Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माझिया मना on Sun, 08/23/2020 - 00:22
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का?
असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले.
त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली.
ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला.
६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.

  • 20875 views

प्रतिक्रिया

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/23/2020 - 01:42

Permalink

तीन प्रश्नेत !

१. वेळच्या वेळी पोलीस कंप्लेंट का केली नाही ? २. १६ व्या वर्षापासून आत्मनिर्भर असतांना ६४ वर्ष वाट कशाला बघितली ? ३. ते घर सोडून गेले म्हटल्यावर दिपा कुठून आली ?

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 08/23/2020 - 04:16

In reply to तीन प्रश्नेत ! by संजय क्षीरसागर

Permalink

खिक्क

खिक्क

Submitted by माझिया मना on Sun, 08/23/2020 - 07:38

In reply to तीन प्रश्नेत ! by संजय क्षीरसागर

Permalink

१. कंम्प्लेंट करूनही सापडले

१. कंम्प्लेंट करूनही सापडले नाहीत. २. आत्मनिर्भर असणारे वाट पहात नाहीत का? ३. लग्न झाल्या झाल्या बायकोला सोडून नव्हते गेले, म्हणून दीपा आली.

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/23/2020 - 17:16

In reply to १. कंम्प्लेंट करूनही सापडले by माझिया मना

Permalink

@ माझिया मना : उत्तरातून पुन्हा तीन प्रश्ण निघाले

१. सिक्स्टीनच्या बालिकेला अपत्ययुक्त करणं हा फौजदारी गुन्हा आहे. मिस्टरांना उर्वरित आयुष्य (पुण्यात असतील तर), डिएसके अँड फॅमिलीबरोबर काढावं लागेल. मग काय उपयोग एवढी तपश्चर्या करुन ? २. सध्या सिक्स्टीफोरची असूनही दिपा यंग कशी राहिली ? ३. आत्मनिर्भर ही फार उच्च स्टेट आहे. सरकारनी (इंडिरेक्टली) सांगितलं की आता करोनाच्याबाबतीत आत्मनिर्भर व्हा. सुटले की नाही लोक जीवाववर उदार होऊन ? आता कुणी मनकी बात ऐकत नाही आणि कधी दिसेल टिवीवर आपला तारणहार ? याची वाट बघत नाहीत. सो गिरीजा मॅम इज नॉट आत्मनिर्भर .

Submitted by आनन्दा on Sun, 08/23/2020 - 19:51

In reply to @ माझिया मना : उत्तरातून पुन्हा तीन प्रश्ण निघाले by संजय क्षीरसागर

Permalink

@माझिया_मना तुम्ही लिहीत रहा.

@माझिया_मना तुम्ही लिहीत रहा. आम्हाला वाचायला आवडते आहे, आणि असले रिकामे प्रश्न पण पडत नाहीत.

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/23/2020 - 20:59

In reply to @माझिया_मना तुम्ही लिहीत रहा. by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : काय बोल्ता ?

23 Aug 2020 - 10:41 am | आनन्दा चौथा प्रश्न - वेळच्या वेळी अबोर्शन का नाही केलं? हा रिकामा नाही तर काय फालतू प्रष्ण का ?

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 08:46

In reply to @ आनन्दा : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर

Permalink

हा हा.. वाटलंच मला तुम्ही हे

हा हा.. वाटलंच मला तुम्ही हे विचारणार म्हणून.. पण हा प्रश्न कथाबीजावर नव्हताच.. तो एका आभासी माणसाच्या आईवडिलांना उद्देशून होता.. कोण बरं असेल तो आभासी माणूस?

Submitted by माझिया मना on Mon, 08/24/2020 - 00:55

In reply to @ माझिया मना : उत्तरातून पुन्हा तीन प्रश्ण निघाले by संजय क्षीरसागर

Permalink

१. थोडे मागील काळात गेलात तर

Submitted by माझिया मना on Mon, 08/24/2020 - 00:55

In reply to @ माझिया मना : उत्तरातून पुन्हा तीन प्रश्ण निघाले by संजय क्षीरसागर

Permalink

१. थोडे मागील काळात गेलात तर

Submitted by माझिया मना on Mon, 08/24/2020 - 00:55

In reply to @ माझिया मना : उत्तरातून पुन्हा तीन प्रश्ण निघाले by संजय क्षीरसागर

Permalink

१. थोडे मागील काळात गेलात तर

Submitted by स्पार्टाकस on Mon, 08/24/2020 - 10:17

In reply to @ माझिया मना : उत्तरातून पुन्हा तीन प्रश्ण निघाले by संजय क्षीरसागर

Permalink

बेसिकमध्येच राडा

दुसर्‍या प्रश्नातल्या बेसिकमध्येच राडा आहे, कारण दीपा ८० वर्षांच्या सासूबाईना घेऊन आली आहे याचा अर्थ दीपा सून आहे, मुलगी नाही. अर्थात नीट लक्षपूर्वक न वाचता बाष्कळ प्रश्न विचारत सुटणं हा यूएसपी असल्यामुळे लेखक / लेखिका यांनी दुर्लक्ष करावे आणि लिहीत राहवे.

Submitted by शाम भागवत on Mon, 08/24/2020 - 10:35

In reply to बेसिकमध्येच राडा by स्पार्टाकस

Permalink

हाहाहा.

हाहाहा.

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 08/24/2020 - 14:28

In reply to बेसिकमध्येच राडा by स्पार्टाकस

Permalink

@ स्पार्टाकस : नीट वाचा

दीपा मुलगी आहे हे तुम्ही काढलंय ! मी फक्त `दीपा कुठून आली' असं विचारलंय. बाईंचे सुपुत्र ६४ चे आहेत. त्यांची पत्नी त्याच दरम्यान असावी असा अंदाजे, म्ह्णून पुढचा प्रश्ण आहे. पुन्हा एकदा वाचा ! _________________________________ अर्थात, प्रश्न मौजमजेचे आहेत इतकी सुद्धा समज, तिरकस प्रतिसाद देणार्‍यांना असू नये हे नवले ! लोक्स काय करतात कुठे तरी झालेला लोच्या कुठेही सेटल करायला पाहतात आणि मग पुन्हा तोंडघशी पडतात. काही जण तर केवळ स्वतःच्या अत्यंत अशुद्ध लेखनानं व्यथित असतात, मग स्वतःचं लेखन सुधारण्याऐवजी, काहीएक कारण नसतांना, त्याचा राग माझ्यावर काढतात ! असो, यातून धडा घ्या. उगीच व्यक्तिगत प्रतिसाद देऊ नका. कारण एकवेळ माहितीत चूकभूल होऊ शकते पण लॉजिकमधे मला कोंडीत पकडणं अशक्य. आणि या प्रोसेसमधे काहीही साधत नाही, पुन्हा कटुता वाढते. अर्थात, मी कुणाला ओळखत नाही त्यामुळे जसा प्रतिसाद तसं उत्तर हीच कायम पॉलिसीये, पण तुमचा कोच्या होतो, त्याची जवाबदारी मी घेऊ शकत नाही.

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 14:46

In reply to @ स्पार्टाकस : नीट वाचा by संजय क्षीरसागर

Permalink

असो.. ठीक आहे. तुमचे लॉजिक

असो.. ठीक आहे. तुमचे लॉजिक मानले. १.
सध्या सिक्स्टीफोरची असूनही दिपा यंग कशी राहिली ?
या विधानातील दीपाच्या वयाचा निष्कर्ष संदर्भासह स्पष्ट करा. २. त्यानंतर वेळ आणि लाज उरलीच, तर
१. सिक्स्टीनच्या बालिकेला अपत्ययुक्त करणं हा फौजदारी गुन्हा आहे. मिस्टरांना उर्वरित आयुष्य (पुण्यात असतील तर), डिएसके अँड फॅमिलीबरोबर काढावं लागेल.
आज ८० वर्षाच्या असणार्‍या सासुबाई १९५६ साली गरोदर राहिल्या. त्या काळी संमतीवय किती होते त्याचे पण थोडे ज्ञानतुषार उडवा. @संपादक - सदर आयडी जिथे तिथे आपले ज्ञानतुषार उडवत असतो, पण शक्यतो दुर्लक्ष केले जाते असे ध्यानात आले आहे. परंतु इथे १. काहीही कारण नसताना एका चांगल्या प्रयत्नावरती लेखकाची खिल्ली उडवणारे प्रतिसाद दिले गेले आहेत. २. काहीही संबंध नसताना राजकारण आणलेले आहे ३. इतर सदस्यांची वैयक्तिक अक्कल काढणारे प्रतिसाद दिलेले आहेत (समजा ते सोडुन देऊ.) परंतु १ व २ साठी सदर सदस्याला समज देण्यात यावे अशी विनंती आहे.

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 08/24/2020 - 16:42

In reply to असो.. ठीक आहे. तुमचे लॉजिक by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : अरे बाप रे !

आधी पल्टी मारली आणि आता एकदम स्वतःची लाजच घालवली ! १.वाचा : बाईंचे सुपुत्र ६४ चे आहेत. त्यांची पत्नी त्याच दरम्यान असावी असा अंदाजे, म्ह्णून पुढचा प्रश्ण आहे. २. अज्ञानाची परिसीमा थांबवा > संमतीचा प्रश्नच नाही : वाचा > Section 375 of the Indian Penal Code defines rape as "sexual intercourse with a woman against her will, without her consent, by coercion, misrepresentation or fraud or at a time when she has been intoxicated or duped, or is of unsound mental health and in any case if she is under 18 years of age." ३. आणि व्यक्तिगत प्रतिसाद देण्यास (पार लाज वगैरे) स्वतः सुरुवात केली आहे हे लक्षात घ्या. आता मुस्काडात बसल्यावर सैरभर होण्यापेक्षा, यातून काही तरी शिका म्हणजे पुन्हा अशी चूक होणार नाही.

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 17:12

In reply to @ आनन्दा : अरे बाप रे ! by संजय क्षीरसागर

Permalink

बर, सोपे प्रश्न -

बर, सोपे प्रश्न - १९५० साली नवरा आणि नवरीच्या वयात किती वर्षांचे अंतर असायचे? १९५० साली संमतीवय किती होते?

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 08/24/2020 - 19:05

In reply to बर, सोपे प्रश्न - by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : तुमची पुरेशी शोभा वरच्या प्रतिसादात झालेली आहे

आता स्वतःची उत्तरं स्वतः शोधा आणि माझ्याबाबतीत पुन्हा असं धाडस करु नका.

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 19:21

In reply to @ आनन्दा : तुमची पुरेशी शोभा वरच्या प्रतिसादात झालेली आहे by संजय क्षीरसागर

Permalink

हा हा..

हा हा.. शोभा कोणाची होतेय ते तुम्हीच ठरवा.. उगीच अहे कॉम्पुटर म्हनून काहीही टाकायचं आणि अंगाशी आले की दुसर्‍याची अक्कल काढायची हे नेहमीचे आहे तुमचे. फक्त तेहमी तुम्ही शब्दांचे खेळ करून निसटून जाता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्याच शब्दांमध्ये अडकला आहात. आणि धाडस म्हणाल तर मी कधीच आंधळी रिस्क घेत नाही. संमतीवयाचा कायदा माझ्या तोंडावर मारा आणि व्हा की मोकळे, नाहीतर तोंडावर पडला आहात हे मान्य करा.

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 08/24/2020 - 19:35

In reply to हा हा.. by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : ?

संमतीवयाचा कायदा माझ्या तोंडावर मारा ?
इंग्रजी वाचता येत असेल तर सेक्शनवर दिला आहे. अजूनही स्वतःची शोभा झाली आहे हे समजत नसेल तर चालू ठेवा.

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 20:27

In reply to @ आनन्दा : ? by संजय क्षीरसागर

Permalink

हा आजचा कायदा आहे.. लग्न 1956

हा आजचा कायदा आहे.. लग्न 1956 ला झाले आहे.. तेव्हा किती होते संमतीवय ? मला इंग्रजी येत नाही, तेव्हा एखादी लिंक द्या, जिथे 1955 चे संमतीवय स्पष्ट लिहिलेले असेल, नाहीतर मी देतो बघा जमतंय का

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 08/24/2020 - 20:44

In reply to हा आजचा कायदा आहे.. लग्न 1956 by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : ?

संमतीचा प्रश्नच येत नाही. पुराव्यादाखल प्रतिसादात संबधित भाग अधोरेखित केला आहे. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर कुणाकडूनही उपरोक्त सेक्शनचा अर्थ समजावून घ्या.

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 21:34

In reply to @ आनन्दा : ? by संजय क्षीरसागर

Permalink

आयला म्हणजे तुम्हाला बलात्कार

आयला म्हणजे तुम्हाला बलात्कार झाला असे म्हणायचे आहे?

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 21:52

In reply to हा आजचा कायदा आहे.. लग्न 1956 by आनन्दा

Permalink

चला,

चला, आता हवेत विधान करणे बंद करूया, विकी असे म्हणतो की Child marriage was outlawed in 1929, under Indian law. However, in the British colonial times, the legal minimum age of marriage was set at 14 for girls and 18 for boys. Under protests from Muslim organizations in the undivided British India, a personal law Shariat Act was passed in 1937 that allowed child marriages with consent from girl's guardian.[6] After independence and adoption of Indian constitution in 1950, the child marriage act has undergone several revisions. The minimum legal age for marriage, since 1978, has been 18 for women and 21 for men. पुढे असेही लिहिले आहे की The 1929 law for non-Muslims was revised several times after India gained its independence from the colonial rule, particularly in 1978 when the marriage age was raised by 3 years each for men and women.[ हे विकी वरती घेतले आहे. मला अगदी तुमच्याइतके महान इंग्रजी येत नसेल, पण इथे जे लिहिले आहे, त्याचा अर्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे असा होतो, की 1978 पर्यंत संमतीवय 15 होते. 1978 मध्ये ते 18 केले गेले. तुमच्या इंग्रजीमध्ये जर काही वेगळा अर्थ असेल तर माहीत नाही. अजून एक ठिकाणी विकी असे सांगतो की Section 375 of the Indian Penal Code (IPC) considers the forced sex in marriages as a crime only when the wife is below age 15. Thus, marital rape is not a criminal offense under the IPC. Marital rape victims have to take recourse to the Protection of Women from Domestic Violence Act 2005 (PWDVA). म्हणजे संमतीवय सोडले तरी 15 वर्षाच्या पुढे होणारे वैवाहिक संबंध बलात्कार मानले जात नाहीत.. म्हणजे तुमचा दुसरा मुद्दा पण गैरलागू होतो. मग तुम्ही बलात्कार कशाच्या आधारावर म्हणत आहात? माझिया मना, कृपया क्षमा करा धागा हायजॅक केल्याबद्दल, पण हे केव्हातरी व्हायलाच हवी आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो.

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 08/25/2020 - 14:47

In reply to चला, by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : एका दिवसात ढोंग उघडं पडलं !

१.
24 Aug 2020 - 8:27 pm | आनन्दा मला इंग्रजी येत नाही,
असला खोटेपणा किती दिवस टिकणार ? असे उलटसुलट प्रतिसाद केवळ मानसिक असंतुलन दर्शवतात. २. न तुम्हाला कायदा माहिती न सोशल फोरमवर वागण्याच्या मर्यादा. तुम्ही लिहिलेलं सर्व आयपिसीच्या सेक्शन ३७५ मधल्या अंतर्विरोधामुळे झालं होतं आणि सुप्रिम कोर्टानं ते संपूर्णपणे बाद ठरवलं आहे. Sex with minor wife, despite consent, is rape: Supreme Court आणि याचं कारण The exception had remained an anomaly because Section 375 itself mandated that sex with a girl below 18 years of age, with or without her consent, was statutory rape. An unmarried girl child can prosecute her rapist, but a married girl child aged between 15 and 18 could not even do that, Justice Lokur said, pointing out the injustice. ३.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो ?
परत मुस्काडात बसली आहे. माझ्याशी तर सोडाच, पण कुणाशीही असला प्रकार पुन्हा करु नका. सहसा मी इतका खोलात जात नाही पण इतका निर्बुद्धपणा आणि अशी भाषा कुठेही सोकावता कामा नये.

Submitted by आनन्दा on Tue, 08/25/2020 - 15:11

In reply to @ आनन्दा : एका दिवसात ढोंग उघडं पडलं ! by संजय क्षीरसागर

Permalink

ठीक आहे, तो अंतर्विरोधाचा

ठीक आहे, तो अंतर्विरोधाचा मुद्दा आपण सध्या मान्य करु. तसाही तो अस्थानी आहे. पण तिथे असे स्पष्ट लिहिले आहे की संमतीवय १९७८ साली वाढवून १५ चे १८ करण्यात आले. ते पण खोटे आहे का?

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 08/25/2020 - 20:22

In reply to ठीक आहे, तो अंतर्विरोधाचा by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : तुम्ही काय लिहिता हे कळतंय का तुम्हाला ?

तसाही तो अस्थानी आहे ?
काय घंटा अस्थानी आहे ? पहिल्याच प्रतिसादात सांगितलंय की संमतीचा प्रश्नच नाही. तुम्ही सुप्रिम कोर्टाचा निर्णय वाचलेलाच नाही. तो निर्णय तुम्ही इकडून तिकडून गोळा केलेला सगळा कचरा रद्दबातल ठरवतो. सुप्रिमकोर्टाचा निर्णय हा अंतीम आहे त्यामुळे Sex with minor wife, despite consent, is rape: Supreme Court. विषय संपला. अजूनही कळत नसेल तर सोडून द्या. इथून पुढे : १. स्वतःला सोयिस्कर तेवढा कॉपी-पेस्ट मारलेला असा कचरा काहीएक उपयोगाचा नाही. माझ्यासारखी फुल लिंक देण्याची हिंमत ठेवा म्हणजे सगळा संदर्भ क्लिअर होतो. २. आपल्यात काहीएक वाद नसतांना तुम्ही सुरुवात केली आहे आणि त्याची फळं भोगतायं. स्वतः वातावरण बिघडवून परत वर कांगावा करत प्रशासनला साकडं घालण्याचा शहाजोगपणाही केला आहे. इंग्रजी येत नाही इतका उघड आणि बालीश खोटेपणा करुन तुम्ही आयडीची सर्व विश्वासार्हता गमावली आहे. तस्मात, तुमच्याशी चर्चा करण्यात मला काहीएक रस नाही. इथून पुढे तुमचे प्रष्ण तुम्ही सोडवा. याप्रकारे काहीही संबंध नसतांना उगीच वाट्टेल तसे स्कोर सेटल करणं आणि मुस्काडात बसल्यावर माझ्यावर आरोप करणं गैर आहे याची कल्पना तुम्हाला आणि असा प्रकार करणार्‍या इतर आयडींना यायला हवी. हा बायकी प्रकार आहे. जो मुद्दा असेल त्या धाग्यावर आणि समोरासमोर चर्चा झाली तर ती विधायक होते आणि विषय तिथेच संपतो.

Submitted by आनन्दा on Tue, 08/25/2020 - 20:43

In reply to @ आनन्दा : तुम्ही काय लिहिता हे कळतंय का तुम्हाला ? by संजय क्षीरसागर

Permalink

ठीक आहे चर्चा करू

ठीक आहे चर्चा करू सुप्रीम कोर्टाचा निर्णय 2000 नंतरचा आहे. आपल्या केसमध्ये शरीरसंबंध 1960 च्या अगोदर झाले आहेत. त्यावेळेस कोणता कायदा होता जे ज्यांवये तुम्ही याला बलात्कार म्हणताय इतका साधा प्रश्न मी विचारतोय. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळाटाळ करताय म्हणून मी उत्तर शोधून दिल, तर त्यातला अनावश्यक भाग घेऊन परत टिपण्णी केलीत. समजा मी आहे मूर्ख, आणि तुम्ही म्हणता मुस्काटात बसलेला, पण मग तुम्ही 1950 चा कायदा मारा ना माझ्या तोंडावर.. मी पन गाल लाल करून बसेन ना.. पण मला तो 1950 चा कायदा पाहिजे, 1978 च्या पुढचा नको, त्याने काहीही सिद्ध होत नाही. उगीच फुकाच्या तोंडावर पडणे आणि थोबाडीत बसण्याच्या चर्चा करू नका. खरी मारून दाखवा. गाल पुढे केला आहे.

Submitted by आनन्दा on Tue, 08/25/2020 - 20:58

In reply to ठीक आहे चर्चा करू by आनन्दा

Permalink

चला - संमतीवयासाठो ही लिंक

चला - संमतीवयासाठो ही लिंक घेऊया - https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://egazette.nic.in/WriteReadData/1955/E-2210-1955-0035-101571.pdf&ved=2ahUKEwjz8Zfm1LbrAhU7yDgGHTDyA-EQFjAGegQIAhAB&usg=AOvVaw28SX14F4U5M_6kZzObpQW8 गॅझेट ची आहे, 1955 च्या हिंदू विवाह कायद्याची scanned कॉपी. तिथे मुलीचे वय 15 वर्षे असावे असे लिहिले आहे. गौरीच्या सासूबाईंच्या वय 16 होते. तुमच्या मते तो बलात्कार आहे. तुमच्या कायद्याची प्रत कधी देताय?

Submitted by आनन्दा on गुरुवार, 08/27/2020 - 13:44

In reply to ठीक आहे चर्चा करू by आनन्दा

Permalink

जरा ते कायद्याच बघा ना राव..

जरा ते कायद्याच बघा ना राव..

Submitted by कानडाऊ योगेशु on Fri, 08/28/2020 - 13:22

In reply to जरा ते कायद्याच बघा ना राव.. by आनन्दा

Permalink

आता कळले कुठल्याही गोष्टीत

आता कळले कुठल्याही गोष्टीत संक्षीसर "आनंद" कसा घेतात ते.!

Submitted by संगणकनंद on Sat, 08/29/2020 - 19:57

In reply to आता कळले कुठल्याही गोष्टीत by कानडाऊ योगेशु

Permalink

स्वयंघोषित सर्वज्ञ को सही पकडे हैं...

एखाद्या प्रश्नावर ते निरुत्तर झाले की ते अशी काही सुमडीत कल्टी मारतात की जसे काय त्यांनी त्या चर्चेत आपल्या आधीच्या दिव्य प्रतिसादातून दिव्य ज्ञान दिलेच नाही. इतरत्र मात्र कोडगेपणाने आपण स्वतःच शिवलेला सर्वज्ञाचा झगा घालून प्रतिसाद देत असतात. असा माणूस "आनंदी" असेल तर त्यात नवल काय.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 08/29/2020 - 20:45

In reply to स्वयंघोषित सर्वज्ञ को सही पकडे हैं... by संगणकनंद

Permalink

@ त्याचू वैलपान : पुन्हा त्याचूपणा चालूच !

काय घंटा माहिती आहे तुम्हाला सेक्शन ३७५ आणि सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची ? नक्की काय परिणाम आहे त्या निकालाचा ? कशाप्रकारे सेक्शन ३७५ मधला अंतर्विरोध १८६० सालापासून दूर झाला आहे ? हिंमत असेल तर लिहा बरं इथे सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम. एकतर काहीही माहिती नाही, प्रतिसाद वाचायचे नाहीत, संदर्भ माहिती नाही, कधेमधे उगवलं की पुन्हा त्याचूपणा चालू !

Submitted by संगणकनंद on Sat, 08/29/2020 - 22:23

In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा त्याचूपणा चालूच ! by संजय क्षीरसागर

Permalink

हांगाश्शी!! आता कसे लाईनवर आलात...

आनन्दा भाऊ, बघा हो यांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे का ते.

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/30/2020 - 15:23

In reply to हांगाश्शी!! आता कसे लाईनवर आलात... by संगणकनंद

Permalink

@ त्याचू वैलपान : याला म्हणतात फुल त्याचू !

पुन्हा नांव सार्थ केलंत. बघा : एकतर काहीही माहिती नाही, प्रतिसाद वाचायचे नाहीत, संदर्भ माहिती नाही, कधेमधे उगवलं की पुन्हा त्याचूपणा चालू ! आता थोबाडात बसल्यावर दुसर्‍याकडे मदतीचा धावा !

Submitted by स्पार्टाकस on Mon, 08/24/2020 - 20:47

In reply to असो.. ठीक आहे. तुमचे लॉजिक by आनन्दा

Permalink

दीपा वयाने ६४ चीच असेल हे

दीपा वयाने ६४ चीच असेल हे तर्कट कशावरुन? ती ३४ पण असू शकते. दुसरं म्हणजे ६४ वर्षांची असली तरी ती अ‍ॅक्टीव्ह असू शकते आणि टू-व्हीलरही चालवू शकते अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत, त्यामुळे हा मुद्दाच बाद. लॉजिक गंडलेलंच असताना कोंडीत काय पकडणार डोंबल?

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 08/24/2020 - 21:08

In reply to दीपा वयाने ६४ चीच असेल हे by स्पार्टाकस

Permalink

@ स्पार्टाकस : निर्बुद्ध तर्काची हद्द !

१.
ती ३४ पण असू शकते.
चालू दे ! ३० वर्षाचं अंतर असणार्‍या किती जोड्या पाहिल्यात तुम्ही? दीपाचं वय ६४ च्या आत बसवतायं इतकीच काय ती तुमच्या लॉजिकची हद्द !

Submitted by महासंग्राम on Tue, 08/25/2020 - 09:44

In reply to @ स्पार्टाकस : निर्बुद्ध तर्काची हद्द ! by संजय क्षीरसागर

Permalink

मिलिंद सोमण आणि त्याची

मिलिंद सोमण आणि त्याची सध्याची बायको यांच्यात २६ वर्षांचे अंतर आहे

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 08/25/2020 - 14:21

In reply to मिलिंद सोमण आणि त्याची by महासंग्राम

Permalink

@ महासंग्राम : आलात का नाही लाईनवर ?

तर्काचा नियम असा आहे की Exception Proves the Rule ! थोडक्यात, अपवाद पुन्हा नियमच सिद्ध करतो. तस्मात, असल्या फालतू तर्काला काहीही अर्थ नाही. तार्किक दृष्टीनं तो बाद आहे.

Submitted by माझिया मना on Tue, 08/25/2020 - 00:06

In reply to बेसिकमध्येच राडा by स्पार्टाकस

Permalink

तुम्हांला समजलेय

तुम्हांला समजलेय

Submitted by आनन्दा on Sun, 08/23/2020 - 10:41

In reply to तीन प्रश्नेत ! by संजय क्षीरसागर

Permalink

चौथा प्रश्न - वेळच्या वेळी

चौथा प्रश्न - वेळच्या वेळी अबोर्शन का नाही केलं?

Submitted by शाम भागवत on Sun, 08/23/2020 - 10:50

In reply to चौथा प्रश्न - वेळच्या वेळी by आनन्दा

Permalink

त्यावेळी नवरा बायकोंच भांडण

त्यावेळी नवरा बायकोंच भांडण झालं नसेल!

Submitted by शाम भागवत on Sun, 08/23/2020 - 10:49

Permalink

छान लिहिलंय.

छान लिहिलंय.

Submitted by माझिया मना on Mon, 08/24/2020 - 01:09

In reply to छान लिहिलंय. by शाम भागवत

Permalink

आभार

आभार

Submitted by कोहंसोहं१० on Mon, 08/24/2020 - 01:58

Permalink

छान कथा.

छान कथा. बाकी फालतू प्रश्नांना भीक न घालता लिहीत राहा. काही अतिशहाणे आहेत इथे त्यांचा बैल रिकामाच राहणार. अगदी इथून ६४ वर्षांनी सुद्धा.

Submitted by चित्रगुप्त on Mon, 08/24/2020 - 15:07

Permalink

कथेतील आशय र्‍हदयस्पर्शी आहे.

कथेतील आशय र्‍हदयस्पर्शी आहे. ६४ वर्षेपर्यंत धीर धरून वाट बघणे ही एक तपश्चर्याच आहे. ही शत-शब्द कथा आहे, असे मानून वाचली. आता शब्द मोजले तर ९४ निघाले (मोजण्यात चूकही झाली असेल) गंमत म्हणजे ६४ वा शब्द नेमका "६४" हाच आहे. तर्क तर्काच्या जागी, आणि भाव भावाच्या जागी. लिहीत रहा.

Submitted by शाम भागवत on Mon, 08/24/2020 - 16:17

Permalink

कथेतील आशय र्‍हदयस्पर्शी आहे.

कथेतील आशय र्‍हदयस्पर्शी आहे. ६४ वर्षेपर्यंत धीर धरून वाट बघणे ही एक तपश्चर्याच आहे.
संपूर्णपणे सहमत. मला तर शबरीची गोष्ट आठवली. तसेच सहृदयी माणसांनी लेखक/लेखिकेला दिलेले प्रोत्साहनही भावले.

Submitted by गणेशा on Mon, 08/24/2020 - 16:51

Permalink

कथा, लेख असे तर काहीच म्हणता

कथा, लेख असे तर काहीच म्हणता येत नाही याला. एक घटना सांगितली आहे, ती पण त्रोटक पणे.. रागाने किंवा भांडून छोट्या मुलाला आणि 16 वर्षाच्या बायकोला सोडून जाणाऱ्यासाठी वाट पाहणे म्हणजे तपश्चर्या नसून निव्वळ मूर्ख पणा आहे. बायका सोडणार्यांना किंवा दुसऱ्या बायको बरोबर पळून जाणाऱ्यांना अद्दल घडवली पाहिजे तर येथे त्याच्या वाट पाहण्याला तपश्चर्या म्हंटले जाते.. अवघड आहे. उलट स्त्री ने असल्या नवऱ्याचे अस्तित्वच झुगारून दिले पाहिजे.. आणि दीपाच्या नवऱ्याने, जो स्वतः 64 वर्षाचा म्हातारा आहे, त्याने तर त्याला पुन्हा घरात पण घेतले नाही पाहिजे.. हाकलून दिले पाहिजे.. आणि एक काल्पनिक गोष्ट असेल तर ठीक आहे, पण भावना, संवाद, मनःस्तिथी यांचा कुठलाच लवलेश नसलेल्या आशयशुन्य गोष्टी वर वयक्तिक प्रतिसाद किंवा शेरेबाजी करणे चुकीचेच.. असो..

Submitted by आनन्दा on Mon, 08/24/2020 - 21:55

In reply to कथा, लेख असे तर काहीच म्हणता by गणेशा

Permalink

अहो शतशब्दाकथा आहे ती.. आणि

अहो शतशब्दाकथा आहे ती.. आणि छान आहे कल्पना म्हणून.. पूर्वी अश्या अनेक बायकांच्या कहाण्या ऐकल्या आहेत. त्या काळाला आजच्या मापदंडावरती जोखणे चूक आहे.

Submitted by गणेशा on Tue, 08/25/2020 - 00:25

In reply to अहो शतशब्दाकथा आहे ती.. आणि by आनन्दा

Permalink

Oh ok.

Oh ok. शतशब्द कथा असा उल्लेख नसल्याने, असे अर्धवट का लिहिले असेल असे मला वाटले.. अवांतर - बाकी मापदंड आजचा असला तरी अश्या अवस्थेत तेंव्हा स्त्री, मन मारून समाजासाठी जगायची.. कदाचीत ती आताही मन मारून जगत असेल.. पण या मन मारून खुडत जगण्याला तपश्चर्या म्हणणे म्हणजे, एका भिकाऱ्याला वैरागी म्हणण्यासारखे वाटले होते.. असो, माझा वरील रिप्लाय हा एक वाचकाला, भावना, संभाषण नसलेली गोष्ट वाटली.. शतशब्दकथा लिहिले असते किंवा मला कळाले असते तर शब्दमर्यादा समजल्याने रिप्लाय दिला नसता.. लिहीत रहा..

Submitted by चौकस२१२ on Fri, 08/28/2020 - 04:57

In reply to Oh ok. by गणेशा

Permalink

+१

+१

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com