Skip to main content

घडामोडी नोव्हेंबर २०२०

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 30/10/2020 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्‍याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते. आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील . युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्‍या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्‍यापैकी कमी पडतात. असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे. फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्‍या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism *घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

वाचने 88944
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

एक भगवे कपडे घातलेला साधू. एक निर्वूत सैनिक. त्यानं शोधलेले अर्धवट विचारवंत. एक bjp च तेवढंच हुशार नेता. असे सर्व हजर असतात. हे म्हणजेच देश असा एक ह्यांचा बालिश विचार आहे. अलिबाग बाग मध्ये अटक झाल्यावर bjp कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देत होते जसा कोणी देशाचा योद्धा च तुरुंगात आहे. देशाच्या स्वतंत्र लढ्यात काडीचे पण योगदान नसणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देतात. लय म्हणजे लय हसायला येत होते.

एक भगवे कपडे घातलेला साधू. एक निर्वूत सैनिक. त्यानं शोधलेले अर्धवट विचारवंत. एक bjp च तेवढंच हुशार नेता. असे सर्व हजर असतात. हे म्हणजेच देश असा एक ह्यांचा बालिश विचार आहे. अलिबाग बाग मध्ये अटक झाल्यावर bjp कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देत होते जसा कोणी देशाचा योद्धा च तुरुंगात आहे. देशाच्या स्वतंत्र लढ्यात काडीचे पण योगदान नसणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते वंदे मातरम् च्या घोषणा देतात. लय म्हणजे लय हसायला येत होते.

In reply to by Rajesh188

सध्याच्या कोणत्या पक्षाचे देशाच्या स्वतंत्र स्वातन्त्र्य लढ्यात योगदान होते? वंदे मातरम् ही घोषणा देण्यासाठी देशाच्या स्वतंत्र स्वातन्त्र्य लढ्यात योगदान देण्याची आवश्यकता असते का?

अर्णब ला अटक हि रायगड पोलिसांनी केली आहे. महाराष्ट्राचे आत्ताचे गृहमंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत.. आणि केस reopen अन्वय नाईक यांच्या पत्नीने केली आहे.. मला प्रश्न पडतात 1. केस कुठलीही न्यायालयीन चौकशी न होता दोन अडीच वर्षांपूर्वी बंद केली जाते, यात तेंव्हाच्या गृहमंत्री असलेल्या नेत्याला प्रश्न विचारले पाहिजेतच ना? 2. आरोपाखाली अटक झाली, कारण आत्महत्या केलेल्या चिठ्ठीत अर्णब चे नाव होते.. यावर केस चालू होउदे, आरोप प्रत्यारोप आणि नंतर न्याय न्यायालय देईल.. यात अर्णब दोषी नसेल तर सुटेल. पण हि पत्रकारीतेवरचा हल्ला आहे वगैरे देशाचे माननीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते करतात, हि आणीबाणी परिस्थिती वगैरे बोलतात काय आहे हे.. मग ह्याच धर्ती वर अलीकडे माजी अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांना न्यायालयाने क्लीन चिट दिली तेंव्हा तुम्ही सत्तेचा गैरवापर करताय असे कोणी म्हणाले का? वद्रा ला जेल मध्ये टाकणार असे बोलणारे इतके वर्ष कुठले पुरावे घेऊन बोलत होते.. जो आरोपी त्यावर केस चालवा ना, त्यात पत्रकार, नेते फलाना मध्ये येतेच का? आणि सुशांत सिंग च्या आत्महत्येला कोण जबाबदार तसेच अन्वय च्या आत्महत्येला कोण जबाबदार हे तरी कळूद्या.. मग अभिनेत्याला वेगळा न्याय आणि व्यावसायिकाला वेगळा न्याय असे का? जर तो आरोपी नसेल, त्याने सर्व पैसे रिटर्न केले असतील तर तो सुटेल.. तसेही 2 लाखाच्या वर cash व्यवहार होत नाहीत ना 2016 पासून, मग तर पाऊण कोटी पेक्षा जास्त रक्कम आहे ती, त्याने बँक अकाऊंट, चेक फलाना ने दिलीच असेल तर सुटेल... यात पत्रकारीता मध्ये का आणली जातेय? उद्या पत्रकार काहीही करतील आणि अटक केल्यावर पत्रकाराला अटक म्हणताल की संशयित आरोपी ला अटक?

एखाद सोपा प्रश्न मी पण विचारावा म्हणतो. पहिलं नाव ज्याने जास्त पैसे बुडवले त्याच्यापासुन सुरुवात करतात जनरली. (असो आत्महत्येची मानसिकता झालेला माणुस कदाचित ते ताळतंत्र विसरला असावा म्हणुन सोडुन देवु) ज्यांच्या मुळे संबंधितांनी आत्महत्या केली त्या तिघांची नाव सगळ्याच ठिकाणी एकत्रच नी सतत घेतली जातात. अस असुनही, मग या सगळ्यांच एवढ वाढीव प्रेम त्या ठो ठो बोंबलणार्‍या एकट्या अर्णबवरच कां उतु जातय????? त्या "नॉटी"च काय म्हणण आहे यावर त्यांनी काही प्रगल्भ भाष्यवगैरे केलेय काय?

In reply to by इरसाल

प्रश्न बरोबर आहे एकट्याच्याच नावे का ओरडले जातेय.. न्यायालयात मात्र मरणापूर्वी चिठ्ठीवर नाव कोणत्याही क्रमवारी वर असले तरी गुन्हा त्यामुळे कमी जास्त होत नाही.. अवांतर : आत्महत्येला प्रवृत्त केले असे सिद्ध झाल्यास काय शिक्षा असते हे मला माहित नाही.. अर्णब चेच सुशांत बद्दलचे episod पाहावे काय या माहितीसाठी..? नाही न्याय न्यायालय देतात कि न्यूज चॅनेल वाले असाच प्रश्न त्यावेळी पडत होता.

In reply to by गणेशा

काय शिक्षा असते ? Section 306 in The Indian Penal Code 306. Abetment of suicide.—If any person commits suicide, whoever abets the commission of such suicide, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine.

In reply to by गणेशा

अर्थात पैसे बुडवले म्हणून आत्महत्येला प्रवृत्त केले असे सिद्ध होऊ शकत नाही. पहिला प्रकार दिवाणी न्यायालयात, दुसरा गुन्हे न्यायालयात. खरं सांगायचं तर आत्महत्येला प्रवृत्त करणे हे prove करणे प्रचंड अवघड आहे. आत्महत्या करण्यासाठीचा दबाव तुम्ही डायरेक्ट टाकला आणि त्याशिवाय त्या व्यक्तीकडे दुसरा पर्याय नव्हता हे सिद्ध करावं लागतं. ही केस होपलेस आहे हे त्या व्यक्तीच्या बायकोला ही बहुधा माहीत असावं. पण बहुधा दुसरीकडून चाव्या फिरवल्या जातायत, मराठी मराठी चा गजर केला जातोय आणि यडे मराठी लोक सरकारच्या illegal गोष्टींवर टाळ्या वाजवताहेत.

In reply to by इरसाल

पहिलं नाव ज्याने जास्त पैसे बुडवले त्याच्यापासुन सुरुवात करतात जनरली. (असो आत्महत्येची मानसिकता झालेला माणुस कदाचित ते ताळतंत्र विसरला असावा म्हणुन सोडुन देवु)
तुमच्या या ताळतंत्र विसरला असु शकतो, या वाक्यामुळे मी बऱ्याच घटना, काही vedio, केस या संबंधी माहिती मिळतेय का पाहिली.. शेवटी पहिले नाव अर्णब चे का याची उकल मला आत्ता मिळाली.. अर्णब चा project त्याचा आत्महत्या करण्या पूर्वीचा शेवटचा project होता.. मला वाटते काही लोक जास्तीत जास्त sastain करत असतील पण शेवटच्या धक्क्याला असह्य होत असतील. आणि त्यामुळे चिठ्ठीत शेवटी बुडवणाऱ्याचे नाव आधी असेल. असो.

In reply to by गणेशा

आणी असच जर असलं तर राहुदे त्याला मधे. आणी दररोज थोडा थोडा प्रसादही गेत चला म्हणा. पण तरीही अस असताना कुटुंबिय असा दुजाभाव का करत असावेत?

अप्रिय अर्णब आणि सपोर्टर्स, महाराष्ट्रात तुला अटक होऊन कायदेशीर कारवाई होते आहे, तुला न्याय मिळेल, उत्तर प्रदेश मध्ये असतास तर मुंबईहून अलिबागला जाताना गाडी पलटी झाली असती तू पळून जाताना तुला गोळ्या घातल्या असत्या आणि हाथरसप्रमाणे तुला मध्यरात्री कोणाला ना सांगता जाळले असते , त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे आभार माना

In reply to by सॅगी

तुम्हाला हवे असेल तर उत्तर प्रदेश मधील पत्रकरांच्या हत्या पण शोधा . बाकि माफिया असायला हातात बंदूक लागते असे नाही.

In reply to by कपिलमुनी

हो, पण विकास दुबे हा गुंड होता. चकमकीच्या काही दिवस आधी त्याने पोलीसांवरही हल्ला केला होता, काही पोलीस त्यात मारलेही गेले होते. आता अशा लोकांना न्यायालयाच्या मार्गाने जाउन वर्षानुवर्षे पोसत बसायचे (तेही जनतेच्या पैशाने) की ठोकायचे?

In reply to by सॅगी

न्यायव्यवस्था सुधारायची की हा मनमानी शॉर्टकट मारायचा? तोही स्वतःच्या किंवा बोलवत्या धन्याच्या सोयीप्रमाणे?

In reply to by तुषार काळभोर

८० व ९०च्या दशकात मुंबई पोलिस अनेक्वेळा शॉर्टकट मारायचे रे पैलवाना. गम्मत म्हणजे तत्कालिन सत्ताधार्याना किंवा पोलिस अधिकार्याना जास्त प्रश्न विचारले जात नसत. शॉर्टकट मारणार्या ह्या अधिकार्याना "एन्काउन्टर स्पेशलिस्ट" म्हणत.

In reply to by तुषार काळभोर

पण ते काम एका रात्रीत होणारे आहे का? आणि तोवर हे असले गुंड ज्यांना पोलीसांचेही भय नाही अशांना पोसायचे? पोलीस संरक्षण द्यायचे?? उद्या ह्याच न्याय व्यवस्थेने त्यांची सुटका केली की पुन्हा ते समाजाच्या डोक्यावर मिरे वाटायला मोकळे.....

In reply to by तुषार काळभोर

त्या गुंडांनी कायद्याला आणि कायद्याच्या रक्षकांना (आणि निरपराध नागरिकांना) ठोकण्यापेक्षा गुंडांनाच ठोकलेलं बरं...

In reply to by सॅगी

ते गुंड आहेत आणि त्यांनी अमूक एक गुन्हा केला आहे (जो त्यांना मारून टाकण्याची शिक्षा देण्याएवढा मोठा आहे) , हे कोण ठरवणार? पोलीस? पत्रकार? राजकीय व्यक्ती? समाज? समाज माध्यमं? न्यायव्यवस्था? यातील सर्वात विश्वासार्ह संस्था कोणती आहे? यातल्या कोणत्या संस्थेकडे 'एखाद्या गुंडाचं एन्काउंटर करायचं की नाही' याचा अधिकार (सद्य परिस्थितीमध्ये) असायला हवा?

In reply to by तुषार काळभोर

जे गुंड असतात त्यांची कुंडली पोलीसांकडे असतेच, त्यामुळे हा अधिकारही त्यांच्याकडे असायला हवा...

In reply to by सॅगी

काहीतरी गडबडतंय. मी सागर गुरव यांच्या 'पोलीस' या प्रतिसादाला उपप्रतिसाद देतोय, तर हा इथं येतोय!

In reply to by सॅगी

पोलीस सर्वाधिक विश्वासार्ह आहेत असे तुम्हाला नक्की वाटते? ते तटस्थपणे, निस्पृहपणे निर्णय घेऊन ठोकतील असे नक्की वाटते?

In reply to by तुषार काळभोर

जे गुंड पोलीसांना/नागरिकांना उपद्रव करत असतील, ज्यांची मजल पोलीसांवर हात उचलण्यापर्यंत/मारण्यापर्यंत गेली असेल अशांना पोलीस तटस्थपणे, निस्पृहपणे निर्णय घेऊन ठोकतील असे मला नक्की वाटते.

In reply to by सॅगी

अभिनंदन!

In reply to by सॅगी

NL मधल्या मेघनाद नावाच्या व्यक्तीने दुबेचा एन्काऊंटर होणार, असे प्रेडिक्शन केले होते, तेव्हा लागलीच पुढच्या दिवशी एन्काऊंटर झाले नाही म्हणून अर्णब गोस्वामीने नॅशनल टेलिव्हिजनवर NL ची "सेलआऊट्स, फेक न्यूज" अशी भलावण केली होती. प्रेडिक्शन खरे ठरल्यावर माफी वैगेरे मागणे तर अर्णबच्या तत्वातच नाही.

In reply to by सॅगी

@ सागर मस्तच लॉजीक आहे... करेक्शन... मुनी आणि त्यांचे प्रतिसाद यात अनेकदा लॉजीकचाच आभाव असतो ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?

In reply to by कपिलमुनी

फेक एन्काउन्टर म्हणजे खोटी चकमक ही मुंबई पोलिसांचीच देशाला दिलेली भेट आहे हो मुनी. ८०च्या दशकात रिबेरो कमीशनर असताना हे चालु झाले होते. कधी दाउद टोळीतल्या 'शार्प शूटर' ला मार तर कधी राजन्/शकिल/गवळी वगैरे. पकडलेल्या गुंडाची किंमत दुबईला फोन करून विचारली जाते.. सौदा पटला नाही तर मग चकमकीत मारले जाते. https://www.amazon.com/Maximum-City-Bombay-Lost-Found/dp/0375703403/ref… मॅक्सिमम सीटी ह्यात विस्त्रुत वर्णन केले आहे.

अर्णबच्या नाव आले तरी त्याला हात लावू नये अशी अपेक्षा आहे काय ? दोन वर्षे का लागली हा योग्यच प्रश्न आहे, पण त्याच्या मुळाशी मिळणारे उत्तर का कोणाला माहित नाही ? तेव्हा उगाच वेड पांघरून पेडगावला कशाला जा ? नशीब, लायबल (अब्रूनुकसान) आणि सेडिशन सारखे कायदे वापरले नाहीयेत. एक स्टॅन्डअलोन केस आहे, अर्णबला पूर्ण संधी आहे बचावाची आणि सर्वात मोठ्ठा राष्ट्रीय पक्ष पाठराखण करतोय. काय होत नाही त्याला.

कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात न्यायासाठी अजुन एक मागणी आली आहे. पाहु या पुढे काय होते या मागणीचे...

In reply to by सॅगी

२ दिवस जाऊनही अजुन पुढे काही बातमी नाही... कायदा काहींसाठी जरा जास्तच समान असतो असे ऐकले होते....कायद्याच्या राज्यात ते खोटे ठरावे ही अपेक्षा...

अर्णव आणि bjp सोडली तर कोणत्याच मीडिया ग्रुप ला,पत्रकारांना राज्य सरकार दडपशाही करतेय असे वाटत नाही राज्यसरकार वर टीका तर अनेक पत्रकार,न्यूज पेपर,न्यूज चॅनेल वाले करत असतात त्यांचा वर कधीच राज्य सरकार नी दबाव आणला नाही. अर्णव सोडून बाकी कोणालाच महाराष्ट्र मध्ये आणीबाणी सदृश स्थिती आहे असे वाटत नाही. फक्त हा अर्णव ज्याला पत्रकार म्हणता येणार नाही आणि जे तो करत आहे त्याला पत्रकारिता म्हणता येणार नाही. White कॉलर गुंड च आहे तो आणि त्याच्या वर गुंड वर जशी कारवाई करायला हवी तशीच कारवाई केली गेली आहे ह्या बद्द्ल देश भरातून महाराष्ट्र सरकार चे अभिनंदन लोकशाही प्रेमी लोक करत आहेत. फक्त भक्त,आणि त्यांचे आका डोळे, कान,बंद करून बसले आहेत

In reply to by Rajesh188

राज्यसरकार वर टीका तर अनेक पत्रकार,न्यूज पेपर,न्यूज चॅनेल वाले करत असतात
मराठी पत्रकारांबद्दल बद्दल बोलायचे झाले जमलंच तर कधी एबीपी माझा, झी २४ तास च्या पत्रकारांचे ट्विटर हॅन्डल पाहून घ्या, सगळे राज्य सरकारची तळी उचलण्यात धन्यता मानतात आणि त्यातले काही तर सिल्वर ओक च्या गेटवरच बसलेले आढळतील.

In reply to by Rajesh188

ही मते उद्या जर राजदीप किंवा बरखा ला TRP घोटाळ्यात अटक झाली तर तशीच राहुदेत अश्या शुभेच्छा देतो.. निवडणुका संपल्या आहेत आणि हिशेब चुकते करायची वेळ आलेली आहे..

In reply to by आनन्दा

आनंदा.. असं होत नाही.. त्यावेळेस मग लोकशाही वर हल्ला.. आणीबाणी, फॅसीजम , भगवा दहशवाद, संविधानावावर हल्ला आणि अश्या बऱ्याच नसलेल्या गोष्टी देशात तयार होतात.. अवॉर्ड शोधून शोधून परत करण्यासाठी धावपळ सुरु होते..

तसंही अर्णवला आवरायची खलबतं सरकारी पातळीवर चालली होतीच. अर्णवने मविआ च्या शेपटावर पाय दिला. म्हणुन त्याला उचलला. कंगनाने टीवटीव केली. तिचंही ऑफीस मोडलं. हे दोघेही केंद्र सरकारच्या/सत्ताधीश पार्टीच्या आशिर्वादाखाली वटवट करायचे असा लोकांचा रास्त समज आहेच. शिवाय त्यांचा डोक्यात जाणारा आविर्भाव... त्यामुळे जनसामान्यांची सहानुभूती फार काहि मिळाली नाहि. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अनेकांशी पंगा घेतलेला, शिवाय मिडीया आणि मनोरंजन क्षेत्रात मविआ समर्थकांची लॉबी आहेच. त्यामुळे तिथुनही पाठिंबा यथातथाच. आता पुढे काय होणार? कदाचीत अर्णव परत आपल्या व्यवसायात परतेल. कंगनाचं करीअर बहुतेक दोलायमान राहील. भाजप तर तसंही नामानिराळा राहुन दुसरा एखादा अर्णव/कंगना सोडेल मविआ वर. फायदा झाला एकट्या पवार साहेबांचा. अर्णवची खोड मोडली. शिवसेनेची बदनामी करवली. सेनेला तसा काहि फरक पडत नाहि हा भाग वेगळा. सेना-भाजप मधली दरी रुंद केली. सेना भाजपाविरुद्ध आक्रमक मूड मधे आली आहेच बर्‍याच महिन्यांपासुन. सेनेला दुसरा पर्याय देखील नाहि. पण सेनेची पुण्याई संपत चालली दिवसेंदिवस. हि देखील पवारांचीच इच्छा. पुढील काहि महिन्यात सेनेवर आणखी व्यवस्थीत शिंतोडे उडवले कि अडीच वर्षांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला सोपवण्याची मागणी सुरु होईल. हा सर्व खेळ त्यासाथीच चालला असावा कदाचीत. एकदम झकास.

In reply to by अर्धवटराव

फायदा झाला एकट्या पवार साहेबांचा. अर्णवची खोड मोडली. शिवसेनेची बदनामी करवली. सेनेला तसा काहि फरक पडत नाहि हा भाग वेगळा. सेना-भाजप मधली दरी रुंद केली.
जो बायडेन निवडुन यावेत व ट्रम्प पडावेत म्हणून पवार प्रयत्नशील आहेत असेही काहीजण म्हणत आहेत. असो. हलकेच घेणे. आक्रस्ताळी भाषेमुळे अर्नबला अनेक्जण वैतागले होते. त्यात त्याच्या चॅनलच्या लोकप्रियतेमुळे अनेक चॅनल्वाल्यांच्या पोटात दुखत होतेच. आता पोलिसानी ही केस बंद का केली होती, हे कोर्ट विचारेल कदाचित व पोलिसाना स्पष्टिकरण द्यावे लागेल. भाजपावाले आता बॅकफूटवर गेले आहेत. आता कोण काय खेळी करतात ते बघायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कदाचीत थोडंफार लॉबींग केलेंही असतं पवारांनी ;) मोदिंनीही केलं असं म्हणतात. असो. आपण कितीही तर्क लावतो म्हटलं तरी आपल्याला किती आणि काय कळणार त्यातलं...

In reply to by अर्धवटराव

त्याच मुळे अटक अर्णव सारख्या फालतू व्यक्ती ची मुख्यमंत्री सेनेचा पण bjp आरोप करत आहे काँग्रेस वर . ती राष्ट्रवादी किंवा सेना ह्यांना जाहीर दोष देत नाही. म्हणून पप्पू सेना असे वाक्य असते. राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी,सेना एकत्र असतील तर bjp ni किती ही उड्या मारल्या तरी त्यांना इथे सत्ता मिळूच शकत नाही. महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्या राज्यातून सर्वात जास्त पैसा राजकीय पक्षांना मिळतो हेच राज्य जर bjp शासित नसेल तर bjp ची मस्ती पुढील 5 वर्षातच उतरेल . सेने सहित बाकी दोन्ही काँग्रेस चांगले मुरलेले खेळाडू आहेत. Bjp सारख्या सत्ता pippasu पक्षाला ते संधी देणारच नाहीत.

In reply to by Rajesh188

Bjp सारख्या सत्ता pippasu पक्षाला ते संधी देणारच नाहीत.
भाजपा सत्तापिपासु, आणि इतर पक्ष काय समाजसेवेकरता आलेत का? सत्ताकांक्षा हेच सर्वांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. सद्यः परिस्थिती अशी आहे कि युती करण्याची सर्वाधीक गरज राष्ट्रवादीला आहे, पण पवारांनी राजकारणच असं केलय कि राष्ट्रवादी बरोबर युती करण्याची शर्यत भाजपा आणि सेनेत लागली आहे. या सर्व प्रकरणात काँग्रेसला काहिच चॉईस नाहि. म्हणुनच भाजप राष्ट्रवादीला दोष देत नाहि, आणि सेनेचं नाक कापायचं पुण्यकर्म पवारांच्या हातुनच व्हावं अशी भजपाची इच्छा आहे. योग्य वेळी पवार तसं करतीलही. किंबहुना तेच राजकारण सध्या सुरु आहे. काँग्रेसला उचकवुन पवारांना भाजपाच्या भरीस पाडण्याची संधी भाजप शोधतय.. पण पवार इतक्या लवकर काहि करणार नाहित हे माहित असल्यामुळे भाजप तसा शांत आहे सध्या. सेना आपल्या नशीबावर आणि पूर्व पुण्याईवर जगते आहे. सेनेचा बोकड कापून पार्टी करायची भाजपा-राकाँची योजना आहे. तसं होईलच का माहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

अर्णब चे बोलताना, चर्चा bjp, शिवसेना आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यावर व्हायला लागली पुन्हा.. मुद्दा किंवा विचार मांडणे योग्य.. पण चर्चाच मुद्द्यापासून डायव्हर्ट झाली.. :-)) असो..
एकट्या पवारांचा फायदा झाला?
फायदा झाला असेल तर ज्यांनी हि केस दाखल केली होती, त्यांचा झाला असे मला वाटते..
शिवसेनेची बदनामी झाली?
तुम्हाला असे वाटू शकते, पण बदनामी हि अर्णब ची झाली आहे. आणि शिवसेनेची बदनामी अमित शहा, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र जी यांच्या ट्विट मध्ये दिसते आहे.. कि काँग्रेस च्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना नाचते आहे.. गृहमंत्री राष्ट्रवादीचा आहे, त्यांचे नाव पण नाही ट्वीट ला.. आणि जर आरोपी पत्रकार असेल तर तो पत्रकार आहे म्हणुन त्याची बाजू घ्यायची कि तो गुन्हेगार नाहीये असे म्हणुन बाजू घ्यायची हे भाजपा ने ठरवावे... कारण गुन्हेगार नाहीये हे न्यायालय ठरवेल.. bjp कोण हे ठरवणारे? So ते पत्रकारिते वरती हल्ला म्हणत आहेत ते.. मग पत्रकारिते आडून पण आधी हल्ले करणारे हेच होते का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.. आणि ज्यांच्या मनात हा प्रश्न उपस्तिथ होतो त्यांना बदनामी अर्णब ची आणि राजकीय म्हणाल तर bjp ची होत आहे असे वाटते..
शिवसेना भाजप विरोधात जास्त आक्रमक झाली
येथे तरी भाजपा शिवसेने विरोधात जास्त आक्रमक वाटत आहे..भाजपा नेत्यांचे बोलणे किंवा tweet याचे पुरावे आहेत..
शिवसेनेवर शिंतोडे उडवून पवार यांनी आपला फायदा करून घेणे व मुख्यमंत्री पद आपल्या पारड्यात घेणे
हा आणखिन गैरसमज पसरवला जातोय.. तुम्हाला कदाचीत माहिती असेल राष्ट्रवादी ला काँग्रेस पेक्षा जास्त जागा आल्या होत्या तेंव्हा हि काँग्रेस चा मुख्यमंत्री राज्याला 5 वर्ष मिळाला होता, पण महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती.. पवारांचे राजकारण एव्हडे सोप्पे नक्कीच नाही.. मुख्यमंत्री चा चेहरा घेण्यापेक्षा महत्वाची खाती घेणे हेच त्यांच्या साठी महत्वाचे आहे.. आणि 2.5 वर्षे मुख्यमंत्री पद तर त्यांना bjp पण देऊ शकते :-)) विरोधक आधी हे सरकार 100 दिवसात पडेल म्हणत होते आता वर्ष झाल्यावर 2.5 वर्ष टिकेल आणि मग पवार पाडतील असे म्हणत आहेत काय आता? मुख्यमंत्री पदाची हाव पवारांना आहे कि देवेंद्र जी आणि पर्यायाने bjp ला आहे हे एक वर्ष झाले महाराष्ट्र पाहतोय.. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिंतोडे राष्ट्रवादी उडवत नसून bjp उडवत आहे हे समोर दिसते आहे..

In reply to by गणेशा

फायदा झाला असेल तर ज्यांनी हि केस दाखल केली होती, त्यांचा झाला असे मला वाटते..
तुम्हाला असे वाटू शकते, पण बदनामी हि अर्णब ची झाली आहे.
अर्णवची आणखी काय बदनामी होणार? त्याचा आक्रास्ताळपणा त्याकरता पुरेसा आहे. कंगना ने "क्या उखाडलोगे" म्हटलं, तिचं ऑफीस विस्कटलं. अर्णवने बोंबाबोंब केली , त्याला आत टाकलं. राज्यसरकारमधे पवार कंट्रोल्ड जरी असतं तरी फोकसमधे सेनाच आहे. कंगना, अर्णव प्रकरणं टेक्नीकली वेगवेगळे असली तरी पब्लीकमधे एकच मॅसेज गेला. सेना समर्थकांना अत्यानंद झाला, कारण नडला त्याला फोडला हिच सेनेची रीत आहे. सेना - भाजप कुंपणांदरम्यान हिंदु मतवादी/काँग्रेसविरोधी एक जनसमुह आहे. तिथे सेनेची बदनामीच झाली. त्यांच्यासाठीच हा खेळ चाला आहे. इतरांना काहि फरक पडत नाहि.
आणि शिवसेनेची बदनामी अमित शहा, चंद्रकांत पाटील... bjp ची होत आहे असे वाटते..
राजकीय पक्षांच्या भुमीका उघड आहेत. त्यात काहि आश्चर्य नाहि.
हा आणखिन गैरसमज पसरवला जातोय.. तुम्हाला कदाचीत माहिती असेल राष्ट्रवादी ला काँग्रेस पेक्षा जास्त जागा आल्या होत्या तेंव्हा हि काँग्रेस चा मुख्यमंत्री राज्याला 5 वर्ष मिळाला होता, पण महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती.. पवारांचे राजकारण एव्हडे सोप्पे नक्कीच नाही.. मुख्यमंत्री चा चेहरा घेण्यापेक्षा महत्वाची खाती घेणे हेच त्यांच्या साठी महत्वाचे आहे..
तसंही असेल. शेवटी बार्गेनींग पॉवर महत्वाची. सेनेला मुम पद नकोसं झालं/केलं गेलं/काँग्रेसने दावा सांगीतला, तर राकॉ तीच मागणी करेल. अजीत दादांनी आणखी 'उप' राहायचं ?
आणि 2.5 वर्षे मुख्यमंत्री पद तर त्यांना bjp पण देऊ शकते :-))
तसा ऑप्शन विचारात घेतला असेलच. पण नाहि जमलं.
विरोधक आधी हे सरकार 100 दिवसात पडेल म्हणत होते आता वर्ष झाल्यावर 2.5 वर्ष टिकेल आणि मग पवार पाडतील असे म्हणत आहेत काय आता?
विरोधी पक्ष किंवा सततचे सेना विरोधक काय म्हणतात हे महत्वाचं नाहि. नव्या राजकीय समीकरणांमुळे मतदारांमधे जो विस्कळीत पणा आला आहे, त्यांना काय वाटतं हे महत्वाचं. सेनेव्यतीरीक्त इतरांच्या भुमीका स्पष्ट आहेत. लोकं सेनेला बघताहेत.
मुख्यमंत्री पदाची हाव पवारांना आहे कि देवेंद्र जी आणि पर्यायाने bjp ला आहे हे एक वर्ष झाले महाराष्ट्र पाहतोय.. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिंतोडे राष्ट्रवादी उडवत नसून bjp उडवत आहे हे समोर दिसते आहे..
सत्तेची हाव सर्वांना सारखी आहे. पवारांना मुख्यमंत्रीपदाची हाव नसुन ति त्यांची गरज आहे. फडणवीसांना हाव असेलच, पण त्यांचं राजकीय करीअर आता कुठे सुरु झालय. त्यांना भरपूर उसंत आहे. असो.

In reply to by अर्धवटराव

प्रथमता एक सांगू इच्छितो.. बऱ्याच मुद्द्यांमध्ये तुमचे आणि माझे विचार वेगळे आहेत तरीही तुमचा हा प्रतिसाद मनापासुन आवडला.. चांगला आहे.. म्हणुन सगळ्या मुद्द्यावर बोलत नाही.. सेना समर्थक आणि त्यांच्या रीत बद्दल बोलतो.
कंगना, अर्णव प्रकरणं टेक्नीकली वेगवेगळे असली तरी पब्लीकमधे एकच मॅसेज गेला. सेना समर्थकांना अत्यानंद झाला, कारण नडला त्याला फोडला हिच सेनेची रीत आहे
नडला त्याला फोडला हि सेनेची रीत पूर्वी पासून लोक पाहत होती.. परुंतु अर्णब च्या चाललेल्या कृत्याला लगेच कुठली हि प्रतिक्रिया ना ठाकरें कडून आली ना सेना समर्थक मुंबई तील लोकांकडून कुठली हि तोडफोड झाली. यामुळे नडला त्याला फोडला हि इमेज येथे शिवसेनेची दिसली नाही.. आणि हि कारवाही, एकतर पत्रकारिता, trp आणि इतर संबधातील नसून, आत्महत्या आणि वयक्तिक संबंधातील आहे, उलट नीट विचारपूर्वक अभ्यासू पद्धतीने योग्य कारवाही ते हि timing पाहून जी झाली ते पाहता हि नीती शिवसेनेची नक्कीच नाही.. (आणि जर असेल आणि या मुळे कोणाला न्याय मिळत असेल तर ते योग्य आहे.. ) असा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्याचा गेम शिवसेना कधीच खेळत नव्हती.. उलट संदेश गेला असेल तर नडला त्याला फोडला हि नीती पुसून.. टप्प्यात घेऊन रीतसर कार्यक्रम केला जातोय हे पाहून शिवसैनिक नसून हि मला जास्त आनंद झाला.. बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक आहेत (जरी त्यांच्या हयातीत मी शिवसेनेला वोट दिले नव्हते ), पण उद्धव ठाकरे हे मला कधीच आवडले नव्हते, परंतु या एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी मला तरी आश्चर्याचे धक्के दिलेत.. आणि ते सुसंस्कृत मुख्यमंत्री मला वाटतात..

In reply to by गणेशा

या सगळ्यात मुख्य गम्मत अशी आहे की, महाराष्ट्रात एक शिवसेनेचा सहानुभूतीदार आणि कुंपणावर बसणारा हिंदुत्ववादी मतदार आहे. सध्याचा सगळं तमाशा हा त्या मतदाराला खेचण्यासाठी चालू आहे. याशिवाय, मला ही कारवाई सामान्य जनतेचा सरकारवरून, मह आहे ठाकरे सरकार वरून विश्वास उडावा या उद्देशाने केली जातेय अशी शंका घ्यायला पण वाव आहे. ही मोडस ऑपरेडी शिवसेनेची अजिबात नाही, ही पद्धत आहे राष्ट्रवादीची, पण बिल फाडतायत शिवसेनेवर, यातच सगळे समजून जाते. जर दुर्दैवाने न्यायालयाने सरकारवरती ताशेरे ओढले तर काय होईल याचा विचार व्हायला हवा. गृहमंत्री राष्ट्रवादीचा आहे, पण बिल सेनेवरती.. आणि उडते बाण घ्यायला संपादक आहेतच! एकंदरीत पुढचे काही महिने अजून मजा येणार आहे.. बिहार निवडणुकीच्या निकालावर सगळे कळेल.. निवडणुकीच्या तोंडावरच अर्णबला अटक झाली, आणि मतदान होईपर्यंत सोडले नाही यात पण मला काळेबेरे दिसतेय सरकारमधले कोणीतरी फितूर आहे हे नक्की!

In reply to by गणेशा

@ आनंदा, ( (प्रतिसाद छोटा दिसेल, सो येथे देतोय ) _____
महाराष्ट्रात एक शिवसेनेचा सहानुभूतीदार आणि कुंपणावर बसणारा हिंदुत्ववादी मतदार आहे. सध्याचा सगळं तमाशा हा त्या मतदाराला खेचण्यासाठी चालू आहे.
मुळात तमाशा अर्णब करत होता, यात तरी दुमत नसावे. मतदार खेचण्यासाठी हे असावे असे वाटत नाही.. कारण येथे महिन्या पूर्वी हाथरस ला पत्रकार जाऊन न देणाऱ्या लोकांना जनता विसरली पण. कुंपणा वरचे लोक 4 वर्षानंतर वोट देणार म्हणुन आता प्रयत्न नक्कीच नाही..
ही मोडस ऑपरेडी शिवसेनेची अजिबात नाही, ही पद्धत आहे राष्ट्रवादीची, पण बिल फाडतायत शिवसेनेवर, यातच सगळे समजून जाते.
कोण बिल फडतायेत, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि इतर bjp नेते? आणि हे बिल फाडल्याने शिवसेनेची बदनामी होण्या ऐवजी bjp चीच नाचक्की होणार.. कारण हि पत्रकारितेवरचा हल्ला नाहीये, हि वयक्तिक केस आहे.. आणि तरी एव्हडे bjp ला अर्णब ची बाजू घ्यायची आहे तर त्याचा तमाशा bjp च करवून घेत होती हे कोणाच्याही लक्षात येते आहे.. मग पत्रकारिते आडून bjp चा अजेंडा राबवणे शोभते का? हा प्रश्न पडतोच.. उलट शिवसेना तोडफोड करेल अर्णब च्या कार्यालयाची आणि आम्ही तो पत्रकारीते वरील हल्ला म्हणुन बोंब मारू असे bjp ला वाटत असेल, पण शिवसेनेला साथ पवारांची आहे हे ते विसरले कि काय? टप्प्यात घेऊन कार्यक्रम केला बरोबर.. अर्णब ला कळाले पाहिजे किती खालच्या दर्जाला जाऊन पत्रकारितेला बट्टा लावायचा.. (रवीश चा लेख वाचनीय आहे यावर, नक्की वाचा.. वाटल्यास लिंक देतो मी ) आणि bjp ला पत्रकारितेची एव्हडी पडली असेल तर अलीकडेच 40 वर्ष पत्रकारितेत असलेले पत्रकार नाव विसरलो मी , हिमाचल चे होते करोना काळात सरकार वर प्रश्न केले म्हणुन राजद्रोह चा आरोप लावला bjp ने.. मग हा कशावर हल्ला होता.. मग न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे ना.. यातून काय दिसते? असे अनेक पत्रकार आहेत, जे bjp ने आत टाकलेत ते आता मी शोधत नाही.. मला तर उलट वाटते शिवसेना हि तोडा आणि फोडा नीतीतून बाहेर येत असेल तर अभिनंदन आहेच..
जर दुर्दैवाने न्यायालयाने सरकारवरती ताशेरे ओढले तर काय होईल याचा विचार व्हायला हवा
. आताच्या सरकार चा संबंध काय? केस reopen का केली असा जाब कोर्ट सरकार ला विचारेल काय? ताशेरे ओढले तर, कोर्ट म्हणेल केस आधी बंद करणारे अधिकारी कोण त्यांची चौकशी करा.. आणि त्या वेळेस च्या गृहमंत्री यांनी राजकीय दबाव आणला का ते पण पहा.. मग हे ताशेरे सरकार आणि त्यावेळेस चे गृहमंत्री यांच्यावर का ओढले जाणार नाहीत?
एकंदरीत पुढचे काही महिने अजून मजा येणार आहे.. बिहार निवडणुकीच्या निकालावर सगळे कळेल.. निवडणुकीच्या तोंडावरच अर्णबला अटक झाली, आणि मतदान होईपर्यंत सोडले नाही यात पण मला काळेबेरे दिसतेय
याचे काही नाही.. बिहार निवडणूक आणि अर्णब ची अटक डोंबल्याचा संबंध नाही.. आणि बिहार निवडणूक यावेळेस तेजस्वी यादव ने विकासाच्या मुद्द्यावर लढविली, एक यादव जातीपाती पेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय हे मला तरी बिहारचे चित्र बदलवण्यास आश्वासक वाटते.. आणि तेथे तोच निवडून येईल असे मला वाटते.. आणि संबंध असेल तर बिहार ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत आत्महत्या चा मुद्दा अर्णब आणि bjp ने बनवला, bjp ने पत्रक वाटलेत तेथे पूर्णिया मध्ये.. बिहार का बेटा समथिंग.. सरकारचे कोण फितूर व्हायची गरज नाही... हे सरळ आहे...

In reply to by गणेशा

माझा अंदाज जर खरा असेल तर सोमवारी किंवा मंगळवारी mostly सोमवारीच कोर्टाचा निकाल येईल, आणि तो निकाल आला की बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे मला तरी वाटते. बिहार चे मतदान झाले आहे, त्यामुळे आता अर्णब ला तुरुंगात ठेवायची गरज उरलेली नाही असे माझे तरी मत आहे. सुनावणीत बऱ्यापैकी वेळकाढूपणा केला आहे या बाबतीत, आणि विनाकारण तारीख टाकलेली आहे असे माझे मत आहे बाकी माझ्या मते ही केस बऱ्यापैकी loopholes सोडून आहे, त्यामुळे जमीन अर्जावर निकाल देताना कोर्ट काय बोलते हे पाहणे रोचक ठरावे. पुढील चर्चा त्यानंतर करू.

In reply to by आनन्दा

माझ्या मते अश्या एखाद दुसऱ्या केस चा एका राज्याच्या निकालावर काही ही परिणाम होईल असे वाटत नाही. लोक स्थानिक प्रश्नांना जास्त महत्व देणार. जर नितीश कुमारांनी आणि भाजपा ने गेली 5 वर्ष काम केलं असेल तर लोक त्यानाच निवडून देणार आणि नसेल केलं दुसरा पर्याय तपासणार. एका अभिनेत्यासाठी कोण मतदान करेल असे वाटत नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

अभिनेत्यासाठी सगळी जनता मतदान करत नाही, पण लोकांचा फॅन क्लब असतो, काही लोक आंधळे प्रेम करणारे पण असतात. तसे नसते तर विशेष काही न करता धर्मेंद्र, शत्रुघ्न वगैरे कसे निवडून येतात. त्यामुळे यात काहीतरी दम असतो.. तसेही निवडणूक शेवटी 2-3 टक्के मतांवर फिरते, बाकीचा मतदार बहुतांशी पक्षाला बांधील असतो. आणि अश्या वेळेस 0.1टक्का जरी फरक पडणार असेल तर असगी रिस्क घ्यायला काहीच हरकत नसते. नाहीतर अर्णबला बिहारच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला किंवा बरोबर मतदान चालू असतानाच का अटक झाली याचे काय उत्तर? अनिल देशमुख केस ओपन करू असे म्हणाले होते 26 मे ला, मग इतके दिवस काय करत होते? यात काहीतरी काळेबेरे आहे हे नक्की.. तसाही कायदा या गोष्टीवर माझा विश्वास पण नाही. बळी तो कां पिळी, आणि काका वाक्यं प्रमाणं, यांच्यावरच माझा हल्ली जास्त विश्वास आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

@ आनंदा, अर्णब चा अटकेचा बिहार निवडणुकीत कोणाला फायदा होऊ शकतो असे तुम्ही म्हणताय.. मला कळाले नाही नीटसे.. कारण देतो.. कारण एकीकडे तुम्ही म्हणता ठाकरे सरकार ची सामान्य लोकांच्यात बदनामी करण्यासाठी हि कारवाई केली गेली आहे. यात राष्ट्रवादी ने हि कारवाही केली आणि नाव शिवसेनेचे आणले असा अर्थ तुम्ही सांगताय असे वाटले होते. आता तुम्ही म्हणता अर्णब चा फॅन क्लब किंवा अंध समर्थक चिडून महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेचे सरकार ने जे केले त्या विरोधात मतदान करण्यासाठी बिहार मध्ये काँग्रेस - rjd या विरोधात म्हणजे bjp - jdu ला मतदान करतील मग तुम्हाला असे म्हणायचे आहे काय, कि bjp ने राष्ट्रवादी च्या मदतीने अर्णब ला आत टाकले.. आणि काँग्रेस सेनेला बदनाम करून बिहार मध्ये काही मते डायव्हर्ट केली.. आणि हे खरेच हास्यस्पद वाटत नाहीये का?
नाहीतर अर्णबला बिहारच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला किंवा बरोबर मतदान चालू असतानाच का अटक झाली याचे काय उत्तर?
बिहार ची निवडणूक तीन टप्प्यात झाली, 28 oct, 3 nov आणि काल 7 nov.. मग येव्हडीच मते फिरणार होती तर अटक 28 च्या अगोदर न करता 4 nov ला का केली? यावरूनच हे स्पष्ट होतेय arnab ला अटक बिहार निवडणुकी साठी झाली नाही.. आणि स्थानिक, पायाभूत सुविधा आणि विकास या मुद्द्यावर निवडणूक होत असताना ज्यांना असले राजकारण करणे भाग पडत असेल त्यांना सुज्ञ जनतेने उलट सबक शिकवलेच पाहिजे.. कसले फॅन following? उद्या मराठी पत्रकाराला त्याच्या वयक्तिक केस मुळे राजस्थान मधील काँग्रेस ने अटक केली तर येथील काही काँग्रेस ला वोट करणारे तिकडे राजस्थान सरकार मराठी पत्रकारतेवर हल्ला करून चुकीचे करत आहे म्हणुन ते महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी मतदान करतील हे सगळे मनाचे इमले वाटत आहेत.. असो..

In reply to by गणेशा

बिहारचे निकाल वाचून तुम्हाला मी वरती बोललेल्या 0.01 टक्क्याचे महत्व कळले असेल अशी अपेक्षा ठेवतो.. आता अर्णब 4 दिवसात नक्की सुटेल असेल दिसतेय, करण सत्र न्यायालयाला 4 दिवसांची मुदत दिली आहे, नाहीतर हायकोर्ट हस्तक्षेप करेल. मेंटल harrasment चा पुरावा थेट अर्णब च्या नावाने नसेल, जसे की थेट फोन कॉल वगैरे, तर अर्णब ला थेट गुन्हेगार म्हणून अडकवणे सोपे नाही, त्यामुळे कोर्ट पोलिसांवर ताशेरे मारण्याची शक्यताच मला जास्त दिसतेय याच्यात. पण तरीही निकाल अजून येत नसल्यामुळे मी यावर आत्ता बोलणार नाही. अवांतर - मी उघडपणे प्रो भाजप भूमिका घेतो, पण म्हणून भाजप स्वच्छ आहे, वगैरे गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवत नाही. राजकारणाकडे मी तत्वापेक्षा अभ्यास म्हणून बघतो. म्हणून एकाच वेळेस मी पवार आणि मोदी दोघांचाही फॅन राहू शकतो. आणि ताकाला जाऊन भांडे लपवायची मला गरज पण पडत नाही.

In reply to by आनन्दा

गणेशा भाऊ, अर्णब सुटला बऱ का, दुसर्‍याच दिवशी. आता तरी पटतय का मी काय सांगितले ते? मुळात विषय सुशांतसिंग ला न्याय देण्याचा होता, अर्णब ला त्याचा योद्धा बनवले होते, आणि अर्नब ला अटक म्हणजे सुशांत वरती अन्याय असे चित्र उभे केले होते. तुम्ही हसाल हे सगळे वाचून - बादरायण संबंध आहे म्हणून, पण बिहारमधल्या बर्‍याच जगांचे निकाल १०० ते १००० मतांनी लागले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे त्या प्रकरणाचे महत्व कळेल.

In reply to by रात्रीचे चांदणे

जर नितीश कुमारांनी आणि भाजपा ने गेली 5 वर्ष काम केलं असेल तर लोक त्यानाच निवडून देणार आणि नसेल केलं दुसरा पर्याय तपासणार.
या वाक्यावरती काय प्रतिक्रिया द्यावी असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. असो.

In reply to by आनन्दा

म्हणजे बिहार च्या लोकांनी कोणत्या मुद्द्यांवर मतदान केले हे तुम्ही हिथे बसून सांगणार. माझ्यामते तर लोक असल्या गोष्टी ला जास्त महत्व देत नाहीत. एक उदाहरण सांगतो, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आदी काँग्रेस सरकार ने मराठा समाज ला आरक्षण दिले, आमच्या भागात गारपीट झाली नसताना देखील भरपाई म्हणून भरपाई दिली, उसाला प्रत्येक टनाला की क्विंटल ला 100 रुपयाचे अनुदान दिलें ते ही मागणी नसताना. पण लोकांनी मतदान करताना गेल्या 5 वर्षातली म्हणजेच 2009 ते 2014 कामगिरी लक्षात ठेवून मतदान केले. नितीश कुमार जर गेली 15 वर्षे सत्तेत राहून पण पूर्ण बहुमताने पुन्हा निवडून येत असतील तर खरंच तिथं काहीतरी काम केले असेल. खुद्द बिहारचे विरोधी पक्ष पण म्हणत नाही की सुशांतसिंग केस मुळे हरलो ते EVM ला दोष द्यायला लागलेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

मी इतरत्र कुठेतरी इथेच ते ०.०१ टक्क्याचे गणित मांडले आहे.. तुमची ९०टक्के मते तशीदेखील बांधील असतात. प्रत्येक पक्षाकडे तसे बांधील मतदार असतात. ज्याच्याकडे असे बांधील मतदार असतात तो पक्ष जास्त स्थिर असतो. हा वर्ग बर्‍याच वेळेस विचारधारा, विकास वगैरे गोष्तीवर अवलंबून असतो. परंतु, बर्‍याच वेळेस निवडणूक जिंकायला हा मतदार पुरत नाही, अश्या वेळेस अन्य भावनिक मुद्दे तापवून जास्तीची २-३ टक्के मते मिळवायचा प्रयत्न केला जातो.. बिहारमध्ये यावेळेस अक्षरशः एक एक मताचा हिशोब झालाय, ते लक्षात घेता मी काय म्हणतोय हे लक्षात यायला हरकत नसावी. अजुन देखील तुम्हाला विकास धरुन बसायचा असेल तर माझा नाइलाज आहे. पण मुळात बिहारच्या निवडणूकांमध्ये विकासापेक्षा लोजपा हा मुद्द जास्त प्रभावी ठरला आहे, लोजपा युतीमध्ये असता तर ही निवडणूक आज देखील एकतर्फी झाली असती. जाता जाता एक आगाऊ सल्ला देऊन जातो - राजकारणाकडे भावनेपेक्षा एक व्यवसाय म्हणून बघा, बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

In reply to by गणेशा

सेनेच्या राडा पद्धतीचाच हा राजकीय अविष्कार आहे असं चित्रं प्रोजेक्ट झालय. रस्त्यावरच्या भांडणात सेना दगड उचलते. सत्तेत आल्यावर पोलिसांकरवी पत्रकाराला उचलते. संजय राऊत विरोधकांना बोचकारे काढतो ते स्वाभावीक राजकारणाचा भाग असु शकतो. पण मुख्यमंत्री देखील दसरा मेळाव्यात तिच भाषा वापरतात हे बघुन वैशम्य वाटतं. कंगनाला बिएम्सी ने हात लावायची अजीबात आवष्यकता नव्हती. त्याकरता मनोरंजन क्षेत्रातले सेना समर्थक मंडली पुरेसे होते. अर्णवला एकट्या संजय राऊतने लेखणीच्या जोरावर हाताळायला हवं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे या बाबतीत मराठी सारस्वत सेनेच्या मदतीला धावला असता. पण सेनेसे राज़्कीय ताकत वापरली. उद्धवरावांकडुन अशी अपेक्षा अजीबात नव्हती. उद्धव राव वेगळ्या धाटणीचे वाटायचे. पण सेनेची संस्कृती बदलायच्या ऐवजी तेच वाहावत चालले कि काय अशी शंका येते. याचा परिणाम सेनेच्या इमेजवर होतोय असं वाटतं.

In reply to by Rajesh188

सेने सहित बाकी दोन्ही काँग्रेस चांगले मुरलेले खेळाडू आहेत.
दोन्ही काँग्रेस बद्द्ल माहित नाही, पण सेना इतकीच मुरलेली होती तर एवढी वर्षे युतीच्या (आणि आता भकास बिघाडीच्या) कुबड्यांची गरज का पडली?