Skip to main content

!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 05/08/2020 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर. जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं. सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे. पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत. मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं. या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्‍या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक. मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक. मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्‍या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो. मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात. आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे. जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती. हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती. !जय श्री राम!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43835
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्‍या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक. हं त्या काळात शाळेत गल्लीत टीव्ही , स्क्रीन , इंटरनेट होते का ?

बाबरी कमिटीला पाच एकर दिलेत म्हणे , त्याचे काय झाले ?

In reply to by Gk

सर्व जात आणि धर्म यांनी आपल्या मधले देहभाव विसरुन आणि राम मंदिर सिद्ध झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ एकत्र येऊन या पाच एकर जागेवर सर्व धर्मांच्या एकतेचे प्रतीक असलेली एखादी हॉस्पिटलची मोठी वास्तू बांधावी

अरे जी के तुझे जी. के. खरंच कमी आहे काय रे? बाकी सगळं न्हवतं पण रेडियो तर होता ना. त्या द्वारे तरी संवाद साधता आला असता ना?

कुणी मनातून कुणी हातातून, धनातून पाठिंबा दिला त्या सगळ्यांनाच श्रेय देतो. बाकी मोदींनी त्यांच्या पद्धतीने खुर्चीत बसून संसदीय आणि न्यायालयाच्या मदतीने काम केलं हे नाकारता येत नाही. पूर्वी याच गोष्टी तरवारीच्या धारेवर केल्या गेल्या आहेत. पण आताचा काळ लोकशाहीचा. यावरून आठवलं. मध्य प्रदेशच्या झाशी, उज्जैन, इंदोरमध्ये फिरताना होळकर आणि शिंदे यांनी प्रांताला गतवैभव प्राप्त करून दिलं याची त्यांना मनोमन जाण आहे. अहिल्याबाईंनी तर सोमनाथ, काशिविश्वेश्वरासह कित्येक मंदिरे परत उभारली.

In reply to by कंजूस

नाशिकचे त्र्यंबकेश्वर जे मुसलमानांनी बटवले होते ते पेशव्यांनी परत बांधले. प्रेम मंदिर ज्याची मशीद झालेली होती ते पुन्हा ताब्यात मिळण्यामध्ये पेशव्यांचे सरदार फडके आणि सरदार नारोशंकर यांचे मोठे कर्तृत्व होते. तसेच उज्जैन चा महाकाल हादेखील मशिदीत परावर्तित झालेला होता जो शिंदे यांचे सरदार सुखटणकर यांनी हस्तगत केला आणि आणि मंदिराची मशिद करण्यासाठी जे बांधकाम होते ते काढून पूर्वीचे मंदिर मोकळे केले.

In reply to by कंजूस

गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या म्हणण्यानुसार अहिल्यादेवींनी केलेल्या या आणि अशा अनेक "धर्म' कार्यामुळेच यांना "देवि" ही उपाधी प्राप्त झाली

प्रस्तावनेची गरज नव्हती.. राम मंदिर निर्माणाला मनापासुन शुभेच्छा.. आजचा दिवस खासच ... वयक्तिक मत - लालकृष्ण अडवाणी यांना बोलवायला पाहिजे होते..

अभिनंदन राजीव गांधी , बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचेही अभिनंदन

In reply to by Gk

बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचेही ( जुन्या ) अभिनंदन मान्य , पण राजीव गांधींचे?

In reply to by चौकस२१२

शाहबानो प्रकरणात ठेच पोचल्यावर हिंदूंना सांभाळण्यासाठी राजीव गांधींनी शिलान्यासाला परवानगी दिली होती

In reply to by महासंग्राम

हे माहित नवहते... आणि असेल तसे ,, पण म्हणजे हा जुलमाचा रामराम होता ( नो पन इंटेंडेड !) एक वेळ नसती दिली परवानगी तरीचालले असते,, (न्यायालयीन प्रयतन चालूच राहिले असते ) ..राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणी जे देशातील महिलांचे नुकसान केल ते जास्त धोकादायक होतं

In reply to by चौकस२१२

राजीव गांधींनी वादग्रस्त इमारतीचे कुलूप काढले व हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली, शिलान्यासही केला होता https://youtu.be/tsOpzH38oN4 गेल्या आठवड्यात भाजपाचे सुब्रमण्यम स्वामीही हेच बोलले

In reply to by चौकस२१२

राजीव गांधींचे नक्कीच अभिनंदन करायला पाहिजे. कारण त्यांनी जन्माला घातलेल्या नररत्नाच्या कृपेनेच भाजप ला दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सतत मिळाली आहे. त्यांच्या इतका भाजपचा स्टार प्रचारक दुसरा नसेल. तेंव्हा त्यांचे आभार मानलेच पाहिजेत.

In reply to by सुबोध खरे

त्याचबरोबर त्या नररत्नाचे देखील आभार मानायला पाहिजेत.. कि त्याने अजुन एखाद्या नर रत्नाला जन्माला घातले नाहीये.. या भूमीवर उपकार अनंत उपकार केलेत. Thank you. BTW, ज्यांच्या रक्तातच गांधी आडनावाची हुजरेगिरी करायची सवय भिनलीये फक्त त्यांच्यासाठी एखादया वद्रा राजपुत्रालाच गांधी म्हणून प्रोजेक्ट करतील.. असे वाटते.

In reply to by बाप्पू

शहाचे पोर्गे क्रिकेट बोर्डात घातले आणि करोना येऊन क्रिकेट बंदच पडले पनवती शहा ह्याच्यापेक्षा नेहरू गांधी परवडले

गेलाबाजार पुरोगाम्यांचे सध्याचे दैवत श्री रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा, मेघनाद, इंद्रजित यांचे अभिनंदन त्यांना का सोडा उगाच त्यांना वाईट वाटायला नको.

बाबराचे पण आभार माना. त्याने तेथे मशीद बांधली नसती तर ती पाडण्याची वेळच आली नसती. आणि मशीद पाडली गेली नसती तर त्याजागी मंदीराचा शिलान्यास करायचीही वेळ आली नसती

इतिहासाच्या घटना ------------- पुन्हा मुळ लेख वाचला... वरती मी रिप्लाय दिला होताच आजचा दिवस खास, आणि त्यात प्रस्तावना देण्याची गरज नव्हती.. पुन्हा लेख वाचताना लक्षात आले, की मंदिर, श्री राम या पेक्षा ही मोदींनी करून दाखवले हे जास्त सांगण्यात आले.. मी त्यांचा जाहीर विरोधक आहे.. आपल्याला नाटकी माणसे आवडत नाहीत.. पण तीन तलाख, काश्मिर आणि राम मंदिर या मुद्द्यावर मला आताचे सरकार योग्य वाटते.. मात्र मूळ लेखात लिहिलेले, नोटबंदी, अर्थव्यवस्था ह्या एकदम फसलेल्या गोष्टी. अत्यंत चूकीच्या पद्धतीने हाताळल्या.. याखेरीज सामाजिक ऐक्य बिघडवण्यात हि या सरकारचा जास्त हात आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.. आणि सोशल वार यांचीच निर्मिती आहे.. याचा अर्थ असा नाही मी की आधीच्या काँग्रेस सरकारला माझा पुर्ण पाठींबा किंवा अंध भक्ती होती, त्यांच्या हि बऱ्याच भ्रष्ट गोष्टींना माझा कायम विरोध होता.. हे सांगण्याचे कारण की तेंव्हा विरोधात बोलले तरी कोणी मनावर घेत नव्हते, जे बरोबर ते बरोबर असे होते, आता चूक असो वा बरोबर मोदीच अंतिम सत्य आहेत, नाहीतर तुमच्यावर शाब्दिक हल्ले, देशविरोधी इतकेच काय तुम्ही हिंदू विरोधी असे हि बोलले जाते.. माझ्या वयक्तिक मताने.. बाबर हा बाहेरून आलेला मुस्लिम होता, आणि नंतर बांधलेल्या मशिदी ह्या बऱ्याचदा मंदिर तोडून बांधलेल्याच होत्या.. हे माझे वयक्तिक मत आहे, त्यामुळे एक हिंदू भावनिक किणार या मंदिर प्रकरणाला होती.. असो.. तरीही भाजपा सरकार मुळेच ह्या मंदिराच्या बाजूने निकाल लागला हि सत्य परिस्थिती आहे.. या हि पुढे जाऊन, राम मंदिर प्रेम की राजकारण ह्यात नक्कीच अंतर असेल असे माझे साधे मन म्हणत आहे.. बाकी लेख हा पुर्ण इतिहासात्मक किंवा राममंदिर किंवा रामावर आधारित हवा होता.. पण येथे हि पुन्हा मोदीच श्रेष्ठ हे ठसवण्यात आल्या सारखे लिहिलेले आहे.. असो प्रत्येकाचे मत वेगळे असते.. त्याचा आदर आहेच.. असो जास्त बोलत नाही... एक लिंक सापडली त्रिपाठी यांनी लिहिलेली ती पहिल्या लाईनीत दिली आहे. तोच इतिहास असा माझा दावा नाही, पण त्यात घटना व्यवस्थित दिल्या आहेत, काय काय झाले बाबर नंतर.. बघा वाचून आणि अभिप्राय सांगा.. काय खरे काय खोटे माहित नाहि..

आज दिवसभर मनाची एखादा सण असावा तशी उत्सवी अवस्था होती. (मी कट्टर मोदी समर्थक नाही आहे पण मोदींना पर्याय म्हणुन ओवेसी,रागा आणि उठा शपा ह्यांच्याकडे पाहायची हिंमत होत नाही.)

In reply to by कानडाऊ योगेशु

मोदी नव्हते तेंव्हा देश चालत नव्हता का ? मोदी नाहीत म्हणून जसोदाबेन उपाशी राहिली का ? ते स्वतःच बोलतात , मी झोला घेऊन जाईन तुम्ही आत्मनिर्भर व्हा मोदींशीवाय कोण आहे का ? असे विचारणारे मूर्ख आहेत , मोदी स्वतः बोलतात , आत्मनिर्भर व्हा , आणि हे मोदी मोदी करत नाचतात, मोदींचा वैचारिक पराभव त्यांचे भक्तच करतात

In reply to by Gk

इतके सैरभैर का होताय भौ! तुमचे बरोबर आहे. मोंदीचा पराभव त्यांचे भक्त करतात आणि मोंदीना मोठे त्यांचा पराकोटीचा द्वेष करणारे नमोरुग्ण करतात.

मी देखील आजच्या या सुवर्णक्षणाचा संबंध कोणत्याही राजकारणाशी लावू इच्छित नाही.पण ही खुप मोठी प्रक्रिया होती.आधी बाबरच आक्रमण, इंग्रजांची दुफळी, हिंदूंची घुसमट, वैज्ञानिक रीतीने सिद्ध होऊनही न्यायालयाची २ पिढ्यांची लढाई.आणि शेवटी रामलल्लाचा आज ५०० वर्षांपासूनचा वनवास संपणे. ज्यांच्यामुळे घडलं त्यांच कौतुक .

आज खरच सोनियाचा दिनु आहे. याच साठी केला होता अट्टहास... हिच अनेकांची भावना असेल आज. अवांतरः टेक्नीकली हा मंदीर-मशीद वाद न्यायालयाने सोडवला आहे. त्यामुळे कोण्या एका माणसाला/संघटनेला श्रेय देता येत नाहि. पण.. गोष्टी खरच इतक्या सरळ असतात का? तसं वाटत नाहि. संवेदनशील प्रकरणांत सरकार आणि न्याययंत्रणेत काहि ना काहि अंडरस्टँडींग नक्कीच असेल. पुरातत्व विभागाने आपले अहवाल नि:संदीग्धपणे मंदीराच्या बाजुने दिले. सरकार पातळीवर अभय नसतं तर त्यात फेरफार झाले नसते काय? सांगता येत नाहि. उदारणार्थ, लालुंनी स्थापन केलेल्या समितीने गोध्रा रेल्वे जळीतकांड एक अपघात होता म्हणुन निर्णय दिला होता. शेवटच्या चरणात न्यायीक प्रक्रीयेची रोज सुनावणी होणे, इतर कुठल्याच पक्षाला/पिटीशनला एका विशिष्ट तारखेनंतर त्या प्रकरणी ढवळाढवळ न करु देणे, सगळ्या संबंधीत पार्ट्यांना स्ट्रीमलाईन करायला आवष्यक तिथे नोकरशाहीचा वापर करणे... हे सर्व भाजपाची केंद्रात आणि राज्यात स्वबळावर सत्ता नसताना झालं असतं काय? शंकाच आहे. भाजपचे सरकार असुन देखील मोदि पं.प्र. नसते तर हे घडलच नसतं का? सांगता येत नाहि. शक्यतो इतर कुठल्याही भाजप पं.प्र. ने हे प्रकरण तडीस नेलच असतं... मोदिंच्या बाबतीत मात्र हि गॅरेण्टी अगदी १००% होती. कोरोना प्रकरण नसतं तर सिनियर भाजपेयी नेत्यांचा आणि इतर मान्यवरांचा सोहळा सहभाग असताच असता. निदान अडवाणी, जोशी मंडळी तरी नक्की आली असती. मोहन भागवतांनी तसाही अडवाणींचा उल्लेख केला आपल्या भाषणात. रामनामाचा आनंद भोगण्याचा दिवस आहे. उगाच खुसपटी काढुन आपल्याच आनंदात विरजण पाडुन घेऊ नये. _/\_ जय श्री राम _/\_

आज खरोखरीच आनंदाचा क्षण आहे. राम मंदिर व्हावे ही इच्छा बाळगणार्‍या सर्वांनाच आज आनंद झाला आहे. वर उल्लेख केलेल्या प्रमाणे काही व्यक्तींना राम मंदीर प्रकरणी मोदींचे योगदान कमी व नगण्य वाटते मात्र देशभर डाव्यांनी, महाराष्ट्राच्या जा.रा. इत्यादींनी पंतप्रधानांनी धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावू नये, धर्मनिरपेक्षता जपावी अशा जो लकडा लावला होता त्यास न जुमानता ह्या कार्यक्रमास हजेरी लावली तेच माझ्यामते सर्वश्रेष्ठ योगदान आहे. राम मंदिराची अजून एक लढाई साता समुद्रापार न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर देखील लढली गेली. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला.काही मुस्लिम संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता मात्र त्यांच्या विरोधास योग्य ती जागा दाखविली गेली. कलम ३७० हटविणे, राम मंदिर बांधणे हे आपल्या वचननाम्यातील दोन महत्वाचे वायदे पुर्ण केल्यामुळे माझे पुढील लोकसभेचे मत भाजपालाच. मग पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणी का असेना.

In reply to by माझा_डूआइडी

माझा_डूआइडी, राम सजीव आहे तर! प्रगती आहे एकंदरीत. आ.न., -गा.पै.

व्हॅटसप वर नवा राम मंदिर ईमोजी आला आहे व्हॅटसप इमोजी वर वर जिथे गाडी चा लोगो आहे त्या गटात आहे दर्शन घ्यावे राम

रामाचे वारस आले नव्हते का ? भारतातील श्रीमंत 10 स्त्रियांत आहे म्हणे ती कुणीतरी राणी. 15 ऑगस्ट 47 ला चांगले महाल , सोने नाणे , शेतजमीन , प्लॉट , हे सगळे खजिने राज वारसांना मिळाले आणि सामान्य लोकांना इतिहासाची प्रॉपर्टी मिळाली खंड ( पुस्तकांचे) खिंड खिंडार पडलेले बुरुज खंदक खंडहर खिद्रापूर वगैरे देऊळ खांब मोडके , लेण्यांमधले खापराचे तुकडे म्युझीयममध्ये

भारतातील श्रीमंत 10 स्त्रियांत आहे म्हणे ती कुणीतरी राणी. चंपाबाई याला काही पुरावा वगैरे?

In reply to by सुबोध खरे

https://trendcelebsnow.com/diya-kumari-net-worth/ दिया कुमारी याशिवाय अजून काही राज घराणी आहेत शिवाय , नंतर अयोध्येची फाळणी होऊन 5 तुकडे झाले , त्यातून नाग , निषाद वगैरे अजून वंश उत्पन्न झाले. नळराजा , नहूश , शुद्धोधन , गौतम बुद्ध हे सगळे रघुवंशीच

In reply to by Gk

त्यांनी दावाच केला आहे ना? त्यात काय मोठंसं? काही लोक आपण शिवाजी महाराजांचे पाईक असून शिवाजी महाराजांचे "जाणता राजा" हे बिरुद मिरवतात. काही मांजरं अंतर्गोल आरशात पाहून मिशा फेंदारून वाघ असल्याचा दावा करतातच ना मग तुम्ही करा कि दावा कि मी औरंजेबाचा वंशज आहे. हा का ना का

gk आणि mrcoolguynice तुमची जळजळ होतेय हे स्पष्ट दिसतेय म्हणून तुम्ही तर्कहीन आणि वयक्तिक प्रतिसादांचा रतीब घालताय इथे. हजारो मंदिरे पाडून तिथे मुद्दामहून मस्जिदी उभी करायची, इतर धर्मियांचे खचीकरण आणि अपमान करून स्वतः ला श्रेष्ठ समजणाऱ्या संस्कृती चे पाईक तुम्ही.. तुमच्याकडून तर्कशुद्ध प्रतिसादाची अपेक्षा फोल आहे. असो. मोदी स्वतः कुठेही येऊन फक्त मी आणि माझ्या मुळेच राममंदिर झाले असे म्हणाले नाहीयेत. त्यामागे लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारीं वाजपेयी आणि असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे मोदींनी कालच्या भाषणात मान्यच केलेय. आणि ते जगजाहीर आहे. सध्या मोदी पंतप्रधान आहेत त्यामुळे ते समारंभास उपस्थित राहिले पण म्हणून ते पूर्ण श्रेय घेतायेत... किंवा त्यांच्या हातात हे फळ आयते पडले वगैरे वगैरे असे बिनबुडाचा आरोप तुम्ही त्यांच्यावर इंडिरेक्टली करता आहात. यातून तुमचा फक्त मोदीद्वेष आणि दिसून येतो असे श्रेय घेण्याचे काम ( करून दाखवले वगैरे ) चिवसेनेत चालते, तिथे त्यासाठी खास माणसे ठेवली जातात आणि वर्तमानपत्र सुद्धा चालवले जाते. पण आता एका सो कॉल्ड धरनिरपेक्ष पक्ष्याच्या आधारामुळे आणि काकांच्या धाकामुळे आपला उत्साह त्यांना दाबून ठेवण्याखेरीज पर्याय नाहीये.

In reply to by बाप्पू

आयते फळ मिळाले , हे मी बोललो नाही मी अभिनंदन बोललो आहे , नवीन व्हॅटप वर चित्र आहे , ते दिले आणि हा आता ऐतिहासिक खजिना व रामाच्या वंशाच्यावर प्रतिसाद लिहिला आहे बाकी मोदी आयते वगैरे मी लिहिलेले नाही

In reply to by Gk

आयते मिळाले वगैरे मोदीच राहुल गांधीबद्दल बोलतात, पण तसे काही नसते , काही ना काही प्रत्येकाला आधीपासून मिळालेले असतेच , मोदींचे वडील पंतप्रधान नव्हते , पण म्हणून काही मोदींनी सुरुवात आदिमानवाच्या गुहेतून लाकूड घासून नव्हती केली. मागचे घ्यावे , पुढंचयानाही द्यावे , अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे , त्यामुळे कुणाला काही मिळत असेल तर आम्ही पोट दुखावून घेत नाही, राफेल आल्यावरही पूर्वीच्या 3000 शस्त्रात 5 नवीन आले , असाच आनंद आम्ही मानतो. मनुष्याला संचित , क्रियमाण व प्रारब्ध अशी 3 फळे भोगावी लागतात, कुणी काही आयते वगैरे म्हणत असेल तर ते प्रारब्धाचे फळ असते.

In reply to by Gk

काँग्रेसी संस्कृती संस्कृतचा द्वेष करणारे आपली

संस्कृती

आहे म्हणून बोलतात याचा अर्थच असा आहे कि तुम्ही किती वल्गना केल्या तरी संस्कृत/ संस्कृती तुमच्या आत्म्यातून जात नाही. जसे भारताच्या आत्म्यातून "राम" जाणारच नाही. मग बाकी शब्द छल कितीही करा.

In reply to by सुबोध खरे

मागचे घ्यावे , पुढंचयानाही द्यावे , अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे अशी नाही तर मागच्यानी खावे आणि पुढंचयानी ही खावे , एकमेका लांच देऊ अवघे होऊ श्रीमंत अशी आमची काँग्रेसी संस्कृती आहे

In reply to by बाप्पू

वयक्तिक प्रतिसादांचा रतीब घालताय इथे अगदी बरोबर खास करून स्वतःला "कुल" म्हणवणारी घाणेरड्या मनोवृत्तीचे दर्शन, घडवणारी व्यक्ती... मग सतत कमोड काय , अर्धनग्न काय आणि "फ... अप" काय मुद्दा नसला कि हे

शिवसेना आम्हीच पाडली असेच सांगताहेत ना ? मग बिघडले कुठे ? अडवाणींनी कोर्टात तो मी नव्हेच असे सांगितले म्हणे

In reply to by Gk

शिवसेना आम्हीच पाडली असेच सांगताहेत ना ?........... नाही. शिवसैनिकांनी पाडली असेल तर अभिमान आहे असे शिवसेना सांगत होती. अत्ता शिवसेना काहीच सांगत नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

असू दे अडवाणी तर तो मी नव्हेच असेच म्हणणार , शेंगदाणे मोदी शहाने नेले, फोलपटे कुठे उचलत बसणार ? म्हणून मी शेंगदाणे खाल्ले नाहीत , ते बिचारे असेच बोलणार

In reply to by Gk

मोगा खान जहाँ राम का जन्म हुआ था मंदिर वही बनायेंगे असे सोमनाथ ते काशी आणि अयोध्या म्हणत कोण रथ चालवत होते? बाकी जळजळ होते आहे तर अडवाणी मुरली मनोहर जोशी याना बोलावले नाही म्हणून मनाचे समाधान करून घ्यायचे असेल तर घ्या पण मंदिर वही बन रहा है हि वस्तुस्थिती मात्र स्वीकारावीच लागेल

In reply to by सुबोध खरे

जखमेवर मीठ चोळणे कशाला म्हणता येईल? कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत अजून किती अच्छे दिन हवे आहेत? असदुद्दीन ओवैसी ने रामरक्षा म्हणायला हवे आहे का?

बाबरी मशीद पाडल्यानंतर बिजेपी नेते सुंदर सिंग भंडारी यांच्या तोंडचं वाक्य - "बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली". त्यावेळेला किती शिवसैनिक घुमटावर चढले, कितींनी हातोडा मारला याचा पुरावा शोध्णं कठिण आहे. पण तुम्हि तुमच्याच नेत्यांचं भाष्य मान्य कराल कि नाहि? अडवाणींनी सुद्धा त्यावेळेला हात वर केले. म्हणजे जेंव्हा गरज असते, हिंदु खतरेमे असतो तेंव्हा तुम्हि दारं खिडक्या लावुन घरी बसणार. थोडक्यात तुमचा "तो मी नव्हेच" मधला लखोबा लोखंडे होणार. आणि सगळं आलबेल झाल्यावर, ऐटित क्रेडिट घ्यायला सगळ्यात पुढे. काय, बरोबर ना...

In reply to by Gk

शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामे लिहिले होते.. आणि अफजलखानाला देखील आपण घाबरलोय असे सांगितले होते. पण दोन्ही वेळेला नंतर काय झाले हा इतिहास आहे.... तसेच बाबरी मशिदी च्या बाबतीत कित्येक नेत्यांनी जे घडले कदाचित उघडपणे मान्य केलेही नसेल पण ते महत्वाचे नसून आज काय झाले ते इतिहासाच्या पानात नक्की च लिहिले जाईल. स्थळ वेळ काळ परिस्थिती पाहून राजकारण करावे लागते मोगा भाऊ.. बाकी तुमच्यात आणि तुमच्या आका (पप्पू, खुजलीवाल, ओवेसी वगैरे) यांच्यात खरं बोलायची एवढीच खुमखुमी असेल तर मुगलांनी आणि इतर इस्लामी आक्रमकानीं हजारो मंदिरे आणि प्रार्थना स्थळे ( त्यात अयोध्या पण आले ) पाडून जबरदस्ती मशिदी उभ्या केल्यात हे उघडपणे बोलून दाखवा.. ! मग पुढे बोलू..

मंदिराच्या बाबतीत हिंदूंनी जास्तच सहिष्णुता दाखवली म्हणायला पाहिजे. राम कृष्ण हे सर्व इथले पूजनीय आहेत आणि त्यांचे मंदिर जन्मभूमीवर बनणार नाही तर काय पाकिस्तानात आणि अरबस्तानात बनणार? तरीही हिंदूंनी सहिष्णुतेच्या मार्गाने अगदी न्यायालयीन लढाई ३० वर्षे लढवून आणि अनेक विघ्ने पार पाडून मंदिर बनवायला घेतले आहे. जगातल्या इतर कोणत्याही धर्माच्या लोकांनी इतका संयमितपणा दाखवला असता हि शक्यता खूपच कमी आहे. एक साधा प्रश्न - जर मोहम्मद पैगंबरांच्या जन्मभूमीवरील प्रार्थनास्थळ दुसऱ्या धर्माच्या लोकांनी आक्रमणात पाडले असते तर सद्यपरिस्थितीत तेथील मुस्लिम लोकांनी त्यांचे प्रार्थस्थळ उभे करायला न्यायालयीन मार्ग अवलंबून धीराने आणि नेटाने ३० वर्षे लढाई लढली असती का? ५०० वर्षापूर्वीचे चर्च म्युझियम एका झटक्यात मशिदीत रूपांतरित करण्याच्या आणि इतर घडणाऱ्या जसे की इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करणे, खोदकामात इतर धर्माच्या निगडित काही गोष्टी सापडल्या जसे की मूर्ती तर त्या नष्ट करणे असे प्रकार पाहता वरील शक्यता ना च्या आसपास आहे. रिझवान अहमद यांनी काही मुद्दे खरेच खूप छान मांडले आहेत या विडिओ मध्ये. अश्या विचारांची समाजाला जास्त आवश्यकता आहे. https://www.youtube.com/watch?v=gyryX0Owq9U

https://youtu.be/zxySITIhz40 अयोध्या करती है आव्हान गीत रवींद्र जैन ..... अयोध्या करती है आव्हान, ठाट से कर मंदिर निर्माण, शीला की जगह लगा दे प्राण, बिठा दे वहां राम भगवान । सजग हो रघुवर की संतान, ठाट से कर मंदिर निर्माण । हिन्दू है तो हिन्दुओ की आन मत जाने दे, राम लला पे कोई आंच मत आने दे, कायर विरोधियो को शोर मचाने दे, जय श्री राम, कायर विरोधियो को शोर मचाने दे, लक्ष्य पे रख तू ध्यान । अयोध्या करती है आव्हान, ठाट से कर मंदिर निर्माण ॥ मंदिर बनाने का पुराना अनुंबध है, सब तेरे साथ पूरा पूरा प्रबंध है, कार सेवको के बलिदान की सौगंध है, जय श्री राम, कार सेवको के बलिदान की सौगंध है, बढ़ चल वीर जवान । अयोध्या करती हैं आव्हान, ठाट से कर मंदिर निर्माण ॥ इत शिवसेना उत बजरंग दल है, दुर्गावाहिनी में शक्ति प्रबल है, प्रण विश्वहिंदू परिषद का अटल है, जय श्री राम, प्रण विश्वहिंदू परिषद का अटल है, जो हिमगिरि की चट्टान । अयोध्या करती है आव्हान ठाट से कर मंदिर निर्माण । जिस दिन राम का भवन बन जाएगा, उस दिन भारत में राम राज आएगा, राम भक्तो का ह्रदय मुस्काएगा, जय श्री राम, राम भक्तो का ह्रदय मुस्काएगा, खिलते कमल समान । अयोध्या करती है आव्हान ठाट से कर मंदिर निर्माण । सजग हो रघुवर की संतान ठाट से कर मंदिर निर्माण । ॥ जय श्री राम ॥

In reply to by Gk

रवींद्र जैन आंधळे होते तरी त्यांना शिवसेना दिसली. महाराष्ट्राची सत्ता गेल्यापासून भाजप्याना डोळे असूनही शिवसेना दिसायची बंद झाले आहे.

In reply to by Gk

G. K उर्फ मोगा भाऊ.. बाकी सगळं ठीक आहे.. पण तुम्ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवता आहात हे वाचून डोळे पाणावले.. अच्छे दिन ते हेच का??

In reply to by बाप्पू

भाजपावालेही मागची 35 वर्षे बाळासाहेबांच्या नावे साक्षात करवा चौथ करत होते म्हणे आणि 35 वर्षांनी भाजपा रिया चक्रवर्ती झाली पण सेना म्हणजे सुxxxx नव्हे , 1 दिली हाकलून आणि 2 आणले

In reply to by Gk

मोगा खान शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवत आहेत अजून किती अच्छे दिन हवे आहेत?

कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत मोगा खान शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने किल्ला लढवत आहेत अजून किती अच्छे दिन हवे आहेत? असदुद्दीन ओवैसी ने रामरक्षा म्हणायला हवे आहे का?

In reply to by सुबोध खरे

कमल नाथ यांनी हनुमान चालिसा म्हटला प्रियांका वाद्रा आणि राहुल गांधी जय श्रीराम म्हणत आहेत
त्यात चुक का आहे? राजकार्नात सगळं चालू शकते.

In reply to by माझा_डूआइडी

चूक कोण म्हणतंय? पण ज्यांनी राम हा काल्पनिक आहे असे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्रात म्हटलंय. त्यांनीच त्याचे स्तोत्र म्हणावे यापेक्षा नैतिक पराभव कोणता असावा ?

मोगा खान, अब बस भी करो, सिर्फ बर्नॉल लगाओ, जलेपे बस वोही काम आता है !!

https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudule… In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques. It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे