दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्याचा एकसारखा मधुर आवाज येत असतो.आकृत्या हळूहळू धूसर होऊ लागतात.चंद्र सूर्याच्या अदृश्य होण्याची वाट बघत असतो.रातकिड्यांचा आवाज येतो.वाऱ्याची एक झुळूक अंगाला शिरशिरी देऊन जाते.मोठे प्रसन्न व विलोभनीय दृश्य असते ते.
वाचने
4137
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
धन्यवाद
In reply to छान. by कंजूस
प्रथमतः आपलं अभिनंदन.
धन्यवाद
In reply to प्रथमतः आपलं अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख लिहिलं आहे. जास्त
धन्यवाद,असे लेखन मी मारुती
In reply to सुरेख लिहिलं आहे. जास्त by चौथा कोनाडा
वाचल्याबद्दल धन्यवाद