भाज्यांचे निर्जंतुकीकरण आम्ही कसे करतो
In reply to योग्य... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अस्वच्छ असूनसुद्धा by Rajesh188
...भाजी मधून प्रसार झाल्याचे एक तरी ठोस उदाहरण आहे का....असाच प्रश्न वीषाणूबाधीत जंगली प्राण्यांच्या सहवासात राहील्याने वीषाणूचा प्रसार झाल्याचे एक तरी ठोस पुरावा द्या असे चिनीही विचारू शकतात. आपण म्हणता तसा पुरावा उदाहरण देण्यासाठी कोविड-१९ ने बाधीत व्यक्तीला भाजीवर शिंकुन ती भाजी गरम न करता खाऊन मग अशा काही व्यक्तीची टेस्ट करून द्यावा लागेल आणि तसे करण्याची किंवा अगदी तसा सल्ला देण्याची अनुमती कायदा देत नाही. चुभूदेघे पण मला वाटते हे सामान्य ज्ञान आहे. आता पर्यंत जी वैज्ञानिक दृष्टीकोणातून वाचलेली खात्रीशीर माहिती आणि लॉजीक आहे त्यानुसार जंतूनाशक आणि तीव्र उष्णते शिवाय इतर कोणत्याही पृष्ठभागावर वीषाणू (स्वतःचा गुणाकार करू शकत नाहीत) पण किमान बर्यापैकी काळ स्वतःचे अस्तीत्व टिकवून ठेवतात. आणि अशा वीषाणूबाधीत पृष्ठभागास स्पर्श होऊन (कोवीड) वीषाणू तोंड नाक डोळे या वाटे प्रवेश केल्यावर आजार होणार नाही याची खात्री वैज्ञानिकांनी दिल्या शिवाय वीषाची परिक्षा का घ्यावी. अधिकची काळजी घेणे सहज शक्य व श्रेयस्कर असता नसती जोखीम घेऊन शरीरावर आजाराची शक्यता का ओढवून घ्यावी?
रोज विषाणू,जिवाणू चे हल्ले झाल्यामुळे लोकांची प्रतिकार शक्ती चांगली आहे.माझ्या आता पर्यंतच्या वीषाणू विषयींच्या माहितीनुसार सर्वसाधारण प्रतिकार शक्ती आणि विशीष्ट वीषाणूंशी प्रतिकाराच्या अनुभवातून आलेली प्रतिकार शक्ती या विभीन्न बाबी आहेत. विशीष्ट वीषाणूंशी प्रतिकार करून आलेली प्रतिकारशक्ती केवळ त्याच वीषाणूंचा मुकाबला करते. शरीराला पुर्वानुभव नसलेले नवे वीषाणू आल्यास शरीराला पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रतिकारशक्तीवरच अवलंबन करावे लागते. आणि सर्वसाधारण प्रतिकारशक्तीची क्षमता उपलब्धता आणि टिकाऊपणा याला स्वतःच्या मर्यादाही असतात अन्यथा मानवी जगासमोर जिवाणू वीषाणूंचे प्रश्नच उपस्थित राहीले नसते. (माणूस आणि मानवी जिवनमान अधिक अस्वच्छ आणि जंतुयुक्त राहीले तर चालले असते. पण केवळ स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणातून मानवी सर्वसाधारण आयुष्याची लांबी बरीच वाढली आणि लोकसंख्या वाढीस हातभार लावणारी ठरली नाही काय? या बाबत मात्र उदाहरणे देता येतील)
भारतात स्वच्छता नसताना सुद्धा कोरणा चा. प्रसार अतिस्वछ देशान पेक्षा कमी आहे.१) विकसित देशांपेक्षा सर्वसाधारण आयुष्य मर्यादा भारतात कमी आहे. भारतात वयस्क व्यक्तींचे नेहमीपेक्षा अधिक मृत्यू नोंदवले जाण्यासाठी ते आधी अधिक जगावयास हवेत , ते आधीच गचकून जात असतील तर वयस्कांचा मृत्यूदर आधीच अधिक असेल म्हणजे वाढीव मृत्यूदर दिसून येण्याचा स्कोपच मुळात कमी असेल. २) कोविडमुळे सर्वसाधारण मृत्यूदरापेक्षा पन्नास टक्क्यांपर्यंत मृत्यूदर वाढला आहे (मी मागच्या वेळी इटली बाबत वाचन केले त्यानुसार). प्रत्येक मृत्यूची शहानिशा व व्यवस्थित मोजणी न होणार्या, कोविडच्या टेस्टींग सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसलेल्या भारतासारख्या देशात मृत्यूदर काहीच वाढलेला नाही असा ठाम दावा कोणत्या आधारावर करता येऊ शकतो ? उत्तरदायीत्वास नकार लागू
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
In reply to सुबोध खरे - धन्यवाद. by अत्रुप्त आत्मा
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
In reply to भाज्या किंवा फळातून करोना च by सुबोध खरे
In reply to सोडियम dichloroisocyanurate by Rajesh188
In reply to सोडियम dichloroisocyanurate by Rajesh188
In reply to SODIUM dichloroisocyanurate by सुबोध खरे
In reply to +++111 by अत्रुप्त आत्मा
In reply to मनोभयाच्या फायद्याचे पोटॅशियल ग्राहक.... by चौकटराजा
In reply to क रोना येण्या अगोदर काय अवस्था होतो by Rajesh188
In reply to तंदुरी मांस कच्चे असते? by आनन्दा
In reply to दुर्लक्ष करा by तुषार काळभोर
In reply to अर्धवट पूर्ण न शिजलेले असा अर्थ घ्या by Rajesh188
In reply to हॅहॅहॅ by अभ्या..
In reply to कच्च्या भाज्या खाल्याने करोना by सुबोध खरे
In reply to अशी जोखीम का घ्यावी ? by माहितगार
In reply to जोखीम कुठे नाही ,,,,,, ? by चौकटराजा
In reply to ज्यांचे काम तळहातावर जीव घेऊन by माहितगार
In reply to आत्ताची अधिकृत आकडेवारी जशी by माहितगार
In reply to आत्ताची अधिकृत आकडेवारी जशी by माहितगार
In reply to ज्यांचे काम तळहातावर जीव घेऊन by माहितगार
In reply to या बाबतीत २-३ प्रश्न आहेत by आनन्दा
In reply to अजून एक.. by आनन्दा
किंवा इमारतीच्या पार्किंगमध्ये एखाद्या करोनाबाधिताशी मास्कशिवाय गप्पा मारल्याने मला संसर्ग होईल का? आणि झाला तर तीव्रता किती असेल?कोविड-१९ आणि एकुणच श्वसनजन्य वीषाणू संसर्ग केवळ मोठ्या थेंबातून होतो की छोट्या थेंबातून अधिक लांबवर जातो या बद्दल संशोधकात अंशतः (तपशिलाचा) वाद चालू आहे अगदी कालच २३९ वैज्ञानिकांनी आग्रही शक्यता व्यक्त केली आहे की छोट्या थेंबातूनही वीषाणूंचा प्रसार जरासा अधिक दुरवर होत असणार. एअरबोर्न शब्दावर गूगलले तर बर्याच बातम्या आणि शोध मिळतील. हा संशोधकातील तपशिलाचा वाद बाजूला ठेवला तर किमान स्वरुपाचे वीषाणू विज्ञान, सामान्य विज्ञान आणि लॉजीक यांचा ताळमेळ घातला तर उत्तर सामान्य ज्ञानाच्या प्रश्नोत्तरात मोडावे. सविस्तर उत्तराकडे नंतर येऊ... मला प्रश्नातील एक गृहीतक सुरवातीसच अधिक क्लिअर केलेले सयुक्तीक राहील असे वाटते
किंवा ..... एखाद्या करोनाबाधिताशीकुणाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली तरी लगेच आनंद अवाजवी स्वरुपात साजरा न करण्याचा सल्ला जाणकार देताना दिसतात कारण टेस्ट करता सँपल पाठवल्या नंतर ही किंवा टेस्ट रिझल्ट निगेटीव्ह आल्या नंतरही लागण होण्याचा संभव असू शकतोच. त्यामुळे शारिरीक अंतरपाळताना एखादी व्यक्ती कोरोना बाधीत आहे किंवा नाही याचा विचार करण्याची उसंतही उपलब्ध असतं नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी शारीरीक आंतर पाळणे भाग आहे / अभिप्रेत आहे. (घरातील व्यक्तींशी अगदीच अडचणीच्या क्षणीचा भाग सोडला तर अंतर पाळणे श्रेयस्कर असावे)
किंवा इमारतीच्या पार्किंगमध्ये एखाद्या करोनाबाधिताशी मास्कशिवाय गप्पा मारल्याने मला संसर्ग होईल का? आणि झाला तर तीव्रता किती असेल?मूळ प्रश्नाकडे परत येऊ: १) आपण मास्क बांधतो ते मुख्यत्वे दुसर्याला बाधा होऊ नये म्हणून - हे सर्वांनी दुसर्यांची काळजी घेतली तर आपली काळजी आपोआप घेतली जाते असे तत्व आहे. मास्कच्या स्वरुप आणि प्रत्यक्ष वापरावर संसर्गाची जोखीम अवलंबून असेल. २) मास्क बांधला आहे किंवा नाही या पेक्षाही शारीरीक अंतर हा प्रमुख क्रायटेरीया आहे. - ज्या कणांचे आकार मिलीमिटीर पेक्षा कमी असेल किंवा धुळीच्या कणापेक्षा लहान असेल ते हवे सोबत बर्यापैकी अंतर हवेच्या दिशेने गाठतील हे सांगायला ज्योतीष आणि वैज्ञानिक दोन्हीही लागू नयेत किंवा कसे- प्रत्यक्ष संसर्ग होईल किंवा नाही हे अंतरा शिवाय समोरच्या व्यक्तीच्या उश्वास आणि बोलताना तुषार किती जोरात उडतात त्यांचा आकार (वजन) आणि हवा वाहती आहे किंवा नाही आणि हवेच्या दिशेवर इत्यादीवर अवलंबून असेल. ( माझ्या व्यक्तीगत अंदाजाने परस्पर उंचीचाही संबंध यावा कमी उंचीच्या व्यक्तीने अधिक उंचीच्या व्यक्तीपासून संसर्गाची शक्य्ता कमी असावी म्हणून अधिक अंतर पाळणे श्रेयसकर असावे) ३) अंतर जेवढे कमी आणि खेळत्या हवेचे प्रमाण जेवढे कमी आणि व्यक्तींची संख्या जेवढी अधिक तेवढी संसर्गाची शक्यता अधिक अंतर जेवढे अधिक व्यक्तींची संख्या जेवढी कमी आणि हवा जेवढी कोरडी आणि खेळती तेवढी संसर्गाची शक्यता कमी व्हावी. हे साधे गणित नाही का ? उदाहरणार्थ सहा फुटांचे अंतर त्यातल्या त्यात सुरक्षीत समजले जाते पण समजा हवेचा जोर तुषार सोडणार्याकडून तुषार झेलणार्याकडे अधिक असेल तर सहा फुटाचे अंतर असूनही वीषाणू पोहोचणार नाहीच याची गॅरंटी कशी देणार किंवा एखादा जॉगर धावपटू धावता धावता शिंकला किंवा शिंकत शिंकत धावला तर त्याची शिंक अधिक अंतर कव्हर करेल. किंवा एखादी व्यक्ती शिंकुन पुढे निघुन गेली आणि नेमके त्या मुमेंटला कुणि तिथे पोहोचले तरी अंतर अधिक असूनही बाधा होऊ शकतेच पण दोन व्यक्ती संवाद साधत आहेत त्यात सहाफुटांचे अंतर त्यातल्या त्यात कमी जोखीमेचे असणार. ४) कुणाचे तुषार उडाल्या उडाल्या अर्थात सिलींग फॅनच्या अथवा एसीच्या खेळत्या हवेस तेवढा अर्थ असणार नाही कारण ते आपापल्या दिशेने हवा फिरती ठेवू शकतात ज्यात संसर्गजन्य वीषाणू हवेतच गोल गोल फिरतील (खेळती नव्हे) ५) ज्याला बाधा होईल ती किती प्रमाणात होईल ते त्या त्या व्यक्तीच्या त्या त्या वेळच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असेल. ( मी अलिकडे कायप्पावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉ. धनंजय केळकरांचे व्याख्यान ऐकले) व्हायरल लोड वीषाणू संख्येचा नेमका किती परिणाम होतो हे अद्यापही संशोधनात असलेतरी होत असण्याची शक्यता गृहीत धरावी लागत असावी (चुभूदेघे). ६) प्रतिकार शक्ती व्यवस्थित असताना शरीर प्रतिकार करत असले तरी शिंका खोकलणे होऊ शकते त्यतनही वीषाणूंचा प्रसार होतोच म्हणजे स्वतःचे शरीर सुरक्षीत राहीले तरी स्वतःच्या उश्वासातील तुषार मार्गे वीषाणू दुसर्यांना पोहोचवले जात असतात. एनी वे बिंदीस्त जागेत / घरात संवाद साधण्यापेक्षा मोकळ्या जागेत सुरक्षीत -६ फुटाचे- अंतर ठेवत मास्कबांधून संवाद साधणेच अधिक सुरक्षीत असावे. कोणा चाचणी घेऊन पॉझीटीव्ह असलेल्या कोरोना बाधीताशी संवादा पलिकडे - संवादासाठी मास्क बांधून ६ फुटाचे अंतर - व्यवहार म्हणजे जसे की वस्तुंची देवाण घेवाण करण्याची वेळ आलीच तर मला वाटते एखाद्या निर्जंतुकीकरण केलेली प्लास्टीकची बास्केट किंवा बकेट इत्यादी वापरावे ज्यातून दोघांनीही वस्तु देण्यापुर्वी निर्जंतुकीकरण करावे. ६ फुटापेक्षा कमी अंतर ठेवण्याची वेळ आली तर अशी जोखीम सहसा निरोगी निर्व्यसनी तरुणांनी घ्यावी, माझ्या व्यक्तीगत मते एन - ९५ मास्क डोळ्याला चष्मा लाबंबाह्यांचे कपडे हातात आणि पायात मोजे बूट अशी किमान तयारी असावी. एन - ९५ मास्क कमी वापरा म्हणतात पण आवश्यक तेथे टिका झाली तरी केला पाहीजे असे माझे व्यक्तीगत मत आहे. (उत्तरदायीत्वास नकार लागू)
In reply to या बाबतीत २-३ प्रश्न आहेत by आनन्दा
करोना आणि त्या अनुषंगाने झालेली / केली गेलेली चीनची कोंडी पाहता कधीकधी मला करोना हा प्लांटेड / हाइपड आजार आहे असे वाटते. पण तो या धाग्याचा विषय नाही, म्हणून तुर्तास सोडून देतो.भारतीय तत्वज्ञानातील दिसणारे जग मिथ्या आहे याच्यावरच्या विश्वासातून कुणि बोलत असेल तर भाग वेगळा. जागतिक राजकारण त्यातुन होणार्या आरोपबाजी बाजूला ठेवल्या तरी, नेहमीच्या व्हेंटीलिएटर गरजेपेक्षा अधिक व्हेंटीलिएटर लागत असतील आणि नेहमीच्या मृत्यूदरा पेक्षा ४९% पर्यंत अधिक मृत्यू होताहेत हे सिद्ध होत असेल तर हाईप्ड कसे म्हणता येईल. संशयाचे मीठ असावे ते स्वतःचे जेवण खारट होईल एवढे नसावे. जसे साप साप म्हणून भुई थोपटू नये तसे साप खरोखर फिरत असेल तर अस्तीत्व नाकारु नये.
भारतात करोनाच्या वाढीचा दर माझ्य अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे.कोण म्हणाले कमी आहे म्हणून-वर आकडेवारी दिली आहे-सहसा सरकारी आकडेवारी कमी करुन दाखवली जाते म्हणजे अधिक असू शकते-, सोप्या शब्दात रोज मरे त्याला कोण रडे असे झाले अशी स्थिती आल्यावर लोक रडायचे थांबले किंवा आपण रडण्याकडे लक्ष देणे थांबवले म्हणजे लोकांचे मरण थांबले असा अर्थ होत नसावा किंवा कसे? माझे मार्केटींगचे गुरु सांगत पाऊसाची सवय झाली की मुसळधार पावसाचे ही काही वाटत नाही मग माणूस छत्री विकणार्याला परत पाठवतो, याचा अर्थ पाऊसाची समस्या संपली असा होत नसावा किंवा कसे. आजच्या सकाळ मध्ये ग्रामीण भागात व्हेंटीलिएटर कमी पडल्याने एका पॉझीटीव्ह स्त्रीचा मृत्यू अशी बातमी आहे. बातमीत न आलेल्या व्यक्ती किती असतील ते देव जाणे. तिथे जाऊन आपण मदत करु शकत नाही तर कमीत कमी परिस्थितीचे गांभीर्य कमी मोजून केवळ समाजमनाची दिशाभूल झाली असे नाही तर त्या समाजमनाने जबाबदार्या घेण्याचे नाकारावयास सुरू केले तर .. असो.
जर एका विशिष्ट गतीने आजार पसरू दिला, जसे की सध्या पसरत आहे, तर हवेतून सौम्य व्हायरल लोड मिळून सामूहिक प्रतिकारशक्ती लवकर तयार होइल का?मी वरच्या प्रतिसादात विषयातील जाणकाराच्या संदर्भा सहीत माहिती दिली आहे - ज्यांचा संदर्भ दिला ते माझे कोण लागत नाही- तरी आपल्याला माहिती नाकारावी वाटते तर इतर संदर्भातून तपासून संदर्भा सहीत त्रुटी नजरेस आणाव्यात. आरोग्याच्या क्षेत्रात समाजमनाची दिशाभूल करणारा संशय संदर्भाशिवाय पसरवला असे होऊ नये. (उत्तरदायीत्वास नकार लागू)
In reply to आनन्दांना उत्तर २ by माहितगार
In reply to मी कोणतेही निष्कर्ष काढता by आनन्दा
जो आजार lokdown असताना प्रचंड वेगाने वाढत होता तो आजार lokdown उठल्यावर इतक्या कमी वेगाने वाढेल यावर मी विश्वास ठेवू शकत नाही.वर दिलेली आधीकृत आकडेवारी आपण नीट वाचली असता आजार कमी वेगाने वाढत असल्याचे सुचवत नाही आहे. आता पर्यंत १ कोटीच्या आसपास टेस्ट झाल्या ७ लाख रडारवर आले ६ लाख आजार होऊन गेल्यानंतर कळाले म्हणजे अदमासे ४६ टक्के नंतर कळाले. ७ लाख जे रडारवर वेळे आधी आले ते सर्व गचकले नाही केवळ ४.२५ टक्केच दिवंगत झाले. ४.२५ टक्के रेट सर्व साधारणपणे ऑक्सिजन आणि व्हेंटीलिएटर सुविधा देऊन येतोय म्हणजे जिथे टेस्टींग ऑक्सिजन आणि व्हेंटीलिएटर सुविधा नाही तिथे मृत्यूदर बराच अधिक असू शकतो. (- भारताची १३० कोटी पैकी ३० कोटी लोकसंख्या जरी घनदाट वस्त्यातून रहाते असे गृहीत धरले तरी १३ लाखाच्या ३० पट तरी चारेक कोटी पर्यंत आजार सहज पसरलेला असू शकतो किंवा येत्या काळात सहज पसरेल प्रत्यक्षातला मृत्यूदर बराच अधिक असणार जो टेस्ट आणि संगणकीकृत नोंदींच्या अभावी रडारवर येत नाहीए. माहितीच्या आधिकारात किंवा संसदेच्या पटलावर प्रश्नांची उत्तरे मागवल्या नंतर सावकाशपणे आकडेवारी चे गांभीर्य पुढे येऊ लागेल ) लॉकडाऊन उठल्यानंतर सरकारलाही सगळी आकडेवारी रडारवर नको आहे. सेवा दात्या अधिक घनता असलेल्या ठिकाणी आजार अधिक पसरतोय. (भारतात मृत्यूंची नोंद होऊन डाटाबेसमध्ये विश्लेषणासाठी येण्यात एक पंचवार्षीक कालावधी संपलेला असतो अगदी पुण्यासारख्या ठिकाणी डेथपासेस अगदी कोरोना येण्यापुर्वी पर्यंत हाताने लिहीलेले नॉन कॉम्प्युटराईज्ड दिले जात मग नंतर पास घेऊन तुम्ही सर्टीफिकेट मागण्यासाठी गेला तरच संगणकीकरण होणार!) छोट्या शहर आणि गाववाड्यातील आकडेवारीची स्थिती दयनिय असणार . इटलीत सुद्धा सगळ्या मृतांचे टेस्टींग केले जाऊ शकले नाही पण संगणकीकरणामुळे वाढलेला मृत्यूदर लवकर कळला. भारतात गरिब वर्गाच्या जेष्ठ नागरीकातील मृत्यूदर पुर्वीपासूनच जास्त असणार त्यामुळे मृत्यूदरात झालेली वाढ भारतात चटकन नोंदवली जात नाहीए. मध्यम वर्गात आजार कमी पसरण्याचे कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये लोक एखाद दुसर्या फ्लोअरशी संवाद ठेऊन असतात. शिक्षण आर्थीक क्षमता या कारणांनी शारिरीक प्रतिकारशक्ती बरी असणे आणि फ्लोअर बाह्य संवाद कमी असल्याने चाळींच्या तुलनेत आजाराची साखळी न वाढण्याचा फायदा होतो. आपण म्हणता तसे त्यांचे घराच्या बाहेर नियम न पाळता मिसळणे वाढते आहे तसे आजार वाढतो आहे फक्त तो एखाद्या फ्लोअर पर्यंत मर्यादीत असल्यास महापालिकेला त्यांच्या कडे बघण्यास वेळ नाही. किंबहूना सरकारी इस्पितळांची जबाबदारी खासगी क्षेत्रात देण्याचा एक फायदा जसा ताण कमी करणे आहे तसा वाढती आकडेवारी न दिसून येण्यात सरकारचे राजकीय वाभाडे निघू नये म्हणून कोणतेही सरकार सर्व मध्यमवर्गाची आकडेवारी पुढे आली नाही तर सरकारलाही ठिकच असेल. आकडेवारीवर असंख्य लोक लक्ष्य ठेऊन आहेत मोठ्या त्रुटी आल्या तर कुणि न कुणि लक्षात आणून देईल मी काल टंकलेली आक्डेवारी एन डी टि व्ही वरून घेतली आहे ते काही सरकारी बाजूचे चॅनल नाही अधिकृत आकडेवारी चुकत असेल तर त्यांनी आधीच आवाज केला असता. अर्थात जिथे टेस्टींग सुविधाच देशभरात नाहीत तिथे खेडोपाडी छोट्या शहहरात किती आले आणि किती गेले याची मोजदाद होणे संभव नाही. असो.
In reply to असंख्य दावे by Rajesh188
योग्य...