सुनील,
नको वाटतं असं काही वाचायला. इतक्या थोड्या आणि नेमक्या शब्दात असलं जीवघेणं लिहिलंय....
ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?
अप्रतिम, असामान्य.
आताच वाचलेली कविता आणि हे गाणे...कधी न उमगलेला, गाण्याचा हा नवा अर्थ हळू हळू उलगडू लागतो.
ही एका प्रगल्भ वाचकाची निशाणी.
Like summer tempest came her tears--
'Sweet my child, I live for thee.'
परवाचा वैशाली हसमनीस यांचा आयसीयु लेख आठवला. त्यांच्यावर आलेला असाच काहीसा प्रसंग आणि त्यांना जिद्द देणारे असेच काहीसे कारण. काल आयबीएन-लोकमत वर आशा भोसले यांची मुलाखत होती 'ग्रेट भेट' मधे. त्यातही त्यांनी नेमके असेच सांगितले. "माझी मुलं मी रस्त्यावर येऊ देणार नाही. त्यांच्यासाठी तरी मला गावेच लागेल." अंगावर मारहाणीमुळे झालेल्या जखमा घेऊनही त्यांनी गाणी रेकॉर्ड केली आहेत. तर अशी ही सार्वकालिक भावना नेमकी मांडणे, त्याला शब्दरूप देणे हेच टेनिसन सारख्या कवींचे मोठेपण.
बिपिन कार्यकर्ते
भट साहेबांच्या कवितेचा तुम्हाला उमगलेला अर्थ बरोबर आहे.
मलाही हा अर्थ माहित नव्हता. परंतु झी वरच्या मराठी सारेगमपच्या मागील पर्वात आलेल्या कोणीतरी व्यक्तीने (नक्की कोण ते आत्ता आठवत नाहीये.) हा अर्थ सांगितला होता.
लॉर्ड टेनीसन यांचीही कविता सुंदरच आहे.
ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?
भट साहेबांच्या कवितेतील ह्या ओळीसुद्धा आप्रतिम आहेत.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
--शाल्मली.
परंतु झी वरच्या मराठी सारेगमपच्या मागील पर्वात आलेल्या कोणीतरी व्यक्तीने (नक्की कोण ते आत्ता आठवत नाहीये.) हा अर्थ सांगितला होता.
एकदम बरोबर. सर्व मराठी रसीकाना ह्या गाण्याच्या अर्थाची नव्याने ओळख झाली होती.
म्हणजे त्याच्या अशा वेगळ्या अर्थाबद्दल एकदा अवधूत गुप्तेंनी सारेगमच्या मंचावर उल्लेख केला होता.
त्याच्या अर्थ.. सरळ पहिलं तर ते एक शृंगार रसप्रधान गीत वाटते. पण खोल अर्थ असा दडलेला आहे त्याचा.
मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या संदर्भात या गाण्याचा अर्थ मला हवा होता... तेव्हा तात्यांशी यावर चर्चा केलेली आठवते.
दोन्ही अर्थानी हे गाणं अत्युच्च आहे इतकंच म्हणेन. भट साहेबांचा लेखणीपुढे नतमस्तक!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सुनील,भटसाहेबांच्या त्या गाण्याचा अर्थ तसाच आहे जसा आपण काढलेला आहे. वरवर ते शृंगारगीत वाटते पण तसे ते नाहीये.
ह्या बाबत पूर्वी कधी तरी वाचल्याचे आठवतंय मात्र ह्याक्षणी त्याचा दुवा देणे कठीणच आहे.
टेनीसनची कविताही भारी आहे.
एकाच घटनेकडे पाहताना दोन दिग्गज कवींची मनोभूमिका एकच असणे हा निव्वळ योगायोग वाटतो.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
प्राजु तुला आठवत का ह्या गाण्याबद्दल?
तू हे गाण `अष्ट्नायिका` या तुझ्या रेडिओच्या कार्यक्रमात केला होतास.पण तेव्हा शृंगार रसप्रधान म्हणून केला होतास.
मी तुला म्हटल होत की त्या कवीची हे गीत लिहिण्यामागची भावना वेगळी होती.अर्थ वेगळा आहे अस ऐकल.
मला हवच होता हा अर्थ कुणीतरी लहायला. कारण मला खात्रीलायक लिहिता येत नव्हते.
सुनिल धन्यवाद.
इंग्रजी ओळींची तुलना ही उत्तम केली आहे तुम्ही.
मीनल.
फारच छान लिहिले आहे... मी पण ह्या गाण्याला शृंगार रसप्रधान समजत होतो....
ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?
मस्तच ओळि
लेख आवडला.
टेनिसनची कविता छान आहे.
तुमचा व्यासंग आणि तरलतेचे कौतूक वाटले.
'तरूण आहे रात्र..' यावर मागे मनोगत/उपक्रम/मिपा वर चर्चा झाली होती. बहुधा अवधूत गुप्तेने सारेगममध्ये उल्लेख केला होता त्यामुळे ती चर्चा झाली होती. आणि त्यात कुणी जाणकाराने (बहुधा चित्तरंजन यांनीच असावे. मला नीटसे आठवत नाही आहे.) तो गैरसमज आहे सांगीतले होते. ती कविता शृंगारिक आहे असेच त्यांचे म्हणणे होते असे मला आठवत आहे. पण वरील सर्व प्रतिसाद पाहता मी आठवणीबाबत गोंधळलो आहे. ती चर्चा मी शोधायचा प्रयत्न केला पण सापडली नाही. असो. पण तसा अर्थ असेलच असे आपलेही म्हणणे नाही असे आपण तळटीपेत लिहिले आहेच. काव्य भावले म्हणजे झाले !!
-- लिखाळ.
मी केवळ शृंगारिक अर्थच लावत होतो. पुन्हापुन्हा वाचता मृत्युशय्येचा गर्भितार्थ अटळ वाटतो आहे. आतापर्यंत कोड्यात टाकणारी दु:खी चाल एकदम समजली. तुमच्या लेखनाने त्या गझलेला माझ्या मनात वेगळेच बनवले आहे, खूप खोल नेले आहे.
धन्यवाद सुनील. टेनिसनची वीरविधवा आणि सुरेश भट यांची युवतीविधवा - या दोन कवितांचे लागेबांधे सुचणार्या तुमच्या आस्वादक मनाला सलाम.
या गाण्याचा मी आजवर घेतलेला अर्थ शृंगारिकच आहे. यापुढेही तो तसाच राहण्याची शक्यता आहे. हा लेख वाचल्यानंतर किमान तीनदा ते गाणं मी पुन्हा ऐकलं. आशाताईंच्या आवाजात. पण काही केल्या शृंगारिक भावातून मृत्यू या कल्पनेशी संबंधित भावात जाताच आले नाही.
पण या रचनेकडे टेनिसनच्या त्या रचनेच्या संदर्भातून वेगळ्या दृष्टीने पाहण्याची कल्पना भिडली. चांगला लेख.
लेख, अतिशय आवडला. 'अजुनि रूसून आहे, खुलता कळी खुलेना' ही कविता अनिलांनी त्यांच्या पत्नी (कुसुमावती देशपांडे) यांच्या मृत्युसमयी लिहिली होती, असे मागे एका जाणकार व्यक्तीकडून कळले होते. भा. रा. तांबे यांची काही गीते जशी वरकरणी प्रियकराला, पण मुळात परमेश्वराला उद्देशून आहेत; तसेच या वरवर शृंगारिक भासणार्या कवितांच्या मागची अर्थातली ही ड्युऍलिटी इथे स्पष्ट केल्याबद्दल आभार.
भा. रा. तांबे यांची काही गीते जशी वरकरणी प्रियकराला, पण मुळात परमेश्वराला उद्देशून आहेत; तसेच या वरवर शृंगारिक भासणार्या कवितांच्या मागची अर्थातली ही ड्युऍलिटी इथे स्पष्ट केल्याबद्दल आभार.
यावरून आठवले की, वसंतराव देशपांडे जेव्हा अमेरीकेच्या दौर्यावर आले होते तेव्हा ते ज्यांच्या घरी उतरले होते त्यानी त्यांच्याशी झालेल्या गप्पा रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत. त्यात वसंतराव म्हणतात "गझल म्हणजे शुद्ध अध्यात्म आहे कारण 'गझल' या शब्दाचा अर्थ काय? तर पडद्याकडे बघून बोलणे. गझलेत 'आशिक' आणि 'माशुका' यांच्यातल्या नात्याचे वर्णन असते. 'माशुका' म्हणजे काय तर 'जे पडद्यामागे लपलेले आहे ते'. म्हणजे मुस्लिम स्त्रिया पडदा घेतात म्हणून प्रेमिकेला माशुका म्हटले आहे असे वरकरणी वाटते. पण त्याचा नक्की अर्थ काय तर, जो या सॄष्टीच्या पडद्यामागे लपला आहे तो. म्हणजे परमेश्वर. त्याला माशुका म्हटले आहे. आणि आशिक म्हणजे जो या पडद्यामागच्या परमेश्वराच्या प्रेमात पडला आहे तो. म्हणून गझलेचा अर्थ वरकरणी एक वाटतो आणि आतला कदाचित वेगळाही असू शकतो. मेहंदी हसन, गुलाम अली यानी गझलेला भावगीतासारखे सादर केले म्हणून त्यातल्या या दुसर्या अर्थाचा विचार कोणी करत नाही. पण बेगम अख्तर यानी गझल गायली ती भावगीतासारखी गायली नाही, ती गझल म्हणून गायली, म्हणून मला त्यांची गझल आवडते. त्यामुळे तुम्ही गझल ऐकताना ही अशी ऐका तुम्हाला रसनिष्पत्तीतला फरक जाणवेल".
अर्थात वरील सर्व मते वसंतरावांची स्वतःची मते आहेत. ती मी फक्त इथे मांडली आहेत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
कवी कविता लिहून जातात आणि रसिक त्या कवितांचे अन्वयार्थ लावीत राहतात.
बालकवींची "औदुंबर" ही कविता घ्या. जेमतेम ८ ओळींची. पण त्यावर त्याचा अर्थ लावण्यावरून कित्येक पाने खर्ची पडली असावीत! विशेषतः त्यातील शेवटच्या ओळीतील - पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर - "असला" ह्या शब्दावर!
कवी अनिल यांच्या "अजुनी रुसून आहे" चा उल्लेख वर आलाच आहे.
टेनीसनची कविता ही "नरेटीव" पद्धतीची. ज्यात एखादी त्रयस्थ व्यक्ती एखाद्या घटनेबद्दल सांगत असते. अशा कविता साधारणपणे सरळधोप असतात. याउलट गझल हीच मुळी उपमांच्या विळख्यात अडकलेली! गझलेत नुसता चंद्र म्हटला तरी तो खगोलशास्त्रीय चंद्र नसून प्रियतमेचा मुखडा असतो!
कवी अर्थांबाबत मुग्ध राहतात. आपण वाचत रहायचे. कधीतरी अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोहोचूच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनीलरावांचे हे लिखाण आवडले. असे म्हणतात की लेखकाचे मन कुठून कुठून काय काय घेऊन येत असते. अंतर्मनातून झिरपलेले अबोध मनात रुजते आणि नवे अंकुर घेऊन कुठे तरी बाहेर येते. रसिक मनाचे सुद्धा यापेक्षा फार वेगळे नसावे. एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेताना आपण अनेकदा आयुष्यातल्या अनेक गोष्टींची , इतर आस्वादलेल्या कलाकृतींची सांगड आपल्यासमोरच्या आस्वाद्य गोष्टीशी घालत असतो. "ब्रह्म हे उष्टं नसतं" असे योगी परमहंस म्हणून गेले. ब्रह्माचे माहिती नाही , परंतु सगळे पार्थिव अनुभव हे असे , कमी अधिक प्रमाणात उष्टे आहेत.
"Home they brought her warrior dead" या सुप्रसिद्ध कवितेची मराठी मनाशी ऐतिहासिक सांगड घातली गेली आहे ती गोविंदाग्रजांच्या "राजहंस माझा निजला" या अजरामर काव्याशी. टेनिसनच्या कवितेमधे वीराचे शव त्याच्या पत्नीपाशी नेले. "राजहंस" मधे एका अश्राप बालकाचा मृतदेह त्याच्या आईपुढे ठेवलाय. आणि आईला हा मृत्यू मान्यच नाही. तिचा "राजहंस निजलेला आहे".
ते हृदय कसें आईचें
आनंदेंही जे रडतें
दु:खात कसें ते होई
मी उगाच सांगत नाही
या त्या प्रसिद्ध ओळी.
सुनील यांच्या रसिक मनाने , एरवी शृंगाराची परमावधी मानली गेलेल्या या गाण्यातही , हा असा , करुण शोकावेग शोधला आहे. कविता लेखणीतून उतरून कागदावर छापून आली की ती त्याचीच रहात नाही. प्रत्येक रसिकाच्या मनात ती नव्याने जन्म घेते. याचीच पुनर्प्रचिती हा लेख वाचून येते आहे. नंदनने दिलेला "खुलता कळी खुलेना"चा उल्लेख फार अचूक आहे या संदर्भात.
बाकी कै. सुरेश भट यांच्या कवितेची ही ताकद अशी की , ही कविता आपल्याला आपल्या मनातले अज्ञात प्रदेश दाखवते. मला स्वतःला त्यांच्या काही ओळी वाचताना असा अनुभव आला आहे की, अरे ! कितीही जन्म घेतले तरी हा सत्याचा कण चिरंतन आहे ! खालील ओळीच घ्या :
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसूं आरशात आहे !
माझ्यामते वरील शब्दांमधला अनामिक अनुभव हा असा , घुसमटवून टाकणारा आहे.
सुनील यांना माझा कुर्निसात.
सुनील, सा-या ओळींचा अर्थ या तू सुचवलेल्याप्रमाणे लागतो - एक सोडून;
उसळती ह्र्दयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
ती युवती कुठल्या अर्थाने असं म्हणेल?
तुझा लेख वाचून थक्क झालो. काय अर्थ लावला आहेस तू. आणि कसा सुचला तेही निव्वळ नि:शब्द करणारं आहे. अतिशय सुंदर लेखन. धन्यवाद.
युवतीचे हृदयात जे प्रेम लाटांसारखे उचंबळते आहे, ते अमृत आहे, त्याला अंत नाही.
"तू" मात्र युवतीच्या शेजारी आहे, हृदयाच्या जवळ आहे, किनार्यासारखा. पण ते अमृत "तू"ला लागत नाही - "तू" कोरडा राहातो. ("तू" मृत आहे, ते अमृत जवळ असून त्याला मिळाले नाहीच असा अर्थ मी लावला.)
धनंजय...सुंदर विवेचन.
सुनील, असं काहितरी वाचलं की, दिवसातला बराचसा भाग आपण (मी तरी) किती क्षुल्लक, क्षुद्र गोष्टिंमधे घालवतो हे जाणवतं. खरंच, काय अप्रतिम अर्थ आहे.
भटांची ही गजल मी आत्तापर्यंत शृंगारगीत म्हणूनच ऐकत आलो होतो.
हा नवा अर्थ सापडलाय, आता पुढल्यावेळी ऐकताना मनस्थिती निश्चितच वेगळी असणार.
नेहेमीच्या दिवसातल्या एका साध्या घटनाक्रमातून अभावितपणे दोन महान कलाकृतींमधील दुवा तुमच्या मनाच्या तरलतेमुळे साधला जावा हा किती सुंदर योग आहे! आणि त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे अगदी आतून आलेल्या ह्या अनुभवाचे तुम्ही अतिशय नेमक्या शब्दात वर्णन करुन त्या अनुभवाला आपलेसे करण्याची संधी आम्हाला दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडेच.
चतुरंग
दादांची प्रतिभा खरेच थक्क करणारी आहे..
अश्याच अर्थाचे कुमार गंधर्व यांचे अजुन एक गाणे.. कवि अनिल.. प्रत्यक्षात हे पत्नीच्या निधन प्रसंगी लिहीले होते ( ? ) ..
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! ॥१॥
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ! ॥२॥
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥३॥
ह्या गाण्या बद्दल आमच्या ग्रुप मध्ये ५/६ महिन्या पुर्वीच चर्चा झाली होती तेव्हा मी त्या दृष्टीने विचार करून ते गाणे ऐकले होते तेव्हा त्या गाण्याने डोळ्यात पाणी आणले होते.
तरुण आहे रात्र अजुनी,
राजसा निजलास का रे?
भटांची गझल शृंगारगीत म्हणूनच ऐकायलाच सुंदर वाटते. सैनिकाच्या पत्नीची विरहभावना हा अर्थ असाच मराठी संकेतस्थळावर कुठेतरी वाचलेला. तेव्हा आता वरील गझलेकडे पाहण्याचा नजरियाच बदलून गेला. या निमित्ताने 'लॉर्ड टेनीसन'या प्रतिभावंताची ओळख करुन दिल्याबद्दल सुनिलचे आभार !!!
-दिलीप बिरुटे
छानच लेख लिहिला आहे सुनील्...मला पण भटांच्या या गाण्याचा असा अर्थ माहित नव्हता :)
याच प्रकारे मी कवी ग्रेस यांच्या 'ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता' या गाण्याविषयी ऐकले आहे... मला वाटत होते की कवी, त्याची आई वारली आहे, आणि तिच्या विरहाने दु:खी होउन हे गाणे म्हणत आहे असे आहे काय्...पण तुनळी वरच्या गाण्यावर मी असे वाचले कि, खरेतर, कवीची आई, कविला एकटे टाकुन तिच्या प्रियकरा बरोबर गेली आहे, आणि तो अघात सहन न होउन कवी ते गाणे म्हणत आहे... :(
बर्याच वेळेला आपल्याला कवितेचा अर्थ वेगळा वाटत असतो, पण कवीला मात्र निराळाच अर्थ अभिप्रेत असतो..
-----------------------
केदार जोशी
सुनील, दोन कवी आणि त्यांच्या कलाकृतींचा तुम्हाला जाणवलेला अर्थ फार सुंदर उलगडून दाखवला आहे. वरील अनेक अभिप्रायही त्यात भर घालणारेच..तुमचा हा लेख एक उत्तम कलाकृती झालेला आहे.
(भटसाहेबांच्या वरील गीताबद्दल सारेगमप मध्ये अवधूत गुप्तेने केलेले विवेचन अंधुकसे आठवत होते,पण मनोगतावर झालेली उलटसुलट चर्चाही आठवत होती. )
स्वाती
या गाण्याचा या दृष्टीने विचार अवधूत गुप्त्यांमुळे झाला होता.
पण 'होम दे ब्रॉट' शी तुलनात्मक किंवा साधर्म्यात्मक चर्चा करणारा हा लेख आवडला.
प्रतिक्रियाही माहितीपूर्ण आहेत.
माझी थोडी भर -
"नववधु प्रिया मी बावरते" हे भा.रा. तांब्यांचे गीत मृत्यूला उद्देशून आहे. (तू म्हणजे मृत्यू असे ऐकले आहे.)
नंदन, धनंजय इ. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
नाही पटले
सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे... आणि तू मिटलास का रे?
हे अध्यात्मिक आहे हे पटू शकत नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
कवितेतले ह्यातले काही कळत नाही पण सुनील जेव्हा कविता वाचली व तुझे परिक्षण वाचले व परत एकदा कविता वाचली तेव्हा कळाले की तुला काय म्हणायचे आहे, मस्तच !
ओठ अजुनी बंद का रे, श्वासही मधुमंद का रे?
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे?
ह्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत.
खरच भटकाकांनी "तरुण आहे " शृन्गारकाव्य म्हणून न लिहिता अशा वेगळ्या अर्थानंच लिहिलेल आहे. त्यांच्या तोंडूनच ते विश्लेषण ऐकण्याच महद् भाग्य लहानपणी मला लाभल, अर्थात त्यावेळी ते कळण्याच वयही नव्हत, पण या चर्चेमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खूप चांगल वाचायला मिळाल. खरच कविमनाचा मागोवा घेण किती कठीण असत, हे अशा वरवर एक भाव, आणि अन्तर्यामी वेगळाच अर्थ अभिप्रेत असणार्या कितीतरी कविता वाचताना लक्षात येत. आता अशा कविता शोधायचा नवा छन्द लागला! खूप खूप छान लेख आहे खरच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
सांगितल्यावरच कळला. टेनिसनचीहि कविता मस्तच. मराठी कविताच कळत नाहीं मग इंग्रजीच्या वाटेला कोण जाईल? म्हणून ठाऊकच नव्हती. खरेंच अव्धूतनें सांगितल्यावर पण माझीहि आपण म्हटल्याप्रमाणें
डोळे भरून येतात. पुढचे काही वाचवत नाही. बिछान्यावर पडतो आणि ते मघाशी ऐकलेले गाणे पुन्हा मनात रुंजी घालू लागते. आताच वाचलेली कविता आणि हे गाणे...कधी न उमगलेला, गाण्याचा हा नवा अर्थ हळू हळू उलगडू लागतो.
अशीच अवस्था झाली होती. धन्यवाद.
सुधीर कांदळकर.
तुम्ही काढलेला अर्थ आधी नक्कीच ऐकलेला होता. म्हणूनच वरती कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे उपक्रमावर शोध घेतला असता खालील लोकसत्तेतील पत्र सापडले. सदर पत्रलेखकाला/लेखिकेला सुद्धा नेमका हाच अर्थ आणि त्याअनुषंगाने हीच इंग्रजी कविता सुचावी हा निव्वळ योगायोग की आणखी काही ह्यावर विचार करतो आहे.
गमतीचा भाग म्हणजे साक्षात चित्तरंजन भटांनी ही निव्वळ शृंगारीक कविता आहे असा केलेला खुलासाही तिथेच आढळला आणि त्याचवेळेला वरचे काही भावनाप्रधान होऊन डोळ्यातून पाणी काढणारे आणि कसला कसला गहिवर येणारे प्रतिसाद पाहून मौजही वाटली.
-समीर
अशाच आशयाची खरड मला माजी मिपाकर आजुनुकर्ण यांनी उपक्रमावर पाठवली होती तेव्हा मलादेखिल ह्या योगायोगाचे आश्चर्य वाटले होते. माझ्यापुरते म्हणाल तर, मी हे लोकसत्तातील पत्र काय किंवा अवधूत गुप्ते यांचा कर्यक्रम काय, दोन्हीही पहिले नव्हते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
त्यातील कारुण्याची शक्यता हृदयनाथ मंगेशकरांनाही जाणवली. वर्तमानपत्रातील "मालवून टाक दीप"चे रस-विडंबन अतिशयोक्त आहे.
"तरुण आहे रात्र" साठी हृदयनाथांनी लावलेली चाल (http://www.youtube.com/watch?v=_eEbqofJs4w), आणि "मालवून टाक दीप" साठी हृदयनाथांनीच लावलेली चाल (http://www.youtube.com/watch?v=vVinL1a7liw) यूट्यूबवर ऐकावी.
आता सुरेश भटांच्या मनात शृंगारावेगळे काही नसेलही, पण एकदा का कवीच्या हातून कविता प्रकाशित झाली, की त्याचा कवितेच्या अर्थावर एकाधिकार राहात नाही. कवी रसिकाच्या पुढे अनेक शक्यता ठेवतो, एकच काटेकोर अर्थ असलेले कंत्राटपत्र ठेवत नाही.
"मालवून टाक दीप" मधील स्त्री प्रियकराला पुढे अमुकतमुक करायच्या सूचना देत आहे (मालवून टाक दीप; गारगार या हवेत, घेउनी मला कवेत, मोकळे करून टाक; घे टिपून एक एक रूपरंग), त्यामुळे रसिकाने आशावादी अर्थ घेण्यास कवीने खूप जागा ठेवली आहे.
"तरुण आहे रात्र" मधील स्त्री होऊन गेलेल्या घटनांबद्दल तक्रार करत आहे (निजलास, त्या कुशीवर वळलास, विझलास, मिटलास, लुटलास, कोरडा उरलास, रुसलास). भविष्यात प्रियकर काही ऐकेल, करेल, करावे, असे काही सांगतच नाही. मग कोणी रसिकाने निराशेचा सुर पकडला, तर कवीने त्याला रोखण्यासाठी एकही शब्द दिलेला नाही.
"मालवून टाक दीप" मध्ये आसुसलेला प्रणय आहे, "तरुण आहे" मध्ये निराश प्रणय आहे, असे म्हणायला तरी नक्कीच जागा आहे. (निराश प्रणयाची पराकोटी म्हणजे वैधव्य. हा रसिकाचा दु:खी कल्पनाविलास.) _समीर_ यांना मौज वाटते ती का? शृंगार भावनाप्रधान असू शकत नाही, निराश झालेला प्रणय दु:खद नसतो, कोणाला दु:ख जाणवल्यास तो भंपकपणा आहे, ही भावना त्या मौजेच्या मुळाशी आहे का?
सुरेश भटांच्या वहीतून कोणाला "तरुण आहे" कवितेच्या आणखी द्विपदी सापडल्या, त्यात प्रियकर उठून प्रेयसीला आलिंगन देतो, असे असेल, तर ती खरोखरच नवी कविता होईल.
प्रतिक्रिया
सुनीलभौ
मन विद्ध . . . .
सहमत
सुनील, नको
भट
परंतु झी
या गाण्याबद्दल
सहमत..
भटसाहेबांचे गाणे!
ग्रेट!
इंटरेस्टिंग
गीत
फारच छान
लेख
हा अर्थ सुचलाच नव्हता
असेच म्हणते
अर्थ
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आणि हे?
अतिशय आवडतं गाणं..
अतिशय समर्पक दुवा !
भा. रा.
कवितांचे अन्वयार्थ
सुनीलदादा,
लेख
एक शंका
अमृताच्या लाटा जवळ असून कोरडा = मृत
हो, आता सगळा अर्थ बरोबर जमतो
सुनील, तुमचा लेख आवडला!
अप्रतिम प्रतिभा
सुरेख...
ध्वनीफीत
ह्या
तरुण आहे
ती गेली तेव्हा रिमझिम..
कलाकृती..
असेच म्हणतो
चिंतनात्मक लेख
नाही
+१ सहमत
आवडल.
कवितेतले
सुनिल
खरच.
मलाहि हा अर्थ अवधूतनें ...
दोन्ही
योगायोग?
निव्वळ
खुलासा
चित्तरंजन भट म्हणतात तरी