मन मुंबई लक्ष्मी लॉटरी...
मन खडखडीत तिजोरी...
मन वैरी...
मन डायरीतले मोरपीस...
मन आहेराचा शर्ट पीस...
मन कासावीस...
मन मंदिरातला गाभारा...
मन हातामधला गंडादोरा...
मन भरारा...
मन इमान धैर्य न्याय...
मन दोन दगडावरती पाय..
मन हाय हाय...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1783
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा, झकास !
व्वा, झकास !
मन डायरीतले मोरपीस...मन आहेराचा शर्ट पीस...
मन कासावीस...
आहेराचा शर्ट पीस वाचून मन नॉस्टजिकले,
गेले ते आहेराच्या शर्टपीसचे दिवस, राहिल्या त्या फाटक्या टीशर्ट आणि रंग विटलेल्या जीन्सच्या आठवणी !
हा हा...शर्ट पीस नाही पण
In reply to व्वा, झकास ! by चौथा कोनाडा
हा हा...शर्ट पीस नाही पण डायरी मधली मोर पीस मात्र अजून आहेत हेच काय ते समाधान
छानेय
छानेय मध्यमवर्गीय मन.
सं - दी - प