✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक प्रसंग, दोन कवी आणि दोन कलाकृती

स
सुनील यांनी
Mon, 03/30/2009 - 19:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30053 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

किंवा ....

मुक्तसुनीत
Wed, 04/08/2009 - 04:15 नवीन
सुरेश भटांच्या वहीतून कोणाला "तरुण आहे" कवितेच्या आणखी द्विपदी सापडल्या, त्यात प्रियकर उठून प्रेयसीला आलिंगन देतो, असे असेल, तर ती खरोखरच नवी कविता होईल. किंवा एखाद्या धार्मिक व्यक्तीला सत्यवान्-सावित्रीच्या कथेचा दृष्टांतही दिसेल ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

निराशेचा सूर

सुनील
Wed, 04/08/2009 - 05:13 नवीन
"तरुण आहे रात्र" मधील स्त्री होऊन गेलेल्या घटनांबद्दल तक्रार करत आहे (निजलास, त्या कुशीवर वळलास, विझलास, मिटलास, लुटलास, कोरडा उरलास, रुसलास). भविष्यात प्रियकर काही ऐकेल, करेल, करावे, असे काही सांगतच नाही. मग कोणी रसिकाने निराशेचा सुर पकडला, तर कवीने त्याला रोखण्यासाठी एकही शब्द दिलेला नाही. माझा विशेष रोख आहे तो शेवटच्या कडव्यावर (जे कोणत्या कारणाने हृदयनाथांनी रेकॉर्ड करताना गाळले, ते माहित नाही). त्यात हा निराशेचा सूर प्रकर्षाने जाणवतो. प्रतिसादाची जागा किंचित चुकली आहे. सदर प्रतिसाद हा धनंजय यांना आहे, मुक्तसुनित यांना नव्हे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सुंदर...

एकलव्य
Wed, 04/08/2009 - 09:46 नवीन
या अंगाने या ओळींकडे पाहिलेच नव्हते... डोळे बंद मिटून राहावेसे वाटते आहे. आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद सुनील.
  • Log in or register to post comments

पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केलेला खुलासा

atuldpatil
गुरुवार, 11/05/2020 - 17:58 नवीन
"... कुणीतरी या गाण्याचा अर्थ सांगताना हे मृत्युगीत आहे असा अर्थ सांगण्यात आला. मला वाटत नाही कि मी मृत्युगीताला इतकी शृंगारिक चाल लावेन. आणि ती चाल भटांनी पण ऐकली होती भटांना अतिशय आवडलेली चाल आहे ती. आणि भटांनी असा माझ्याजवळ कधीही उल्लेख केला नाही कि हे मृत्युगीत आहे म्हणून. पण हे शृंगारिक गाणे आहे. प्रेयसी प्रियकराची मनधरणी करते. आणि तो तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. तिने जास्तीत जास्त तिच्यात आर्तता यावी.तिने अधिक संवेदनशील व्हावं ह्या उद्देशाने तो तिच्याकडे दुर्लक्ष करतोय हे भटांचं म्हणणं होतं..." इथे ऐका: https://youtu.be/EXrwDBiUyOM?t=172
  • Log in or register to post comments

खुद्द सुरेश भटांनी सांगितले

अमर विश्वास
गुरुवार, 11/05/2020 - 18:15 नवीन
खुद्द सुरेश भटांनी सांगितले आहे कि तरुण आहे रात्र अजुनी ही प्रेम / शृंगार कविताच आहे गरवारे कॉलेज सभागृहात झालेल्या एल्गार कार्यक्रमात त्यानी हे सांगितलेले मी स्वतः ऐकले आहे बाकी खुद्द हृदयनाथांच्या शब्दात ऐका https://www.youtube.com/watch?v=EXrwDBiUyOM&ab_channel=GaneshPitre
  • Log in or register to post comments

कायच्या कै लेख टाकलायं !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/05/2020 - 18:58 नवीन
आज नवे प्रतिसाद बघतांना दिसला शेजेच्या फुलांचा तिरडीच्या फुलांशी त्याचू टाईप संबध जोडून गाण्याचा विचका करण्याचा भंपक प्रयत्न होता हा !
  • Log in or register to post comments

निद्रा आणि मृत्यू

गामा पैलवान
गुरुवार, 11/05/2020 - 19:51 नवीन
संजय क्षीरसागर, निद्रा आणि मृत्यू यांना सख्खी भावंड मानलं जातं. तर मग चिरनिद्रेवर निद्रेचा आरोप होणं बऱ्यापैकी नैसर्गिकच नव्हे काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ गामा पैलवान : कशाला काहीही जोडतायं काय ?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/05/2020 - 21:03 नवीन
श्वासही मधुमंद का रे? म्हटलंय ! बंद का रे ? नाही. संग झाल्यावर श्वास मंद होतो हा सार्वत्रिक अनुभव आहे. आणि सखी मात्र अजून अतृप्त आहे असा सरळ अर्थ आहे. तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास का रे ? एवढयातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? सगळ्या कवितेचा एकूण नूर तोच आहे. कुणी काहीही अर्थ लावतो ! मी नसेन इथे बहुदा त्या वेळी नाही तर इतका पसारा वाढू दिला नसता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हा अर्थ माझा नव्हे ....

गामा पैलवान
Fri, 11/06/2020 - 13:45 नवीन
संजय क्षीरसागर, मृत्यूचं प्रतीक हा अर्थ माझा नाहीये. असा अर्थ लावणं काहीजणांना साहजिक वाटू शकतं, इतकाच माझा मर्यादित दावा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

असा अर्थ किंवा दावा

संजय क्षीरसागर
Fri, 11/06/2020 - 13:57 नवीन
घोर चुकीचा आहे हे साकारण सांगून या प्रकरणावर आता पूर्ण पडदा पाडला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

दावा चुकीचा कसा काय?

गामा पैलवान
Fri, 11/06/2020 - 18:41 नवीन
संजय क्षीरसागर, अर्थारोपण चुकीचं असू शकेल किंवा नसेल. पण काहीजणांना हे अर्थारोपण नैसर्गिक वाटू शकतं, हा दावा चुकीचा कसा काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्यांनी पाडलेला पडदा ना उठाओ..

संगणकनंद
Fri, 11/06/2020 - 19:12 नवीन
गामाजी, त्यांनी म्हटलंय ना की "असा अर्थ किंवा दावा घोर चुकीचा आहे हे साकारण सांगून या प्रकरणावर आता पूर्ण पडदा पाडला आहे !" मग तुमची हिंमत कशी झाली त्यांना प्रतिप्रश्न करण्याची? ते म्हणाले सूर्य पश्चिमेला उगवतो तर पश्चिमेलाच उगवतो. ते म्हणाले पॄथ्वी सपाट आहे तर सपाटच आहे. त्यांचा शब्द अंतिम आहे, त्यांचं सगळंच भव्य आहे, त्यांचं सगळंच दिव्य आहे. त्यांचे शब्द मोती आहेत. ते लिहीतात तेव्हा जगावर उपकार करतात. एक लक्षात घ्या, त्यांनी बाजारातून सडकं केळं जरी विकत घेतलं तरी त्याला ते उच्च प्रतीचं केळं म्हणणार. आणि इतरांनी जरी कितीही उच्च प्रतीचं केळं विकत घेतलं तरी ते त्याला रताळं म्हणणार. त्यांचं केळं केळं आणि लोकांचं केळं रताळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

@ त्याचू वैलपान : उगवलात की त्याचूगिरी चालू !

संजय क्षीरसागर
Fri, 11/06/2020 - 21:48 नवीन
हे मृत्यूगीत आहे ते तुमचं एकूण काय आकलन आहे त्यानी सिद्ध करुन दाखवा. जमत नसेल तर बाष्कळ पचपच करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संगणकनंद

@ गामा पैलवान : अर्थ गीताच्या आषयाशी पूर्णपणे विसंगत आहे

संजय क्षीरसागर
Fri, 11/06/2020 - 21:54 नवीन
हे दाखवून दिल्यावर पुन्हा चुकीची बाजू उचलून धरणं रास्त नाही. गैरसमज होऊ शकतो पण एकदा मुद्दा क्लिअर झाला तरी त्याचूगिरी चालूच ठेवणं, हे काम इथले एकमेव सदस्य करु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

होय बरोबर आहे तुमचं

संगणकनंद
Sat, 11/07/2020 - 10:26 नवीन
एकदा मुद्दा क्लिअर झाला तरी त्याचूगिरी चालूच ठेवणं, हे काम इथले एकमेव सदस्य करु शकतात.
आणि हे एकमेव सदस्य स्वतःला सर्वज्ञानी आणि जगाला मूर्ख समजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

चुकीची बाजू?

गामा पैलवान
Sat, 11/07/2020 - 22:56 नवीन
संजय क्षीरसागर, मी चुकीची बाजू उचलंत नाहीये. ती अतार्किक असूनही इतरांना का बरोबर वाटतेय, यावर विचार मांडतोय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ गामा पैलवान : कमाले !

संजय क्षीरसागर
Sat, 11/07/2020 - 23:27 नवीन
मुन्नी बदनाम हुई हा विधवा विलाप आहे असं म्हणेल ! नवर्‍यानं सुसाइड नोट लिहिल्यानं मुन्नीची बदनामी झाली आहे. तरीही प्रेमापायी ती त्याला आजही डार्लींग म्हणते. तीला अंगभर कपडे नसल्यानं ती केवळ लाज राखण्यापुरती वस्त्रं परिधान करुन आहे. तीच्या कमनीय बांध्याकडे पाहू नका, उपासमार दाखवण्यासाठी ती पोट उघडं ठेवून नाचतेय. लोकांची धुणं-भांडी आणि फरश्या पुसणं करुन तीचं अंग इतकं मोडून आलं आहे की तीला सर्वांगाला झंडू बाम हवा आहे आणि ते ती सांकेतिक पद्धतीनं सांगतीये. तुम्ही काढाल का असा अर्थ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

समजा कोणी काढलाच तर ....

गामा पैलवान
Sun, 11/08/2020 - 15:31 नवीन
संजय क्षीरसागर,
तुम्ही काढाल का असा अर्थ ?
माझं जाउद्या. समजा इतर कोणी काढलाच तर त्याचे हेतू तपासून बघायला हवेत ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तोच तर मुद्दा आहे आणि

संजय क्षीरसागर
Sun, 11/08/2020 - 17:28 नवीन
म्हणूनच हा प्रतिसाद प्रपंच ! इतक्या सुरेख गाण्याचा लोक वर्षानुवर्ष आनंद घेतायंत. पुढच्या पिढयांना त्या गाण्याचा अंदाज शृंगारिक अभिव्यक्तीचा मार्गदर्शक ठरेल. तर अशा अप्रतिम गाण्याचा रसभंग कशापायी करावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मुद्दा मान्य पण ....

गामा पैलवान
Mon, 11/09/2020 - 02:15 नवीन
संजय क्षीरसागर, तुमचा मुद्दा पूर्णपणे मान्य आहे. पण काये की हजार नव्या वाटा धुंडाळता एखादीच अप्रतिम वाट सापडते. तेव्हा कितीही रसभंग झाला तरीही प्रयत्नांना कमी लेखू नये, इतकीच अपेक्षा आहे. मी इथे थांबतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्हाला थांबणंच श्रेयस आहे

संजय क्षीरसागर
Mon, 11/09/2020 - 09:08 नवीन
रसभंग करुन काहीही विधायक होणं असंभव कारण ती वृत्तीच मुळात निर्मितीशी विसंगत आहे. याला चांगल्या चाललेल्या गाडीचं बॉनेट उघडणं म्हणतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

संशयाचा फायदा ....

गामा पैलवान
Wed, 11/11/2020 - 21:28 नवीन
संजय क्षीरसागर, मला इथे रसभंग झाल्याचं वाटंत नाही. रसहानी म्हणता येईल. शेवटचं कडवं फारसं कुणाला माहित नाही. ते वगळून गीत बघितलं तर संशयाचा फायदा द्यायला वाव आहे, असं माझं मत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तब्बल साडे अकरा वर्षे!

स्मिता.
गुरुवार, 11/05/2020 - 19:17 नवीन
तब्बल साडे अकरा वर्षांनी हा धागा वर आला, अनेक जुने आयडी दिसले आणि स्मरणरंजन झाले. बाकी हे गाणं वरचा खुलासा कळल्यानंतर अनेकवेळा ऐकूनही ते विरहगीत/मृत्यूसमयीचं दु:खी गीत वाटत नाही. माझ्यापर्यंत तरी त्यातून 'का रे दुरावा' सारखा शृंगारीक भावच पोहोचतो.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश

चौथा कोनाडा
Tue, 11/10/2020 - 21:05 नवीन
सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश कविता ही सुंदर ! असाही अर्थ आहे असं मध्यंतरी वाचण्यात आले होते. शेवटी जो अर्थ आपल्या मनात भिनलाय तोच आठवत राहणार.
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश

चौथा कोनाडा
Tue, 11/10/2020 - 21:05 नवीन
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश

चौथा कोनाडा
Tue, 11/10/2020 - 21:05 नवीन
सुंदर लिहिलं आहे. इंग्लिश कविता ही सुंदर ! असाही अर्थ आहे असं मध्यंतरी वाचण्यात आले होते. शेवटी जो अर्थ आपल्या मनात भिनलाय तोच आठवत राहणार.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

सतिश गावडे
Tue, 11/10/2020 - 21:51 नवीन
कवीने ज्या अर्थाने काव्य लिहीले तो अर्थ, काव्याच्या लोकांनी लावलेला अर्थ यांसहीत एखादा काव्य रसिक वेगळाच अर्थ लावू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

काय वाट्टेल ते!

उन्मेष दिक्षीत
Wed, 11/11/2020 - 15:10 नवीन
  • Log in or register to post comments

.

उन्मेष दिक्षीत
Wed, 11/11/2020 - 15:12 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत

.

उन्मेष दिक्षीत
Wed, 11/11/2020 - 15:16 नवीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा