Skip to main content

अनलॉक १.० ते ५.०

लेखक Prajakta२१ यांनी मंगळवार, 02/06/2020 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा डॉ बिरुटे सरांच्या सूचनेनुसार नवीन धागा काढत आहे धन्यवाद https://www.esakal.com/mumbai/mission-begin-again-start-maharashtra-chie... अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे स्वयंशिस्त १. मास्क वापरणे २. मास्क काढावा लागला तरी नंतर लगेच हात sanitize करणे ३. सार्वजनिक ठिकाणी without कव्हर न शिंकणे,न खोकणे ,न थुंकणे ४. गर्दी न करणे (whatsapp सारख्या माध्यमांचा उपयोग करून वार ठरवून घेणे सामान खरेदीसाठ,शक्यतो दुकानदारांना फोन करून जाणे) ५. ऑनलाईन ,घरपोच डिलिव्हरीला प्रोत्साहन देणे ,प्राधान्य देणे अवांतर - रुग्णसंख्या वाढत असताना देखील लोकडाऊन शिथिल करण्याच्या भारताच्या निर्णयावर जगात आश्चर्य व्यक्त होत आहे असे आज एका वृत्तवाहिनीवर (tv ९) सांगत होते आत्ता चक्रीवादळाची बातमी सारखी दाखवत आहेत चक्रीवादळामुळे परत त्या त्या ठिकाणी संचारबंदी आहे निसर्गच लोकडाऊन वाढवण्याचा इशारा तर देत नाहीये ना असे वाटले

वाचने 51015
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

काय काय सुरु होणार.

एक) राज्यातील रेष्टांरंट, बार पाच ऑक्टोंबरपासून सुरु होणार. दोन) लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु. तीन ) मुंबई एमएमआर क्षेत्रातील उद्योग सुरु. चार) पुणे विभागातील लोकल गाड्या सुरु. पाच) पूर्वी ज्या गोष्टींना मनाई होती त्या सर्व गोष्टींना ३१ ऑक्टोंबरपर्यंत मनाई असेल.

 काय काय बंदच राहणार.

एक) शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोंबर पर्यंत बंद राहणार. दोन) जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, मॉल्स, व्यापारी संकूल बंद राहतील. ( आमच्याकडे सुरु आहे बिंधास्त) तीन) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ( विशेष परवानगी दिलेले वगळून) बंद राहील. चार) मेट्रो बंद राहील. पाच) राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यकम, धार्मिक स्थळे बंद राहतील. मा. आदरणीय मोदीशेठ उगाच लॉकडाऊनच्या भानगडीत पडले. भारतीय जनता आज आकाशवाणीने भयभयीत झाली होती. ज्या त्या राज्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती. पण कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करायच्या नादात भलतेच काही तरी होऊन जातं. आणि मग आत्मनिर्भर व्हा म्हणून सोडून द्यावे लागते. पुनश्च एकदा हरिओम. माझे कुटुंब, माझी जवाबदारी. -दिलीप बिरुटे

मा. आदरणीय मोदीशेठ उगाच लॉकडाऊनच्या भानगडीत पडले. काय सांगताय? मग महा भकास आघाडी अजून लोकल, शाळा, कॉलेजे का सुरू करत नाहीये? सिनेमा हॉल ना परवानगी दिली पण नाट्यगृहांना नाही? मराठी संस्कृती कुठे गेली? अजून महाराष्ट्राचा लॉकडाऊन केंद्रापेक्षा जोरात का चालू आहे? महाराष्ट्रात सिनेमाला २०० लोक जाऊ शकतात पण लग्नाचा हॉल मध्ये ५० च लोकाना परवानगी? बंगलोर मध्ये १ जूनपासून रेस्टोरंट हॉटेले उघडली आहेत मग महाराष्ट्रात का नाही? तिथे केसेस जास्त वाढल्या नाहीत ना? ज्या त्या राज्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती. मग महाराष्ट्रात कुठे घोडं पेंड खातंय? द्वेष असला कि तरतम बुद्धी काम करत नाही याचे उत्तम हे उदाहरण आहे

In reply to by सुबोध खरे

काय सांगताय?
खरं सांगतोय. आगा ना पिछा कोणताही काहीही हेतू नाही. आज रात्रीपासून सर्व सबकुछ बंद राहील, असे म्हणून सर्वसामान्य लोकांच्या पोटात गोळा आणायची गरज नव्हती, हे हजार वेळा सर्वांनी सांगून झालं आहे. महाराष्ट्र सरकारची जनजागृती सुरु होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हळुहळु बंद करणे सुरु होते. किमान महाराष्ट्राच्या जनतेने घाबरुन जाऊ नये, असे एक आश्वासक काम महाराष्ट्र सरकार करीत होते. एक सप्टेंबरपासून व्हेंटीलेटर, टेष्टींगकीट, पीपीइकिट, मास्क, आणि अशी सर्व मदत महाराष्ट्राला नाकारणे. सर्वाधिक जीएसटीचा कर महाराष्ट्र सरकारने केंद्राला दिला तरी महाराष्ट्राच्या वाट्याचे काहीएक हजार कोटी रुपय महाराष्ट्राला दिले नाही. सर्वात कर कमी कर मिळवून देणा-या उत्तरप्रदेश मध्यप्रदेश सरकारच्या तुलनेतही निधी दिला नाही. करोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने विविध योजनांसाठी निधी खर्च केला, करीत आहे. ती राज्यांचीच जवाबदारी असते. अशा वेळी केंद्रसरकार राजकारण करीत राहीले. करोनाच्या काळात जिथे माणसं मरताहेत, अशावेळी केंद्रसरकार महाराष्ट्राशी भेदभावाचे राजकारण करीत आहे, केंद्रसरका जसे वागणार तसेच भक्तमंडळी वागणार परंतु संकटाच्या प्रसंगी तरी राजकारण करु नये याचं भान ना केंद्रसरकारला नाही. महाराष्ट्राशी द्वेशाचं राजकारण केंद्रसरकार करीत आहे, आपण म्हणता ते खरं आहे. ”द्वेष असला कि तारतम्य बुद्धी काम करीत नाही” महाराष्ट्रातील जनतेशी केलेला भेदभाव महाराष्ट्र विसरणार नाही. योग्यवेळी, योग्य धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातील माणूस शांत बसणार नाही, याची मला जाणीव आहे. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वाधिक जीएसटीचा कर महाराष्ट्र सरकारने केंद्राला दिला तरी महाराष्ट्राच्या वाट्याचे काहीएक हजार कोटी रुपय महाराष्ट्राला दिले नाही : Apr 09, 2020, Centre releases Rs 14,103 crore GST compensation to states; more to be released soon Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/centre-releas… New Delhi:28 July, 2020 8:29 am IST The Centre on Monday released Rs 1,65,302 crores as Goods and Services Tax (GST) compensation to states/Union Territories for the financial year 2019-20 against cess collection of Rs 95,444 crores. Maharashtra received the highest GST compensation from the Centre amounting to Rs 19,233 crores https://theprint.in/india/centre-releases-gst-compensation-of-over-1-65… सत्य काही निराळेच आहे असं दिसतंय. ”द्वेष असला कि तारतम्य बुद्धी काम करीत नाही” महाराष्ट्रातील जनतेशी केलेला भेदभाव महाराष्ट्र विसरणार नाही. योग्यवेळी, योग्य धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातील माणूस शांत बसणार नाही, याची मला जाणीव आहे. जय महाराष्ट्र. ब्वॉर्र

In reply to by सुबोध खरे

केंद्रसरकारने मागील आर्थिक वर्षाचे २२ हजार कोटी रुपये, एप्रील, मे,जून,जुलै, ऑगष्ट पर्यंत महाराष्ट्राला दिले नव्हते, हे अर्थमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले. ( लिंक निवांत पाहा. ) केंद्रसरकार आपल्या कर्माचे फळ भोगेलच. हजारो नागरिकांना बेघर केले, अनेकांच्या नौक-या गेल्या. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. गरिबांचा तळतळाट बरा नसतो. केंद्रसरकार महाराष्ट्राशी भेदभाव करीत आहे, हे महाराष्ट्राने पाहिलंच आहे. राज्यपाल कार्यालयाचे उंबरे झीजवून झीजवून थकले परंतु सरकार काही पडेना. चालायचंच. -दिलीप बिरुटे

आता पूर्ण नियमावली पाहिली सिनेमा हॉल्स ना परवानगी नाही. तेवढे वाक्य गाळून टाका पण "बार" ला आहे. म्हणजे समोरासमोर बसून दारू पिता येईल तेंव्हा कोव्हीड होणार नाही. पण दोन सीट टाकून पलीकडे बसलेल्या माणसाकडून तुम्हाला कोव्हीड होईल. बढिया है

वाचनालयांचे काय ? साधा उल्लेखही आढळला नाही. (बंदच रहातील म्हणुन सुध्दा). खिजगणतीतच नाही.

ते मोदीशेठ ना विचारा असल्या फडतूस गोष्टींसाठी कल्याणकारी सरकारला वेळ आहे का? काय तरी विचारणं तुमचं!

In reply to by सुबोध खरे

असल्या फडतूस गोष्टींसाठी कल्याणकारी सरकारला वेळ आहे का?
मा.सेठची....दिवा-बत्ती, थाळीनाद-टाळ्या......अतिशय कल्याणकारी गोष्ट होती. आपल्याला बॉ मान्यच आहे.......! -दिलीप बिरुटे

https://www.loksatta.com/mumbai-news/libraries-are-neglected-in-relaxat… कोणीतरी आवाज ऊठवला हे बरे झाले घरात डांबुन रहायचा वेळ, सुसह्य करण्याचा, मनोरंजनाचा, ज्ञान वाढवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग हाच आहे. समाजाच्या सुसंकृतपणाचे वाचनालय हे एक निदर्शक आहे आणि त्याच कडे दुर्लक्ष ! (दारुच्या दुकाना एव्ह्ढी गर्दी तरी निश्चितच होणार नाही. )

In reply to by मराठी_माणूस

मुळात वाचनालयात वाचनासाठी तासंतासं वाचन करायचा काळ आता मागे पडत चाललेला आहे, विद्यार्थी सोडले तर आता सार्वजनिक वाचनालयात सामान्य नागरिक वाचनालयात केवळ पुस्तक बदलायलाचा दिसतात. बाकी वाचनालये सुरु करुन वृद्ध साठीचे लोक वाचनालयाकडे ढकलणे सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही असे वाटते.
समाजाच्या सुसंकृतपणाचे वाचनालय हे एक निदर्शक आहे.
ओके....!
(दारुच्या दुकाना एव्ह्ढी गर्दी तरी निश्चितच होणार नाही. )
लो कल्ल्लो बात...! मद्य आणि पुस्तके हे दोन वेगवेगळे विषय आहेत, मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे अनेकांची साहित्यविषयक प्रतिभा बहरल्याची इतिहासात नोंदी आहेत, तो विषय वेगळा. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातून मद्याने केवळ एक महिन्यात साठकोटी रुपये महसूल मिळून दिला. पुस्तके ज्ञान देणार, महसूल थोडी देणार.....? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे अनेकांची साहित्यविषयक प्रतिभा बहरल्याची इतिहासात नोंदी आहेत, तो विषय वेगळा काय बुद्धिवादी समर्थन आहे. मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याच्या कित्येक पट संख्येने कलावंतांची शतकानुशतके धूळधाण झाली हे मात्र लोक सोयीस्कर विसरतात.

In reply to by सुबोध खरे

>>>>काय बुद्धिवादी समर्थन आहे. कसय डॉक्टर साहेब,माहिती नसेल काही तर गप्प बसलं पाहिजे, पण ते तुम्हाला शक्य नाही. आपल्या वाढत्या वयामुळे ते पुढेही शक्य नाही असे दिसते. घरात वयस्कर मानसं जशी नीरर्थक वटवट चालू ठेवतात तुमचं तसं सुरु जालावर सुरु असतं. सुरु ठेवा. मला आवडतं. ;) मराठवाड्यातल्या एका मोठ्या साहित्यिक उपक्रमाचा मी एक भाग आहे, थोरा-मोठ्यांचे किस्से अनेकदा तिथे ऐकतो, साहित्यव्यवहार पाहतो. >>>>मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याच्या कित्येक पट संख्येने कलावंतांची शतकानुशतके धूळधाण झाली हे मात्र लोक सोयीस्कर विसरतात. आपलं हे मत मान्यच आहे, डॉक्टर अंकल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहिती नसेल काही तर गप्प बसलं पाहिजे, पण ते तुम्हाला शक्य नाही. आपल्या वाढत्या वयामुळे ते पुढेही शक्य नाही असे दिसते. घरात वयस्कर मानसं जशी नीरर्थक वटवट चालू ठेवतात तुमचं तसं सुरु जालावर सुरु असतं जळजळ जास्त होते आहे का? इनो घ्या

In reply to by सुबोध खरे

आपणास इनो आणि विश्रांतीची फार गरज आहे, काळजी घ्या. बाहेर पडू नका. येताजाता साबणपाण्याने हात धुत राहा. -दिलीप बिरुटे

”रोम जळत होते तेव्हा निरो बासूरी वाजवत होता, तसे देश करोनाच्या गर्तेत जात असतांना मोदी मोराला दाने खाऊ घालत होते” अशी टीका काँग्रेसने केली होती. हे काँग्रेसवाले आपलं मिपा वाचतात की काय अधुन-मधून. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंतप्रधानानी मोराला दाणे नसते खाऊ घातले तर देश करोनाच्या गर्तेतून आजपर्यंत बाहेर निघाला असता का ? तो मोर जर उपासमारीने मेला असता तर याच कॉंग्रेसने, 'मोदी एक मोर की जान नहि बचा सकता, तो देश के लोगो की जान क्या बचायेगा' अशी टिका केली नसती हे कश्यावरुन ? सध्या झालय काय की, या कॉंग्रेसकडे विरोध करण्याकरता कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने, पंतप्रधान 'फावल्या वेळात' काय करतात हाच मुद्दा घेऊन टिका करत राहातात. आता मोराला दाणे टाकणे व कोरोना महामारी याचा नक्की काय संबध आहे?

In reply to by प्रसाद_१९८२

कॉंग्रेसकडे मुद्दे नाहीत किंवा असले तरी त्यांचे मुद्दे गोदीमिडिया समोर येऊ देत नाहीत तो भाग थोडा वेळ बाजूला ठेवू, आपण म्हणता तशी टिका झली असती. मोर उपासमारीने मरण पावला असता तर तेही दु:खदायकच ठरलं असतं. पण करोनाच्या काळात किती तरी लोक उपासमारीने मरण पावले, त्याची अधिकृत कोणतीही आकडेवारी नाही, अनेकांचा हातावरील रोजगार बुडाला, लोक मरणासन्न अवस्थेत पोहचले, असे असतांना अशावेळी अधिक वेगाने लोकांना तीव्र मदतीची अपेक्षा असतांना तुम्ही देशाचे लाडके पंतप्रधान आहात, तुम्ही मोराबरोबर फोटो सेशन करता, त्याच्याशी खेळत बसता, तुम्ही मोराला दाणे घालत बसतातुम्ही स्वतःला त्याला प्रसिद्धी देता, यावरुन तुमची भारतीय जनतेप्रती असलेली सहवेदना किती खोल आहे, ते दिसून येते. असंवेदनशीलतेचं प्रतिक मोराला दाणे खाऊ घालण्यात दिसते. निरो असाच लाडका होता, निरोच्या आईचा रोमवर अत्यंत प्रभाव होता. पुढे कालांतराने निरोची शक्ती वाढत गेली आणि रोममधील एक शहर जळत असतांना जुलमीपणा, कौर्य, असंवेदनशीलतेची मर्यादा ओलांडल्या गेलेली दिसते, तेव्हा निरो आपल्या वाड्यात फिडेल वाजवत जळणारे शहर पाहात होता. तेव्हापासून हे अप्रिय शब्द राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलता आणि अकार्यक्षमतेसाठी वापरले जात असतात म्हणून त्यांनीही तसा शब्द प्रयोग वापरला असावा असे वाटते इतकाच तो संबंध असावा असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना मोराला दाणे घालायच्या ऐवजी कोमट पाणी पीत बसायला हवं होतं. काही जण त्यात ब्रँडी नावाचे द्रव्य सुद्धा घालतात ज्याने प्रतिभा उत्तुंग आणि अनावर होऊन साहित्य, कला, संस्कृती पाझरायला लागते.

In reply to by सुबोध खरे

काहींनी इथे ब्रँडी न घेता, करोना कसा होत नाही, कशामुळे होतो, अतिशय उच्च दर्जाच्या थापा मारल्या होत्या हे आम्ही मिपाकर अजूनही विसरलो नाही.....नंतर व्हू च्या नावावर खपवलं तेही आम्ही पाहिलंच आहे. डॉक्टरसाहेब, तुम्ही येता जाता नुसते हात पाय साबण पाण्याने धुवायचेच पण मनही धुवुन काढा, तुम्हाला त्याची फार गरज आहे. -दिलीप बिरुटे

मुख्यमंत्री सहायता निधीतील ४३१ कोटी रुपये वापराविना

करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी देणगी दिलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ या खात्यात ४३१ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्य शासनाकडून सातत्याने आर्थिक अडचणी असल्याचा पाढा वाचला जात असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ खात्यातील निधी वापरला जात नसल्याचा विरोधाभास अधोरेखित होत आहे. https://www.loksatta.com/pune-news/without-using-rs-431-crore-from-cm-a…

आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान मा.मोदीसेठ यांनी काल सहा वाजता देशाला संबोधीत केले. करोना काळात त्यांची ही सातवी भेट होती. काय महत्वाचे बोलले ते आपणास माहिती असेल तरी आपल्यासाठी सांगून ठेवतो. १) करोना विषाणुचे संकट संपलेले नाही,त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. २)लॉकडाऊन संपला तरी करोना संपलेला नाही. ३) युरोप अमेरिका आणि इतर देशांमधे करोना रुग्णांची संख्या घटल्याचे पाहण्यात आल्यानंतर पुन्हा तिथे रुग्ण प्रमाण वाढल्याचे दिसते ४)करोना रोखण्यासाठी जी काळजी घ्यायची तीच गोश्ट थांबल्याचे दिसते, तुम्ही मास्क न वापरता इकडे तिकडे फिरणार असाल तुम्ही तुमच्यासह कुटुंबाची जोखीम वाढवत आहात. ५)लस जेव्हा केव्हा उपल्ब्ध होईल तेव्हा प्रत्येक भारतीयांपर्यंत लस पोहोचेल यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. ६) देशातील परिस्थिती सध्या स्थीर आहे, आपण ती बिघडू न देता काळजी घ्यायला हवी. एक गोष्ट खरी आहे, की रुग्णसंख्या कमी होत आहे, असे वाटल्यामुळे नागरिकांची बेफिकिरी जरा जास्त दिसून येत आहे, रुग्ण बरेही होत आहे, काहींच्या जीवावरही ह करोना उतरत आहे, तेव्हा काळजी घेत राहू या.... मास्क, साबण-पाण्याचा वापर, सॅनिटाइजरचा वापर, आणि सुरक्षित अंतर ही आपल्या सर्वांची जवाबदारी आहे. एकटे सेठ, कुठे कुठे पुरतील आपल्याला....! -दिलीप बिरुटे

लशी संबंधी इतक्या उलट सुलट बातम्या येत असतात की , लस खरेच मिळली आहे का नाही ह्या बाबतीत संभ्रम वाढला आहे.

बाजारात तुरी आणि..... अशी एक मराठी म्हण आहे, अजून त्या करोनावरील लशीचं कशात काही पत्ता नाही. आणि हे तिकडे बिहार मधे भाजपची सत्ता आली तर बिहारच्या जनतेला मोफत लस देऊ असे म्हणत आहेत. सत्ता आली नाही तर, लशीचे दर राज्यसरकारे ठरवतील. अरे यांना कोणी तरी आवरा रे......! -दिलीप बिरुटे

चित्रपट आणि नाट्यगृहे आजपासून खुली, तरणतलाव, योग संस्थांनाही परवानगी. पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि तरणतलावाचा वापर जलतरणपटूंना (सर्वसामान्यांसाठी नाही) करता येणार आहे. धार्मिक स्थळे योग्यवेळी खुली करु असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षपणे दिवाळीनंतर सुरु होणार आहे. -दिलीप बिरुटे

ब्रिटनमधील नव्या करोना व्हर्जनमुळे सर्व महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते ६ पर्यन्त संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतामुळे होणारी गर्दी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी आजपासून ते पाच जानेवारीपर्यन्त ही संचारबंदी असेल. दिवस आणि रात्र असा भेदभाव करोनाकडे नसतो असे वाटते. पण पब्लिक जर काळजी घेणार नसेल तर सरकार असे उलट पालट निर्णय घेणारच. आदरणीय मोदीसेठने घेतलेल्या निर्णयाची आपल्याला आठवण आहेच. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

आजच्या दोन बैठका आयोजित केलेल्या आहेत. एक, आदरणीय, सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, देशात आणखी कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. काहीही निर्बंध लावा, फक्त तो दिवाबत्तीचा, थाळीचा टास्क देऊ नये असे वाटते. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही निर्बंधाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे, मला वाटतं अगोदर केंद्रसरकारचा निर्णय झाला पाहिजे, नाही तर अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. बेकारी, हातावरील मोलमजूर यांच्या आयुष्याचं काय, असे प्रश्न विचारुन विचारुन टीव्हीवरचे सर्व कार्यक्रम सोडून ते बघावे लागेल. आता पुन्हा नव्याने, लॉकडाऊन एप्रील २०२१ व्हर्जन २.१ असे धागे काढावे लागेल असे वाटत आहे. बाकी, निर्बंध लागण्यापूर्वी आपल्याकडील सर्व आवश्यक सामानांची यादी अपडेट करुन घ्यावी, धावपळ होणार नाही. सध्याची रुग्ण संख्या पाहता निर्बंध आवश्यक आहेत आणि त्याची योग्य अंमलबजावणीही आवश्यक आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करोना योद्ध्यांना, प्रोत्साहन देण्यासाठी, आवाहन केले होते.... आमच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या गावाने पण एकजूटीने, ही प्रोत्साहनाची संकल्पना पार पाडली .... ह्या अशा गोष्टी, जनतेला एकत्र आणण्यासाठी करणे उत्तमच असते... मेणबत्ती मोर्चा पण, ह्यासाठीच असतो....