अत्रुप्त आत्मांच्या भाजी घ्या भाजीवर भाज्यांच्या सॅनिटायझेशन बद्दल प्रश्न विचारला गेला, सध्या सार्वत्रिक असलेला मीठ अथवा खाण्याच्या सोड्याने भाजी धुवावी असा एक सल्ला आला आणि बिरुटे सरांनी त्याबद्दल सुयोग्य साशंकता व्यक्त केली.
माझ्या लहानपणी शाळेत भारीचा बहुधा इलेक्ट्रॉन का काय मायक्रोस्कोप आणि सुसज्ज प्रयोगशाळा होती त्यात गुरुजींनी मायक्रो ऑर्गॅनिझमचे दर्शन उत्साहाने घडवले होते. सोबत 'माशी' हा प्रकार किती भयंकर - म्हणजे माणसे ते कुत्र्यामांजरीच्या शीशू वर बसून पुन्हा अन्नपदार्थांवर बसून कशा पद्धतीने जिवाणू विषाणू पसरवतो हे समजावून सांगितले तेव्हापासून मला स्वतःला कमालीचा माशीफोबीआ आहे! आपल्या देशात लहान गावात सांडपाण्याच्या नाल्यांच्या काठी आणि मोठ्या शहरात गटारांच्या भोका भोकांच्या किंवा लोखंडी सळईच्या झाकण लावलेल्या परिसरात भाजीपाल्याची (आणि इतर अन्नपदार्श मिठाई इत्यादी) सर्रास विक्री आणि खरेदी चालू असते. आणि सहाजिक माश्यांचाही मोठा वावर व्यवस्थितपणे दुर्लक्ष करून व्यापार चालू असतो (अगदी शिक्षीत गावे आणि शिक्षीत माणसे यांचाही यात सहभाग असतो). तसे (भारतता सहसा पाळला न जाणारा) कायदा सांडपाण्याच्या जागे पासून १०० मीटरच्या आत अन्नपदार्थ घटकांच्या विक्रीस अनुमती देत नाही. (सहसा मिठाई दुकानदारांना या कायद्याची माहिती (पालन नको) असते)
पण माशिफोबीआमुळे मी भाजी खरेदीच्या वेळी कमालीचा संवेदनशील आणि सतर्क रहात आलो आहे. म्हणजे ज्या भाज्यांची साल काढली जाते ती तशी कुठेही घेतो पण साल काढली जात नाही त्या भाज्या सहसा सुपर स्टोअर मधून घेणे पसंत करतो किंवा अगदीच गरज पडली तर किमान उघडा ओला कचरा पेटी आसपास नाही गटार झाकण आसपास नाही आणि माश्या खूप नाहीत एवढे आग्रहाने पाळतोच. पण त्या शिवाय भाजीचा वरचा थर सरकवून खालची भाजी घेतो.
आता कोविड-१९ कोरोना वीषाणूंनी निर्जंतुकीकरणाचा प्रश्न अधिक गंभीर बनवला आहे. मीठ आणि खाण्याच्या सोड्यात भाज्या भिजवून घेण्यासाठी बरेचजण सांगतात पण त्याने फारतर काही जिवाणूंची वाढ रोखली जात असावी. बिरुटेसर म्हणतात तसे वीषाणूंना मीठ आणि खाण्याच्या सोड्याने आणि थंडपाण्याने फरक पडण्याचा संभव कमी असावा. कोविडसाथ पसरली तेव्हा पासून मी घेत असलेली अधिकची काळजी
१) भाजी खरेदीच्या ठिकाणी शारीरीक अंतर पाळतोच - मी घेताना मागून कुणी घुसखोरी केली तर मी ज्या वेगाने बाजूस होतो त्याचे कुणि व्हिडीयो काढला तर विनोदी दिसू शकतो पण मी ते पाळतो.
२) भाजी वाल्यांना मास्क घालण्याची सवय अगदी आग्रहाने लावली शिवाय नोटा घेतल्या नंतर हँड सॅनिटायझरने सॅनिटाईज करण्याचीही सवय लावली. कमावलेले पैसे एका आजारपणात जातील हे सांगितले की पाळतात बिचारे. वरुन माझ्याही हातावर आठवणीने हँड सेनिटायझरचे चार थेबही प्रेमाने टाकतात.
३) माझ्या मित्रांनी सुचवल्यापासून भाजी निवडण्याच्या बास्केटला धरण्यासाठी अर्धा बास्केट मध्ये एक आणि वजनाच्या मशिन मध्ये एक असे स्वतःचे अडीच पेपर नॅपकिन खर्ची घालतो.
४) साल काढून खातो अशा भाज्या फळे चक्क साबणाच्या पाण्याने धुतो आणि साल नसलेल्या भाज्या फळे कढत गरम पाण्यानेच धुतो. कारण मीठ आणि खाण्याच्या सोड्यात धुण्याने मनाचे समाधान होते वीषाणूंना केवळ साबण आणि गरम पाणीच मारू शकते.
तरी कांदा लसूण अश्या काही भाज्या सुटतातच तर त्यांची पिशवी वेगळी ठेवली आहे ते चिरण्याच्या आधी गरमपाण्याने धुतो.
एक प्रश्न असा असू शकतो की नंतर अन्न शिजवल्यावर गरम होतेच मग आधी गरमपाण्याने धुण्यात काय हशील ? मी सध्या अधिकतम पदार्थ गरम करून खातो पण तरीही वरून पसरलेली कांदा कोथिंबीर इत्यादी सुटतातच त्यांना इतर भाज्यां अथवा पदार्थांवरचा हात केव्हा लागेल हे एकतर सांगता येत नाही दुसरे रेफ्रीजरेटर ही जिवाणू वीषाणू पसरवली जाणारी आणि कमीतकमी वेळा निर्जंतुक केली जाणारी जागा आहे की ज्यातले काही पदार्थ तुम्ही नंतर गरम करता तर काही पदार्थ थंडच खाता पिता त्यात भाज्या निर्जंतूक न करता भरणे मला तरी श्रेयस्कर वाटत नाही.
शेवटी कुणि म्हणेल एवढी काळजी का घ्यायची ? मरणाला का घाबरावे या प्रश्नाला मला बाळासाहेब ठाकर्यांचे वाक्य आठवते मरायची हौस आली की सिमेवर जावे आणि शत्रुला मारून मग मरावे. जाणीवपूर्वक संसर्गजन्या आजाराबाबत निष्काळजीपणा करणे म्हणजे स्वतः सिगरेट फुंकताना आसपासच्या न फुंकणार्यांच्या फुप्फुसातसुद्धा सिगरेटचा धुर अप्रत्यक्ष पणे लोटण्यासारखे आहे. माझ्या वर्तनाने इतरांना आजार पोहोचावा इतर कुणालातरी दवाखान्याचा भुर्दंड पडावा किंवा इतर कुणाच्या आयुष्याचा दोर तुटावा असे माझ्या स्वतःच्या गलथानपणामुळे घडणे माझ्या स्वतःच्या मनाला पटत नाही.
* अनुषंगिका पलिकडची अथवा शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
* उत्तरदायीत्वास नकार लागू
वाचने
26359
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग्य...
अगदी मर्म सांगितलेत कि ..
In reply to योग्य... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक फार प्राचीन काळातले वाक्य
अस्वच्छ असूनसुद्धा
:)
In reply to अस्वच्छ असूनसुद्धा by Rajesh188
अशी स्थिती
यासाठीच तर सर्व जग लस निर्माण व्हायची वाट पाहत आहे.
मी तर यावर्षी एकही पालेभाजी
मी uvलाईट वापरते. भाज्या, फळे
भाज्या किंवा फळातून करोना च
बारागावचे हात कुणास ठाऊक
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
सुबोध खरे - धन्यवाद.
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
अगदी असेच ..
In reply to सुबोध खरे - धन्यवाद. by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद.
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
मी पाण्यात पालेभाज्या आणल्या
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
याच प्रतिसादाची वाट पाहत होतो :)
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
सोडियम dichloroisocyanurate
यास मिपाकर जाणकारांचा
In reply to सोडियम dichloroisocyanurate by Rajesh188
20 की 10 लिटर पाण्यात 1 गोळी टाकायची
In reply to सोडियम dichloroisocyanurate by Rajesh188
SODIUM dichloroisocyanurate
+++111
In reply to SODIUM dichloroisocyanurate by सुबोध खरे
मनोभयाच्या फायद्याचे पोटॅशियल ग्राहक....
In reply to +++111 by अत्रुप्त आत्मा
अगदी खरं आहे तुमचं म्हणणं.
In reply to मनोभयाच्या फायद्याचे पोटॅशियल ग्राहक.... by चौकटराजा
क रोना येण्या अगोदर काय अवस्था होतो
तंदुरी मांस कच्चे असते?
In reply to क रोना येण्या अगोदर काय अवस्था होतो by Rajesh188
दुर्लक्ष करा
In reply to तंदुरी मांस कच्चे असते? by आनन्दा
न शिजवलेले मांस
In reply to दुर्लक्ष करा by तुषार काळभोर
अर्धवट पूर्ण न शिजलेले असा अर्थ घ्या
हॅहॅहॅ
In reply to अर्धवट पूर्ण न शिजलेले असा अर्थ घ्या by Rajesh188
@त्याला कोळसा हा शब्दप्रयोग
In reply to हॅहॅहॅ by अभ्या..
कच्चं खाणं टाळतोय...
कच्च्या भाज्या खाल्याने करोना
अशी जोखीम का घ्यावी ?
In reply to कच्च्या भाज्या खाल्याने करोना by सुबोध खरे
जोखीम कुठे नाही ,,,,,, ?
In reply to अशी जोखीम का घ्यावी ? by माहितगार
ज्यांचे काम तळहातावर जीव घेऊन
In reply to जोखीम कुठे नाही ,,,,,, ? by चौकटराजा
आत्ताची अधिकृत आकडेवारी जशी
In reply to ज्यांचे काम तळहातावर जीव घेऊन by माहितगार
आता पर्यंत १ कोटी टेस्ट
In reply to आत्ताची अधिकृत आकडेवारी जशी by माहितगार
अगदी बरोबर ..
In reply to आत्ताची अधिकृत आकडेवारी जशी by माहितगार
या बाबतीत २-३ प्रश्न आहेत
In reply to ज्यांचे काम तळहातावर जीव घेऊन by माहितगार
अजून एक..
In reply to या बाबतीत २-३ प्रश्न आहेत by आनन्दा
आनन्दांना उत्तर १
In reply to अजून एक.. by आनन्दा
आनन्दांना उत्तर २
In reply to या बाबतीत २-३ प्रश्न आहेत by आनन्दा
मी कोणतेही निष्कर्ष काढता
In reply to आनन्दांना उत्तर २ by माहितगार
किती आले आणि किती गेले याची मोजदाद होणे संभव नाही.
In reply to मी कोणतेही निष्कर्ष काढता by आनन्दा
सामूहिक रोग प्रतिकार शक्ती
शक्य असेल तेवढी काळजी घेणे
बोध ..
असंख्य दावे
मन्त्र .....
In reply to असंख्य दावे by Rajesh188