✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता

श्रीगणेश लेखमाला २०२०- आवाहन

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 07/18/2020 - 21:39  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! आषाढ संपत आलाय, आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे सणांचा महिना, श्रावण म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल... सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रसिद्ध करतो. या वेळची थीम असेल - आठवणी. नॉस्टॅल्जिया! आठवणीत रमायला कोणाला आवडत नाही! शाळा सिनेमा बघताना आपण आपल्या शाळकरी वयात नकळत जातो. प्रचेतस यांचा माझं नाशिक लेख वाचताना आपल्याला आपल्या आजोळच्या भेटी आठवतात. तर तुमच्या सुखद, रम्य आठवणी, शाळेच्या, कॉलेजच्या, गावाकडच्या आठवणी, मिपाकरांशी शेअर करा, आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुयात नोस्टॅल्जियामध्ये डुंबून! अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा. आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- १७ ऑगस्ट २०२०! टीप : थीमव्यतिरिक्त अन्य दर्जेदार/उल्लेखनीय लेखसुद्धा घेता येतील. कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा. गणेशोत्सव
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10790 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

स्वागत...

तुषार काळभोर
Sat, 07/18/2020 - 21:43 नवीन
उत्सुकता.. गणरायाच्या आगमनाची आणि लेखमालेची..
  • Log in or register to post comments

मस्त

गुल्लू दादा
Sat, 07/18/2020 - 23:34 नवीन
सहभाग घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. उपक्रमास शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

नमस्कार गुल्लू दादा,

साहित्य संपादक
Wed, 07/22/2020 - 17:05 नवीन
तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहे. जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

छान..

गणेशा
Sun, 07/19/2020 - 10:55 नवीन
छान.. शब्द झाले मोती -2 मधील लिखान असेच झालंय.. त्यातलेच दिले तर चालेल.. कि नविन पाहिजे?
  • Log in or register to post comments

Np..

गणेशा
Sun, 07/19/2020 - 12:14 नवीन
Np.. तेथे बंधनामुळे न टाकता आलेले लिखान, नावे बदलून येथे देतो.. उगाच का पुसाव्यात आठवणी..? तसे हि नावात काय आहे कोणी तरी म्हंटलेले आहेच :-)) :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तसे हि नावात काय आहे कोणी तरी म्हंटलेले आहेच :-)) :-))

तुषार काळभोर
Sun, 07/19/2020 - 13:43 नवीन
बहुतेक शेक्सपिअर ने म्हटलं असेल. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

त्याच्या तरी नावात काय आहे

विजुभाऊ
Mon, 07/20/2020 - 11:04 नवीन
त्याच्या तरी नावात काय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

शब्द झाले मोती -2 मधील लिखान

तुषार काळभोर
Sun, 07/19/2020 - 13:46 नवीन
अगदी अगदी.. तशाच जुन्या, सुखद, दरवळणाऱ्या आठवणी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अरे भो...फोटो दिसत नै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/19/2020 - 13:51 नवीन
साहित्य संपादकसेठ, पहिला फोटो दिसत नै. पहिला फोटो दिसत नसल्यामुळे पुढे काय लिहिले आहे ते वाचले नाही. मजकूर वाचायला पुन्हा येईन...धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे (शुभेच्छुक, मिपामित्र मंडळ. औरंगाबाद)
  • Log in or register to post comments

आभार....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/19/2020 - 15:32 नवीन
योग्य दुरुस्तीबद्दल आभार....! आले का गणपतीबाप्पा. देवा, लेख लिहितो. तितकं करोनाचं बंदोबस्त करु. लेखमालेला शुभेच्छा. सहभागी असेनच. लेख नाय झाला तरी लेखकांच्या धाग्याला प्रतिसाद नक्की लिहित राहीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर,

साहित्य संपादक
Wed, 07/22/2020 - 17:06 नवीन
तुमच्या अनुभवसिद्ध लेखाची प्रतिक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा!! जमलं तर नक्की

मन्या ऽ
Sun, 07/19/2020 - 20:35 नवीन
शुभेच्छा!! जमलं तर नक्की लिहीन.. :-)
  • Log in or register to post comments

मन्या ऽ

साहित्य संपादक
Wed, 07/22/2020 - 17:08 नवीन
नक्की जमवा. लेखाची प्रतिक्षा करत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ

व्वा...!

प्रचेतस
Mon, 07/20/2020 - 09:25 नवीन
व्वा...! उत्तमोत्तम लेखांची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

लेख माला

कपिलमुनी
गुरुवार, 07/23/2020 - 06:04 नवीन
अशे उपक्रम आले की चिमण्या उर्फ जॅक स्पॅरो आठवतो. कुठे बिझी झालाय ? सध्या मिपावर दिसत नाही
  • Log in or register to post comments

वाह !

अनिंद्य
गुरुवार, 07/23/2020 - 19:37 नवीन
वाह ! आयोजकांनी विषय फारच छान निवडला आहे - आठवणी, नॉस्टॅल्जिया ! कोविड -करोनामुक्त विषयसूची बघायला आणि गलेमा वाचायला उत्सुक आहे :-) खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, अनिंद्य

साहित्य संपादक
Sun, 07/26/2020 - 13:21 नवीन
तुमचादेखील लेख वाचण्यासाठी उत्सुक आहोत. जरूर सहभागी व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

अवश्य पाठवीन लेख.

अनिंद्य
Sun, 07/26/2020 - 19:04 नवीन
अवश्य पाठवीन लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहित्य संपादक

लेखासाठी शब्दमर्यादा असल्यास

अनिंद्य
Sun, 07/26/2020 - 19:06 नवीन
लेखासाठी शब्दमर्यादा असल्यास कळवा प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहित्य संपादक

शब्दमर्यादा

साहित्य संपादक
Mon, 07/27/2020 - 06:46 नवीन
नमस्कार, लेखमालेसाठी शब्दमर्यादा नाही. ( अर्थात एकोळी- दोनोळी - चारोळी लेख अपेक्षित नाही :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

मिपा मंडळ ,

बिपीन सुरेश सांगळे
Sun, 07/26/2020 - 13:00 नवीन
मिपा मंडळ , मस्त . उपक्रमास शुभेच्छा ! लिहिण्याचा प्रयत्न करतो . बिपीन
  • Log in or register to post comments

बिपीन सुरेश सांगळे, आभार!!

साहित्य संपादक
Sun, 07/26/2020 - 13:22 नवीन
तुमच्या लेखाची प्रतीक्षा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपीन सुरेश सांगळे

तीन दिवस...

साहित्य संपादक
Fri, 08/14/2020 - 22:39 नवीन
लेखन स्वीकृती साठी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा