✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुशांत सिंह राजपूत

म
मदनबाण यांनी
Mon, 08/31/2020 - 16:12  ·  लेख
लेख
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
177277 वाचन

💬 प्रतिसाद (340)

प्रतिक्रिया

निष्पक्ष न्याय करण्यासाठी

सुबोध खरे
Mon, 09/28/2020 - 18:15 नवीन
निष्पक्ष न्याय करण्यासाठी न्याय आणि शासकीय तपास यंत्रणांना अशा तर्हेचे वैयक्तिक संवाद किंवा लेखन( डायरी पत्र दस्त ऐवज) वाचण्याची परवानगी घटनेने दिलेली आहे. चिंता नसावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

२ बातम्या, नक्की सत्य काय ?

मदनबाण
Mon, 09/28/2020 - 21:48 नवीन
Salman Khan's Lawyer Issues Statement Clarifying On KWAN Links, Says Actor Has No 'stake' “Certain sections of media are falsely reporting that our client, Mr. Salman Khan, a leading Indian actor, has a majority stake in KWAN Talent Management Agency Pvt. Ltd. Mr. Khan has no stake, direct or indirect, in Kwan or any of its group entities.” NCB summons KWAN Agency CEO. Did you know Anurag Kashyap aide and film producer Madhu Mantena co-founded KWAN as well as Phantom films In 2018, Bollywood talent manager and co-founder of Kwan, Anirban Das Blah, had been asked to quit after #MeToo allegations on him too, had surfaced, where four women accused him of sexual harassment. Almost immediately after Anirban Blah quit the company, Salman Khan’s own talent management company Uniworld Big Talent (UBT) picked up major stakes in Big Bang Media Venture, the holding company which owns Kwan. Salman Khan’s UBT became partners in Kwan. So, Salman Khan is the direct owner of Kwan Company as he has a major of stakes in this company. Salman Khan's UBT lands strategic ownership in Kwan :- http://www.uniindia.com/salman-khan-s-ubt-lands-strategic-ownership-in-kwan/entertainment/news/1400599.html

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sochenge Tumhe Pyaar Kare Ke Nahi... :- Deewana
  • Log in or register to post comments

या बातमीचा आणि सुशांत

कपिलमुनी
Mon, 09/28/2020 - 22:15 नवीन
या बातमीचा आणि सुशांतचा काय संबंध आहे ते सांगालका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ओह!

निनाद
Tue, 09/29/2020 - 11:02 नवीन
म्हणजे सलमान क्वानचा कर्ता करविता होता/आहे आणि सुशांत क्वान तर्फे काम करत असे. असे म्हणायचे आहे का? लोक सलमान ला इतक्या शिव्या का घालतात? बरेच स माजकार्य पण करतो ना तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

या बातमीचा आणि सुशांतचा काय

मदनबाण
Tue, 09/29/2020 - 12:47 नवीन
या बातमीचा आणि सुशांतचा काय संबंध आहे ते सांगालका आणि सलमान क्वानचा कर्ता करविता होता/आहे आणि सुशांत क्वान तर्फे काम करत असे. असे म्हणायचे आहे का? जया सहा ही सुशांतची एक्स टॅलेन्ट मॅनेजर होती, तसेच रेहा ची देखील टॅलेन्ट मॅनेजर होती / बहुतेक आजही आहे. [ हीची आणि रेहा ची ड्रग चॅट हिस्ट्री लिक झाली होती ] जया सहा क्वान मध्ये कन्सल्टंट म्हणुन होती तसेच दुसर्‍या माहिती नुसार क्वान मध्ये १० पार्टनर आहे आणि हीची त्यात २ टक्के भागीदारी आहे. दीपिका पदुकोण आणि करिश्मा पारेख यांची ड्रग चॅट उघड झाली होती, करिश्मा ही दिपीकाची आणि रेहा ची मॅनजर आहे आणि क्वान ची कर्मचारी देखील. दिशा सालियान देखील क्वान मध्ये काम करायची. टॅलेन्ट एजन्सी वर नियंत्रण म्हणजे बॉलिवूड वर नियंत्रण कारण कोणाला चित्रपट मिळावेत किंवा काढुन घ्यावेत याचे नियंत्रण या एजन्सींकडेच असते.सुशांतकडुन ६ महिन्यात ७ चित्रपट गेल्याची बातमी जून मध्ये आलेली होती. संदर्भ :- Sushant Singh Rajput death case: Who is Jaya Saha and why is the NCB interrogating her Jaya Saha in statement: Disha Salian didn't meet Sushant Singh Rajput while working at Kwan | Exclusive Sushant Singh Rajput’s Ex-Talent Manager Jaya Saha Names Four Male Actors in Bollywood Drug Scandal Narcotics Control Bureau Chief Gives Six Months To The Team To File Charge Sheet In Bollywood's Alleged Drug Nexus Case - REPORTS ‘Maal is cigarette and hash are its different brands’, Deepika Padukone makes bizarre claims when confronted with ‘drug’ chats: Report 'Jaya Saha Just An Agent, Big Names To Surface,' Says SSR's Friend Yuvraj Who Knows KWAN KWAN's Payments To Rhea Chakraborty Under ED Scanner; Agency Probing Drug Angle @ मुनी सारखे प्रश्न विचारण्या ऐवजी गुगल बाबाला शरण जाऊन, शोध घेउन ती माहिती इथे देण्याचा देखील प्रयत्न करा. जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

अनुराग

निनाद
Tue, 09/29/2020 - 11:03 नवीन
बलात्काराचा आरोप असूनही अनुराग अजून बाहेर कसा हे कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छान

Gk
Tue, 09/29/2020 - 11:28 नवीन
एका आर्किटेकतला आत्महत्येला प्रवृत्त केले तरी अर्णव गोस्वामी बाहेर आहेच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

व्हॉटअबाऊटिझम

निनाद
गुरुवार, 10/01/2020 - 05:51 नवीन
सरळ सरळ व्हॉटअबाऊटिझम चाललेले आहे. Whataboutism, also known as whataboutery, is a variant of the tu quoque logical fallacy that attempts to discredit an opponent's position by charging them with hypocrisy without directly refuting or disproving their argument. - https://en.wikipedia.org/wiki/Whataboutism मुद्दे भरकटत ठेवायचे ही साम्यवादाची देणगी आहे! या प्रकारात रस नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

2000

शाम भागवत
Tue, 09/29/2020 - 07:20 नवीन
2000
  • Log in or register to post comments

...

Gk
Tue, 09/29/2020 - 13:04 नवीन
सुशांत कडून चित्रपट गेले म्हणे, लोकांच्याही नोकर्या जातात शेतकऱयांची शेती जाते, पिके जातात राजकारण्यांची इलेक्शन तिकिटे जातात मग त्यांनी काय करायचे ? आणि जे पिक्चर मिळाले , तेही कुणाकडून तरी जाऊन मिळाले असतील ना ?
  • Log in or register to post comments

व्ह्लॉगर्स मध्ये हडकंप

मदनबाण
Tue, 09/29/2020 - 20:43 नवीन
साहिल चौधरीचा युट्युब व्ह्लॉग सुशांत सिंग प्रकरणामुळे फार प्रसिद्ध झाला होता, सुशांत प्रकरणात सगळ्यात जास्त व्होकल साहिलच होता. त्याची बिनधास्त बोलण्याची शैली विलक्षण होती. काही दिवसांपूर्वी तो मुंबईत येउन गेला होता, दिशा सालियान ची बिल्डिंग आणि तीची बॉडी सापडली यातले अंतर यावर त्याने माहिती दिली होती. मदतीचे आश्वासन सगळेच देतात परंतु खरी वेळ आली कि साथ देणारे फार कमीच असतात असे तो म्हणाला होता. मुंबईत तो अपूर्वाला भेटला होता. जितकं मला आठवतं त्या नुसार अपूर्वा ने त्याला काही ठिकाणी घेउन गेली ज्याचा उल्लेख त्याने त्याच्या शेवटच्या व्हिडियोत केला होता, त्या नंतर तो गायब झाला आणि युट्युब व्ह्लॉगर्स मध्ये खळबळ उडाली... जितकी माहिती जालावर येत आहे त्यानुसार त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या नंतर अपूर्वा आणि शीना पॅनिक मोड मध्ये आहेत. साहिलच्या व्ह्लॉग मधले या प्रकरणातील सगळे व्हिडियो आता डिलीट केले गेले आहेत किंवा ऑफलाईन केले गेले आहेत. आता शीना ने ऑन लाईन येउन काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यात तिची साहिल विषयी चिंता देखील उघड होते. तीच्या म्हणण्या नुसार तीने तिच्याकडचे पुरावे हे तिच्या लॉ फर्मकडे आणि कॅनडियन गव्हर्न्मेंटकडे दिलेले आहेत, शिवाय आपला मृत्यू झाल्यास हे पुरावे पब्लिक केले जावे अशी देखील तीने तरतुद केलेली आहे. जसे वर मी अ‍ॅम्युलन्सच्या फोटो वरुन माहिती वाचकांनी या विषयी माहिती काढावी असे म्हंटले आहे त्याच प्रमाणे तीने देखील या अ‍ॅमब्युलन्स बाबत वाच्यता केलेली असुन त्यात ती ३ अ‍ॅमब्युलन्स बाबत बोलताना दिसते. शीना प्रचंड ताणात असुन त्यामुळेच ती प्रत्येक गोष्ट प्रदिर्घ बोलताना दिसते. तीने हे देखील सांगितले की अर्णब गोस्वामीचे ऑफिशीअल ट्विटर अकाउंट नाही म्हणुन तीने रिपब्लिक टिव्हीला टॅग केले होते, तसेच रिपब्लिकच्या एका पत्रकाराशी देखील तिचे बोलणे झाले होते, परंतु रिपब्लिक नेटवर्क कडुन तिला विशेष मदत मिळू शकलेली नाही किंवा त्या बाबतीत तिच्या पदरी निराशा आली असे तिच्या बोलण्यातुन येते. माझ्या जालिय शोधात आणि डॉट जोडण्याच्या प्रयत्नात ९:३० कॉल हे काही ठिकाणी आले होते जे शीनाच्या कॉल संबंधीच आहे जो तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंड ने तिला केला होता आणि सुशांत प्रकरणाची फार महत्वाची माहिती त्याला माहित असल्याने त्याच्या जिवास धोका असल्याचे तिने म्हंटल्याचे दिसते तसेच तो अजुन जिवंत असल्याचे देखील कळते. या संपूर्ण ऑनलाईन येउन बोलण्यात ती केवळ एकाच व्यक्तीचे नाव उघडपणे घेते [ जे तुम्ही व्हिडियोत ऐकण्याचे कष्ट घ्यावेत म्हणुन मी इथे देत नाही. ] आणि जालावर या व्यक्ती विषयी माहिती मिळवा असे ती सांगते. ती इतर कोणाचेही नाव घेत नाही कारण तसे केल्यास तिला अटक होण्याची भिती आहे, तिचा आपल्या देशातील न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे ती सांगते आणि जन्माने कॅनेडियन असुन काही वर्षां पासुन हिंदूस्थानात राहत असल्याचे देखील म्हणते. याच बरोबर तीने तीच्या घरा बाहेरचा सीसीटिव्ही कॅमेरा फोडला गेल्याचे सांगुन एक निष्णात हॅकर टिम कार्यरत असल्याचे सांगुन तिची काही ऑनलाईन अकांउट्स आणि तिच्या घरच्या इंटरनेटचे नेटवर्क हॅक करण्यात आल्याचे ती सांगते. तीचा हा व्हिडियो मी खाली देत आहे. व्हिडियो ३४ मिनीटा पासुन किंवा ४७ मिनीटां पासुन पुढे पहावा. *** तीने विभोर वर विश्वास दर्शवला असल्याचे देखील दिसते. जाता जाता :- सुशांत प्रकरणात जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याला एक तर ठार केले गेले आहे किंवा केले जाण्याची भिती आहेच, शिवाय त्याला केसेस मध्ये अडकवण्याचे प्रयत्न तसेच हँकिंगचा देखील सामना करावा लागतो हे आत्ता पर्यंत दिसुन येत आहे, हे तेव्हाच होते जेव्हा सगळ्यात मोठा मासा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे जोर लावतो. शीनाचा सीबीआय तसेच सुशांतच्या वकिलाशी संपर्क व्हावा असे एकंदर तिचे बोलणे ऐकल्यावर प्रकर्षाने वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)
  • Log in or register to post comments

साहिल चौधरी

शा वि कु
Tue, 09/29/2020 - 21:10 नवीन
तुम्ही टाकलेल्या एका व्हिडिओच्या थबनेल मध्ये (साहिल चौधरीच्या) "बेबी ए. यु." आणि पेंग्विनचा इमोजी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाप्रे

शा वि कु
Wed, 09/30/2020 - 08:06 नवीन
तेव्हा नव्हता पहिला. अटक का झाली बघायला दुसऱ्या चॅनेल वरचा ह्याचा व्हिडीओ पाहिला. भयचकित झालो पाहून. एक तरी तथ्य आहे का त्याच्या बोलण्यात ? काय रिसर्च केला म्हणे या माणसाने ? जे अफाट आणि अचाट दावे केलेत त्यावरून तरी कसलाही रिसर्च दिसत नाही. "मी रिसर्च केलाय भरपूर" या वाक्याखेरीज आणखी काही माहिती तरी दिलीये का आपल्या सो कॉल्ड रिसर्चची. आदित्य ठाकरेंनी स्वतः जाऊन सुशांतचा खून केला असं हा हवेतून बोलतो. खुनाच्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि ३ बॉडीगार्ड होते असा भयानक दावा जणू काही स्वतः CCTV फुटेज पहिल्यासारखा केला आहे. कुणावरती अश्या पातळीचे खोटे आरोप करणे हा गुन्हा आहे. ह्याला अटक व्हायलाच हवी. असल्या गोष्टींवर विश्वास ठेवून शेअर करणे पण धन्य आहे. असल्या प्रतिचा अपप्रचार करून अटक का झाली विचारू नये. अटक होणारच आणि व्हावीच. हे काही प्रश्न विचारणे नव्हे, गदारोळ करणे आणि चिखलफेक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

धागाकर्ते

शा वि कु
Sat, 10/03/2020 - 19:17 नवीन
धागाकर्ते हा व्हिडीओ (साहिल चौधरीचा) देण्यास विसरले असावेत. मी चूक दुरुस्त करावी म्हणतो. https://youtu.be/O2AqZQVOHC4
फॅक्ट्स जरूर चेक करें
असं म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

हा

निनाद
Wed, 09/30/2020 - 06:02 नवीन
साहिल चौधरी ला अटक का झाली? काय आधारावर? की फक्त चौकशीसाठी आत घेतले आहे? आवाज बंद केले जात आहेत का? कोण आहे त्यामागे असे वाटते? सगळ्यात मोठा मासा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे जोर लावतो. हा मोठा मासा कोणता आहे? की अनेक मोठे मासे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

साहिल चौधरी ला अटक का झाली?

मदनबाण
Wed, 09/30/2020 - 21:39 नवीन
साहिल चौधरी ला अटक का झाली? Kangan Ranaut On Youtuber Sahil Chaudhary: गिरफ्तार यूट्यूबर साहिल चौधरी की कंगना रनोट ने की रिहाई की मांग सुशांत केस: ‘मुंबई में यह क्या गुंडाराज चल रहा है?’, यूट्यूबर साहिल चौधरी की गिरफ्तारी पर फूटा कंगना रनौत का गुस्सा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kehdo Ke Tum Ho Meri Warna... :- Tezaab
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

मोदी चे गोद घेतलेले चमची आहे पद्मा

Rajesh188
Sat, 10/03/2020 - 15:41 नवीन
ह्या चामच्यांचे व्हिडिओ कशाला देत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

करना गुनाह नहीं है पर बोलना गुनाह है

मदनबाण
Tue, 09/29/2020 - 20:56 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)
  • Log in or register to post comments

सहमत

Gk
Tue, 09/29/2020 - 21:38 नवीन
खुद्द पन्त प्र्धान म्हणतात , कोन्ग्रेस मुक्त भारत , विरोधि पक्शच नको मग त्यान्चे पाठीराखे जनताहि त्सेच करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कशाला पुड्या सोडताय?

सुबोध खरे
Wed, 09/30/2020 - 12:23 नवीन
कशाला पुड्या सोडताय? विरोधि पक्शच नको असे श्री मोदी कुठे आणि कधी बोलले आहेत? बेधडक थापा मारताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

हा अभिनेता कोणता?

निनाद
Wed, 09/30/2020 - 06:06 नवीन
हा प्रसिद्ध अभिनेता कोणता आहे? तो इतका मोठा आणि पॉवरफुल कुणाच्या आशिर्वादाने झाला आहे? यात राजकारणी कोणते आहेत? जे लोक सहजतेने बोलू शकत होते युट्युब वर व्हिडियो टकत होते त्यांना आता बोलता येत नाही. दाबून टाकले जाते आहे. निरनिराळ्या गुन्ह्यात अडकवले जाते आहे का? हळूहळू दहशत तयार होते आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

राज्यपाल राजवट

गोंधळी
Wed, 09/30/2020 - 10:44 नवीन
https://www.ndtv.com/india-news/up-hathras-rape-victim-cremated-by-cops-family-begged-to-pay-last-respects-2303004?pfrom=home-topscroll उत्तर प्रदेश मध्ये राज्यपाल राजवट का लागु करु नये??? तिथे खरी गरज आहे असे कोणालाही वाटत नाहि का???
  • Log in or register to post comments

राष्ट्रपती

प्रसाद_१९८२
Wed, 09/30/2020 - 11:07 नवीन
राजवट लावून, बलात्कार्‍यांची मानसिकता बदलेल असा विश्वास वाटतो का तुम्हाला ? माझ्यामते हैद्राबाद पोलीसांनी जो न्याय तेथील बलात्कार्‍यांना बरोबर केला अगदी तसाच न्याय UP पोलिसांनी देखील करायला हवा तरच अश्या प्रकारांना थोडाफार तरी आळा बसेल. बाकि या प्रकरणात पोलीसांची भुमिका संशयास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

मुद्दा

गोंधळी
Wed, 09/30/2020 - 13:20 नवीन
मुद्दा हा आहे की ज्या अनावश्यक गोष्टींसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु करण्यासाठी जे लोक बोंब मारत होते ते अशा घट्नाणांकडे दुर्लक्ष करतात. मुबई पोलीसांवर तोंड्सुख घेणारे अशा वेळी गप्प बसतात. ती कंगना उत्तर प्रदेश मध्ये राहायला जाईल का?? माझ्यामते हैद्राबाद पोलीसांनी जो न्याय तेथील बलात्कार्‍यांना बरोबर केला अगदी तसाच न्याय UP पोलिसांनी देखील करायला हवा तरच अश्या प्रकारांना थोडाफार तरी आळा बसेल. अशा घट्नांचे मुळ हे सामाजीक व आर्थिक विषमता, गरीबी व शिक्षणाचा अभाव आणि एकुणच जनता जाग्रुत नसणे, अशा गोष्टींत आहे असे वाटते. हे तुम्हाला मिडीयामध्ये कोणत्या मुद्द्यांना TRP मिळतो यावरुन दिसेल. उदा. सुशांत राजपुत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

उत्तर प्रदेशात पोलिसांची

सुबोध खरे
Wed, 09/30/2020 - 12:32 नवीन
उत्तर प्रदेशात पोलिसांची वागणूक नेहमीच संशयास्पद असते. कारण तेथे आपल्या जातीच्या जास्तीत जास्त लोकांची पोलिसात भरती करणे हे सर्व राजकारणी करत आले आहेत. याची सुरुवात श्री मुलायमसिंह यादव यांनी केली. https://www.outlookindia.com/newswire/story/hc-orders-cbi-inquiry-into-up-police-recruitment-scam/577890 आणि अशा मानसिकते मुळे तेथे जाती पातीचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. योगी आदित्यनाथ यांनी किती जोर लावला तरी तेथील जातीचे राजकारण जायला काही दशके लागतील अशी स्थिती आहे.
  • Log in or register to post comments

छान

Gk
Wed, 09/30/2020 - 14:09 नवीन
स्वतः धर्माचे राजकारण करायचे मग कुणितरी जातीचे करून तुम्हालाही खड्ड्यात ढकळणार धप्प !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान

सॅगी
Wed, 09/30/2020 - 15:15 नवीन
स्वतः धर्माचे राजकारण करायचे
याच धर्तीवर... स्वतः शांतताप्रिय धर्मियांचे लाड करणारे राजकारण करायचे मग येउन तुम्हालाही खड्ड्यात ढकळणार धप्प !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

छान

सॅगी
Wed, 09/30/2020 - 15:16 नवीन
स्वतः धर्माचे राजकारण करायचे
याच धर्तीवर... स्वतः शांतताप्रिय धर्मियांचे लाड करणारे राजकारण करायचे मग कुणीतरी येउन तुम्हालाही खड्ड्यात ढकळणार धप्प !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

स्वतः धर्माचे राजकारण करायचे

सुबोध खरे
गुरुवार, 10/01/2020 - 12:09 नवीन
स्वतः धर्माचे राजकारण करायचे कुणी केलं धर्माचं राजकारण म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

BJP चे चमचे

Rajesh188
Wed, 09/30/2020 - 23:23 नवीन
कंगु वेडी आणि अर्णू मूर्ख उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या बलात्कार विषयी आकड तांडव करत नाहीत.
  • Log in or register to post comments

.

Gk
गुरुवार, 10/01/2020 - 06:43 नवीन
जीभ त्या मुलीची गेली आणि बोलती भाजपयांची बंद झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

व्हॉट अबाऊटिझम

निनाद
गुरुवार, 10/01/2020 - 09:21 नवीन
सरळ सरळ व्हॉट अबाऊटिझम करू नका. Whataboutism, also known as whataboutery, is a variant of the tu quoque logical fallacy that attempts to discredit an opponent's position by charging them with hypocrisy without directly refuting or disproving their argument. संदर्भ: - https://en.wikipedia.org/wiki/Whataboutism व्हॉट अबाऊटिझम वापरून मुळ मुद्दे सोडून इतर वाद नको, या प्रकारात रस नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अहो कोणाला समजावताय?

सॅगी
गुरुवार, 10/01/2020 - 10:35 नवीन
काँग्रेसचे राज्य म्हणजेच रामराज्य, तिथे काही अघटीत घडले की त्यावर बोलायला त्यांची दातखीळ बसणार.... आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं पाहायचं वाकुन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

डोळ्यात अंजन घालनारी मुलाखत

गोंधळी
गुरुवार, 10/01/2020 - 17:55 नवीन
हे मात्र खर आहे सुशांत राजपुत च्या नावावर सगळे आपली पोळी भाजुन घेत आहेत.
  • Log in or register to post comments

साहिल चौधरी

कपिलमुनी
गुरुवार, 10/01/2020 - 22:17 नवीन
साहिल चौधरीला अटक का झाली?? कोणती तक्रार आहे ? कोणी केलीये ? कोणते सेक्शन लावले आहेत ? काविळीचा चष्मा काढून वाचा . According to the police, they received a complaint on August 22 from a female advocate after which a case was registered under section 509 (word, gesture or act intended to insult the modesty of a woman), 505(2) (statements conducing to public mischief), 500 (defamation), 501 (printing or engraving matter known to be defamatory), 504 (intentional insult with intent to provoke breach of peace) and 34 (common intention) of the Indian Penal Code (IPC) and section 67 (publishing or transmitting obscene material in electronic form) of the Information Technology Act. An officer from Cyber police station said, “The accused used to upload videos on his social media profile containing abuses. The accused also posed as a journalist working with a national news channel. During investigation, police identified the accused as Sahil alias Pradeep Mohinder Chaudhary, following which a police team was dispatched to Faridabad, Haryana to arrest him.” Dr Rashmi Karandikar, deputy commissioner of police (cyber), said, “We have arrested the accused and are investigating the case.” The accused, during questioning, accepted that he has uploaded such videos to attract followers. Police have blocked all his social media accounts and deleted the videos. He was produced before metropolitan magistrate court on Monday and has been remanded in police custody till October 1. आता त्यानं कबूल केलाय, कोर्टाने त्याला कस्टडी दिली आहे, त्यावर काही कमेन्ट असेल तर सांगा ,
  • Log in or register to post comments

Dr. M Padma

मदनबाण
गुरुवार, 10/01/2020 - 23:45 नवीन
पाहण्या सारखा आणि ऐकण्या सारखा व्हिडियो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Keh Doon Tumhe Ya Chup Rahoon... :- Deewar [ 1975 ]
  • Log in or register to post comments

रोचक

निनाद
Fri, 10/02/2020 - 05:22 नवीन
व्हीडियो रोचक आहे. डॉ. पद्मा त्यांच्या लक्षात आलेले अगदी संगतवार उलगडून दाखवतात. आणि त्या स्वतः पण कोर्टात जाणार आहेत असे म्हणतात. न घाबरता स्वतः च्या जबाबदारीवर नावे घेऊन आरोप करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

डॉ. पद्मा यांना साष्टांग

मदनबाण
Fri, 10/02/2020 - 15:17 नवीन
डॉ. पद्मा यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे इतका डिटेल अ‍ॅनेलिसिस त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चॅनलवर दिला आहे. माझ्या स्वतःच्या पाहण्यात इतका डिटेल अ‍ॅनेलिसिस कुठेच आलेला नाही. जे मेन स्ट्रीम मध्ये सांगितले जात आहे ते किती चुकीचे आणि त्रुटक माहितीवर आहे, हे डॉ. पद्मा सांगतात ते समजुन घेताना कळुन येते. ligature mark हा शब्द प्रयोग सर्व मिडियात आहे तो कसा चुकीचा आहे ते सुद्धा समजले. इंग्रजी व्हिडियोत फोटो सकट अ‍ॅनेलिसिस दिला आहे, हिंदी व्हिडियोत फोटो नाहीत. इंग्रजीत :- हिंदीत :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मिटा डोळे, बरळा नीट
  • Log in or register to post comments

आत्महत्या म्हणे, मग आता फडणवीस , अर्णव, कंगना चे काय होणार ?

Gk
Sat, 10/03/2020 - 13:19 नवीन
*सुशांतची 'हत्या नसून आत्महत्याच', एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल* मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांत सिंगचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या यावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. त्याचा मृत्यू गळफासामुळे झाला की विषप्रयोगामुळे झाला, यासंबधीचे अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु होते. मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम देणारा एक अहवाल समोर आला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या एका समितीने एक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सुशांत सिंग राजपूतची हत्या नसून आत्महत्या केली आहे. असं स्पष्ट करण्यात आलं आहे. http://dhunt.in/bdSxj?s=a&uu=0xc87377c8c7485594&ss=wsp
  • Log in or register to post comments

अरेरे

Gk
Sat, 10/03/2020 - 13:43 नवीन
आणि मग ते बिहार इलेक्शन साठी सुशांत की मौत नही भुलेंगे भाजपाने पोस्टर छापून ठेवलेत त्याचे काय होणार ?
  • Log in or register to post comments

धागाकर्ता

कपिलमुनी
Sat, 10/03/2020 - 15:36 नवीन
धागाकर्ता आणि त्याचे यूट्यूबचे ज्ञानी लोक्स आता काय करतील ? तोंडावर पडल्यानंतर यूट्यूबवाले गायब होतील पण धागाकर्ता काय करतो हे बघणे रंजक असेल
  • Log in or register to post comments

आहात कुठे !

शा वि कु
Sat, 10/03/2020 - 16:24 नवीन
युट्युबवर एम्स म्हणा, सीबीआय म्हणा, जोपर्यंत खून सिद्ध होत नाही तोवर कोणत्याही संस्था विश्वासपात्र नाहीयेत अशी घोषणा कधीच झाली आहे. आदित्य ठाकरेने स्वतः जाऊन सुशांतला मारलंय, हे माहीत सगळ्यांनाच माहीत आहे, पुराव्यांची पण गरज नाही. सीबीआय, एम्स, (मुंबई पोलीस हेवेसांनल), खोट्या बातम्या पसरवू नका सांगणारे हाय कोर्ट, सर्वच्या सर्व पावरबाज मुख्यमंत्राच्या तालावर नाचत आहेत.पहिला पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट खोटा आहे हे म्हणू शकतो तर नव्या एम्स पॅनेलने असे काय दिव्य काम केले आहे की त्यांच्यावर शंका घेणार नाही ? नक्की घेणार. खोटारडे एम्स वाले. आणि अजुन अबेटमेंट टू सुसाईड आहेच.इतक्यात विसरू नका म्हंटलं ! रिया चक्रवर्तीने, करणं जोहरने आणि सलमान खानने सॅटेलाईट फोन वापरून सुशांतला हिप्नोटाईज करून आत्महत्या करायला लावली, हि शक्यता कोणीतरी नाकारू शकतं का ? घाईघाईने शवाचे दहन केले, घरातल्यांना सोडून, ते पोस्टमार्टम वर कोणी शंका घेऊ नये म्हणूनच. (अरेच्चा. ते ह्या केस मध्ये नाही ? बरं बरं.) #JusticeForSSR #SSRWarriors
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जस्टीस जस्टीस करून फेसबुक

Gk
Sat, 10/03/2020 - 16:46 नवीन
जस्टीस जस्टीस करून फेसबुक व्हॅटसपवर नुसता दन्गा माजवला होता आता त्यांच्या सगळ्या जुन्या पोस्टही सुसाईड करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ये बोहोत लंबी लढाई है...

मदनबाण
Sat, 10/03/2020 - 18:33 नवीन
सुशांतच्या केस मध्ये लढाई ही सिस्टिम व्हर्सस सिटिझन अशी असुन देशातील व जगभरातील हिंदुस्थानी नागरिक तसेच इतर लोक देखील या केसवर लक्ष ठेवुन आहेत आणि लढण्याची पूर्ण तयारी करत आहेत. किमान ५-७ वर्ष तरी या केस मध्ये सहज जातील याची खात्री अनेकांना आहेत. या काळात ज्या घडामोडी घडतील त्याचाही अर्थातच या केसवर परिणाम होणार आहे. एम्सचा रिपोर्ट जरी ही हत्या आहे हे सांगणारा नसला तरी सीबीआय ३०२ कलम चा वापर करणार का ? हे या रिपोर्ट पेक्षा अधिक महत्वाचे आहे असे मला वाटते. या केसशी संबंधीत डिजिटल इन्फॉर्मेशन फार मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर उपलब्ध आहे जी या केसला अशी सहजा सहजी बंद करु देणार नाही, तसेच जनतेचा दबाव देखील आहेच. राजकिय दबाव आणि जनतेचा दबाव या मध्ये कोणाचे पारडे जड भरेल हे येणारा काळच दाखवुन देइल तेव्हा एका रिपोर्ट ने हताश किंवा कोणी हुरळून जाण्याचे कोणतेच कारण नाही कारण, ये बोहोत लंबी लढाई है... जाता जाता :- एक जुनी बातमी :- Sunanda Pushkar's death: Dr Sudhir Gupta no stranger to controversy Dr Gupta had written to the Central Administrative Tribunal alleging that there were attempts to influence the autopsy report of Pushkar, brought out by a team headed by him. Image removed. टाईम्स नाऊ ने त्यांचे हे ट्विट कोणाच्या दबावा खाली डिलिट केले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile
  • Log in or register to post comments

302 नाही येत

Gk
Sat, 10/03/2020 - 18:46 नवीन
304 लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

३०२ का ३०४ हे सीबीआय

मदनबाण
Sat, 10/03/2020 - 20:25 नवीन
३०२ का ३०४ हे सीबीआय डायरेक्टर ठरवतील, तेव्हा आपल्याला कळेलच. In Sushant Case, CBI Director To Decide On Adding '302' Murder Charge; File To Be Handed

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

ट्विट डिलीट का केले ?

शा वि कु
Sat, 10/03/2020 - 19:01 नवीन
मुद्दलातच हवेतून केलेले ट्विट डिलिट करावेच लागणार. टाइम्स नाऊ ने ऐकीव माहितीवर ट्विट केले हे त्यांच्या कारकिर्दीला साजेसेच आहे. इथे आदित्य ठाकरेनी जाहीर आव्हान दिल्यावर टाइम्स नाऊ ने शेपटी घातली. जर इतकी खरीखुरी माहिती असती तर "मिनिस्टर्स सन" न म्हणता थेट व्यक्तीचं नाव देण्याची हिम्मत ठेवली असती. जर विश्वासार्ह माहिती असेल तर सर्व माहिती नावासकट देऊ शकतात, निर्धोकपणे. पण ह्यांनी लायबल वैगेरे कायदे कोळून पिले असतात, त्यामुळे थेट न बोलता अडून अडून बदनामी करतात. (अर्णब नाही का, थेट आरोपांवर सलमान खान नाव घ्यायला घाबरत होता? तसेच.)
Thackeray dared those who are making allegations to come forward and hand over the proofs to Mumbai police.
गंमत म्हणजे वरील दुवा टाइम्स नाऊ चाच आहे.
  • Log in or register to post comments

मुद्दलातच हवेतून केलेले ट्विट

मदनबाण
Sat, 10/03/2020 - 20:25 नवीन
मुद्दलातच हवेतून केलेले ट्विट डिलिट करावेच लागणार. कोणताही प्रतिष्ठा ठेवुन असणारा वृत्तसमुह हवेतुन ट्विट करत नाही. त्यामुळेच हे ट्विट केले गेल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते. टाइम्स नाऊ ने ऐकीव माहितीवर ट्विट केले हे त्यांच्या कारकिर्दीला साजेसेच आहे. हे आपल्या कानात कोणी येउन सांगितले का ? इथे आदित्य ठाकरेनी जाहीर आव्हान दिल्यावर टाइम्स नाऊ ने शेपटी घातली. जर टाईम्स नाऊ ने कोणत्याही "मिनिस्टर्स सन" चे नाव घेतले नसेल तर त्यांनी शेपटी घालायची गरज काय ? उलट त्यांच्याकडे ट्विट मध्ये जे ३ मुद्दे दिले आहेत त्या बद्धल माहिती आहे असा अर्थ होतो आणि त्यामुळेच ते ट्विट डिलीट का गेले हा प्रश्न देखील उपस्थित होतो. जर इतकी खरीखुरी माहिती असती तर "मिनिस्टर्स सन" न म्हणता थेट व्यक्तीचं नाव देण्याची हिम्मत ठेवली असती. कोणाचे नाव कधी घ्यावे हे न कळल्यास त्याचा साहिल होतो ना ? वरती तुम्हीच म्हणाला आहात फॅक्ट्स जरूर चेक करें, जे योग्यच आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

त्यामुळेच हे ट्विट केले

मदनबाण
Sat, 10/03/2020 - 20:27 नवीन
त्यामुळेच हे ट्विट केले गेल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते. हे त्यामुळेच हे ट्विट डिलीट केले गेल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते. असे वाचावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Test-Fires Nuclear-Capable Shaurya Missile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बरे

शा वि कु
Sat, 10/03/2020 - 20:50 नवीन
>>> प्रतिष्ठा ठेवून असणारा वृत्तसमूह- किती प्रतिष्ठित असली तरी ते ट्विट चुकीचेच आहे. >>> कानात येऊन कोण सांगितले ? - हाच प्रश्न टाइम्स नाऊ ला विचारायला हवा. त्यांना सुद्धा कोणीतरी कानात येऊन माहिती दिली आणि ती आहे तशी ट्विट करून उत्तम पत्रकारितेचा नमुना दाखवला. यालाच ऐकीव माहिती म्हणतात. याला कायद्याच्या भाषेत "hearsay" म्हणतात. कोणतरी काहीतरी बोलतो हा काही पुरावा नाही. >>> नाव घेतल्यावर साहिल होतो- तेहेलका, कोब्रा पोस्ट यांनी थोर्यामोठ्या व्यक्तींच्या नावासहित त्यांना उघडे केले आहे. तेव्हा नाव घेतल्यावर साहिल होत नाही. राजकीय आकसातून म्हणा, मनोरंजनासाठी म्हणा, व्ह्यूज साठी म्हणा, एखाद्याचे नाव घेऊन आगापीछा नसलेली गोष्ट बनवली कि साहिल होतो. (साहिल काय म्हणतो- सगळे युट्युब चॅनल मनोरंजनासाठी फेकफेकी करत आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा