Skip to main content

मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी बुधवार, 11/11/2020 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा. मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो. १. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे. २. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला. दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. धन्यवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48150
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

रोहित रामचंद्रय्या साहेब, शुद्धलेखन शिकून घ्या आणि लिहीत जा. मराठी लिखाणासाठी मनःपूर्वक अभिनंदन. काही समाजकंटक सदस्य धाग्यावर येऊन दंगा घालतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

मानवी मनाच्या कार्यप्रणालीचा, तरीही काय वाट्टेल ती फेकाफेक चालवली आहे
मार्ग २. त्या भाषेतील सर्व प्रकारची म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक अशी बाराही काळातली वाक्ये बनवता येण्यासाठी आवश्यक इतपत व्याकरण चोखपणे शिकणे
ही बारा काळातली वाक्य शिकूनच आपल्या इंग्रजीचा बोर्‍या वाजला आहे. प्रेझंट, प्रेझंट परफेक्ट, प्रेझंट कंटीन्यूअस आणि प्रेझंट पर्फेक्ट कंटीन्यूअस इतक्या भानगडी शिकल्यावर वाक्य नेमकं कसं बोलायचं हेच लक्षात येत नाही. अशा प्रकारे तुम्ही भूत आणि भविष्याकाळाचा ही लसूण केला की मग काय चिवडा होईल ते विचारायलाच नको ! त्यात तिथे भविष्यकाळातली वाक्य साफ चुकीची केली आहेत : मी सिनेमाला जाईल ? मी शिक्षक बनेल ? मी आंबा खात असेल ? मी रोज व्यायाम करत जाईल ? आणि अशी भाषा तुम्ही दुसर्‍यांना शिकवता ? याचा अर्थ तुमचंही मराठी धड नाही. कुठे फेडणार हे पाप ?

In reply to by संजय क्षीरसागर

१) तुमचा जगातल्या सर्वच विषयांचा इतका पुरेपुर असल्याची दर्पोक्ती अजून किती काळ चालणार आहे? कोण देतं ही सर्टीफिकेटस तुम्हाला? की स्वत:च स्वत:ला प्रमाणपत्र देता? २) मी दिलेल्या लिंकवर भविष्यकाळातली करेल , जाईल , असेल हे चुकीचे लिहिले आहे हे मलाही माहित आहे.ते संकेतस्थळ माझे नाही. त्यावरचा मजकूर मी लिहिलेला नाही. मी तुम्हाला फक्त बारा काळ माहित व्हावेत या उद्देशाने लिंक दिली होती.कारण तुम्हाला स्वत:लाच व्याकरणात १२ काळ आहेत हे माहित नाहीये.हा तुमचा भाषाशास्त्राचा अभ्यास(???) तुम्ही कुठं फेडणार हे अज्ञान?? ३) आणि धागालेखकाला मराठी मोलकरीण ठेवायला सांगताय.साधारणपणे एखाद्याला भाषा शिकण्याबद्दल सल्ला देताना तो प्रमाणभाषा शिकता येईल असा द्यावा.कुठची मोलकरीण इतकी शिकलेली असते हो? जी शुद्ध , पुणेरी , प्रमाण मराठी बोलते? धागालेखकाला व्हय न्हाईवाली अशुद्ध मराठी शिकवायला बघताय का काय? कुठं फेडणार हे पाप?

In reply to by उपयोजक

.१.
मी तुम्हाला फक्त बारा काळ माहित व्हावेत या उद्देशाने लिंक दिली होती.कारण तुम्हाला स्वत:लाच व्याकरणात १२ काळ आहेत हे माहित नाहीये.
हे तुम्हाला कुणी सांगितलं ? मी सुरुवातीच्याच प्रतिसादात म्हटलंय की आधी व्याकरण शिकल्यामुळे आपल्या इंग्रजीचा बोर्‍या वाजला आहे. मी १२ काळ ही काय भानगडे ? असा प्रश्न केला कारण तुमच्याकडे काही वेगळा पर्याय असावा असा गैरसमज समज झाला. आणि तो तुम्ही लगेचच दूर केलात. बाय द वे, स्वतःच्या लेखनाचा आवाका आणि कंटेंट बघता, इतकं घनघोर अज्ञान प्रकट करण्यापूर्वी, माझ्या इथे प्रकाशित झालेल्या लेखांची नुसती अनुक्रमाणिका बघितली तरी तुम्हाला फेफरं येईल : जनातलं, मनातलं रोमान्स विथ मुझिक 68 जे न देखे रवी... चारीमुंड्या चित 18 जनातलं, मनातलं पुलंचा एक सुरेख लेख ! 57 जनातलं, मनातलं पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ ! 167 जनातलं, मनातलं ग्राहकमंच : सामान्यांचा हक्क ! 54 जनातलं, मनातलं देवाचं नांव कुणी ठेवलं ? 379 जनातलं, मनातलं बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट ! 83 जनातलं, मनातलं नक्की प्रॉब्लम काये ? 222 स्पर्धा [शशक' २०२०] - एफ यू : लॉकडाऊन ! 20 जनातलं, मनातलं अनफेअर चेस ! 23 जनातलं, मनातलं लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी ! 51 जनातलं, मनातलं हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग ! 151 जनातलं, मनातलं कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |३| 1 जनातलं, मनातलं कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |२| 7 जनातलं, मनातलं कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही | 0 जनातलं, मनातलं मोह ! 11 जनातलं, मनातलं मनाच्या बाहेर ! 7 तंत्रजगत वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये 167 जनातलं, मनातलं अँबी वॅली - बियाँड दि हेवन ! 124 जनातलं, मनातलं मी (चुकून) संपादक झालो तर ! 96 जनातलं, मनातलं द क्लिफ ! 22 जनातलं, मनातलं शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ कांचनमृग 3 जनातलं, मनातलं शब्दप्रधान गायकी : यशवंत देव 24 जनातलं, मनातलं नसतेस घरी तू जेव्हा 24 जनातलं, मनातलं हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया 3 जनातलं, मनातलं मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो ! 103 जनातलं, मनातलं आताशा.. असे हे.. मला काय होते 20 जे न देखे रवी... नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने ! 13 जनातलं, मनातलं मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए 4 जनातलं, मनातलं ती सध्या काय करते ? 27 जनातलं, मनातलं नीलकांत आणि प्रशांत, मनःपूर्वक अभिनंदन ! 21 जनातलं, मनातलं नग्नता आणि मुक्ती 16 जनातलं, मनातलं तू बोले तो बन जाऊं मैं, बुल्लेशा सौदाई 21 जनातलं, मनातलं जग घूमेया थारे जैसा ना कोई | 16 जनातलं, मनातलं सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ 252 जनातलं, मनातलं बार-बे-क्यू नेशन, द हेवन! 255 जनातलं, मनातलं बोगदा 91 जनातलं, मनातलं आज जानेकी ज़िद ना करो (दोन) 2 जनातलं, मनातलं आज जाने की ज़िद न करो (एक) 10 जनातलं, मनातलं ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता 67 जनातलं, मनातलं भय इथले संपत नाही (दोन) 33 जनातलं, मनातलं भय इथले संपत नाही (एक) 44 जनातलं, मनातलं कुणी जाल का सांगाल का 76 जे न देखे रवी... गाढव ऐकेना, गाढव समजेना 87 जनातलं, मनातलं बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी 9 जनातलं, मनातलं दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही 21 जनातलं, मनातलं बायकांचे संसारींग-माझा अनुभव 22 जनातलं, मनातलं मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना 30 जनातलं, मनातलं अरविंद बरोबर दीड तास! 214 जनातलं, मनातलं तु तुझे मन फक्त गच्च ठेव, बाकी घोड्यावर सोड 21 जनातलं, मनातलं रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार) 153 जनातलं, मनातलं रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन) 225 जनातलं, मनातलं रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन) 80 जनातलं, मनातलं `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक) 211 जनातलं, मनातलं महाराज 107 जनातलं, मनातलं देहाला चाळुन घेता 24 जनातलं, मनातलं निरक्षर 147 जनातलं, मनातलं बुद्ध 70 जनातलं, मनातलं आवडलेली गाणी : ये मौसम रंगीन समा 14 जनातलं, मनातलं कैसे दिन बीते, कैसे बीती रतिया 8 जनातलं, मनातलं एकहार्ट 84 जनातलं, मनातलं गोल्डफिश आणि गेस्टाल्ट 95 जनातलं, मनातलं द मरुन रोब 99 जनातलं, मनातलं परिक्रमा! 46 जनातलं, मनातलं काल 127 जनातलं, मनातलं पैसा 107 जनातलं, मनातलं देह 28 जनातलं, मनातलं नियती ? नाय नाय टेंपोवरती! 2 जनातलं, मनातलं मास्तर -३ 7 जे न देखे रवी... एका क्षणावरी या 37 जनातलं, मनातलं मास्तर - २ 6 जनातलं, मनातलं मास्तर - १ 9 जे न देखे रवी... निःशब्द तळ्याच्या काठी 13 जनातलं, मनातलं मन : एक नितांत रमणीय प्रवास 2 जनातलं, मनातलं मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास 67 जनातलं, मनातलं मला समजलेले चिऊ आणि काऊ 4 जनातलं, मनातलं ग्रेस बाकी इतका व्यासंग करण्याची तर बातच सोडा कारण तुमच्या जीवनात काही छंद निर्माण होण्याची शक्यता तुम्ही स्वतःच्या अक्कल हुशारीनं बाद करुन टाकली आहे नसत्या उपद्व्यापांतून सुटका ३.
कुठची मोलकरीण इतकी शिकलेली असते हो? जी शुद्ध , पुणेरी , प्रमाण मराठी बोलते?
तुम्ही डोळे मिटून वाचायची कला अवगत केली आहे का ? हा माझा यापूर्वीचा प्रतिसाद नेमका तुमच्या प्रतिसादाच्या वरच आहे .जीवनात हास्य-विनोद नसेल तर काय मजा आहे ? लोक विनोदही सिरियसली घेऊन उच्छाद मांडतात त्याला माझा इलाज नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

हायजॅक केलेले धागे या यादीत अॅड करायचे राहिलेत याची आठवण करुन देऊन खाली बसतो. ;)

In reply to by उपयोजक

हायजॅक केलेले धागे ?
वाचन वाढवा. जिथे धाग्यापेक्षा प्रतिसाद भारी असेल तिथे ते प्रतिसादच धाग्याचं वाचन मूल्य वाढवतात. काही निर्बुद्ध त्याला धागा हायजॅक केला असं म्हणतात पण केवळ प्रतिसादांमुळे असे फालतू धागे वाचकांना अनपेक्षितपणे काही नवं देऊन जातात.

In reply to by संजय क्षीरसागर

म्हणून चिडलात. रच्याकने अध्यात्मात रागावर नियंत्रण कसे ठेवावे? हा भाग येत नाही का? कशात येतो? ;)

In reply to by उपयोजक

नाही म्हणजे कमाल आहे ! कसला आलाय घाव ? इथे तुमच्या आकलनाचे बारा वाजले तर आता मुद्दा सोडून पुन्हा सुरुवात केलीत. परत असं साहस करु नका इतपत समज आली तरी पुरे.

In reply to by संजय क्षीरसागर

बाकी इतका व्यासंग करण्याची तर बातच सोडा कारण तुमच्या जीवनात काही छंद निर्माण होण्याची शक्यता तुम्ही स्वतःच्या अक्कल हुशारीनं बाद करुन टाकली आहे. "महाजनो येन गतः सः पन्थाः" बहुतांश लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जाण्यातच शहाणपणा आहे. छंदबिंद सांभाळत बसण्यापेक्षा ट्रेंडींग असेल ते करावं. भरपूर पैसे कमवणं,लग्झरियस फ्लॅट घेणं, महागडी चारचाकी घेणं, किमान दीड लाखाचा लॅपटॉप वापरणं,भल्या मोठ्या टिव्हीवर वेबसेरिज बघणं याच मार्गाने बहुतांश लोक जाण्याचा प्रयत्न करतात.हेच खरं जीवन आहे हेच खरं जगणं आहे.हे मिळवताना त्यात यश कितपत येईल ही गोष्ट वेगळी पण त्यादृदष्टीने प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्याचीच पहिली पायरी म्हणजे बिनउपयोगाचे छंदबिंद सोडून देणे.

In reply to by शा वि कु

=))

मिपा व्यवस्थापनाने आता फतवा काढावा की मिपावर फक्त सर्वच विषयातील सर्वच कळणारे आयडीच* फक्त लिहीतील. इतरांनी काही लिहील्यास त्यांच्यावर तुटून पडण्याचे अधिकार सर्वच विषयातील सर्वच कळणार्‍या आयडींना दिले आहेत. बुरा ना मानो दिवाली है ;) *सुज्ञांस हे सांगण्याची आवश्यकता नाही की जगात सर्वच विषयातील सर्वच कळणारे कुणीच नाही. मात्र स्वतःबद्दल असा भ्रम असणारे लोक मात्र अस्तित्वात आहेत.

In reply to by संगणकनंद

मिपा व्यवस्थापनाने आता फतवा काढावा की मिपावर फक्त सर्वच विषयातील सर्वच कळणारे आयडीच* फक्त लिहीतील. इतरांनी काही लिहील्यास त्यांच्यावर तुटून पडण्याचे अधिकार सर्वच विषयातील सर्वच कळणार्‍या आयडींना दिले आहेत. 😂

तुमचा मराठीत लेख लिहिण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. लिहीते रहा. मी मिपावर ७ वर्षापासून वाचनमात्र आहे, पण अजुन लेख लिहिलेला नाही. तुम्ही सरळ लेख लिहिण्यापेक्षा, लेख वाचा, लेखांवर प्रतिक्रिया लिहा. एक वाक्याची प्रतिक्रिया द्या, दोन वाक्याची, लेखा पेक्षा मोठी प्रतिक्रिया(ह. घ्या)....मग लेख लिहा. लेख थोडा मोठा लिहा, प्रकाशित करण्यापूर्वी वाचून बघा, जमल्यास कोणाला तरी वाचायला द्या. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ( किंवा जुने मिपा आणि मिपाकर आता राहिले नाही) तुम्ही सुटलात, दुसरा कोणी असता तर मिपाकरांनी बाजार उठवला असता ( कृ. पहावे: मोकलया दाही दिशा, आणि इतर लेख) आणि धागा कर्त्याने इथे किंवा इतर कुठेही लिहिण्याचा नाद सोडला असता.

In reply to by पक्षी

जुने मिपा आणि मिपाकर आता राहिले नाही) तुम्ही सुटलात, दुसरा कोणी असता तर मिपाकरांनी बाजार उठवला असता हा जुने मिपाकर नसण्याचा फायदा म्हणावा की काय? :)

मी सध्या कन्नड शिकायचा प्रयत्न करत आहे . पण अजुन स्वरगळु आणि व्यंजनगळु चालु आहे. ! कन्नड मध्ये दोन स्वर जास्त आहेत त्यांचा उच्चार मला अजुन नीट कळलेला नाहीये ! स्क्रिप्ट वाचता यायला लागली की मला खुप कॉन्फिडन्स येतो , संवाद ऐकुन ऐकुनच शिकता येतात , अर्थात प्रॅक्टिस हवीच ! कॉलेजात असताना बंगाली मित्र असल्याने बंगाली कधी शिकलो ते कळलेच नाही , अगदी फ्लुएंट येत नाही पण कोणी शांतपणे बोलत असल्यास अर्थ लागतो रीतसर !! ह्यानिमित्ताने - मिपावर पुर्वी सीमाभागात रहाणारे एक भाषाअभ्यासक होते त्यांची आठवण झाली - त्यांना मराठी कन्नड आणि तेलगु ह्या तीन्ही भाषा येतात आणि ह्याही व्यतिरिक्त डच , ग्रीक , लॅटीन वगैरे ५-१० अजुन भाषा येतात ! मिपावरील कंपुबाजी आणि सिलेक्टिव्ह टार्गेटिंगला कंटाळुन अनेक चांगले लेखक वाचनमात्र झाले किंव्वा संपुर्ण सोडुन गेले ह्याचे वाईट वाटते कधीकधी!

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद 'मार्कस ऑरेलियस' जी. तुम्ही माझ्याशी वाट्साप 8971168096 वर संपर्क साधू शकतो.

कानडी आणी मराठी नाट्य , सिने कला क्षेत्रामधे अनेक वर्षांपासुन कलेची देवाण घेवाण चालु आहे . गिरिश कर्नाड , शंकर नाग , अनंत नाग या मातब्बर कानडी कलाकारांनी काही उल्लेखनीय मराठी चित्रपटांमधे केलेल्य भुमिका गाजलेल्या आहेत . ( उंबरठा , सर्वसाक्षी ) .