सुमारे १९८६ साली भारत सरकारने भारतीय भाषांसाठी संगणक कळफलक प्रमाणीत केला. त्याचे नाव इनस्क्रिप्ट. पुढे १९८८ आणि १९९२ साली त्यात सुधारणा केल्या. त्या काळी युनिकोड वगैरे नव्हते. पुढे युनिकोड आले त्यातही भारतीय भाषांसाठी सुधारणा झाल्या. परंतु तो पर्यंत भारतीय भाषांसाठी लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक अप्रमाणित पद्धती विकसित केल्या होत्या जसे गमभन, बोलनागरी इत्यादी. अशीच आणखी एक सोय म्हणजे गुगल इनपुट टूल्स. AI आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाषांसाठी बनवलेली प्रणाली, जी अर्थातच प्रमाणित नाही
दुर्दैवाने आजही भारतीय भाषांमध्ये टंकणे कठीण पडते कारण प्रमाणीकरणाचा आणि त्याच्या प्रसाराचा अभाव. तसेच भारतात मिळणाऱ्या संगणकांचे कळफलक हे अमेरिकन असतात व भारतीय इनस्क्रिप्ट अक्षरे त्यावर नसल्याने प्रसारही होत नाही.
सुदैवाने युनिकोड मुळे जगातील सर्व भाषांना संगणकावर स्वतःची एक प्रमाणित लिखाण पद्धती तयार झाली आहे ,आज सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स युनिकोड सपोर्ट करतात तसेच त्या त्या भाषांमध्ये लिहिण्याची सोयही देतात. परंतु भारतीय भाषांमध्ये तरी हे लिहिणे अजून तितकेसे रुळले नाही.
आपल्याला मराठी वर्णमाला येत असेल तर हे टंकणे शिकणे फार सोपे आहे. रोज अर्धा तास या हिशेबाने ४-६ दिवसात बऱ्यापैकी जमू शकते. अर्थात टंकणे गुगल इनपुट टूल्स इतक्या वेगाने होत नाही परंतु या (गुगल इनपुट टूल्स) पद्धतीत काही स्पेसिफिक शब्द लिहिणे जरा कठीण जाते वेळी इनस्क्रिप्ट माहिती असणे फायद्याचे ठरते. रच्याकने गुगल इनपुट टूल्स पण इनस्क्रिप्ट ला सपोर्ट करते.
तर आज ह्या पद्धतीने काही कठीण शब्द कसे लिहायचे हे बघू. खरे तर मी माझ्या सोयीसाठी ह्या नोट्स तयार केल्या होत्या कारण मला ही माहिती कुठेच मिळाली नाही, खास करून मराठीतले विविध र चे प्रकार इत्यादी. इतरांनाही याचा फायदा होईल असे वाटल्याने इथे देत आहे. अजूनही कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही असे वाटत असेल तर प्रतिसादात विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.
मराठी वर्णमाला
अ (D) आ (E) इ (F) ई (R) उ (G) ऊ (T) ए (S) ऐ (W)
ओ (A) औ (Q) अं (Dx) अः (D_) अॅ (D@) अॉ (|)
क (k) ख (K) ग (i) घ (I) ङ (U)
च (;) छ (:) ज (p) झ (P) ञ (})
ट (') ठ (") ड ([) ढ ({) ण (C)
त (l) थ (L) द (o) ध (O) न (v)
प (h) फ (H) ब (y) भ (Y) म (c)
य(/) र (j) ल (n) व (b) श (M)
ष ( < ) स (m) ह (u) ळ (N) क्ष (Shift + 7) ज्ञ (Shift + 5)
त्र (Shift + 6) क्ष (Shift + 7) श्र (Shift + 8) ऋ (+)
् (d) ा (e) ि (f) ी (r) ु (g) ू (t) े (s) ै (w)
ो (a) ौ (q) ं (x अनुस्वार) ः (_) ॅ (@) ँ (X) ॉ (\) ृ (=) ॄ (Left Ctrl + shift + u + 0944)
(0950 is a unicode character for ॐ , you can replace 0950 with any other code to type other unicode characters. List of all Devnagari unicode characters
https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf)
ॐ (Left Ctrl + shift + u + 0950)
ऽ (Left Ctrl + shift + u + 093d)
₹ (Left Ctrl + shift + u + 20b9)
कीबोर्ड लेआऊट
इनस्क्रिप्ट देवनागरी कळफलक असा दिसतो. हा देवनागरी वर्णमालेप्रमाणे organise केला आहे.
काही कठीण शब्द कसे लिहिता येतील याची उदाहरणे
कृष्ण (k=
| पर्वत (hjdbl) |
वृत्त (b=ldl) |
|
| हऱ्या (uJd/e) |
नाऱ्या (vJd/e) |
झिंदाबाद (Pfxoeyeo) |
| ऑफीस (|Hrm) |
अॅपल (D@hn) |
अत्युकृष्ठ (Dld/gk=<d") |
| त्राही (Shift + 6eur) |
त्र्यंब्यक (Shift + 6d/xyd/k) |
प्रत्येक (hdjld/sk) |
ऋषी (+
| स्वताः (mdble_) |
हृदयात (u=o/el) |
|
| महाराष्ट्र (cueje<d'dj) |
राष्ट्रीय (je<d'djr/) |
प्रश्न (hdjMdv) |
| बँक (yXk) |
अँड्रॉईड (DX[dj\R[) |
कॅमेरा (k@csje) |
| भक्ती (Ykdlr) |
धक्का (Okdke) |
लॅपटॉप (n@h'\h) |
| ज्ञानेश्वर (Shift + 5evsMdbj) |
एक्स्ट्रॉ (Skdmd'dj\) |
द्रौपदी (odjqhor) |
| ऱ्हस्व (Jdumdb) |
काँप्युटर (keXhd/g'j) |
माझं (cePx) |
| चम्पा (;cdhe) |
ब्रम्ह (ydjcdu) |
क्षणीक (Shift + 7Crk) |
| इंट्रेस्टींग (Fx'djsmd'rxi) |
वाङमय (beUc/) |
विठ्ठल (bf"d"n) |
| विठ्ठल (bf"d 'Left Ctrl + Shift + u + 200c' "n) |
| हूर्र्र् (utjd 'LeftCtrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c') मुद्दाम हलन्त पाहिजे असेल तर ही पद्धत वापरु शकता |
अधिक माहिती
प्रतिक्रिया
Google Input Tools (मराठी) झिंदाबाद!!!
मी माझ्या संदर्भसाठी हे तयार
In reply to Google Input Tools (मराठी) झिंदाबाद!!! by शेर भाई
फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही
In reply to मी माझ्या संदर्भसाठी हे तयार by टीपीके
अति-तलम कार्यालय वर्ष-भर =
In reply to फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही by शेर भाई
कै च्या कै.
In reply to अति-तलम कार्यालय वर्ष-भर = by शाम भागवत
छान!
In reply to फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही by शेर भाई
वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, अभिमान बाळगायला काय हरकत आहे
In reply to मी माझ्या संदर्भसाठी हे तयार by टीपीके
हे आवडले :)
In reply to वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, अभिमान बाळगायला काय हरकत आहे by शेर भाई
अस नाही पण
In reply to हे आवडले :) by टीपीके
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक
In reply to वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, अभिमान बाळगायला काय हरकत आहे by शेर भाई
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, कोणत्याही कळफलकाला आपण मराठी टंकायला तयार करू शकतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे.आपण परभाषेतले ९०% शब्द घेऊन तयार झालेल्या धेडगुजरी भाषेला मराठी म्हणुन मिरवतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे !टू इन वन कळफलक हवा !
In reply to मी माझ्या संदर्भसाठी हे तयार by टीपीके
तुम्ही जे मागताय तेच
In reply to टू इन वन कळफलक हवा ! by चौथा कोनाडा
धन्यवाद, टीपीकेजी !
In reply to तुम्ही जे मागताय तेच by टीपीके
ISM SOFT बरोबर पूर्वी
In reply to धन्यवाद, टीपीकेजी ! by चौथा कोनाडा
हा ही उत्तम पर्याय सुचविलात !
In reply to ISM SOFT बरोबर पूर्वी by शाम भागवत
हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे.
In reply to हा ही उत्तम पर्याय सुचविलात ! by चौथा कोनाडा
इथं थॉडीफार माहिती आहे, कळफलक
In reply to हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे. by टीपीके
पहिले उत्पादन छान वाटतेय पण
In reply to इथं थॉडीफार माहिती आहे, कळफलक by चौथा कोनाडा
मी १९९५ ला घेतलेल्या ISM SOFT
In reply to हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे. by टीपीके
व्वा, कौतुकास्पद ! चांगली
In reply to मी १९९५ ला घेतलेल्या ISM SOFT by शाम भागवत
प्लस वन.
In reply to Google Input Tools (मराठी) झिंदाबाद!!! by शेर भाई
+१
In reply to प्लस वन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान माहितीपुर्ण लेख!
इंग्रजी कळफलकावर नक्कीच कठीण
In reply to छान माहितीपुर्ण लेख! by टर्मीनेटर
येथे पण बरीच चर्चा झालेली आहे
धन्यवाद
In reply to येथे पण बरीच चर्चा झालेली आहे by शाम भागवत
कळफलकामागची कळ समजली.
अति-तलम कार्यालय २०१९
याशिवाय जर अति-तलम कार्यालय
एकदम मान्य.
In reply to याशिवाय जर अति-तलम कार्यालय by सतिश गावडे
मराठी संवादात व्याकरणाचे भान देखील ठेवायला हवे
In reply to याशिवाय जर अति-तलम कार्यालय by सतिश गावडे
फोन
माहितीपूर्ण
हल्ली क्रोम ब्राऊझरवर गुगल
इतका मोठा विषय नाही
शंभर टक्के सहमत.
In reply to इतका मोठा विषय नाही by संजय क्षीरसागर
डिबी, मोबाईलवर मराठी टायपींगसाठी
In reply to शंभर टक्के सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बराह भारीच आहे,
In reply to इतका मोठा विषय नाही by संजय क्षीरसागर
बरहा खरंच भारी आहे.
माझ्याकडे बराह चे पेड वर्जन
In reply to बरहा खरंच भारी आहे. by सतिश गावडे
ह्या निमित्ताने CDAC च्या
कळफलकावर लावायला स्टिकर्स
हे छान आहे. पण तुम्ही म्हणता
In reply to कळफलकावर लावायला स्टिकर्स by निनाद
स्विफ्ट की बोर्ड वापरता येईल
माझा मुख्य मुद्दा
In reply to स्विफ्ट की बोर्ड वापरता येईल by शशिकांत ओक
एकंदरीत इथल्या कुणीच
In reply to माझा मुख्य मुद्दा by टीपीके
हा माहितीपुर्ण धागा काढल्याबद्दल धन्यवाद टीपीके !
धन्यवाद :)
In reply to एकंदरीत इथल्या कुणीच by चौथा कोनाडा
वापरलं नाही.
In reply to एकंदरीत इथल्या कुणीच by चौथा कोनाडा
देवनागरी की रोमन ?
:(
In reply to देवनागरी की रोमन ? by बोका