सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना!
असे असेल तर फारच उत्तम! प्रमोज वरून तापलेल्या तव्यावर पोळी भाजायचा प्रयत्न वाटत होता, पण आता नक्कीच बघेन. महेश मांजरेकर शिवाजींच्या भुमिकेत बघायला जरा त्रास होईल खरा...चंद्रकांत/सुर्यकांत नंतर आत्ता फक्त अमोल कोल्हे आवडला शिवाजी म्हणून, बाकीच्यांची ही भूमिका करायची खरच योग्यता आहे का, असा प्रश्न उगाचच पडतो.
हम्म...पाहिला पाहिजे.
(मराठी माणसा जागा हो हे असं अजुन किती वेळा सांगायच?)
(मराठी)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
इथे दिल्याप्रमाणे
"मराठीत प्रथमच 'यूएफओ तंत्रज्ञाना'च्या सहाय्याने हा चित्रपट एकाचवेळी तब्बल २०० चित्रपटगृहात झळकावून एक नवा विक्रम करण्यास सज्ज झाला आहे."
त्यामुळे जालावर लवकर मिळणे कठिण वाटते.
तुम्हाला हा सिनेमा पहायला उशीर होईल ह्याचे वाईट वाटते.
पण मराठी सिनेमाच्या (खरे तर सर्वच) प्रेक्षकाला चित्रपटगृहात आणण्याकरीता हे गरजेचे आहे आणि मला ते आवडले.
बाकी, सिनेमा चांगला आहेच. माझे त्याबाबतचे पूर्ण मत लवकरच लिहिन.
निदान मराठी चित्रपट तरी थेटरात जाउन बगाया पायजे
कशाला हवा जालावर पायोरेटेड कॉपी जरा तरी खर्च करा ना
बाकि चित्रपट लय झकास आहे
*************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
आणि आपल्या बरोबर एका अमराठी माणसाला पण पहायला नक्की घेऊन जा. कारण बऱयाच अमराठी लोकांना अजून शिवाजी कळलाच नाहीये.
तसे पाहिले तर बऱयाच मराठी लोकांना सुध्धा तो कळला नाहीये. ;)
आपल्या या सुंदर परिक्षणाने हा चित्रपट पहाण्याची उत्सुक्ता वाढली आहे.
धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
>>>छान समिक्षण. लवकरच बघणार आहे हा चित्रपट.
असेच म्हणते..
मी माझी..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
बघितला. स्फूर्तीदायक आहे मराठी मनांसाठी.अर्थात थोडी अतिशयोक्ती आहे.सिनेमासाठी मुलीने वडीलांना आडनाव बदलण्याचा आग्रह करणे,एका भाषणात सरकारी अधिकार्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा कायापालट होणे,मराठी पाऊल पडतेच कुठे? वगैरे.पण बाकी विषय छान. "हे राजे" गीत पण छान्.सचिन खेडेकर तर लाजवाब.बारीकसारीक लकबींसह मध्यमवर्गीय भिडस्त मराठी माणूस ते जागा झालेला बाणेदार मराठी गडी त्याने सुरेख उभा केलाय. पोवाडा तर वीररसाने ओथंबलेला.महेश मांजरेकरांचा शिवाजी खराखुरा वाटत नसला तरी टाळ्या घेऊन जातो.संवाद ही चित्रपटाची सगळ्यात प्रभावी बाजू आहे. रोमांच उभे राहतात. सिद्धार्थ जाधवचा गुंड उस्मान पारकर मात्र एकदम फुसका.पडद्यावर दिसल्याबरोबर लोक दचकण्याऐवजी हसू लागतात्.चाकोरीत अडकल्याचा परिणाम. मराठी टक्का उजळून आणि उधळून निघावा असा चित्रपट!
कालच आमच्या मातोश्री त्यांच्या १५ मैत्रिणींबरोबर हा चित्रपट पाहुन आल्या होत्या...आज मी माझ्या मित्रा बरोबर हा चित्रपट पाहुन आलो...थिअटर हाऊस फुल होत.
चांगला मराठी चित्रपट...सुरुवात थोडी हळु आहे पण नंतर चित्रपट वेग धरतो.
प्रिया बापट कोळी नृत्यात चिकनी दिसते,सचिन खेडेकरांचा अभिनय अत्यंत सुंदर आहे.
रायबा (मकरंद शेट) ह्यांचे संवाद सॉलिइइइट आहेत.
दुसरे हिंदी चित्रपट मॉल मधे पाहण्यापेक्षा मराठी चित्रपट पाहिल्याचा जास्त आनंद वाटला.
मधे एकदा लाईट देखील गेले(महाराष्ट्रात चित्रपट पण सलग पाहता येत नाही नाहितर आपल शेजारच राज्य गुजरात पहा...)थॅक्स टु जनरेटर...पुढे चित्रपट व्यवस्थित पाहता आला.
मराठी माणसाने मराठी चित्रपट पाहिचे नाहित तर कोणी पाहिचे ?
तुम्ही देखील पहा. :)
(मराठी)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
प्रतिक्रिया
बघायचा आहे...
चांगलं
हम्म...पाहि
समिक्षण
मीही
यूएफओ ने प्रदर्शन
खर आहे
लवकरच बघेन..
स्वत: पहा
समिक्षण
बघायलाच
आपल्या या
छान
>>>छान
बघितला.
पोवाडा
नक्की बघेन
कालच
नक्की पाहणार !!