Skip to main content

मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी बुधवार, 11/11/2020 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा. मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो. १. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे. २. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला. दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. धन्यवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48150
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

सर, इकडे बेंगळूरु मध्ये मला मराठी बोलणारे मित्र नाही आहे. म्हणून इकडे लिहून, मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.

In reply to by रोहित रामचंद्रय्या

वरच्या टाईपच्या प्रतिसादांकडे लक्ष नका देउ...हवे ते आणि हवे तितके लिहा

In reply to by रोहित रामचंद्रय्या

घरकामाला, त्यानं तुम्ही पटकन शिकाल. तुमच्या वयाची असेल तर अनेक विषय (भाषेतले) पण कवर होतील. भाषा शिकणं तीन स्टेजेसमधे असतं : बोलणं, वाचणं आणि लिहिणं. तुम्ही नेमकी शेवटची पायरी सुरुवातीला चढायला बघतायं. ते एकदम राँगे.

In reply to by संजय क्षीरसागर

"त्या पेक्षा मराठी बाई ठेवा घरकामाला, त्यानं तुम्ही पटकन शिकाल. तुमच्या वयाची असेल तर अनेक विषय (भाषेतले) पण कवर होतील." "डॉक्टरला काय कळते...मी सगळी औषधे कंपौंडरकडून घेतो" - इति संजय

In reply to by टवाळ कार्टा

वायफळ प्रतिसाद देण्यापेक्षा आता नेमक्या मुद्यावर बोला : १. मराठी तुम्ही कशी शिकलात ? भाषा कायम बोलूनच शिकली जाते, वाचनानं ती समृद्घ होते आणि शेवटी लेखनातून प्रकट होते (अर्थात लेखक / कवि आणि प्रतिभा हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे ) त्यामुळे आपण ही मराठी घरात जन्मून, ती भाषा ऐकून, डायरेक्ट बोलायला सुरुवात केली. का तुम्ही जन्मल्यावर यज्ञ, क्षत्रिय असे शब्द लिहून सुरुवात केलीत ? २. आपल्याला इंग्रजी सफाईदार येत नाही कारण अत्यंत मूर्खासारखी आपण भाषेच्या व्याकरणापासून सुरुवात केली. त्यामुळे बोलतांना कायम चुकायची भीती. आणि धडा घोकून परिक्षेत लिहायता लागलो. बोलण्याचा सराव नाही त्यामुळे भाषेचा सहवास नाही आणि आता चारचौघात इंग्रजी बोलायचं तर लाज वाटते ! ३. भाषा हा सहवास आणि बोलणं यातून शिकायचा विषय आहे हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला गुजराथी शिकायची असेल तर गुजराथी मित्र -मैत्रिणी करुन पाहा, केवळ एक / दोन महिन्यात तुम्ही गुजराथी बोलायला लागाल . मग इंटरेस्ट डिवेलप होऊन वाचायला लागाल आणि शेवटी लिहू शकाल (वाचल्यामुळे) माझ्या प्रतिसादातला विनोदाचा भाग सोडा पण मेथड इक्झॅक्टली तीच आहे. आता बोला.

In reply to by संजय क्षीरसागर

१६ आणे बरोबर संक्षी साहेब आपले. आपल्याला कितीही शिकवले तरी हिंदी वा इतर देशी भाषेच्या काय किंवा इंग्रजी वा इतर कोणतीही परदेशी भाषा काय या जिथपर्यंत बोलता येत नाहीत तिथ पर्यंत समजत नाहीत. त्या दाक्षिणात्य भाषातर लिखित स्वरुपात आंडुगुंडु सगळ्या एकच वाटतात मग काय कप्पाळ लिहणार? तेच लहान बाळाची ती मातृभाषा असल्याने त्याला चटकन बोलता येते आणि व्याकरणा सहित तो ती बरोबर बोलतो आणि मग ६ वर्षाचा झाल्यावर पाटीवर गमभन शिकायला शाळेत जातो. जावु द्या तुमची अनुभवाची शिदोरी इतरांना काय आकलन होणार? फक्त तुम्ही बाई ठेवा असं सांगण्या एवजी घरगडी एव्हढंच कशाला शेजारी पाजारी अथवा मित्र अथवा नेटकरी यांच्याकडुन शिका असं म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे टक्याचा गैर समज झाला नसता.

In reply to by आंबट चिंच

जीवनात हास्य-विनोद नसेल तर काय मजा आहे ? लोक विनोदही सिरियसली घेऊन उच्छाद मांडतात त्याला माझा इलाज नाही ! बाई ठेवणे हा सर्वसमावेशक उद्देश आहे आणि लेखकाला मित्र मंडळी नाहीत त्यामुळे तो पर्याय नुसत्या कल्पनेत सुद्धा किती रंजक वाटतो ते पाहा !

In reply to by संजय क्षीरसागर

हा तुमचा भ्रम आहे. आमच्या मराठी शिकायच्या WhatsApp समुहात एक तेलुगू मुलगा आहे.तो WhatsApp रेकॉर्डिंगमधून कधीच शिकत नाही.त्याला फक्त रोजच्या बोलण्यातील वाक्ये बनवता येतील इतपत व्याकरण शिकवलं.आता बर्‍यापैकी संवाद साधतो तो देवनागरीतून लिहून मराठीमधे.

In reply to by उपयोजक

शिकालात का ? तुम्ही लहान होता तेंव्हा पालकांनी तुमच्या व्याकरणाच्या चुका दुरुस्त केल्या, का जे काही तोडकं, मोडकं बोलत होतात त्याचं कौतुक केलं ? आता याच न्यायानं तुम्ही तुमच्या पोस्टचा सफाईदार इंग्रजी अनुवाद इथे देऊ शकाल का ? नाही तर तुमच्या मराठी शिष्याला इथे लिहायला सांगा म्हणजे सगळं स्पष्ट होईल

In reply to by संजय क्षीरसागर

माणसे बोलतात ती कोणतीही भाषा आपल्याला दोन प्रकारे अवगत होते.दोन्हीपैकी अमुक एक मार्ग श्रेष्ठ नि दुसरा कनिष्ठ असे काही नाही.तुमच्या सोयीनुसार मार्ग निवडावा. मार्ग १. ती भाषा बोलणारे लोक सतत तुमच्याभोवती त्या भाषेतून बोलत असणे.आपल्याला आपली मातृभाषा याच मार्गे येते.मराठी लोकांना हिंदी बर्‍यापैकी किंवा चांगल्याप्रकारे सहज बोलता येण्यात हिंदी सिनेमे आणि टिव्हीवरच्या हिंदी मालिका/रिऍलिटी शोज यांचा सिंहाचा वाटा आहे. पण यामार्गे भाषा येण्यासाठी बराच कालावधी(काही वर्षे) जातो. कारण बोलणारे लोक तुम्हाला दरवेळी शब्दांचे अर्थ नि त्यांची वळणं, त्यांचे उपयोग , व्याकरण उलगडून सांगत बसत नाहीत.या मार्गाने भाषा शिकणे हे शक्य तितक्या लहान वयात होणे चांगले.कारण लहान मुलांकडे रिकामा वेळ भरपूर असतो, कुतूहल भरपूर असते.प्रौढ वयातल्या लोकांचे व्याप जास्त असतात.त्यामुळे शिकलेले झपाट्याने विसरणे सहज शक्य असते.या मार्गाने शिकायला फार वेळ लागत असला तरी स्मरणावर ताण कमी येतो.कारण ती भाषा सहज बोलणारे लोक स्वत:च सतत तुमच्या कानावर ती भाषा अादळवत असतात. आपोआप भडीमार करत असतात.तुम्हाला भाषा निवांतपणे शिकणे चालत असेल आणि स्मरणशक्तीलाही फार ताण द्यायचा नसेल तर हा मार्ग वापरावा. मार्ग २. त्या भाषेतील सर्व प्रकारची म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक अशी बाराही काळातली वाक्ये बनवता येण्यासाठी आवश्यक इतपत व्याकरण चोखपणे शिकणे.मोठ्या व्यक्तींची आकलनक्षमता जास्त असते.त्यामुळे प्रौढ व्यक्तीला हा मार्ग सोपा जातो.या मार्गाने भाषा शिकण्यास कालावधी कमी लागतो.वाक्ये बनवण्यात यश लवकर मिळत असल्याने शिकणार्‍याचा हुरुप वाढतो.तुमच्याकडे वेळ कमी असेल पण तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर हा मार्ग वापरा.

In reply to by संजय क्षीरसागर

भाषा शिकणं तीन स्टेजेसमधे असतं : बोलणं, वाचणं आणि लिहिणं. तुम्ही नेमकी शेवटची पायरी सुरुवातीला चढायला बघतायं. ते एकदम राँगे.
हे नेहेमीच शक्य होते असे नाही.मी बेंगलोरमध्ये असताना सर्वप्रथम कानडी वाचायला शिकलो.(दुकानाच्या पाट्या वाचायचो) आणि आता बर्यापैकी वाचता येते.

In reply to by कानडाऊ योगेशु

ಕನ್ನಡ ಅಕ್ಷರಮಾಲೆ काय घंटा वाचणार हे ? मी स्वतः इंग्रजी वाचून शिकलो कारण स्क्रीप्ट माहिती होती आणि अनेकांच्या बाबतीत अशीच शक्यता आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संजयजी माझ्याकडे, दोन इंग्रेजी पुस्तक 'Marathi Pravesh ( An easy book to learn Marathi) Part 1 and 2 by B V Keluskar' आहेत. धन्यवाद

In reply to by रोहित रामचंद्रय्या

त्या पुस्तकाचं वाचन करुन शिकलेलं कुणाशी तरी बोलायचा सराव करा. शिकलेलं बोलत गेलं तरच भाषेचा आत्मविश्वास वाढतो. एकदा बोलता यायला लागल्यावर लिहिणं फारसं अवघड नाही. थोडंफार शुद्ध लेखन इकडे-तिकडे होईल पण वाचतांना तुम्ही लक्षपूर्वक वाचलं असेल तर लिहितांना ते शब्द डोळ्यासमोर येतात. शिवाय शुद्धलेखनामुळे उच्चारण योग्य होतं. आता मी तुम्हाला शेवटच्या पायरीपासून सुरुवात करु नका असं का म्हणालो ते कळलं असेल, आणि इथे काही सदस्यांनी किती छपरी प्रतिसाद दिलेत आणि कुणाला नेमकं किती कळतंय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेलच. शुभेच्छा !

In reply to by संजय क्षीरसागर

धन्यवाद केदारजी. 'उपयोजक'जी के वाट्साप ग्रूप जाइन हुआ हू. वहा शुद्धलेखन सीख रहा हू. I hope to find some Marathi friends here as well.

In reply to by रोहित रामचंद्रय्या

बोलण्याच्या सरावातून ते आपोआप येईल आणि तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा. असा कॉन्फिडन्स हवा....बाकी वरचा प्रतिसादच बेस्ट नाहीये (कदाचित पहिलाच "नॉन-बेस्ट प्रतिसाद पडला असेल) वरच्या वाक्यात "प्रतिसाद" ऐवजी "लेख आणि प्रतिसाद" असा बदल सुचवतो नाहीतर तुमचे लेख बेस्ट नसतात असाही अर्थ निघू शकतो (मराठी भाषा वळवावी तशी वळते हो)

In reply to by टवाळ कार्टा

त्यामुळे मुद्दा कसा पकडतात, तर्कसंगत कसं लिहावं याचं प्रॅक्टीकल ट्रेनींग लेखकाला मिळेल. शिवाय प्रतिसादात सर्वस्वी नवा अप्रोच असतो त्यामुळे मराठीत विचार करायची सवय लागेल. एकदा इंटरेस्ट निर्माण झाला की लेख/ कथा/ कविता ते आपसूक वाचतील.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा.
"आणि एक दिवस हाकलपट्टी करुन घ्या" हे लिहायचं राहीलं सर्वज्ञजी.

In reply to by रोहित रामचंद्रय्या

आमचा मराठी लिहायला वाचायला बोलायला शिकण्याचा मोफत WhatsApp समूह आहे.तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमचा WhatsApp नं व्यनि करा.

मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.
अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अवश्य शिका आणि लिहीत रहा. मुख्य म्हणजे तुम्ही कानडी असल्यामुळे पुणेरी, खानदेशी, विदर्भी वगैरे मराठीपेक्षा एका वेगळ्या प्रकारच्या मराठीशी वाचकांचा परिचय होईल. कर्नाटकातील मराठी मंडळे, तिथली संस्कृती, निसर्ग, कानडी लेखकांचा परिचय वगैरेवर अवश्य लिहावे.

तुमचे मिशन भारी आहे. लिहीत राहा. मराठी पुस्तके वाचा, उपयोग होईल.

In reply to by शा वि कु

मी जि ए कुलकर्णि, गो नि दा, तेंडुलकर यांचे पुस्तक वाचलो. महिन्यात एक मराठी चित्रपट नक्कीच पाहतो.

In reply to by रोहित रामचंद्रय्या

पुस्तके तुम्हाला कशी वाटली हे ऐकणे फार रोचक वाटेल. त्यावर वाटले तर नक्की लिहा.

In reply to by रोहित रामचंद्रय्या

दु आय दी हाय का काय ?

In reply to by कपिलमुनी

G A Kulkarni

रोहीतभाऊ, तुम्ही कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या देशात अधिकृत अशा २२ भाषा आहेत. आणि त्यांच्या बोली भाषांसहीत इतरही असंख्य भाषा आहेत. त्यांच्याबद्दल आदर, आपुलकी असणे ही मोठी गोष्ट आहे; जसे तुम्ही कन्नड भाषिक असूनही तुम्हाला मराठी लिहायला शिकायची आहे. काही अडलं तर विचारा, लोक आत्मीयतेने सांगतील. तुम्ही काही कन्नडप्रचूर शब्द लिहीलात तर त्याचा अर्थ विचारतील; जसा विजूभाऊंनी "अतिनैज नटन" या शब्दाचा अर्थ विचारला. मना लय भारी वाटला येक कन्नड मानुस मराटीत लिवायला शिकताय हा बगुन. लिवा तुमि. आमि वाचु* * हे वाक्य संगमेश्वरी/बाणकोटी या बोलीभाषेतील आहे, जी भाषा रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग यातल्या ग्रामिण भागात बोलली जाते.

तुमच्या लेखनात (खरे तर टंकनात) सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याही लेखनात काही शुद्धलेखनाच्या आणि इतरही काही चूका असू शकतात. पण एक मराठी भाषीक व्यक्ती म्हणून मी तरी असेच लिहीन. जे माझ्याकडूनही चूकीचं लिहीलं आहे ते कदाचित मिपाकर सुधारतील. ======================================================================================= नमस्कार मित्रानो. >> नमस्कार मित्रांनो डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा. >> डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाली तर क्रुपया सुधारणा करा. मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. >> मी जेव्हा ठाण्यात होतो (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेतील एक ऐतिहासिक चित्रपट पाहीला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो. >> या चित्रपटात मला आवडलेल्या गोष्टी खाली लिहीतो. १. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे. >> हा चित्रपट ऐतिहासीक असूनही अतिशय साधा आहे २. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला. >> या चित्रपटात मला मराठी संस्कृतीची झलक दिसली. दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. (आमचा एक मित्र हे असं इंग्रजी वाक्य देवनागरी लिपीत लिहीतो 😂) धन्यवाद

In reply to by सतिश गावडे

Dear Sir, Thanks a lot for your kind words and help with Marathi language. I had not noticed the English keyboard option. Could you please translate this into Marathi. I hope to sharpen my Marathi writing skills and write longer articles in the language. धन्यवाद

मला वाटलं, तुम्हाला आवडलेल्या कोणत्या मराठी चित्रपटावर लिहिलंय की काय. असो, येत राहा, लिहिते राहा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

तुमचा मराठी लेखन करण्याचा प्रयत्न पाहून मौज आणि कौतुक वाटलं. लिहीत रहा, प्रत्येक वेळी अधिकाधिक सुधारणा करत रहा. गृहपाठ: पु ले शु म्हणजे काय हे ओळखा!

तुम्ही जर सिमा भागातील असाल तर अथवा कोण मित्र जर असतील तर खुप लवकर मराठी लिहायला शिकाल. एक प्रश्न होता, मि माझ्या किती तरी कन्नड मित्रांना विचारले होते, ते सांगत नाहीत. आरीयेरू म्हणजे नक्की काय?

In reply to by भीमराव

माझा अंदाज सांगतो. येरू म्हणजे बावळट. येरागबाळा या अर्थी. आरी म्हणजे 'हा तर'. आरीयेरू = हा तर बावळटे ! -गा.पै.

In reply to by रोहित रामचंद्रय्या

Thanks, Please translate your translate famous Kannada stories and poems in Marathi for us.

In reply to by भीमराव

जरी तुमचा प्रश्न "आरीयेरू म्हणजे नक्की काय?" असला तरी कदाचित ऐकताना नक्की शब्द न कळल्याने प्रश्न विचारताना काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते. जर तो शब्द "आवरु यारु" असा असेल तर अर्थः आवरु = ते (तो चे अनेक वचन); यारू= कोण. म्हणजे ते (लोक) कोण (आहेत)

In reply to by शेखरमोघे

Sir, What you said is true. But, it is 'अवरु यारु' not 'आवरु यारु'. I am from South Karnataka. I do understand the North Karnataka slang. I had read in a Kannada novel, 'Theru' (तेरु) म्हण्जे रथ, which was written by Raghavendra Patil, who hails from Belagaum region and the story is also set there. This novel has also won the Kendra Sahithya Academy Award. In that story, one of the characters goes to 'Arera Nadu', 'नाडु' म्ह्ण्जे राष्ट्र, and that Arera Nadu is Maharashtra. The author as specifically mentioned that in that region Maharashtrians are know as 'Areru', grammatically in Kannada, 'Areru' (आरेरु) is a spoken form of the word 'Ariyeru' (आरियेरु). धन्यवाद

In reply to by रोहित रामचंद्रय्या

The author has specifically mentioned that in that region Maharashtrians are know as 'Areru', grammatically in Kannada, 'Areru' (आरेरु) is a spoken form of the word 'Ariyeru' (आरियेरु).

In reply to by भीमराव

जरी तुमचा प्रश्न "आरीयेरू म्हणजे नक्की काय?" असला तरी कदाचित ऐकताना नक्की शब्द न कळल्याने प्रश्न विचारताना काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते. जर तो शब्द "आवरु यारु" असा असेल तर अर्थः आवरु = ते (तो चे अनेक वचन); यारू= कोण. म्हणजे ते (लोक) कोण (आहेत)

रोहित रामचंद्रय्या, तुमच्या प्रयत्नांचं कौतुक आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. हल्ली मुंबई वगैरे मोठ्या नगरांत मराठी असणे केवळ नावापुरतं राहिलं आहे. बरेचसे 'मराठी' लोकं इंग्रजी भाषेतनं शिकलेले असल्याने मराठीच्या खुब्या त्यांना अवगत नसतात. किंवा त्यांच्याकडून तशी अपेक्षा तरी नसते. अर्थात, यांसही सन्माननीय अपवाद आहेत. पण इथे मिसळपाव वर तुम्हाला प्रत्यक्ष मराठीतून शाळा शिकलेले लोकं भेटतील. त्यामुळे मराठीतून व्यक्त कसं व्हावं यावर थेट उदाहरणं उपलब्ध होतील. सुस्वागतम. :-) आ.न., -गा.पै.

रोहित - तुमचे मिसळपाववर स्वागत आहे. एक नवी भाषा शिकताना मिसळपावसारख्या व्यासपीठावर लिहिण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. या मार्गावरच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा!! एक सूचना: मनोगत.कॉममनोगत.कॉमवर सदस्यत्व घेतल्यास त्यांचा शुद्धिचिकित्सक वापरता येतो.