नमस्कार मंडळी!
आषाढ संपत आलाय, आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे सणांचा महिना, श्रावण म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल...
सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रसिद्ध करतो.
या वेळची थीम असेल - आठवणी. नॉस्टॅल्जिया!
आठवणीत रमायला कोणाला आवडत नाही!
शाळा सिनेमा बघताना आपण आपल्या शाळकरी वयात नकळत जातो. प्रचेतस यांचा माझं नाशिक लेख वाचताना आपल्याला आपल्या आजोळच्या भेटी आठवतात.
तर तुमच्या सुखद, रम्य आठवणी, शाळेच्या, कॉलेजच्या, गावाकडच्या आठवणी, मिपाकरांशी शेअर करा, आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुयात नोस्टॅल्जियामध्ये डुंबून!
अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा.
आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- १७ ऑगस्ट २०२०!
टीप : थीमव्यतिरिक्त अन्य दर्जेदार/उल्लेखनीय लेखसुद्धा घेता येतील. कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा.

वाचने
10840
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वागत...
मस्त
नमस्कार गुल्लू दादा,
In reply to मस्त by गुल्लू दादा
छान..
Np..
In reply to छान.. by गणेशा
तसे हि नावात काय आहे कोणी तरी म्हंटलेले आहेच :-)) :-))
In reply to Np.. by गणेशा
त्याच्या तरी नावात काय आहे
In reply to तसे हि नावात काय आहे कोणी तरी म्हंटलेले आहेच :-)) :-)) by तुषार काळभोर
शब्द झाले मोती -2 मधील लिखान
In reply to छान.. by गणेशा
अरे भो...फोटो दिसत नै.
आभार....!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर,
In reply to आभार....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभेच्छा!! जमलं तर नक्की
मन्या ऽ
In reply to शुभेच्छा!! जमलं तर नक्की by मन्या ऽ
व्वा...!
लेख माला
वाह !
धन्यवाद, अनिंद्य
In reply to वाह ! by अनिंद्य
अवश्य पाठवीन लेख.
In reply to धन्यवाद, अनिंद्य by साहित्य संपादक
लेखासाठी शब्दमर्यादा असल्यास
In reply to धन्यवाद, अनिंद्य by साहित्य संपादक
शब्दमर्यादा
In reply to लेखासाठी शब्दमर्यादा असल्यास by अनिंद्य
मिपा मंडळ ,
बिपीन सुरेश सांगळे, आभार!!
In reply to मिपा मंडळ , by बिपीन सुरेश सांगळे
तीन दिवस...