Skip to main content

सुशांत सिंह राजपूत

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 31/08/2020 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.

वाचने 177674
प्रतिक्रिया 340

प्रतिक्रिया

साहिल चौधरीचा युट्युब व्ह्लॉग सुशांत सिंग प्रकरणामुळे फार प्रसिद्ध झाला होता, सुशांत प्रकरणात सगळ्यात जास्त व्होकल साहिलच होता. त्याची बिनधास्त बोलण्याची शैली विलक्षण होती. काही दिवसांपूर्वी तो मुंबईत येउन गेला होता, दिशा सालियान ची बिल्डिंग आणि तीची बॉडी सापडली यातले अंतर यावर त्याने माहिती दिली होती. मदतीचे आश्वासन सगळेच देतात परंतु खरी वेळ आली कि साथ देणारे फार कमीच असतात असे तो म्हणाला होता. मुंबईत तो अपूर्वाला भेटला होता. जितकं मला आठवतं त्या नुसार अपूर्वा ने त्याला काही ठिकाणी घेउन गेली ज्याचा उल्लेख त्याने त्याच्या शेवटच्या व्हिडियोत केला होता, त्या नंतर तो गायब झाला आणि युट्युब व्ह्लॉगर्स मध्ये खळबळ उडाली... जितकी माहिती जालावर येत आहे त्यानुसार त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या नंतर अपूर्वा आणि शीना पॅनिक मोड मध्ये आहेत. साहिलच्या व्ह्लॉग मधले या प्रकरणातील सगळे व्हिडियो आता डिलीट केले गेले आहेत किंवा ऑफलाईन केले गेले आहेत. आता शीना ने ऑन लाईन येउन काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यात तिची साहिल विषयी चिंता देखील उघड होते. तीच्या म्हणण्या नुसार तीने तिच्याकडचे पुरावे हे तिच्या लॉ फर्मकडे आणि कॅनडियन गव्हर्न्मेंटकडे दिलेले आहेत, शिवाय आपला मृत्यू झाल्यास हे पुरावे पब्लिक केले जावे अशी देखील तीने तरतुद केलेली आहे. जसे वर मी अ‍ॅम्युलन्सच्या फोटो वरुन माहिती वाचकांनी या विषयी माहिती काढावी असे म्हंटले आहे त्याच प्रमाणे तीने देखील या अ‍ॅमब्युलन्स बाबत वाच्यता केलेली असुन त्यात ती ३ अ‍ॅमब्युलन्स बाबत बोलताना दिसते. शीना प्रचंड ताणात असुन त्यामुळेच ती प्रत्येक गोष्ट प्रदिर्घ बोलताना दिसते. तीने हे देखील सांगितले की अर्णब गोस्वामीचे ऑफिशीअल ट्विटर अकाउंट नाही म्हणुन तीने रिपब्लिक टिव्हीला टॅग केले होते, तसेच रिपब्लिकच्या एका पत्रकाराशी देखील तिचे बोलणे झाले होते, परंतु रिपब्लिक नेटवर्क कडुन तिला विशेष मदत मिळू शकलेली नाही किंवा त्या बाबतीत तिच्या पदरी निराशा आली असे तिच्या बोलण्यातुन येते. माझ्या जालिय शोधात आणि डॉट जोडण्याच्या प्रयत्नात ९:३० कॉल हे काही ठिकाणी आले होते जे शीनाच्या कॉल संबंधीच आहे जो तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंड ने तिला केला होता आणि सुशांत प्रकरणाची फार महत्वाची माहिती त्याला माहित असल्याने त्याच्या जिवास धोका असल्याचे तिने म्हंटल्याचे दिसते तसेच तो अजुन जिवंत असल्याचे देखील कळते. या संपूर्ण ऑनलाईन येउन बोलण्यात ती केवळ एकाच व्यक्तीचे नाव उघडपणे घेते [ जे तुम्ही व्हिडियोत ऐकण्याचे कष्ट घ्यावेत म्हणुन मी इथे देत नाही. ] आणि जालावर या व्यक्ती विषयी माहिती मिळवा असे ती सांगते. ती इतर कोणाचेही नाव घेत नाही कारण तसे केल्यास तिला अटक होण्याची भिती आहे, तिचा आपल्या देशातील न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे ती सांगते आणि जन्माने कॅनेडियन असुन काही वर्षां पासुन हिंदूस्थानात राहत असल्याचे देखील म्हणते. याच बरोबर तीने तीच्या घरा बाहेरचा सीसीटिव्ही कॅमेरा फोडला गेल्याचे सांगुन एक निष्णात हॅकर टिम कार्यरत असल्याचे सांगुन तिची काही ऑनलाईन अकांउट्स आणि तिच्या घरच्या इंटरनेटचे नेटवर्क हॅक करण्यात आल्याचे ती सांगते. तीचा हा व्हिडियो मी खाली देत आहे. व्हिडियो ३४ मिनीटा पासुन किंवा ४७ मिनीटां पासुन पुढे पहावा. *** तीने विभोर वर विश्वास दर्शवला असल्याचे देखील दिसते. जाता जाता :- सुशांत प्रकरणात जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याला एक तर ठार केले गेले आहे किंवा केले जाण्याची भिती आहेच, शिवाय त्याला केसेस मध्ये अडकवण्याचे प्रयत्न तसेच हँकिंगचा देखील सामना करावा लागतो हे आत्ता पर्यंत दिसुन येत आहे, हे तेव्हाच होते जेव्हा सगळ्यात मोठा मासा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे जोर लावतो. शीनाचा सीबीआय तसेच सुशांतच्या वकिलाशी संपर्क व्हावा असे एकंदर तिचे बोलणे ऐकल्यावर प्रकर्षाने वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)

In reply to by शा वि कु

तेव्हा नव्हता पहिला. अटक का झाली बघायला दुसऱ्या चॅनेल वरचा ह्याचा व्हिडीओ पाहिला. भयचकित झालो पाहून. एक तरी तथ्य आहे का त्याच्या बोलण्यात ? काय रिसर्च केला म्हणे या माणसाने ? जे अफाट आणि अचाट दावे केलेत त्यावरून तरी कसलाही रिसर्च दिसत नाही. "मी रिसर्च केलाय भरपूर" या वाक्याखेरीज आणखी काही माहिती तरी दिलीये का आपल्या सो कॉल्ड रिसर्चची. आदित्य ठाकरेंनी स्वतः जाऊन सुशांतचा खून केला असं हा हवेतून बोलतो. खुनाच्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि ३ बॉडीगार्ड होते असा भयानक दावा जणू काही स्वतः CCTV फुटेज पहिल्यासारखा केला आहे. कुणावरती अश्या पातळीचे खोटे आरोप करणे हा गुन्हा आहे. ह्याला अटक व्हायलाच हवी. असल्या गोष्टींवर विश्वास ठेवून शेअर करणे पण धन्य आहे. असल्या प्रतिचा अपप्रचार करून अटक का झाली विचारू नये. अटक होणारच आणि व्हावीच. हे काही प्रश्न विचारणे नव्हे, गदारोळ करणे आणि चिखलफेक आहे.

In reply to by शा वि कु

धागाकर्ते हा व्हिडीओ (साहिल चौधरीचा) देण्यास विसरले असावेत. मी चूक दुरुस्त करावी म्हणतो. https://youtu.be/O2AqZQVOHC4
फॅक्ट्स जरूर चेक करें
असं म्हणतोय.

In reply to by मदनबाण

साहिल चौधरी ला अटक का झाली? काय आधारावर? की फक्त चौकशीसाठी आत घेतले आहे? आवाज बंद केले जात आहेत का? कोण आहे त्यामागे असे वाटते? सगळ्यात मोठा मासा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे जोर लावतो. हा मोठा मासा कोणता आहे? की अनेक मोठे मासे आहेत?

In reply to by मदनबाण

खुद्द पन्त प्र्धान म्हणतात , कोन्ग्रेस मुक्त भारत , विरोधि पक्शच नको मग त्यान्चे पाठीराखे जनताहि त्सेच करणार

In reply to by Gk

कशाला पुड्या सोडताय? विरोधि पक्शच नको असे श्री मोदी कुठे आणि कधी बोलले आहेत? बेधडक थापा मारताय?

In reply to by मदनबाण

हा प्रसिद्ध अभिनेता कोणता आहे? तो इतका मोठा आणि पॉवरफुल कुणाच्या आशिर्वादाने झाला आहे? यात राजकारणी कोणते आहेत? जे लोक सहजतेने बोलू शकत होते युट्युब वर व्हिडियो टकत होते त्यांना आता बोलता येत नाही. दाबून टाकले जाते आहे. निरनिराळ्या गुन्ह्यात अडकवले जाते आहे का? हळूहळू दहशत तयार होते आहे का?

In reply to by गोंधळी

राजवट लावून, बलात्कार्‍यांची मानसिकता बदलेल असा विश्वास वाटतो का तुम्हाला ? माझ्यामते हैद्राबाद पोलीसांनी जो न्याय तेथील बलात्कार्‍यांना बरोबर केला अगदी तसाच न्याय UP पोलिसांनी देखील करायला हवा तरच अश्या प्रकारांना थोडाफार तरी आळा बसेल. बाकि या प्रकरणात पोलीसांची भुमिका संशयास्पद आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

मुद्दा हा आहे की ज्या अनावश्यक गोष्टींसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु करण्यासाठी जे लोक बोंब मारत होते ते अशा घट्नाणांकडे दुर्लक्ष करतात. मुबई पोलीसांवर तोंड्सुख घेणारे अशा वेळी गप्प बसतात. ती कंगना उत्तर प्रदेश मध्ये राहायला जाईल का?? माझ्यामते हैद्राबाद पोलीसांनी जो न्याय तेथील बलात्कार्‍यांना बरोबर केला अगदी तसाच न्याय UP पोलिसांनी देखील करायला हवा तरच अश्या प्रकारांना थोडाफार तरी आळा बसेल. अशा घट्नांचे मुळ हे सामाजीक व आर्थिक विषमता, गरीबी व शिक्षणाचा अभाव आणि एकुणच जनता जाग्रुत नसणे, अशा गोष्टींत आहे असे वाटते. हे तुम्हाला मिडीयामध्ये कोणत्या मुद्द्यांना TRP मिळतो यावरुन दिसेल. उदा. सुशांत राजपुत.

उत्तर प्रदेशात पोलिसांची वागणूक नेहमीच संशयास्पद असते. कारण तेथे आपल्या जातीच्या जास्तीत जास्त लोकांची पोलिसात भरती करणे हे सर्व राजकारणी करत आले आहेत. याची सुरुवात श्री मुलायमसिंह यादव यांनी केली. https://www.outlookindia.com/newswire/story/hc-orders-cbi-inquiry-into-… आणि अशा मानसिकते मुळे तेथे जाती पातीचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. योगी आदित्यनाथ यांनी किती जोर लावला तरी तेथील जातीचे राजकारण जायला काही दशके लागतील अशी स्थिती आहे.

In reply to by Gk

स्वतः धर्माचे राजकारण करायचे
याच धर्तीवर... स्वतः शांतताप्रिय धर्मियांचे लाड करणारे राजकारण करायचे मग येउन तुम्हालाही खड्ड्यात ढकळणार धप्प !

In reply to by Gk

स्वतः धर्माचे राजकारण करायचे
याच धर्तीवर... स्वतः शांतताप्रिय धर्मियांचे लाड करणारे राजकारण करायचे मग कुणीतरी येउन तुम्हालाही खड्ड्यात ढकळणार धप्प !

कंगु वेडी आणि अर्णू मूर्ख उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या बलात्कार विषयी आकड तांडव करत नाहीत.

In reply to by Rajesh188

जीभ त्या मुलीची गेली आणि बोलती भाजपयांची बंद झाली

In reply to by Rajesh188

सरळ सरळ व्हॉट अबाऊटिझम करू नका. Whataboutism, also known as whataboutery, is a variant of the tu quoque logical fallacy that attempts to discredit an opponent's position by charging them with hypocrisy without directly refuting or disproving their argument. संदर्भ: - https://en.wikipedia.org/wiki/Whataboutism व्हॉट अबाऊटिझम वापरून मुळ मुद्दे सोडून इतर वाद नको, या प्रकारात रस नाही...

In reply to by निनाद

काँग्रेसचे राज्य म्हणजेच रामराज्य, तिथे काही अघटीत घडले की त्यावर बोलायला त्यांची दातखीळ बसणार.... आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं पाहायचं वाकुन.....

साहिल चौधरीला अटक का झाली?? कोणती तक्रार आहे ? कोणी केलीये ? कोणते सेक्शन लावले आहेत ? काविळीचा चष्मा काढून वाचा . According to the police, they received a complaint on August 22 from a female advocate after which a case was registered under section 509 (word, gesture or act intended to insult the modesty of a woman), 505(2) (statements conducing to public mischief), 500 (defamation), 501 (printing or engraving matter known to be defamatory), 504 (intentional insult with intent to provoke breach of peace) and 34 (common intention) of the Indian Penal Code (IPC) and section 67 (publishing or transmitting obscene material in electronic form) of the Information Technology Act. An officer from Cyber police station said, “The accused used to upload videos on his social media profile containing abuses. The accused also posed as a journalist working with a national news channel. During investigation, police identified the accused as Sahil alias Pradeep Mohinder Chaudhary, following which a police team was dispatched to Faridabad, Haryana to arrest him.” Dr Rashmi Karandikar, deputy commissioner of police (cyber), said, “We have arrested the accused and are investigating the case.” The accused, during questioning, accepted that he has uploaded such videos to attract followers. Police have blocked all his social media accounts and deleted the videos. He was produced before metropolitan magistrate court on Monday and has been remanded in police custody till October 1. आता त्यानं कबूल केलाय, कोर्टाने त्याला कस्टडी दिली आहे, त्यावर काही कमेन्ट असेल तर सांगा ,

पाहण्या सारखा आणि ऐकण्या सारखा व्हिडियो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Keh Doon Tumhe Ya Chup Rahoon... :- Deewar [ 1975 ]

In reply to by मदनबाण

व्हीडियो रोचक आहे. डॉ. पद्मा त्यांच्या लक्षात आलेले अगदी संगतवार उलगडून दाखवतात. आणि त्या स्वतः पण कोर्टात जाणार आहेत असे म्हणतात. न घाबरता स्वतः च्या जबाबदारीवर नावे घेऊन आरोप करतात.

डॉ. पद्मा यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे इतका डिटेल अ‍ॅनेलिसिस त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चॅनलवर दिला आहे. माझ्या स्वतःच्या पाहण्यात इतका डिटेल अ‍ॅनेलिसिस कुठेच आलेला नाही. जे मेन स्ट्रीम मध्ये सांगितले जात आहे ते किती चुकीचे आणि त्रुटक माहितीवर आहे, हे डॉ. पद्मा सांगतात ते समजुन घेताना कळुन येते. ligature mark हा शब्द प्रयोग सर्व मिडियात आहे तो कसा चुकीचा आहे ते सुद्धा समजले. इंग्रजी व्हिडियोत फोटो सकट अ‍ॅनेलिसिस दिला आहे, हिंदी व्हिडियोत फोटो नाहीत. इंग्रजीत :- हिंदीत :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मिटा डोळे, बरळा नीट

*सुशांतची 'हत्या नसून आत्महत्याच', एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल* मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांत सिंगचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या यावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. त्याचा मृत्यू गळफासामुळे झाला की विषप्रयोगामुळे झाला, यासंबधीचे अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु होते. मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम देणारा एक अहवाल समोर आला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या एका समितीने एक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सुशांत सिंग राजपूतची हत्या नसून आत्महत्या केली आहे. असं स्पष्ट करण्यात आलं आहे. http://dhunt.in/bdSxj?s=a&uu=0xc87377c8c7485594&ss=wsp

आणि मग ते बिहार इलेक्शन साठी सुशांत की मौत नही भुलेंगे भाजपाने पोस्टर छापून ठेवलेत त्याचे काय होणार ?

धागाकर्ता आणि त्याचे यूट्यूबचे ज्ञानी लोक्स आता काय करतील ? तोंडावर पडल्यानंतर यूट्यूबवाले गायब होतील पण धागाकर्ता काय करतो हे बघणे रंजक असेल

In reply to by कपिलमुनी

युट्युबवर एम्स म्हणा, सीबीआय म्हणा, जोपर्यंत खून सिद्ध होत नाही तोवर कोणत्याही संस्था विश्वासपात्र नाहीयेत अशी घोषणा कधीच झाली आहे. आदित्य ठाकरेने स्वतः जाऊन सुशांतला मारलंय, हे माहीत सगळ्यांनाच माहीत आहे, पुराव्यांची पण गरज नाही. सीबीआय, एम्स, (मुंबई पोलीस हेवेसांनल), खोट्या बातम्या पसरवू नका सांगणारे हाय कोर्ट, सर्वच्या सर्व पावरबाज मुख्यमंत्राच्या तालावर नाचत आहेत.पहिला पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट खोटा आहे हे म्हणू शकतो तर नव्या एम्स पॅनेलने असे काय दिव्य काम केले आहे की त्यांच्यावर शंका घेणार नाही ? नक्की घेणार. खोटारडे एम्स वाले. आणि अजुन अबेटमेंट टू सुसाईड आहेच.इतक्यात विसरू नका म्हंटलं ! रिया चक्रवर्तीने, करणं जोहरने आणि सलमान खानने सॅटेलाईट फोन वापरून सुशांतला हिप्नोटाईज करून आत्महत्या करायला लावली, हि शक्यता कोणीतरी नाकारू शकतं का ? घाईघाईने शवाचे दहन केले, घरातल्यांना सोडून, ते पोस्टमार्टम वर कोणी शंका घेऊ नये म्हणूनच. (अरेच्चा. ते ह्या केस मध्ये नाही ? बरं बरं.) #JusticeForSSR #SSRWarriors

In reply to by कपिलमुनी

जस्टीस जस्टीस करून फेसबुक व्हॅटसपवर नुसता दन्गा माजवला होता आता त्यांच्या सगळ्या जुन्या पोस्टही सुसाईड करतील

सुशांतच्या केस मध्ये लढाई ही सिस्टिम व्हर्सस सिटिझन अशी असुन देशातील व जगभरातील हिंदुस्थानी नागरिक तसेच इतर लोक देखील या केसवर लक्ष ठेवुन आहेत आणि लढण्याची पूर्ण तयारी करत आहेत. किमान ५-७ वर्ष तरी या केस मध्ये सहज जातील याची खात्री अनेकांना आहेत. या काळात ज्या घडामोडी घडतील त्याचाही अर्थातच या केसवर परिणाम होणार आहे. एम्सचा रिपोर्ट जरी ही हत्या आहे हे सांगणारा नसला तरी सीबीआय ३०२ कलम चा वापर करणार का ? हे या रिपोर्ट पेक्षा अधिक महत्वाचे आहे असे मला वाटते. या केसशी संबंधीत डिजिटल इन्फॉर्मेशन फार मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर उपलब्ध आहे जी या केसला अशी सहजा सहजी बंद करु देणार नाही, तसेच जनतेचा दबाव देखील आहेच. राजकिय दबाव आणि जनतेचा दबाव या मध्ये कोणाचे पारडे जड भरेल हे येणारा काळच दाखवुन देइल तेव्हा एका रिपोर्ट ने हताश किंवा कोणी हुरळून जाण्याचे कोणतेच कारण नाही कारण, ये बोहोत लंबी लढाई है... जाता जाता :- एक जुनी बातमी :- Sunanda Pushkar's death: Dr Sudhir Gupta no stranger to controversy Dr Gupta had written to the Central Administrative Tribunal alleging that there were attempts to influence the autopsy report of Pushkar, brought out by a team headed by him. P1 टाईम्स नाऊ ने त्यांचे हे ट्विट कोणाच्या दबावा खाली डिलिट केले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile

In reply to by Gk

३०२ का ३०४ हे सीबीआय डायरेक्टर ठरवतील, तेव्हा आपल्याला कळेलच. In Sushant Case, CBI Director To Decide On Adding '302' Murder Charge; File To Be Handed

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile

मुद्दलातच हवेतून केलेले ट्विट डिलिट करावेच लागणार. टाइम्स नाऊ ने ऐकीव माहितीवर ट्विट केले हे त्यांच्या कारकिर्दीला साजेसेच आहे. इथे आदित्य ठाकरेनी जाहीर आव्हान दिल्यावर टाइम्स नाऊ ने शेपटी घातली. जर इतकी खरीखुरी माहिती असती तर "मिनिस्टर्स सन" न म्हणता थेट व्यक्तीचं नाव देण्याची हिम्मत ठेवली असती. जर विश्वासार्ह माहिती असेल तर सर्व माहिती नावासकट देऊ शकतात, निर्धोकपणे. पण ह्यांनी लायबल वैगेरे कायदे कोळून पिले असतात, त्यामुळे थेट न बोलता अडून अडून बदनामी करतात. (अर्णब नाही का, थेट आरोपांवर सलमान खान नाव घ्यायला घाबरत होता? तसेच.)
Thackeray dared those who are making allegations to come forward and hand over the proofs to Mumbai police.
गंमत म्हणजे वरील दुवा टाइम्स नाऊ चाच आहे.

In reply to by शा वि कु

मुद्दलातच हवेतून केलेले ट्विट डिलिट करावेच लागणार. कोणताही प्रतिष्ठा ठेवुन असणारा वृत्तसमुह हवेतुन ट्विट करत नाही. त्यामुळेच हे ट्विट केले गेल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते. टाइम्स नाऊ ने ऐकीव माहितीवर ट्विट केले हे त्यांच्या कारकिर्दीला साजेसेच आहे. हे आपल्या कानात कोणी येउन सांगितले का ? इथे आदित्य ठाकरेनी जाहीर आव्हान दिल्यावर टाइम्स नाऊ ने शेपटी घातली. जर टाईम्स नाऊ ने कोणत्याही "मिनिस्टर्स सन" चे नाव घेतले नसेल तर त्यांनी शेपटी घालायची गरज काय ? उलट त्यांच्याकडे ट्विट मध्ये जे ३ मुद्दे दिले आहेत त्या बद्धल माहिती आहे असा अर्थ होतो आणि त्यामुळेच ते ट्विट डिलीट का गेले हा प्रश्न देखील उपस्थित होतो. जर इतकी खरीखुरी माहिती असती तर "मिनिस्टर्स सन" न म्हणता थेट व्यक्तीचं नाव देण्याची हिम्मत ठेवली असती. कोणाचे नाव कधी घ्यावे हे न कळल्यास त्याचा साहिल होतो ना ? वरती तुम्हीच म्हणाला आहात फॅक्ट्स जरूर चेक करें, जे योग्यच आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile

In reply to by मदनबाण

त्यामुळेच हे ट्विट केले गेल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते. हे त्यामुळेच हे ट्विट डिलीट केले गेल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते. असे वाचावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile

In reply to by मदनबाण

>>> प्रतिष्ठा ठेवून असणारा वृत्तसमूह- किती प्रतिष्ठित असली तरी ते ट्विट चुकीचेच आहे. >>> कानात येऊन कोण सांगितले ? - हाच प्रश्न टाइम्स नाऊ ला विचारायला हवा. त्यांना सुद्धा कोणीतरी कानात येऊन माहिती दिली आणि ती आहे तशी ट्विट करून उत्तम पत्रकारितेचा नमुना दाखवला. यालाच ऐकीव माहिती म्हणतात. याला कायद्याच्या भाषेत "hearsay" म्हणतात. कोणतरी काहीतरी बोलतो हा काही पुरावा नाही. >>> नाव घेतल्यावर साहिल होतो- तेहेलका, कोब्रा पोस्ट यांनी थोर्यामोठ्या व्यक्तींच्या नावासहित त्यांना उघडे केले आहे. तेव्हा नाव घेतल्यावर साहिल होत नाही. राजकीय आकसातून म्हणा, मनोरंजनासाठी म्हणा, व्ह्यूज साठी म्हणा, एखाद्याचे नाव घेऊन आगापीछा नसलेली गोष्ट बनवली कि साहिल होतो. (साहिल काय म्हणतो- सगळे युट्युब चॅनल मनोरंजनासाठी फेकफेकी करत आहेत.)

In reply to by शा वि कु

हाच प्रश्न टाइम्स नाऊ ला विचारायला हवा. ट्विट डिलीट का केले गेले हा प्रश्नही त्यांनाचा आहे,त्यांनी ट्विट मध्ये हे ऐकीव माहितीवर सांगत आहोत असेही म्हंटलेले नाही, कायद्याच्या भाषेत "hearsay" म्हणतात ते तुम्ही करत आहात का ? नाव घेतल्यावर साहिल होतो- तेहेलका, कोब्रा पोस्ट यांनी थोर्यामोठ्या व्यक्तींच्या नावासहित त्यांना उघडे केले आहे. ज्यांची नावे घेतले त्यांच्यावर पुराव्याच्या आधारावरच कारवाई झाली असेल नाही ? ज्या तेहलकाच्या तरुण तेजपाल यांनी सेक्शुअल व्हॉयलेन्स वर पत्रकारिता केली त्यांच्यावर देखील तोच आरोप होउन कारवाई झालीच. राजकीय आकसातून म्हणा, मनोरंजनासाठी म्हणा, व्ह्यूज साठी म्हणा, एखाद्याचे नाव घेऊन आगापीछा नसलेली गोष्ट बनवली कि साहिल होतो. ओक्के, मी साहिलच्या अयोग्य गोष्टींचे समर्थन कधीच करणार नाही, परंतु तो देत होता ती सगळीच माहिती चूक नव्हती. बादवे... तुम्ही जो व्हिडियो दिला आहे ना त्याच्या खाली असंख्य कमेंट्स आहेत त्या देखील नक्की वाचा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile

या लोकांचा आधी मुंबई पोलीसांवर विश्वास नव्हता, आता सीबीआय , एम्स यावर नसेल एकही पुरावा ना देणाऱ्या लोकांवर ? बहुधा नवीन आयडी हवाबाण असा घ्यावा लागेल

In reply to by कपिलमुनी

या लोकांचा आधी मुंबई पोलीसांवर विश्वास नव्हता, आता सीबीआय , एम्स यावर नसेल मुंबई पोलिसांनी जर या हाय प्रोफाइल प्रकरणात आज पर्यंत एफआर देखील दाखल केला नसेल, तर ते तपास कोणत्या गोष्टीचा करत होते ते सांगा ना मला प्लीज. सीबीआयच्या तपासाच्या गतीवर किंवा त्यात उशिर होत असल्याचे म्हंटल्याने त्यावर अविश्वास दाखवला गेला आहे असा अर्थ काढता येत नाही. एम्स ने त्यांच्या रिपोर्टवर पत्रकार परिषद घेतली आहे का ? एम्स चे ऑफिशिअल स्टेटमेंन्ट आलेले नाही, निदान माझ्या पाहण्यात तरी अजुन आलेले नाही. संदर्भ :- On Tape Or Video? Swamy Raises Questions Over AIIMS Unofficial Leak In Sushant Case बहुधा नवीन आयडी हवाबाण असा घ्यावा लागेल व्यक्तिगत कमेंट ! केवळ प्रश्न विचारत राहणे आणि कुत्सित प्रतिसाद देण्या पलिकडे मुनी तुमची गती नाही हे परत उघड झाले ! :))) मला कॉपी पेस्ट करतो म्हणताना मला प्रतिसाद देताना देखील आपण देखील तेच करतो आहोत याचे ही भान तुम्हाला नाही हे देखील उघड झालेले आहे. तुमच्या टोपण नावाला मी कोणतेही विशेषण लावणार नाही, कारण मी तुमचा द्वेष करत नाही. गुडलक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile

In reply to by कपिलमुनी

बरं बर... आपण ज्या प्रकारे व्यक्त झालात ते केवळ आत्मनंद व्यक्त करण्यासाठीच नाही का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile

Aaj पर्यंत चे सर्वात बकवास सरकार म्हणजे मोदी सरकार. ज्यांनी ह्यांना निवडून दिले तर आता डोकं आपटून घेत आहेत. काय हे नमुने निवडून दिलेत. लोकशाही च्या चारी स्तंभाची वाट लावली,देशाच्या अर्थ व्यवस्थेचं वाटोळे केले. जगात भारताला काहीच किंमत राहिली नाही फक्त ती स्थिती गोदी मीडिया ला दिसत नाही. सुशांत सिंह केस ची पण वाट लावली गोदी मीडिया नी त्या बिचाऱ्याला न्याय मिळेल असे वाटत नाही.

In reply to by Gk

चाणक्याच्या ऐवजी मातोश्रींची चिंता करा... आजकाल तब्येत बरी नसते म्हणे त्यांची. ऑपरेशन मूळे बिघडत असावी बहुदा

In reply to by सॅगी

महाराष्ट्राच्या 'आदित्यला' बदनाम करण्याच्या प्रयत्नात युपीचा 'आदित्यनाथ' कधी बदनाम झाला हे भक्त लोकांना कळलच नाही.

In reply to by Gk

एक पेंगविन मारणारे....दुसरे गुंडांच्या गाड्या उलटवून मारणारे पण चमच्यांना फरक कसा कळणार?

In reply to by Rajesh188

आंधळ्या द्वेषापायी डोकं आपटायच्या बर्याच संधी मिळतील यापुढेही मिळतील तुम्हाला... तेव्हा डोकं आपटून फुटणार नाही याची काळजी घ्या....एकच असतं ना...

ठाकरे , मुंबई पोलीस , सुशांत , ड्रग्ज , सलमान .... भाजपे आणि भक्त सगळे विषय बंद करून अटलजी बोगदा दाखवत बसलेत मोदींचे अभिनंदन

गोदी मीडियानं चीन बरोबर भारताचे युद्ध करून भारत जिंकला हे पण 2 तासात जाहीर केले आहे. सब से तेज न्यूज

In reply to by Rajesh188

चीन विरुद्ध अत्ता पर्यंत दहा वेळा तरी युद्ध जिंकलो असेल, शेवटचे युध्द आपण राजनाथ रशिया ला गेले होते त्या वेळी जिंकलो होतो. आज आणखीन एकदा जिंकलेलो दिसतोय.

लोकहो, अखिल भारतीय वैद्यकशास्त्र संस्थेने ( = AIIMS ने ) सुशांतसिंह राजपूतचं निधन ही आत्महत्या होती असं म्हंटलं आहे. त्यांनी हा निर्णय अनेक आठवड्यांनंतर मृतदेहाची तपासणी न करता केवळ अवशेषांची ( vicera ची ) तपासणी करून दिला आहे. यामुळे माझ्या मते हा निर्णय आजिबात विश्वासार्ह नाही. असो. संजय राऊत व विनायक राऊत या दोन राऊतद्वयींनी भाजपला साकडं घातल्याने हा निर्णय बाहेर आलेला दिसतो आहे. संदर्भ : http://www.vikrantjoshi.com/2020/10/blog-post.html आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्यांचे साकडे ऐकून भाजपा गुन्हेगारांना मदत करते , तुमच्यासारख्या असंख्य भक्तांचा हा किती मोठा अपमान आहे , ह्यासाठी तुम्ही त्यांना मत दिले होते ?

@ गापै संजय राऊत व विनायक राऊत या दोन राऊतद्वयींनी भाजपला साकडं घातल्याने हा निर्णय बाहेर आलेला दिसतो आहे. तुम्ही दिलेल्या लिंक मधील लेखात खालील वाक्य आहेत :- नेमके मला आम्हाला काय करता येईल ते आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे याक्षणी आमचे कोणतेही चुकीचे पाऊल उचलणे,लोकांच्याही मनातून आम्ही उतरू शकतो तेव्हा मला निदान याक्षणी पटकन काहीही करता येणार नाही आणि संजय राऊत हात हलवत परतले, हीच वस्तुस्थिती आहे. मग भाजपाला साकडं घातल्याने हा निर्णय बाहेर आला असे आपण का म्हणता ? खालील ट्विट मधील वाक्ये आपल्यासाठी नाहीत, गैर समज होउ नये म्हणुन आधीच सांगितलेले उत्तम ! ============================================================================================ AIIMS मध्ये सुशांतचा व्हिसेरा पाठवलेला फॉरेन्सिक साठी. त्याची बॉडी नाही. व्हिसेरा रिपोर्ट वरून फक्त विषप्रयोग झाला नाही इतकाच निष्कर्ष निघतो. खून झाला हे सिद्ध करायला परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदार लागतात जे CBI कडे आहेत. चॅनेल काहीही बोलतील पण तुम्हाला अक्कल आहे कि नाही? इति :- लखोबा लोखंडे

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Atal Tunnel: Why opening of world's longest highway tunnel above 10,000ft significant?

In reply to by मदनबाण

मदनबाण, थोडक्यात काय, संजय राऊत हात हलवीत परतले पण अभावैसने शिवसेनेस अनुकूल निर्णय दिला याचा अर्थ हा केवळ तात्पुरता दिलासा ( temporary reprieve ) दिसतो आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा ठरवेल काय ते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अभावैसने शिवसेनेस अनुकूल निर्णय दिला याचा अर्थ हा केवळ तात्पुरता दिलासा रिपब्लिक टिव्ही नुसार अनऑफिशिअल लिक्स वरुन [ बहुतेक व्हॉट्सॲप ] हे मिडियात आलेले आलेले आहे,एम्सकडुन कोणतीही माहिती अजुन देण्यात आलेली नाही. बाकी, हात हलवत परत येण्याचा अर्थ पदरी काहीही न-पडणे तेव्हा तात्पुरता दिलासा देखील भाजपा कडुन देण्यात आलेला नाही. दिलासा मिळाला असे त्या लेखातुन देखील स्पष्ट होत नाही. असो... सध्या डोळे ३०२ वर आणि अर्णब उध्या सकाळी १०:०० वाजता काय उघड करणार आहे त्यावर.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Atal Tunnel: Why opening of world's longest highway tunnel above 10,000ft significant?

In reply to by मदनबाण

AIIMS forensic chief Sudhir Gupta said on Saturday: “We have submitted our conclusive report to the CBI and there are no injuries indicating struggle or scuffle. The body has marks of hanging. The presence of any sedative material was not detected by AIIMS toxicology lab. The complete examination of the ligature mark over the neck was consistent with hanging.” https://www.thehindu.com/news/national/other-states/sushant-singh-rajpu…

In reply to by मदनबाण

जर ही गोष्ट खरी मानायची तर पुन्हा एकदा राऊतांनी फडणवीसांचा गेम केला असे दिसते. म्हणजे राऊत फक्त हॉटेलच्या रूम्स फिरुन आले असतील.मीटींग्/चर्चा झालीच नसेल. पण ह्या गोष्टीमुळे फडणवीसांना ताडीच्या झाडाखाली बसवले गेले आता फडणवीसांनी कितीही ओरडुन सांगितले कि मी दूध पित होतो तरी कोणीही विश्वास ठेवणार नाही. फडणवीस अश्या मोठ्या चुका वारंवार का करतात हे समजण्यापलिकडचे आहे.

आता एम्स आणि मुंबई पोलिस यांच्यावर डॉक्टर गुप्तांच्या रेकॉर्डेड स्टेटमेंटमुळेच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek Din Teri Raahon Mein... :- Naqaab

In reply to by मदनबाण

कोणते असे दडपण आले असावे की यात जबानी फिरली असावी. असेही शरीर उपलब्ध नाही तर कसल्या टेस्ट यांनी केल्या हे पण उघड झाले पाहिजे आता. कुणीतरी फार ताकदवान शक्ती यात गुंतलेली आहे आणि काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते आहे हे वाटते आहे.

सुशांत को इन्साफ दिलवाते दिलवाते संघियों ने एक अच्छे इंटेलीजेंट आदमी की तगड़ी फजीहत करवा दी है, अभी तक की जांच में ये सामने आया है :- 1. सुशांत ने आत्महत्या की थी, AIIMS की रिपोर्ट के अनुसार 2. सुशांत ड्रग्स का आदि था 3. वह रिया के साथ लिव-इन में रह रहा था 4. दो साल में उसने 4 गर्लफ्रेंड बनाई थी 5. अलग अलग गर्ल फ्रेंड्स के साथ वो अलग अलग देशों में छुट्टियां मना के आया था 6. उसको कोई 15 करोड़ की फिल्म नहीं मिली थी, वो एक बातचीत पर ही ऑफर ख़त्म हो गया था 7. उसे बिहार से घंटा प्यार नहीं था, ना तो बिहार सरकार ने उसकी कभी कोई मदद की, ना ही बिहार सरकार ने उसकी मौत से पहले उसे कभी बिहार के प्रतीक के तौर पर कहीं दिखाया, और वो रिटायरमेंट के बाद भी बिहार की बजाय कहीं साउथ में रहना चाहता था। यानी बिहार में उसे कोई बहार नहीं दिखती थी। उनके स्टाफ में भी कोई बिहार का व्यक्ति नहीं था। 8. उसके परिवार से भी उसके अच्छे सम्बन्ध नहीं थे, उसके परिवार वालों को ये भी नहीं पता था की उसका इलाज चल रहा था, उसके पिता ने उसकी माँ को छोड़ दिया था जब वो डिप्रेशन में थी और उसकी अकेले ही मौत हो गयी थी ! उसके पिता ने जब उस से मुंबई आने के लिए कांटेक्ट करने की कोशिश की तो सुशांत ने अपने पिता को ही कोई जवाब नहीं दिया था। उसकी बहनें मुंबई की मुंबई में रहते हुए भी उस से मिलने नहीं जाया करती थी। 9. मैं अभी भी उसे एक अच्छा इंसान मानता हूँ जो डिप्रेशन में चला गया, एक बेहद इंटेलीजेंट और इमोशनल बंदा, जो अपनी माँ से बहुत प्यार करता था, जिसकी मौत को राजनितिक गिद्धों ने एक इवेंट बना लिया अपने राजनितिक फायदे के लिए। Krishan rumi

In reply to by हस्तर

After 14th June , With so many allegation and conspiracy on SSR , SSR was killed several times not once - And Karma will hunt and pay back also several times to all culprits. इति :- Nilotpal Mrinal

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India successfully tested supersonic tropedo | SMART|