झाडे कोणती लावावी

सिन्नरकर's picture
सिन्नरकर in काथ्याकूट
5 Aug 2020 - 11:56 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,
मी मिपावर वाचक म्हणून असतो पण आज प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे काही चुकल्यास तुम्ही समजून घ्याल. 
सध्या ऑफिसचे काम घरूनच असल्याने मी गावाकडून काम करत आहे.तसा मी पुण्यात असतो
आजकाल वेळ असल्याने शेतात येणे जाणे सुरु आहे. सध्या डाळिंब काढणे सुरु आहे पण भाव नसल्याने सर्व काही तोट्यात सुरु आहे. 

मागील काही दिवसांपासून बरेच विचार येताय कि रिकाम्या पडीक जमिनीत झाडे लावावीत. नोकरी आज आहे उद्याचे माहित नाही. 
मला झाडे कोणती लावावी जेणे करून ५ ते १० वर्ष्यात त्यापासून काही अर्थाजन सुरु होईल याविषयी माहिती हवी आहे. 
मी चिंच, आंबा अशी झाडे लावण्याचा विचार करत आहे. पाणी आहे, जमीन मुरमाड प्रकारची आहे, जेथे झाडे लावणार आहे तिथे शेवगा लावला होता पण टिकला नाही. पावसाळ्यात पाणी साचते कारण जमीन खालच्या बाजूला आहे 

कुपया जाणकारांनी माहिती द्यावी. लिंक्स, बुक्स , Youtube विडिओ सुध्या चालतील.

Parmaculture या विषयी वाचन सुरु आहे. 
 
धन्यवाद 

प्रतिक्रिया

गणेशा's picture

5 Aug 2020 - 5:04 pm | गणेशा

मला जास्त माहिती नाही,
परंतु काही वर्षापूर्वी मित्राने कलमी आंबा (पायरी बहुदा ) लावला होता शेतात, शिर्डी -कोपरगाव जवळ.
आता पैसे कमवत आहेत थोडेफार..

गाव कुठले आहे,
म्हणजे
सिन्नर -नाशिक असेल तर तिकडे कुठले फळ येते म्हणजे द्राक्ष वगैरे ते bagha.. पाणी लागते त्याला..

पुरंदर जवळ असेल तर सिताफळ, चिक्कू अंजीर..

म्हणजे, तुमच्या हवामानाला पोषक कुठली फळे येतात ते पहा.. स्थानिक शेतकरी लोकांची मदत घ्या..

Rajesh188's picture

5 Aug 2020 - 8:15 pm | Rajesh188

सु बाभाळ,निलगिरी,बिलकुल लावू नका.
चिंच,आवळा,जांभळं,आंबा,शेवगा,सागवान,कडू निंब,ही झाडे लावा.
त्याच बरोबर सीताफळ,रामफळ,पपई,.
लावा.
कलमी झाडे ही विस्ताराने कमी असतात आणि त्यांचे आयुष्य सुद्धा कमी असते.
देशी झाडे विस्ताराने मोठी असतात आणि त्यांचे आयुष्य जास्त असते ,रोगाला बिलकुल बळी पडत नाहीत.

कपिलमुनी's picture

5 Aug 2020 - 9:15 pm | कपिलमुनी

करंजाची झाडे लावा , कमि पाण्यात जगतात, गुरे सहसा खात नाहीत ,
बिया १५० रु किलो ने विकल्या जातात.

तुषार काळभोर's picture

5 Aug 2020 - 9:28 pm | तुषार काळभोर

करंजाच्या झाडांचं अर्थकारण ढोबळमानाने कसे असते?
म्हणजे अंदाजे किती क्षेत्रात किती झाडे लावता येतात, लावल्यावर किती वर्षांनी उत्पन्न सुरू होते, प्रती झाड किती उत्पन्न होते, इ.
(माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न - त्या बियांचा काय उपयोग असतो?)

तुषार काळभोर's picture

5 Aug 2020 - 9:34 pm | तुषार काळभोर

इथे महाराष्ट्र सरकारचे माहिती पत्रक आहे.
http://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Publications/Biodisel-K...

भारतीय वृक्ष आणि परदेशी वृक्ष म्हणजे काय ?

जगाच्या प्रतेक भागात वृशांच्या विविध जाती दिसतात..
विविध प्रकारचे हवामान असलेल्या ह्या जगात अनेक प्रकारचे वृक्ष आहेत.
प्रतेक वृक्ष ची गरज वेगळी असते.
.मातीचा प्रकार,तापमान,पावसाचे प्रमाण हे सर्व घटक त्यांच्या वर परिणाम करतात.
भारतातील विविध विभागाच्या वातावरणात वाढणारे पारंपरिक वृक्ष हे भारतीय वृक्ष.

Gk's picture

6 Aug 2020 - 12:24 am | Gk

काही वृक्ष उदा सुबाभूळ भारतात वाढते , पण ती भारतीय नव्हे म्हणे

भारतीय म्हणजे अगदी प्राचीन ,
काही वृक्ष म्हणे नन्तर भारतात आले व ते आपल्या पर्यावरणास अपायकारक आहेत

पाणी तुंबले दिवसभर की बरीच झाडे बाद होतात.

नदी किनारी असणारी किंजळची झाडे.
पिंपरी, वट वृक्ष, बाभळ,चिंच,अंबा,कडू निंब, ही आणि अशी अनंत झाडे जी योग्य हवामानात निसर्गतः वाढली ,पोसली जातात ती वादळ आणि पावूस ह्यांच्या पुढे शरणागती स्वीकारत. नाहीत.

pspotdar's picture

6 Aug 2020 - 1:56 am | pspotdar

त्यांना कंकाका म्हणतात, माहित नाही का ???

पावसाळ्यात पाणी साचते कारण जमीन खालच्या बाजूला आहे
हे महत्त्वाचे.
उत्पन्न देणारी झाडे नदीकिनारी असली तरी पाण्यात डुंबलेली नसावीत. फक्त भात पाण्यातच वाढते. रिझल्ट्स दहा वर्षांनी दिसणार मोठ्या झाडांचे.

सिन्नरकर's picture

8 Aug 2020 - 5:50 pm | सिन्नरकर

प्रतिक्रिया बद्दल सर्वांचे आभार
लवकरच निर्णय होईल आमचा ...
जमेल तसे पोस्ट टाकेल 
धन्यवाद 

Gk's picture

8 Aug 2020 - 6:55 pm | Gk

नोकरी सोडून की रिटायरमेंट नंतर शेत केले , असा एक धागा कुणाचातरी आहे

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 4:45 pm | विनिता००२

मायबोलीवर लिंबुटींबू यांचा आहे.

शाम भागवत's picture

14 Aug 2020 - 5:22 pm | शाम भागवत

त्यांचा आयडी उडाला ना खूप पूर्वीच?
आता कोणत्या नावाने लिहितात?

विनिता००२'s picture

17 Aug 2020 - 2:33 pm | विनिता००२

आता लिहीतात की नाही माहीत नाही.
मी फार पूर्वी वाचले होते, पण आत्ता सापडत नाहीये ते लिखाण :(

Gk's picture

24 Aug 2020 - 5:08 pm | Gk

मिसळ पाव वरचा लेख आहे कुणाचातरी

लिंबू बहुदा मिपावर नव्हते

खूप जुने आइडी का उडतात याचं आश्चर्य वाटते. म्हणजे असं की संस्थळावर संयमाने सतत लिहिण्याचा अनुभव असतानाही. ( शे दोनशेच्या आत युजर नंबर असलेले आइडी!)

शाम भागवत's picture

14 Aug 2020 - 9:13 pm | शाम भागवत

कुणितरी डूआयडी घेऊन जुन्याला उचकवतो.
जुन्याच्या कुठल्यातरी श्रध्दांवरती बोचऱ्या भाषेत बोलतो.
मग हा जुना आयडी व नविन डुआयडी दोघेही उडतात.

विनिता००२'s picture

17 Aug 2020 - 2:32 pm | विनिता००२

मला माहीत असलेल्या लिंक देतेय. बघाव्यात.

https://sundayfarmer.wordpress.com/

https://www.facebook.com/teamhas/

सिन्नरकर's picture

19 Aug 2020 - 9:24 am | सिन्नरकर

धन्यवाद!