पन्नाशीचा टप्पा
आता आता दादा होते
कसे मग काका झाले
तरुणाच्या यादी मध्ये
बघा किती मागे गेले
दिसते आहे टक्कल
पांढर्या झाल्या मिश्या
हळू हळू मोठ्या होती
कश्या प्रौढत्वाच्या रेषा
शत्रूवर येऊ नये
तो प्रसंग येतो असा
तिशीची बाई म्हणते
काका जागा आहे बसा
पटापट हातातून
आयुष्य जात पळून
पन्नाशीचा टप्पा आला
मागं पहावं वळून
काय काय राहिलंय
केली पाहिजे यादी
काय माहित कधी
धरावी लागेल गादी
तू लक्ष नाही द्यायचे
कुरबुर केली कुणी
ऐकत बसावं मस्त
आवडती गाणी जुनी
कारणाशिवाय एक
टाकून द्यावी रजा
पोरा सोबत आपल्या
खूप करावी मजा
खर आहे घरासाठी
तर झिझल पाहिजे
एकदा सरीत पण
चिंब भिजलं पाहिजे
राहिलं असेल बघ
ते डोंगरावर जाणं
जुने छंद आठवून
शिक चित्र किंवा गाणं
प्रेमाला वय नसतं
दे बायकोला गजरा
व्हायचं रसिक कधी
चुकवून त्या नजरा
भरून घेतल आहे
आता थोडं फार वाट
मदतीचा हात थोडा
ज्यांना दु:ख आहे दाट
बाहेर बाहेर झालं
तू आत पहा वाकून
उलगडून बघ ते
जे ठेवलस झाकून
मस्त !
खूप छान मनोज
+१
मस्त, आवडली कविता !
:)
असे नाय करायचे
गालगुच्चा घेउन टाकायचा
गालगुच्चा...
सर
हाहाहा.
ओ काका =))))
YZ नावावर जाऊ नका.
:-)) :-)):-))
=))
अप्रतिम...
धन्यवाद
हा हा हा मस्त!