मिपावर काव्यलेखन स्पर्धा २०२० आयोजीत केली आहे. हे वाचून मनापासून आनंद आला.
सांप्रत काळात कवी आणि कवितांना इतर साहित्यप्रकारापेक्षा कमीपणाचे लेखले जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. "मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिला" - असे लिहीणे एकप्रकारे उपकार केल्यासारखे वाटते.
या पार्श्वभुमीवर मिपाने कवितांची स्पर्धा आयोजीत करणे अभिमानास्पद आहे.
सदर स्पर्धेतल्या कविता वाचल्या. त्यात कवितांचे सर्व प्रकार आहेतच पण गजल देखील समाविष्ट आहे.
माझ्या मते गजल हा काव्यप्रकार इतर काव्यप्रकारांपासून निराळा आहे. गजल ही तिच्या प्रकृतीनुसार अधीक अचूक आणि व्याकरणातील सक्षम असावी लागते. ( असे गजल अभ्यासकांचे मत आहे.) त्यामुळेच गजल लिहीणे आणि समजणे, चर्चा करणे जास्त प्रतिष्ठेचे समजले जाते. कला शाखा आणि विज्ञान शाखेत जी चढाओढ असते तेच येथे अपेक्षीत आहे.
अनेक काव्यवाचन स्पर्धांत गजला या गावून सादर केल्या जातात. त्यातील शेर मनाला भिडणारे असतात. त्यामुळे इतर काव्यप्रकारांतून गजल या काव्यप्रकाराला तेथे अधिक मान्यता मिळते. अशा मिश्र काव्यप्रकाराच्या सादरीकरणात गजल ला जास्त बक्षिसे आणि वहावा मिळाल्याचे मी स्वत: अनुभवले आहे.
प्रश्न गजल आणि इतर काव्य यांच्या द्वंदाचा नाहीये. हे दोन भिन्न काव्यप्रकार आहे. गजलेची प्रकृती निराळी आहे. दोन्ही काव्यप्रकार त्या त्या जागी श्रेष्ठ आहेत. यात कोणा एका काव्य रचनाकाराची बुद्धी श्रेष्ठ आणि दुसर्याची कनिष्ठ असे समजायला नको. परंतु ते तसेच होते. मिश्र काव्यप्रकार असतील तेथे गजल करणारे बाजी मारतात. त्यांचे सादरीकरण चांगले असते. त्यामुळे परिक्षकांवर त्यांची छाप पडते. गजलेला प्राप्त झालेले प्रतिष्ठेचे वलय इत्यादी गुण यावेळी उपयोगी पडतात. वास्तविक पाहता इतर काव्यप्रकारही तितक्याच ताकदीचे असतात.
काव्यमंचावर केवळ गजलेचे सादरीकरण असणारे कार्यक्रम नेहमी होत असतात. तेथे इतर काव्यप्रकार सादर होत नाहीत किंवा होवू दिले जात नाहीत. परंतु नेहमीच्या काव्यस्पर्धांत किंवा कविसंमेलनात इतर काव्यप्रकारांसोबत गजल देखील विनासायास समाविष्ट केली जाते नव्हे ती बक्षिसासदेखील पात्र ठरते. मिपावरील सध्याची काव्यस्पर्धा २०२० मध्येदेखील गजल आणि इतर काव्यप्रकार येत आहेत ही याचीच साक्ष आहे.
इतर काव्यप्रकार आणि गजल यामध्ये वाद घालून श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार नसावा. दोन्ही साहित्य भगीनी आहेत. काव्याचे अलंकार आहेत.
मिपावर कविता आणि गजल असे दोन स्वतंत्र प्रकार (विभाग) असावेत असे मला वाटते. दोन्ही आपआपल्या जागी श्रेष्ठ आहेत. इतर संस्थळावर असल्या दोन्ही प्रकारांसाठी निरनिराळे विभाग आहेत.
या काव्यस्पर्धेत परिक्षक गजल आणि इतर काव्यप्रकार असा भेद परिक्षक करतील ही अपेक्षा.
(हे सारे लिहून एका वादाला सुरुवात केल्यासारखे वाटते आहे.)
वाचने
54877
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
विचारला तू प्रश्न सुगंधी,
In reply to हम्म by चांदणे संदीप
विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविलेफुटलो =)))))))))हा हा हा...!
In reply to हम्म by चांदणे संदीप
.
In reply to हा हा हा...! by राघव
राव, ल
In reply to . by चांदणे संदीप
ल
लाल
मॅच होतंय की ! :-)))गज़ल-शेर यातले फारसे काही कळत
In reply to हम्म by चांदणे संदीप
सहमत.
In reply to गज़ल-शेर यातले फारसे काही कळत by मन्या ऽ
गझल कार्यशाळा
In reply to हम्म by चांदणे संदीप
थोडेसे गझले बद्दल...
In reply to हम्म by चांदणे संदीप
पाषाणभेद.. सर्वप्रथम जूने
दूर चालली चिमणी माझी....
In reply to पाषाणभेद.. सर्वप्रथम जूने by गणेशा
दूर चालली चिमणी माझी..
दूर चालली चिमणी माझी.. काळजाच्या आरपार... थेंब थेंब मोती ओला.. ओघळला गालावर.. रिते झाले गाव माझे.. रित्या झाल्या भावना दूर वाजते सनई चौघडे.. त्याला आभाळ पुरेना..क्या बात!! सही!!चर्चेची प्रेरणा काहीही असो,
.
In reply to चर्चेची प्रेरणा काहीही असो, by सतिश गावडे
वाह!
In reply to चर्चेची प्रेरणा काहीही असो, by सतिश गावडे
सुरेश भट
In reply to चर्चेची प्रेरणा काहीही असो, by सतिश गावडे
@ संदीप
परत परत त्याच झाडावर!
In reply to @ संदीप by पाषाणभेद
वरील प्रतिसाद टंकेपर्यंत
चर्चा महत्वाची.
लेख आणि प्रतिसाद आवडले.
ए खादा कवी समजा त्याच्या
तो तो गीत प्रकार
In reply to ए खादा कवी समजा त्याच्या by बिपीन सुरेश सांगळे
संदीप, तुमच्या भावना पोचल्यात
+१
In reply to संदीप, तुमच्या भावना पोचल्यात by राघव
गझल ही कवितेपेक्षा श्रेष्ठ
पटलं..
In reply to गझल ही कवितेपेक्षा श्रेष्ठ by कानडाऊ योगेशु
वाह्
In reply to पटलं.. by चिगो
एकूणात ...
हा हा हा...!
In reply to एकूणात ... by चौकटराजा
नमस्कार , पाभे
वाह
In reply to नमस्कार , पाभे by खिलजि
नमस्कार हो खिलजि!
In reply to नमस्कार , पाभे by खिलजि
कविता /गाणी /गझल /शब्द
+१
In reply to कविता /गाणी /गझल /शब्द by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
+१
पर्फेक्ट !कविता की गझल?
भारी लिहिले आहे..
In reply to कविता की गझल? by एस
हा हा हा ... भारी एक्का भाऊ
काव्य विचार...
पा भे, गणेशा तुम्ही कविता
नाही गेलो कधी, का ओ भाऊ?
In reply to पा भे, गणेशा तुम्ही कविता by प्रमोद देर्देकर
जे खास कवितेचे रसिक आहेत
कविताकोष आणि हिंदीसमय.कॉम
In reply to जे खास कवितेचे रसिक आहेत by प्रमोद देर्देकर
हिंदीसमय.कॉम खरंच अप्रतिम आहे
In reply to कविताकोष आणि हिंदीसमय.कॉम by चांदणे संदीप
वा!
In reply to हिंदीसमय.कॉम खरंच अप्रतिम आहे by सतिश गावडे
शीर्षक बघून कदाचित हा धागा वाचला नसता
मला वाटतं असा भेद नसावा.
अप्रतिम प्रतिसाद..
In reply to मला वाटतं असा भेद नसावा. by आगाऊ म्हादया......
फार खास माणूस आहे हो तो
In reply to अप्रतिम प्रतिसाद.. by गणेशा
मी नाव कुठे तरी ऐकले आहे असेच
In reply to फार खास माणूस आहे हो तो by आगाऊ म्हादया......
प्राजक्ताचा जन्म मिळावा, समोर यावे दार तुझे, अगदी नकळत स्पर्श हजारो, व्हावे वारंवार तुझे,लिंक आहे का सर्व लिखाणाची?
In reply to मी नाव कुठे तरी ऐकले आहे असेच by गणेशा
वैभव जोशी म्हणजे.. जाऊ देत.
In reply to लिंक आहे का सर्व लिखाणाची? by गणेशा
लिंक कुठून आणू?
In reply to मी नाव कुठे तरी ऐकले आहे असेच by गणेशा
Ok..
In reply to लिंक कुठून आणू? by आगाऊ म्हादया......
@आगाऊ म्हाद्या, प्रतिसाद आवडला!
In reply to मला वाटतं असा भेद नसावा. by आगाऊ म्हादया......
धन्यवाद
In reply to @आगाऊ म्हाद्या, प्रतिसाद आवडला! by मन्या ऽ
अतिशय सुंदर प्रतिसाद!
In reply to मला वाटतं असा भेद नसावा. by आगाऊ म्हादया......
तिला अशी दुय्यम
धन्यवाद
In reply to तिला अशी दुय्यम by चौकस२१२
वृत्त बद्ध कविता
छंद / वृत्त ठरवून कविता
In reply to वृत्त बद्ध कविता by निनाद
मी सुद्धा हेच लिहीणार होते.
In reply to छंद / वृत्त ठरवून कविता by राघव
छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही
In reply to वृत्त बद्ध कविता by निनाद
छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाहीह म्हणजे लग्न न झालेली माणसे, नपुसंक असतात असे म्हणण्यासारखे आहे.. गझल आवडते मला.. खुप आवडते.. पण वृत्त नसलेल्या कविता हि तितक्याच जवळच्या वाटतात.. भावनेच्या त्या जसेच्या तसे रूप वाटते.. पण वृत्तात लिहिले पाहिजे, वृत्त पाहिजेच हि अवाजवी मागणी करणारे.. शब्दा वर हि हक्क गाजवू लागतात तेंव्हा? मग ती गझल असु वा निव्वळ कविता.. त्याचे काय..ज्यावर अहंकार चिकटतो.. तो संपतो असे आपले मत.. शब्द हे शब्द असतात...ते प्रेमिका च्या गळ्यात हि हार बनतात.. कोठ्यावर हि फुलेच बरसवतात.. घरात असता ते तिथे हि फुलांचा वर्षाव करतात.. पण म्हणून कोणी फुलांचा बाजार मांडून, तीच खरी फुले असे म्हणत असेल तर अवघड आहे...हा अन्याय ठरेल
In reply to वृत्त बद्ध कविता by निनाद
वेगळा उपविभाग
हे अफाट आहे....वाचनखूण
समर्पक चर्चा!
__^__
In reply to समर्पक चर्चा! by सत्यजित...