Skip to main content

झाडे कोणती लावावी

लेखक सिन्नरकर यांनी बुधवार, 05/08/2020 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी मिपावर वाचक म्हणून असतो पण आज प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे काही चुकल्यास तुम्ही समजून घ्याल.  सध्या ऑफिसचे काम घरूनच असल्याने मी गावाकडून काम करत आहे.तसा मी पुण्यात असतो आजकाल वेळ असल्याने शेतात येणे जाणे सुरु आहे. सध्या डाळिंब काढणे सुरु आहे पण भाव नसल्याने सर्व काही तोट्यात सुरु आहे.  मागील काही दिवसांपासून बरेच विचार येताय कि रिकाम्या पडीक जमिनीत झाडे लावावीत. नोकरी आज आहे उद्याचे माहित नाही.  मला झाडे कोणती लावावी जेणे करून ५ ते १० वर्ष्यात त्यापासून काही अर्थाजन सुरु होईल याविषयी माहिती हवी आहे.  मी चिंच, आंबा अशी झाडे लावण्याचा विचार करत आहे. पाणी आहे, जमीन मुरमाड प्रकारची आहे, जेथे झाडे लावणार आहे तिथे शेवगा लावला होता पण टिकला नाही. पावसाळ्यात पाणी साचते कारण जमीन खालच्या बाजूला आहे  कुपया जाणकारांनी माहिती द्यावी. लिंक्स, बुक्स , Youtube विडिओ सुध्या चालतील. Parmaculture या विषयी वाचन सुरु आहे.    धन्यवाद 

वाचने 10296
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मला जास्त माहिती नाही, परंतु काही वर्षापूर्वी मित्राने कलमी आंबा (पायरी बहुदा ) लावला होता शेतात, शिर्डी -कोपरगाव जवळ. आता पैसे कमवत आहेत थोडेफार.. गाव कुठले आहे, म्हणजे सिन्नर -नाशिक असेल तर तिकडे कुठले फळ येते म्हणजे द्राक्ष वगैरे ते bagha.. पाणी लागते त्याला.. पुरंदर जवळ असेल तर सिताफळ, चिक्कू अंजीर.. म्हणजे, तुमच्या हवामानाला पोषक कुठली फळे येतात ते पहा.. स्थानिक शेतकरी लोकांची मदत घ्या..

सु बाभाळ,निलगिरी,बिलकुल लावू नका. चिंच,आवळा,जांभळं,आंबा,शेवगा,सागवान,कडू निंब,ही झाडे लावा. त्याच बरोबर सीताफळ,रामफळ,पपई,. लावा. कलमी झाडे ही विस्ताराने कमी असतात आणि त्यांचे आयुष्य सुद्धा कमी असते. देशी झाडे विस्ताराने मोठी असतात आणि त्यांचे आयुष्य जास्त असते ,रोगाला बिलकुल बळी पडत नाहीत.

करंजाची झाडे लावा , कमि पाण्यात जगतात, गुरे सहसा खात नाहीत , बिया १५० रु किलो ने विकल्या जातात.

In reply to by कपिलमुनी

करंजाच्या झाडांचं अर्थकारण ढोबळमानाने कसे असते? म्हणजे अंदाजे किती क्षेत्रात किती झाडे लावता येतात, लावल्यावर किती वर्षांनी उत्पन्न सुरू होते, प्रती झाड किती उत्पन्न होते, इ. (माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न - त्या बियांचा काय उपयोग असतो?)

In reply to by Gk

जगाच्या प्रतेक भागात वृशांच्या विविध जाती दिसतात.. विविध प्रकारचे हवामान असलेल्या ह्या जगात अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. प्रतेक वृक्ष ची गरज वेगळी असते. .मातीचा प्रकार,तापमान,पावसाचे प्रमाण हे सर्व घटक त्यांच्या वर परिणाम करतात. भारतातील विविध विभागाच्या वातावरणात वाढणारे पारंपरिक वृक्ष हे भारतीय वृक्ष.

In reply to by Rajesh188

काही वृक्ष उदा सुबाभूळ भारतात वाढते , पण ती भारतीय नव्हे म्हणे भारतीय म्हणजे अगदी प्राचीन , काही वृक्ष म्हणे नन्तर भारतात आले व ते आपल्या पर्यावरणास अपायकारक आहेत

In reply to by कंजूस

नदी किनारी असणारी किंजळची झाडे. पिंपरी, वट वृक्ष, बाभळ,चिंच,अंबा,कडू निंब, ही आणि अशी अनंत झाडे जी योग्य हवामानात निसर्गतः वाढली ,पोसली जातात ती वादळ आणि पावूस ह्यांच्या पुढे शरणागती स्वीकारत. नाहीत.

पावसाळ्यात पाणी साचते कारण जमीन खालच्या बाजूला आहे हे महत्त्वाचे. उत्पन्न देणारी झाडे नदीकिनारी असली तरी पाण्यात डुंबलेली नसावीत. फक्त भात पाण्यातच वाढते. रिझल्ट्स दहा वर्षांनी दिसणार मोठ्या झाडांचे.

प्रतिक्रिया बद्दल सर्वांचे आभार लवकरच निर्णय होईल आमचा ... जमेल तसे पोस्ट टाकेल  धन्यवाद 

नोकरी सोडून की रिटायरमेंट नंतर शेत केले , असा एक धागा कुणाचातरी आहे

In reply to by शाम भागवत

आता लिहीतात की नाही माहीत नाही. मी फार पूर्वी वाचले होते, पण आत्ता सापडत नाहीये ते लिखाण :(

खूप जुने आइडी का उडतात याचं आश्चर्य वाटते. म्हणजे असं की संस्थळावर संयमाने सतत लिहिण्याचा अनुभव असतानाही. ( शे दोनशेच्या आत युजर नंबर असलेले आइडी!)

In reply to by कंजूस

कुणितरी डूआयडी घेऊन जुन्याला उचकवतो. जुन्याच्या कुठल्यातरी श्रध्दांवरती बोचऱ्या भाषेत बोलतो. मग हा जुना आयडी व नविन डुआयडी दोघेही उडतात.