Skip to main content

रूटीनाच्या रेट्यातही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 20/06/2020 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
रूटीनाच्या रेट्यातही कधी थोडं वेडं व्हावं दवबिंदूत इवल्या ओलं ओलंचिंब व्हावं कानठळी कोलाहली अंतर्नादी गाणं गावं प्रमेयाच्या पंखाखाली व्यत्यासांना विसरावं चारोळीनं महाकाव्य पचवून ढेकरावं धीट शून्यानं शतदा अनंताला हाकारावं
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2424
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अताच एका कवितेवर प्रतिसाद देताना शब्द-मौनातील व्यत्यास जाणवला होता,आणि इथे अजूनही व्यापक प्रमेयांच्या पंखाखाली विसावला! चारोळीनं महाकाव्य पचवून ढेकर द्यावा...व्वाह् शून्यानं अनंताला शतदा हाकारावं... सलाम शेवटच्या दोन ओळींसाठी! अचाट लिहिता आपण! कविता वाचून होते तरीही कितीक वेळ या 'अनन्त-यात्री'सह तरंगत रहातो मी कुठेतरी!

शब्द अन शब्द चपखल वापरला आहे... नेहमी प्रमाणेच... पैजारबुवा,