Skip to main content

बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 09/06/2020 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे. त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत. विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे. शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्‍या चिनी नागरिकांच्या आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हिताचं आहे. या अभियानामुळे सर्व जगाचं अर्थकारण बदलू शकेल आणि विकासाच्या संधीचं विकेंद्रिकरण होईल. या अभियानासाठी करोना ही जगाला लाभलेली उत्तम संधी आहे असं सोनम यांचं म्हणणं आहे. त्यानिमित्तानं हा विषय इथे मांडला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24960
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

हे विधान गनपती बसवणार्‍यांसाठी आहे
हो का? पण मग ते इथेच कशाला? इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.
चित्तप्रसन्न होण्यासाठी मला कशाची गरज नाही.
तुमचे कसे काय बुवा चित्त प्रसन्न होते? तुम्ही तर चित्ताच्या पलीकडे गेलेले आहात ना? तुमचे चित्त तर निर्भाव असायला हवे ना? की नुसत्याच बोलायच्या बाता?
तुम्ही पुन्हा एकदा आपलं नांव सार्थ केलं आहे.
तेच बरं आहे. लोक सोडून देतात आमच्यासारख्यांना "जान देव भाय त्याचू हय वह" म्हणत. तुमच्या सारख्यांना मात्र लोक "अति शहाणा त्याचा बैल रिकामा" म्हणत फिदीफिदी हसतात. :)

In reply to by संजय क्षीरसागर

नावाचं सोडा हो, नावाचं काय घेऊन बसलात. नावात काही नसते हे एका "ज्ञानी" माणसाला सांगावं लागण्याची वेळ यावी ना.
धागा कशाविषयी आहे ते वाचा.
धाग्याचं सोडा, मुद्द्याचं बोला. :)
इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.
झाली ना बोलती बंद.

In reply to by संगणकनंद

> बरोब्बर ! पण ते तुम्ही स्वतः घेतलंय ना ! त्यामुळे ते सारखं सार्थ होतंय. आता पुन्हा एकदा धागा काय आहे ते पाहा : 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' तुमच्यासारखे त्याचू लोक धारणा सोडायला तयार नाहीत म्हणून दोन्ही कामं करायला लागतात. त्यांच्या धारणा निस्सरित करणं, आणि त्यांना चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं

In reply to by संजय क्षीरसागर

धाग्याचा हेतू चांगला आहे याबद्दल दुमत नाही. मात्र "आपल्या" विचारांचे समर्थन करताना तुमचा ढोंगीपणा उघड झाला आहे त्यावर बोला ना काही.
इतर ठिकाणी लोक श्रद्धेने लिहीत असतात तिथे कशाला चोंबडेपणा करत विरोध करता? लिहू आणि करु द्या की चर्चा त्यांना. ते त्यांच्यासाठी करत असतात. तुम्ही कशाला आपला शहाणपणा दाखवायला जाता तिथे? सोयीचे असेल तर समर्थन आणि इतर वेळी विरोध, वाह रे वाह.
यावर तुमची बोलती बंद झाली आहे. इथला तुमचा विचार स्पृहणीय आहे, ते विजेच्या माळांचे उदाहरणही योग्य आहे. मग इथे जर तुम्ही देवतेचे, तिच्यासमोर समई लावून मनाला मिळणार्‍या प्रसन्नतेचे समर्थन करत आहात, तुम्हाला चुकीच्या वाटणार्‍या गोष्टीला पर्याय सुचवत आहात तर मग इतर ठिकाणी तुमची बुद्धी का माती खाते? तिथे का श्रद्धेवर, देवता पुजनावर, देवासमोर समई लावण्यांसारख्या साध्या साध्या कृतींवर, नामजपावर काहीही कारण नसताना आगपाखड करत असता? हा विरोधाभास नाही का? काही डोक्यात शिरलं असेल तर काही चांगला मुद्दा मांडाल. नसेल शिरलं तर माझ्या नावावर अजून एखादी बालिश कमेंट कराल. माणूस स्वतःहून जेव्हा एखादं नाव घेतो तेव्हा त्या नावाने त्यास कुणी हाक मारल्यास त्याला काही फरक पडणार नसतो एव्हढी साधी गोष्टही तुम्हाला कळत नाही. बसलेत माझ्या नावाचा जप करत. :)

In reply to by संगणकनंद

पुन्हा वाचा : तुमच्यासारखे त्याचू लोक धारणा सोडायला तयार नाहीत म्हणून दोन्ही कामं करायला लागतात. त्यांच्या धारणा निस्सरित करणं, आणि त्यांना चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं ________________________________ जेंव्हा धारणा निस्सरित करायचा धागा असेल तेंव्हा तिथे ते काम करतो. जेंव्हा चायनीज माल घेण्यापासून प्रवृत्त करणं असतं तेंव्हा ते काम करतो. थोडक्यात, त्याचू लोकांना विचारांची योग्य दिशा देतो.

In reply to by संजय क्षीरसागर

बोलती बंद झाल्यावर गोलमाल प्रतिसाद देण्याची कला तुम्ही चांगलीच आत्मसात केली आहे. :) असो, धागा चांगला आहे, त्यावर अधिक अवांतर नको.

In reply to by संगणकनंद

त्याचू लोकांना विचारांची योग्य दिशा देण्याचं काम सतत करायला लागतं बर्‍याच वेळानं का होईना, धागा काय आहे आणि आपण काय विचारतोयं हे तुम्हाला समजलं ! बघा : धागा चांगला आहे, त्यावर अधिक अवांतर नको

आंतरराष्ट्रीय व्यापार युध्दाला त्या त्या देशातील सरकार व तेथील उद्योगधंद्यांनी तोंड द्यायचे असते. देशातील जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवणे हे त्या देशातील सरकारचे व उद्योगधंद्यांचे कमकुवतपणाचे लक्षण आहे.काळ, अर्थातच स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचा!! वरील मत वाचल्यावर, आताच जालावर वाचलेले आठवले, सर्व जबाबदारया सरकारवर लादण्यापेक्षा आपण देशासाठी आपले कर्तव्य पार पाडु या, व सरस्वती राजमणीसारख्या अनेकांच्या श्रमाचे चीज करु या !!! स्थळ : रंगून, ब्रम्हदेश (आताचे मायनामार) रंगूनमधील सोन्याच्या खाणींचे एक भारतीय मालक - ब्रम्हदेशातील श्रीमंत भारतीयांपैकी एक! मनात जाज्वल्य देशभक्ती आणि ब्रिटिशांबद्दल आकस!! नेताजी सुभाषचंद्र बोस त्यावेळेस रंगूनमधून आपली सूत्रे हलवत असत. असेच एकदा त्यांच्या सभेला गेली, त्यांची कन्या - राजमणी… नेताजींनी सभेत आझाद हिंद फौजेसाठी निधी देण्याचे आवाहन केले. सोळा वर्षीय राजमणी त्यांच्या भाषणाने भारावली… आपले सर्व दागिने आणि पैसे तिने दान केले! एक १६ वर्षाची तरुणी इतके दागिने आणि पैसे दान करते हे नेताजींच्या नजरेतून निसटलं नाही. त्यांना ते योग्य न वाटल्याने ते सरस्वती राजमणी ह्यांच्या घरी आले. त्यांच्या वडिलांना नेताजी दागिने परत करत असताना खुद्द नेताजींना सरस्वती राजामणी ह्यांनी उत्तर दिलं, 'ते दागिने, पैसे माझे आहेत. त्यांच काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी ते तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही'. एका १६ वर्षाच्या मुलीच्या शब्दांची धार खुद्द नेताजींना निशब्द करून गेली. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी त्यावर तिला सांगितलं, 'लक्ष्मी येईल आणि जाईल. पण सरस्वती तशीच रहाते. तिचा वरदहस्त तुझ्यावर आहे. म्हणून तुझं नाव आजपासून 'सरस्वती' त्याअगोदर, जवळजवळ ८३ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी १९३७ सालच्या आसपास रंगूनला गेले होते. राजमणीच्या कुटुंबियांच्या घरी ते पाहुणे म्हणून गेले होते. स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधींचं नाव आणि व्यक्तिमत्व सगळ्यांना आकर्षित करेल असं होतं. त्यांच्या भेटीसाठी त्या घरात लगबग चालू होती. सगळे त्यांना भेटण्यास आतुर झालेले असताना लक्षात आलं की घरातली लहान मुलगी गायब आहे. तिचा शोध सगळीकडे सुरु झाला. खुद्द महात्मा गांधी ह्या शोधकार्यात जुंपले. थोड्या वेळाने ती मुलगी घराच्या मागच्या बाजूला बंदुकीने आपलं लक्ष्य वेधण्याचा सराव करत असताना आढळली. महात्मा गांधी नी तिला जाऊन सांगितलं की, 'तू इतकी लहान असताना हिंसेच्या रस्त्यावर का जात आहेस? आपण अहिंसेने ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देतं आहोत. तेव्हा बंदुकीची गरज नाही. तू सुद्धा अहिंसेच्या मार्गाने त्यांच्या विरुद्ध लढा दे. ' त्यांच बोलून संपत नाही तोच खुद्द महात्मा गांधी ना त्या १० वर्षाच्या मुली नी उत्तर दिलं, 'आपण चोरांना आणि लूट करणाऱ्या लोकांना मारतो. नाही का? मग ब्रिटिश चोर आहेत, लुटेरे आहेत. त्यांनी भारताला लुटलं आहे. भारतात चोरी केली आहे. मी मोठी झाल्यावर एका तरी ब्रिटिशाचा माझ्या बंदुकीने नक्की वेध घेईन'. न घाबरता भारताच्या आणि पूर्ण जगाच्या अहिंसेच्या सगळ्यात मोठ्या व्यक्तिमत्वाला अवघ्या १० व्या वर्षी आपल्या शब्दांनी उत्तर देणारी ती मुलगी म्हणजेच भारताची आजपर्यंतची सगळ्यात तरुण गुप्तहेर ज्यांच नाव आहे 'सरस्वती राजमणी'. त्यांचं कुटुंब मुळचं भारतातल्या त्रिची इथलं. अतिशय श्रीमंत आणि स्वातंत्र्य लढ्याशी निगडित असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून भारताला ब्रिटिशांपासून स्वतंत्र करण्याचं वेड त्यांना होतं. 'लोहा लोहे को काटता हैं' हा बाणा त्यांच्या अंगात लहानपणापासून होता. मोठं झाल्यावर त्यांचा कल ह्याच बाण्याचं नेतृत्व करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्याकडे वळला. सरस्वती राजामणी ह्यांनी नेताजींना त्यांच्या आझाद हिंद सेनेत घेण्याची विनंती केली. अश्या तऱ्हेने त्यांची नियुक्ती आझाद हिंद सेनेच्या गुप्तहेर खात्यात झाली. ह्या खात्याकडे मुख्य जबाबदारी ही ब्रिटिश सेनेतील गुप्त संदेशांना आझाद हिंद सेनेकडे देणं ही होती. सरस्वती राजमणी सोबत अजून ४ सहकारी गुप्तहेर म्हणून रुजू झाल्या. त्या सगळ्यांना आपला पेहराव बदलताना पुरुषी रूप धारण करावं लागलं. सरस्वती राजामणी आता १६ वर्षाचा मिसरूड फुटलेला 'मणी' झाल्या होत्या. मुलगा बनून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात त्यांनी काम करायला सुरवात केली. काम करता करता त्यांच्याकडे संदेश, सैन्याच्या हालचालींची माहिती गुप्तपणे आझाद हिंद सेनेकडे देण्याचं काम होतं. हे काम करताना त्यांच्या एका मैत्रिणीचं बिंग फुटलं आणि ब्रिटिशांनी तिला कैदेत टाकलं. आपल्या साथीदाराला ब्रिटिशांच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं. पकडले गेल्यावर आपली काय हालत होईल हे माहित असताना त्यांनी एका नर्तकी चा वेष करून त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दारू पाजून आपल्या साथीदारांसह तिकडून पोबारा केला. ब्रिटिश सैनिकांना ह्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघींचा ब्रिटिश सेनेने पाठलाग केला. ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात एक गोळी सरस्वती राजामणी ह्यांच्या उजव्या पायाला लागली. गोळी लागलेल्या पायाने धावता येत नसताना ब्रिटिश सैनिकांना चकवा देण्यासाठी ह्या दोघी चक्क झाडावर चढल्या. तब्बल तीन दिवस जोवर ब्रिटिश सैनिकांची शोध मोहीम संपत नाही तोवर झाडावरच बसून होत्या. गोळी लागलेला पाय घेऊन अन्न, पाण्याशिवाय तीन दिवस झाडावर बसून राहणं काय असेल ह्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. त्या गोळीमुळे आजही त्यांच्या उजव्या पायात बळ नाही. पण सरस्वती राजमणी ह्यांनी त्याचा अभिमान बाळगला. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचे कुटुंबीय सर्व काही तेथेच सोडून भारतात परतले, मद्रास (चेन्नई) ला स्थलांतरीत झाले. एकेकाळी गडगंज श्रीमंत असणाऱ्या सरस्वती राजमणी जवळपास ७० वर्ष एका छोट्या खोलीत रहात होत्या. शासनांनं त्यांची दखल घ्यायला स्वातंत्र भारताची सात दशकं जावी लागली! तामिळनाडू सरकारने त्यांना घराची व्यवस्था केली. फाटके कपडे जमवून ते शिवून पुन्हा गरीब लोकांना दान करण्याचं काम त्या आयुष्याच्या शेवटा पर्यंत करत होत्या. २००६ सालच्या त्सुनामीच्या प्रकोपात नाममात्र मिळणारं सरकारी पेंशन सुद्धा त्यांनी मदत कार्याला दान केलं होतं. अश्या ह्या सरस्वतीने १३ जानेवारी २०१८ ला शेवटचा श्वास घेतला. आम्ही भारतीय करंटे आहोत! आम्हाला खऱ्या इतिहासाची जाणीव ना कोणी करून दिली न आम्ही ती करून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय मिळालेले संविधानाचे हक्क, लोकशाही, सार्वभौमत्व हे फक्त आणि फक्त राजकारण आणि स्वतःच्या फायद्यासाठी! मग ते शिक्षण, नोकरी अथवा पैसा किंवा आता सोशल मिडिया सगळ्यांसाठी वापरण्याचा करंटेपणा आजतागायत करत आलेले आहोत. त्याचा आम्हाला माज आहे कारण देशभक्ती काय असते हेच आम्हाला कळलेले नाही. १५ चित्रपट करणाऱ्याला आम्ही देशाचा हिरो मानतो, १० सामने खेळलेला भारताचा स्टार होतो पण अंगावर गोळी झेलून त्याच्या होणाऱ्या यातनांना आपला अभिमान मानणाऱ्या सरस्वती राजमणी ह्यांच्या कर्तृत्वाचं न आम्हाला काही पडलेलं असते न ते कोणत्या पद्म सन्मानाच्या कक्षेत येते. कारण आमच्या हिरो बनवण्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही इतिहासावर फक्त आणि फक्त नाव ठेवायला तयार असतो इतिहास घडवायला नाही. इतिहास घडवणारी सरस्वती देवींसारखी माणसे वेगळ्याच रक्ताची होती. जरी देशाने त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली नाही तरी देशासाठी रक्त सांडल्याचा आणि त्या इतिहासात सहभाग देण्याचा तसेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी योगदान देण्याचा त्यांना अभिमान होता.

In reply to by अर्जुन

इतकं तरी करु शकतो. १. स्वस्त आहेत म्हणून एकदम चार वस्तू घेण्याऐवजी सध्या गरज आहे म्हणून एकच वस्तू घेणं २. अत्यंत गरज असेल तरच वस्तू खरेदी करणं. उदा. गणपतीसमोर समई लावून मन प्रसन्न होतं म्हटल्यावर स्वस्त आहेत म्हणून चायनीज माळा न घेणं ३. जिथे परवडण्यासारखा फरक आहे तिथे जाणीवपूर्वक भारतीय वस्तूच खरेदी करणं हे एकदा नागरिकांनी मनावर घेतलं की चीनकडून होणारी बेफाम आयात आपोआप मंदावेल.