(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
13 Jun 2020 - 1:06 pm

पेरणा अर्थातच

(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )

मुलगी घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.
फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा
आठवड्याची भाजी, मसाले, लोणची..
बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..
तुझ्या हातचे लाडू याला फार आवडतात असे म्हणून केलेले
दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..
कधी ब्यागेत भरते कोण जाणे!

विस्कटून ठेवलेला असतो बेड.
उशांचे अभ्रे, अंथरूण पांघरूण मग मी टाकते धुवायच्या कपड्यात,
कपाटात तेवढा शिल्लक असतो डोकेदुखीचा बाम,
डायबेटीसच्या गोळ्यांची पाकिटं.
ड्रॉवरमधला पर्फ्युम, क्रीम वगैरे
" हे मी घेते ग.... तुला काय करायचंय?" असे म्हणत ब्यागेत गेलेले असते
मागे उरतात नातींची नावं लिहून ठेवलेली रिकामी पाकिटं.... कपाटा खाली सरकवलेली
अन हमखास विसरलेली टेलर ची शिलाई ..

मला आठवतात तिने फोनवरुन नवऱ्याशी उगाच घातलेले वाद
आणि मग त्याचा आमच्यावर काढलेला राग
तिचा चढलेला आवाज
अन् उगाच त्याला केलेली दमदाटी .

निघताना सामान ठेवायच्या गडबडीत राहिलेच की असे म्हणता सोयीस्कर न केलेला नमस्कार, मिठी..

हुश्य गेली एकदाची असे म्हणत मी जरा पडते तेवढ्यात फोन वाजतोच,
पोचले सांगायला नाही काही...

तर "ती नवी पैठणी पॉलिश करून दुकानदार घरी आणून देईल मी त्याला थोडे पैसे दिले होते बाकीचे दे आणि पैठणी कुरीयरने इकडे पाठवून दे मला गणपतीत घालायला हवी आहे...." हे सांगायला...

मुलगी घरी जायला निघते आणि मी एकदाची मोकळी होते..

(निर्भीड सत्यवादी ) पैजारबुवा,

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीअद्भुतरसइतिहासउपहाराचे पदार्थऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

13 Jun 2020 - 3:24 pm | प्राची अश्विनी

वाटच पहात होते तुमच्या विडंबनाची. पण मला वाटले बायकोवर येईल.
विडंबन छानच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jun 2020 - 4:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण मला वाटले बायकोवर येईल

तेच लिहिणार होतो पण बायकोने परवानगी दिली नाही, मग विषय बदलावा लागला.

पैजारबुवा,

सतिश गावडे's picture

13 Jun 2020 - 4:18 pm | सतिश गावडे

अगदी अचूक वर्णन केलंय. :)

अनन्त्_यात्री's picture

13 Jun 2020 - 4:44 pm | अनन्त्_यात्री

मुलगी नसल्याचे समाधान वाटायला घाऊक कारणे पुरविलीत.

गणेशा's picture

13 Jun 2020 - 4:57 pm | गणेशा

मस्त.. :-))
मज्जा आली

मला आजच वाटले होते, विडंबनाचा धागा काढावा..
पण मला स्वतालाच विडंबन येत नाहीत जास्त..
म्हणुन अजून काढू का नको या विचारात आहे..

विडंबन करणाऱ्यांचा मला हेवा वाटतो.. आपल्याला जमत नाही म्हणुन..

अभ्या..'s picture

13 Jun 2020 - 6:01 pm | अभ्या..

माऊली माऊली
आमचे डोके तुमच्या पाऊली

मूकवाचक's picture

13 Jun 2020 - 8:06 pm | मूकवाचक

+1

प्रचेतस's picture

14 Jun 2020 - 6:34 am | प्रचेतस

=))

लैच भारी

तुषार काळभोर's picture

14 Jun 2020 - 7:04 am | तुषार काळभोर

नेहमी सत्य तेच लिहिणारे माऊलींचे पैजार..

मन्या ऽ's picture

21 Jun 2020 - 10:49 am | मन्या ऽ

=))

एस's picture

21 Jun 2020 - 10:52 am | एस

सत्यवचन!! _/\_

रातराणी's picture

21 Jun 2020 - 11:00 am | रातराणी

:) बेस्ट!

गोंधळी's picture

21 Jun 2020 - 11:01 am | गोंधळी

:-)

एक नुसती मजा म्हणून वाचायला चांगलं आहे. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी आळशी आहोत हे खरं, पण एवढा स्वतःच्याच आईचा गैरफायदा घेतलेला मी तरी नाही बघितला. हल्ली माझ्या आणि इतर बऱ्याच जणींकडे "तू पण बस, मी पण बसते, बाहेरून विकत आणू " हे खूप दिसतं. अर्थात माझा डाटासेट मी बघतिलेल्या घरांपुरता आहे हे मान्य.

मीअपर्णा's picture

25 Jun 2020 - 2:12 am | मीअपर्णा

आताच आधीची कविता वाचली. मस्त जमलंय विडंबन.