तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी
डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी
चोरपावलाने हळूच तू येऊन जा
पाखरांचे उदास सूर घेऊन जा
जाग्या झाल्या भोवती रानसावल्या
आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या
जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली
क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली
पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले
प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2275
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
पापण्यांच्या पंखात अश्रूंचे
धन्यवाद
In reply to पापण्यांच्या पंखात अश्रूंचे by गणेशा
"तुझी खाट" असे विडंबन