✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इनस्क्रिप्ट टंकन

ट
टीपीके यांनी
Tue, 08/25/2020 - 18:19  ·  लेख
लेख
सुमारे १९८६ साली भारत सरकारने भारतीय भाषांसाठी संगणक कळफलक प्रमाणीत केला. त्याचे नाव इनस्क्रिप्ट. पुढे १९८८ आणि १९९२ साली त्यात सुधारणा केल्या. त्या काळी युनिकोड वगैरे नव्हते. पुढे युनिकोड आले त्यातही भारतीय भाषांसाठी सुधारणा झाल्या. परंतु तो पर्यंत भारतीय भाषांसाठी लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक अप्रमाणित पद्धती विकसित केल्या होत्या जसे गमभन, बोलनागरी इत्यादी. अशीच आणखी एक सोय म्हणजे गुगल इनपुट टूल्स. AI आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाषांसाठी बनवलेली प्रणाली, जी अर्थातच प्रमाणित नाही दुर्दैवाने आजही भारतीय भाषांमध्ये टंकणे कठीण पडते कारण प्रमाणीकरणाचा आणि त्याच्या प्रसाराचा अभाव. तसेच भारतात मिळणाऱ्या संगणकांचे कळफलक हे अमेरिकन असतात व भारतीय इनस्क्रिप्ट अक्षरे त्यावर नसल्याने प्रसारही होत नाही. सुदैवाने युनिकोड मुळे जगातील सर्व भाषांना संगणकावर स्वतःची एक प्रमाणित लिखाण पद्धती तयार झाली आहे ,आज सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स युनिकोड सपोर्ट करतात तसेच त्या त्या भाषांमध्ये लिहिण्याची सोयही देतात. परंतु भारतीय भाषांमध्ये तरी हे लिहिणे अजून तितकेसे रुळले नाही. आपल्याला मराठी वर्णमाला येत असेल तर हे टंकणे शिकणे फार सोपे आहे. रोज अर्धा तास या हिशेबाने ४-६ दिवसात बऱ्यापैकी जमू शकते. अर्थात टंकणे गुगल इनपुट टूल्स इतक्या वेगाने होत नाही परंतु या (गुगल इनपुट टूल्स) पद्धतीत काही स्पेसिफिक शब्द लिहिणे जरा कठीण जाते वेळी इनस्क्रिप्ट माहिती असणे फायद्याचे ठरते. रच्याकने गुगल इनपुट टूल्स पण इनस्क्रिप्ट ला सपोर्ट करते. तर आज ह्या पद्धतीने काही कठीण शब्द कसे लिहायचे हे बघू. खरे तर मी माझ्या सोयीसाठी ह्या नोट्स तयार केल्या होत्या कारण मला ही माहिती कुठेच मिळाली नाही, खास करून मराठीतले विविध र चे प्रकार इत्यादी. इतरांनाही याचा फायदा होईल असे वाटल्याने इथे देत आहे. अजूनही कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही असे वाटत असेल तर प्रतिसादात विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

मराठी वर्णमाला

अ (D) आ (E) इ (F) ई (R) उ (G) ऊ (T) ए (S) ऐ (W) ओ (A) औ (Q) अं (Dx) अः (D_) अॅ (D@) अॉ (|) क (k) ख (K) ग (i) घ (I) ङ (U) च (;) छ (:) ज (p) झ (P) ञ (}) ट (') ठ (") ड ([) ढ ({) ण (C) त (l) थ (L) द (o) ध (O) न (v) प (h) फ (H) ब (y) भ (Y) म (c) य(/) र (j) ल (n) व (b) श (M) ष ( < ) स (m) ह (u) ळ (N) क्ष (Shift + 7) ज्ञ (Shift + 5) त्र (Shift + 6) क्ष (Shift + 7) श्र (Shift + 8) ऋ (+) ् (d) ा (e) ि (f) ी (r) ु (g) ू (t) े (s) ै (w) ो (a) ौ (q) ं (x अनुस्वार) ः (_) ॅ (@) ँ (X) ॉ (\) ृ (=) ॄ (Left Ctrl + shift + u + 0944) (0950 is a unicode character for ॐ , you can replace 0950 with any other code to type other unicode characters. List of all Devnagari unicode characters https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf) ॐ (Left Ctrl + shift + u + 0950) ऽ (Left Ctrl + shift + u + 093d) ₹ (Left Ctrl + shift + u + 20b9)

कीबोर्ड लेआऊट

इनस्क्रिप्ट देवनागरी कळफलक असा दिसतो. हा देवनागरी वर्णमालेप्रमाणे organise केला आहे. KB Devanagari InScript text 1

काही कठीण शब्द कसे लिहिता येतील याची उदाहरणे

कृष्ण (k= पर्वत (hjdbl) वृत्त (b=ldl)
हऱ्या (uJd/e) नाऱ्या (vJd/e) झिंदाबाद (Pfxoeyeo)
ऑफीस (|Hrm) अॅपल (D@hn) अत्युकृष्ठ (Dld/gk=<d")
त्राही (Shift + 6eur) त्र्यंब्यक (Shift + 6d/xyd/k) प्रत्येक (hdjld/sk)
ऋषी (+ स्वताः (mdble_) हृदयात (u=o/el)
महाराष्ट्र (cueje<d'dj) राष्ट्रीय (je<d'djr/) प्रश्न (hdjMdv)
बँक (yXk) अँड्रॉईड (DX[dj\R[) कॅमेरा (k@csje)
भक्ती (Ykdlr) धक्का (Okdke) लॅपटॉप (n@h'\h)
ज्ञानेश्वर (Shift + 5evsMdbj) एक्स्ट्रॉ (Skdmd'dj\) द्रौपदी (odjqhor)
ऱ्हस्व (Jdumdb) काँप्युटर (keXhd/g'j) माझं (cePx)
चम्पा (;cdhe) ब्रम्ह (ydjcdu) क्षणीक (Shift + 7Crk)
इंट्रेस्टींग (Fx'djsmd'rxi) वाङमय (beUc/) विठ्ठल (bf"d"n)
विठ्‌ठल (bf"d 'Left Ctrl + Shift + u + 200c' "n)
हूर्‌र्‌र्‌ (utjd 'LeftCtrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c') मुद्दाम हलन्त पाहिजे असेल तर ही पद्धत वापरु शकता
अधिक माहिती
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70358 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

Google Input Tools (मराठी) झिंदाबाद!!!

शेर भाई
Tue, 08/25/2020 - 18:27 नवीन
कोणे एक काळी “शिवाजी” किंवा “मंगला” Fonts जपून ठेवावे लागत. पण आता Google Input Tools ने आम्हाला खूप आळशी केल आहे. पूर्वी तुम्ही दिल्या प्रमाणे तक्ते समोर ठेवून टंकायला लागायचे आता मराठी उच्चाराप्रमाणे इंग्रजी कळा (Keys) दाबत गेलो कि झाल.
  • Log in or register to post comments

मी माझ्या संदर्भसाठी हे तयार

टीपीके
Tue, 08/25/2020 - 18:53 नवीन
मी माझ्या संदर्भसाठी हे तयार केले होते, जर कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्यानंही उपयोगी पडेल म्हणून इथे डकवले. गुगल इनपुट टूल्स हे फक्त ब्राउझर मध्ये वपरता येते पण या पद्धतीने संगणकावर कोणत्याही प्रोग्रॅम मधे टंकता येते त्यामुळे याची माहीती असणे उपयोगी आहे. कळफलक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाला तर तुम्हाला असा तक्ता घेऊन बसायची गरज नाही. सध्या इंग्रजी कळफलक वापरात असल्याने तुम्हाला गुगल इनपुट टूल्स सोपे वाटते. ५० लाख लोकसंख्या असणाऱ्या नॉर्वे , डेन्मार्क इत्यादी देशांमध्ये त्यांच्या भाषेचे कळफलक, शुद्धलेखन सहाय्यक, व्याकरण सहाय्यक मिळतात पण ११ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही

शेर भाई
Tue, 08/25/2020 - 20:39 नवीन
|गुगल इनपुट टूल्स हे फक्त ब्राउझर मध्ये वपरता येते पण या पद्धतीने संगणकावर कोणत्याही प्रोग्रॅम मधे टंकता येते त्यामुळे याची माहीती असणे उपयोगी आहे. गुगल इनपुट टूल्स हे फक्त ब्राउझर मध्येच वापरता येते अस नाही, तुम्ही जर गुगल इनपुट टूल्स संगणकाला शिकवलं (install केल) कि संगणकावर कोणत्याही प्रोग्रॅम मधे टंकता येते. याशिवाय जर अति-तलम कार्यालय वर्ष-भर (Microsoft Office 365) किंवा अति-तलम कार्यालय २०१९ (Microsoft Office 2019) वापरणार असाल तर मराठीचा भाषा पुडा (Language Pack) सुद्धा उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अति-तलम कार्यालय वर्ष-भर =

शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 21:10 नवीन
अति-तलम कार्यालय वर्ष-भर = Microsoft Office 365 अति-तलम कार्यालय २०१९ =Microsoft Office 2019 भाषा पुडा= Language Pack हे आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

कै च्या कै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/30/2020 - 08:44 नवीन
अति-तलम कार्यालय वर्षभर, हे मराठीकरण गंडले आहे, असे वाटते. ऑफीस मधून अ‍ॅप्लिकेशनचा बोध होतो. ऑफीस वापरतो का असे म्हटले की ऑफीसच्या काही अप्लीकेशन्सचा बोध होतो. कार्यालय वापर असे म्हणता येणार नाही. बाकी प्रयत्न स्तुत्य आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

छान!

Nitin Palkar
Sat, 08/29/2020 - 19:43 नवीन
छान! शेर भाई!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, अभिमान बाळगायला काय हरकत आहे

शेर भाई
Tue, 08/25/2020 - 20:46 नवीन
|महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, कोणत्याही कळफलकाला आपण मराठी टंकायला तयार करू शकतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

हे आवडले :)

टीपीके
Tue, 08/25/2020 - 23:39 नवीन
अति-तलम कार्यालय वर्ष-भर = Microsoft Office 365 अति-तलम कार्यालय २०१९ =Microsoft Office 2019 भाषा पुडा= Language Pack
हे आवडले :) पण आपण सुचवलेले फक्त workarounds जुगाड आहेत. माझा मुख्य मुद्दा हा प्रमाणीकरण हा आहे. अर्थात तुमच्या मतांचाही आदर आहेच. आवड आपली आपली :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

अस नाही पण

शेर भाई
Wed, 08/26/2020 - 00:29 नवीन
हातात Mixer असताना पाटा वरवंटा घेऊन वाटत का बसावे. आपल्याला गरमागरम भजीसोबत खमंग चटणी मिळाली बस्स. आणि हो, इथे Mixer म्हणजे in thing आणि पाटा वरवंटा outdated अस अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक

चौथा कोनाडा
Sun, 08/30/2020 - 13:07 नवीन
महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल आपल्याला काहीच वैषम्य नाही हिच आपली शोकांतिका महाराष्ट्रात साधा मराठी कळफलक मिळत नाही आणि त्याबद्दल वैषम्य वाटून घेण्यापेक्षा, कोणत्याही कळफलकाला आपण मराठी टंकायला तयार करू शकतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे. आपण परभाषेतले ९०% शब्द घेऊन तयार झालेल्या धेडगुजरी भाषेला मराठी म्हणुन मिरवतो याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

टू इन वन कळफलक हवा !

चौथा कोनाडा
Wed, 08/26/2020 - 12:11 नवीन
टू इन वन कळफलक हवा ! नेहमीचा क्वेर्टी (QWERTY) आणि बटन दाबला की इन्स्क्रिप्ट ! असा एकातदोन कळफलक बाहेरून ही जोडता यायला हवा. ( दोन्ही विकसित करावा लागेल, पण भारतीय पातळीवर विकसित करुन प्रसार केल्यास नक्की फायदा होईल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

तुम्ही जे मागताय तेच

टीपीके
Wed, 08/26/2020 - 22:08 नवीन
तुम्ही जे मागताय तेच इनस्क्रिप्ट आहे. विंडोज कि आणि स्पेस बार दाबला कि भाषा बदलते. पाहिजे तेव्हा इंग्रजी, पाहिजे तेव्हा मराठी. तुमच्याकडे पर्मनंट मार्कर पेन असेल तर वरील प्रमाणे तुम्हीच तुमच्या कीबोर्ड वर लिहा आणि OS वर इनस्क्रिप्ट सेटिंग करा, झाला तुमचा पूर्ण सेटअप तयार. खरे तर असे कीबोर्ड सहज मिळायला पाहिजे पण नाही मिळत, TVS कंपनीचा १च कीबोर्ड आहे असा हा बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

धन्यवाद, टीपीकेजी !

चौथा कोनाडा
गुरुवार, 08/27/2020 - 17:46 नवीन
धन्यवाद, टीपीकेजी ! पर्मनंट मार्कर पेनने कळफलकाच्या कळांवर मराठी अक्षरखुणा करायचं (आत्ता तरी) रानटी वाटतेय. प्रयोग करून बघावा लागेल. TVS कंपनीचा कीबोर्ड एकदम बेष्ट पर्याय आहे सध्याच्याला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

ISM SOFT बरोबर पूर्वी

शाम भागवत
गुरुवार, 08/27/2020 - 18:29 नवीन
ISM SOFT बरोबर पूर्वी कळफळ्यावर चिकटवायला स्टिकर्सच मिळायची. तेवढी सोय झाली तरी पूरेसे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हा ही उत्तम पर्याय सुचविलात !

चौथा कोनाडा
Fri, 08/28/2020 - 17:25 नवीन
हा ही उत्तम पर्याय सुचविलात ! धन्यवाद, शाम भागवत़जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे.

टीपीके
Sat, 08/29/2020 - 11:48 नवीन
हो, हा पर्याय ही उत्त्तम आहे. अशी स्टिकर्स मिळतात का? मी कधी बघितली आणि शोधली नाही. कुणाला माहिती असेल तर सांगा, I am also interested
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

इथं थॉडीफार माहिती आहे, कळफलक

चौथा कोनाडा
Sat, 08/29/2020 - 13:06 नवीन
इथं थॉडीफार माहिती आहे, कळफलक ले-ऑऊटची खात्री करुन घ्यावी लागेल. https://www.amazon.in/Keyboard-Stickers-Lettering-Transparent-Background/dp/B0037LCYOO https://www.flipkart.com/prodot-kb-297rs-usb-hindi-devanagri-standard-keyboard-wired-multi-device/p/itm27b666062efb9?pid=ACCFUEVHWG5EGV7N&lid=LSTACCFUEVHWG5EGV7NGHYQI7&marketplace=FLIPKART&fm=gamificationAndPersonalisation%2FrecentlyViewed&iid=GAP_RECENTLY_VIEWED_DESKTOP_HORIZONTAL_0ba94c9b-502b-4801-aa01-5888f18cb6d6.ACCFUEVHWG5EGV7N&ppt=pp&ppn=pp&ssid=las50j1ybk0000001598686360012&otracker=pp_recently_viewed_Recently%2BViewed_2_35.productCard.RECENTLY_VIEWED_Recently%2BViewed_ACCFUEVHWG5EGV7N_gamificationAndPersonalisation%2FrecentlyViewed_1&otracker1=pp_recently_viewed_PINNED_gamificationAndPersonalisation%2FrecentlyViewed_Recently%2BViewed_DESKTOP_HORIZONTAL_productCard_cc_2_NA_view-all&cid=ACCFUEVHWG5EGV7N https://www.amazon.com/Hindi-Keyboard-Stickers-Overlays-Characters/dp/B001RZUGJC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

पहिले उत्पादन छान वाटतेय पण

टीपीके
Sat, 08/29/2020 - 13:35 नवीन
पहिले उत्पादन छान वाटतेय पण फारच महाग. त्यात 2-3 नवीन कीबोर्ड येतील दुसरे मस्त , फक्त 500-600 मधे तिसरे भयंकर महाग, त्या मुळे कटाप पाहिल्याचा फायदा म्हणजे कोणत्याही existing कीबोर्ड वर वापरता येईल. वेगळा कीबोर्ड न्यायाची गरज नाही. पण किंमत खूप जास्त. पण असतील आणखी कंपन्या ज्यांचे असे प्रॉडक्ट असेल जे स्वस्त असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मी १९९५ ला घेतलेल्या ISM SOFT

शाम भागवत
Sat, 08/29/2020 - 22:40 नवीन
मी १९९५ ला घेतलेल्या ISM SOFT बरोबर स्टिकर्स आली होती. स्टिकर्सची क्वालिटी चांगली होती. काही वर्षांनी तो कीबोर्डच मोडला. तोपर्यंत कीबोर्ड पाठ झाला होता. त्यामुळे नेहमीचा कीबोर्ड आता चालतो. आजही इन्स्क्रिप्टच वापरतो. एचसीएलने बायलिंगल कीबोर्ड बनवले होते. रिझर्व्ह बँक व नाबार्डमधे पाहिलेले आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

व्वा, कौतुकास्पद ! चांगली

चौथा कोनाडा
Sun, 08/30/2020 - 13:10 नवीन
व्वा, कौतुकास्पद ! चांगली स्टिकर्सची मिळुन वरीच वर्षे वापरता आली हे ही विशेषच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

प्लस वन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/26/2020 - 12:51 नवीन
आता गुगल इनपूटवरच आपली भिस्त आहे, बाकी ते इन्स्क्रीप्ट झेपत नाही. लेखनाबद्दल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

+१

तुषार काळभोर
Fri, 08/28/2020 - 11:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान माहितीपुर्ण लेख!

टर्मीनेटर
Tue, 08/25/2020 - 18:54 नवीन
छान माहितीपुर्ण लेख! अर्थात “ काही कठीण शब्द लिहिण्याची पद्धतही कठीणच वाटली “ :-) धन्यवाद आणी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

इंग्रजी कळफलकावर नक्कीच कठीण

टीपीके
Tue, 08/25/2020 - 19:06 नवीन
इंग्रजी कळफलकावर नक्कीच कठीण वाटते, पण देवनागरी कळफलकावर समोर अक्षरं असतील तर नाही वाटणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

येथे पण बरीच चर्चा झालेली आहे

शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 19:05 नवीन
येथे पण बरीच चर्चा झालेली आहे. <\a>
  • Log in or register to post comments

धन्यवाद

टीपीके
Tue, 08/25/2020 - 19:19 नवीन
हे नव्हते बघितले. चांगली चर्चा. अर्थात हा लेख मी कोणी इनस्क्रिप्ट कळफलक वापरच म्हणून लिहिला नसून, वापरायची इच्छा झाली तर संदर्भ म्हणून लिहिला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

कळफलकामागची कळ समजली.

कंजूस
Tue, 08/25/2020 - 19:41 नवीन
कळफलकामागची कळ समजली.
  • Log in or register to post comments

अति-तलम कार्यालय २०१९

नि३सोलपुरकर
Tue, 08/25/2020 - 20:57 नवीन
अति-तलम कार्यालय वर्ष-भर आणी अति-तलम कार्यालय २०१९ शेर भाई _/\_
  • Log in or register to post comments

याशिवाय जर अति-तलम कार्यालय

सतिश गावडे
Tue, 08/25/2020 - 22:39 नवीन
याशिवाय जर अति-तलम कार्यालय वर्ष-भर (Microsoft Office 365) किंवा अति-तलम कार्यालय २०१९ (Microsoft Office 2019) वापरणार असाल तर मराठीचा भाषा पुडा (Language Pack) सुद्धा उपलब्ध आहे.
Microsoft Office 365 आणि Microsoft Office 2019 ही विशेषनामे असून विशेषनामांचं भाषांतर करत नाहीत. :)
  • Log in or register to post comments

एकदम मान्य.

शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 22:59 नवीन
एकदम मान्य. टोपण नाव समजूया. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मराठी संवादात व्याकरणाचे भान देखील ठेवायला हवे

शेर भाई
Tue, 08/25/2020 - 23:58 नवीन
|Microsoft Office 365 आणि Microsoft Office 2019 ही विशेषनामे असून विशेषनामांचं भाषांतर करत नाहीत. :) आजकाल साध्या मराठी संवादात आपण आपल्याच नकळतपणे बऱ्याचदा इंग्रजी शब्द घुसडून बोलत असतो. मागे एका मित्रासोबत कुठेही कधीही भेटल्यावर पूर्ण वेळ मराठीतच बोलायचे अशी पैज लावली होती, हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्यावेळी मराठी संवादात व्याकरणाचे भान देखील ठेवायला हवे हा मुद्दा आमच्याकडून सुटला होता. सतीशG तुमचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

फोन

डाम्बिस बोका
Wed, 08/26/2020 - 01:56 नवीन
Microsoft SwiftKey Keyboard हा कीबोर्ड मी फोन वर वापरतो
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण

सुमो
Wed, 08/26/2020 - 09:07 नवीन
लेख. इन्स्क्रिप्ट कधी वापरलं नाही.
  • Log in or register to post comments

हल्ली क्रोम ब्राऊझरवर गुगल

महासंग्राम
Wed, 08/26/2020 - 09:31 नवीन
हल्ली क्रोम ब्राऊझरवर गुगल इनपुट टूल ऑनलाईन वापरतांना बराच त्रास होतो, शब्द टाईप केल्यावर जवळपास ३-४ सेकंद थांबावं लागतं. यासाठी काही उपाय आहेत का ?
  • Log in or register to post comments

इतका मोठा विषय नाही

संजय क्षीरसागर
Wed, 08/26/2020 - 15:19 नवीन
मोबाईलसाठी गुगल हँडरायटींग अ‍ॅप आहे. त्यात मराठी फाँन्ट डाऊनलोड करा. पेननं वहीवर लिहिल्यासारखं, बोटानं स्क्रीनवर लिहिता येतं. पीसीवर लिहायला बराह पॅडसारखी मजा अजून कशातही आली नाही. विचारा बरहुकूम शब्द उमटतात. बराह सध्या (बहुतेक) पेड आहे. पूर्वीपासून वापरत असल्यानं माझ्याकडे फ्री वर्शन आहे.
  • Log in or register to post comments

शंभर टक्के सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/26/2020 - 15:28 नवीन
पीसीवर लिहायला बराह पॅडसारखी मजा अजून कशातही आली नाही. विचारा बरहुकूम शब्द उमटतात.
येस्स....! बरहाची तुलनाच नै होऊ शकत कोणाची. मी तर कधी कधी मिपावर टायपासाठीही त्याचा उपयोग करतो. मला बरहाची तर इतकी सवय झाली की, बरहाने अगोदर शब्द उमटतात आणि नंतर मेंदू म्हणतो, भाऊ हे नव्हतं रे टायपाचं. :)
पूर्वीपासून वापरत असल्यानं माझ्याकडे फ्री वर्शन आहे.
सेम हियर, व्हर्जन एक आणि व्हर्जन आठ, हे दोन्ही माझ्याकडे आहे. -दिलीप बिरुटे (बरहाकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

डिबी, मोबाईलवर मराठी टायपींगसाठी

संजय क्षीरसागर
Wed, 08/26/2020 - 15:35 नवीन
गुगल हँडरायटींग ट्राय करा. लैच भारी ! त्यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही पर्याय आहेत. मला प्रोफेशनल कामासाठी प्रचंड इंग्रजी टाईप करायला लागतं ते पण मोबाईलवर फारच सुखाचं झालं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बराह भारीच आहे,

चौथा कोनाडा
Wed, 08/26/2020 - 18:13 नवीन
बराह भारीच आहे, वापरलेय, वापरतोय. फ्री व्हर्शन ! पण माझा आजकाल गुगल मराठी इनपुटचा वापर वाढलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बरहा खरंच भारी आहे.

सतिश गावडे
Wed, 08/26/2020 - 18:44 नवीन
बरहा खरंच भारी आहे. माझ्याकडे बरहाचे सुपर युजर व्हर्शन आहे. हे व्हर्शन स्टार्टपमध्ये टाकून ठेवायचे. पिसी किंवा लॅपटॉप चालू झाला की बरहा चालू होते. आणि त्यावर अक्षरे आपोआप (मी कळफलकाला हातही न लावता) उमटू लागतात. मग हे बरहामध्ये उमटलेलं डोळ्यांमार्फत माझ्या मेंदूपर्यंत पोहचते. आणि त्यानंतर मेंदूला कळते की त्याला काय विचार करायचा आहे टंकण्यासाठी. पण बरहामध्ये ते टंकन आधीच झालेले असते. अपूर्व आहे हे.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे बराह चे पेड वर्जन

प्रकाश घाटपांडे
Fri, 08/28/2020 - 11:39 नवीन
माझ्याकडे बराह चे पेड वर्जन आहे. पण तरीही फेबुवर च्या / मायबोली च्या टेक्स्ट बॉक्स मधे थेट लिहिता येत नाही. अक्षरांची गर्दी होते भलतच गार्बेज येत. मग नोट पॅड मधून लिहावे लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ह्या निमित्ताने CDAC च्या

मराठी_माणूस
गुरुवार, 08/27/2020 - 18:39 नवीन
ह्या निमित्ताने CDAC च्या GIST कार्ड ची आठवण आली.
  • Log in or register to post comments

कळफलकावर लावायला स्टिकर्स

निनाद
Mon, 08/31/2020 - 07:15 नवीन
कळफलकावर लावायला स्टिकर्स उपलब्ध आहेत. हे महाग आहेत. The DataCal Marathi language keyboard labels are a high-quality, durable and economical solution to creating a Marathi bilingual keyboard. https://www.dsi-keyboards.com/shop/accessories/language-labels/m-o-languages/marathi-keyboard-labels/ पण यापेक्षा स्वस्त नक्कीच मिळू शकतील.
  • Log in or register to post comments

हे छान आहे. पण तुम्ही म्हणता

टीपीके
Mon, 08/31/2020 - 11:07 नवीन
हे छान आहे. पण तुम्ही म्हणता तसे जरा महाग आहेत. वरती शाम म्हणतात तसे भारतात कुठे मिळतात बघितले पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

स्विफ्ट की बोर्ड वापरता येईल

शशिकांत ओक
Mon, 08/31/2020 - 09:29 नवीन
मोबाईल फोन वर भारतीय भाषा आणि इंग्रजी हे नुसत्या स्पेस बारला पुढेमागे सरकवून भाषा बदलून लिहायची सोय असलेले अ‍ॅप आहे. शिवाय तुम्ही पुढचा शब्द काय लिहिणार आहात तो समोर येतो. मात्र हा की बोर्ड पीसीवर मिळत नाही. I'm using SwiftKey, the keyboard that learns from you. Get it for Android at https://swiftkey.com
  • Log in or register to post comments

माझा मुख्य मुद्दा

टीपीके
Mon, 08/31/2020 - 11:14 नवीन
माझा मुख्य मुद्दा standardization बद्दल आहे. इंग्रजी बद्दल असे करावे लागते का? लॅपटॉप असो, फोन असो, किंवा आणखी कोणतेही मशीन असो. असो, हा लेख मी संदर्भासाठी लिहिला होता. विषय वेगळीकडे गेला :) जी लोकं इनस्क्रिप्ट वापरतात त्यांच्या मते यात काही माहिती वाढवावी का? इतरांनी हे वापरले आहे का? काही शंका आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

एकंदरीत इथल्या कुणीच

चौथा कोनाडा
Mon, 08/31/2020 - 18:02 नवीन
एकंदरीत इथल्या कुणीच इनस्क्रिप्ट वापरलेलं दिसत नाहीय. माझ्या सारखे फोनेटिकला सरावलेले इनस्क्रिप्ट वापरयला कचरतात, म्हणुनच आपण म्हणता तसे कळफलक इनस्क्रिप्ट अक्षरे नसल्यामुळे ! आपण मेहनत घेऊन कठीण शब्द कसे लिहायचे हे लिहिल्यामुळे आमच्या सारख्यांची खुप सोय होणार आहे, जेव्हा केव्हा इनस्क्रिप्ट वापरू तेव्हा इथे पटकिनि सन्दर्भ घेता येईल ! वापरा नंतरच अडचणि येतील, शंका येतील तेव्हा आपण असालच मदतीला !
हा माहितीपुर्ण धागा काढल्याबद्दल धन्यवाद टीपीके !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

धन्यवाद :)

टीपीके
Tue, 09/01/2020 - 16:42 नवीन
धन्यवाद :) कधीतरी एकदा वापरून बघा. आठवड्यातून अर्धा एक तास दिलात तरी खूप सराव होतो. लेआऊट देवनागरी मुळाक्षरे असतात तसाच आहे, शेवटच्या एक दोन ओळी सोडल्या तर. जसे मराठी शब्द तयार होतात अगदी तसेच टाईप करायचे. वर निनाद म्हणाले तसे स्टिकर्स मिळाले पाहिजेत म्हणजे आणखीन सोपे होईल. कोणाच्या ओळखीत असे स्टिकर्स बनवणारे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

वापरलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/30/2020 - 08:39 नवीन
एकंदरीत इथल्या कुणीच इनस्क्रिप्ट वापरलेलं दिसत नाहीय.
जालीय आयुष्यात इनस्क्रिप्ट शब्द खूप वेळा ऐकला, टंकायला कसे असेल असेही विचार येऊन गेला. पण थेट काही जमले नाही. काही तरी कठीण असेल असेच वाटत राहीलेले आहे, त्यामुळे इनस्क्रिप्ट वापरलेले नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

देवनागरी की रोमन ?

बोका
Mon, 08/31/2020 - 20:40 नवीन
हा माहितीपुर्ण धागा काढल्याबद्दल धन्यवाद टीपीके ! पण नवीन पिढी भारतीय लिपीत लिहिण्यास अनुत्सुक आहे. सगळे रोमन लिपीत मराठी, हिन्दि, वगैरे लिहितात. काही वर्षांनी, मलाय भाषेसारखी , मराठी रोमन लिपीत लिहिली जाणार नाही अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments

:(

टीपीके
Tue, 09/01/2020 - 16:43 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा