कविता आणि गजल दोन वेगवेगळे प्रकार आहेत.
हे सारे लिहून एका वादाला सुरुवात केल्यासारखे वाटते आहेसंवाद व्हावा हीच इच्छा! एक किस्सा सांगतो: माझ्या ऑफिसमधला एक मित्र जो फक्त गझल लिहायचा. कधी माझ्या कवितांनाही दाद द्यायचा. मीही त्याच्या गजलांना दाद द्यायचो. पण पुढेपुढे मला त्याच्या गजलांमध्ये/शेरांमध्ये तोचतोचपणा किंवा एकसुरीपणा जाणवू लागला. तेव्हा मी त्याला म्हणालो, तू कविता का लिहित नाहीस. त्यावर त्याचे उत्तर मला हैराण आणि सार्या कवींना तुच्छ लेखणारे वाटले. तो म्हटला, "कविता काय, कोणी पण लिहू शकतो. त्यामुळेच कविता लिहिणे किंवा वाचणे मला आजिबात आवडत नाही." मग मी त्याला म्हणालो, आपण दोघे एक विषय घेऊया त्यावर कविता लिहूया, आणखी दुसरा विषय घेऊया आणि गजल लिहूया. आणि दोन्ही आपल्या ऑफिसातल्या मित्रांसमोर मांडूया. इथेच दूध का दूध का आणि पानि का पानि होईल. अर्थातच त्याने कविता लिहिलीच नाही. पण न लिहिण्याचे अजब कारण सांगितले की, कितीही प्रयत्न केला तरी कविता मला लिहिताच येईना. कविता मी लिहूच नाही शकत. झालं तो विषय तसाच अर्ध्यावर सुटला. आणखी एक, मी गजल लिहिणारे असे पाहिले आहेत की शेरांच्या शेवटी येणारे सारे यमकांचे शब्द आधी शोधून, लिहून मग त्यानंतर त्यापुढच्या ओळी लिहायच्या. हे तरे बळेच प्रकरण झाले. त्यात प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते ही पळवाट आहेच, काहीही लिहायला. उदाहरणादाखल एक शेर लिहितो जो मी एक गजल वाचनाच्या कार्यक्रमात ऐकला होता. पहिल्या ओळीनंतर निघालेली वा! ही दाद दुसर्या ओळीनंतर मला माझ्या हातात त्याक्षणी अंडी किंवा सडके टोमॅटो पाहिजे होते असा विचार देऊन गेली होती. तो शेर होता.... विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले आता बोला! इथे पहिल्या ओळीचा दुसर्या ओळीशी संबंध नाहिये, तिथे एका शेराचा दुसर्या शेराशी संबंध असावा ही अपेक्षाच धरू नये. मला वाटते, हिंदी/उर्दूतून गजल मराठीत आणताना कुणी काव्यपंडितांनी मराठी गजलेला चुकीच्या वाटेवर नेले आहे. माझ्या मते, प्रत्येक गजल ही एक कविताच असते. कविता/काव्य हाच आत्मा आहे. गजल्/अभंग्/विराणी/दोहे/गीत ही तर शरीरे आहेत. सं - दी - प
In reply to हम्म by चांदणे संदीप
विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले
फुटलो =)))))))))In reply to हम्म by चांदणे संदीप
In reply to हा हा हा...! by राघव
In reply to हम्म by चांदणे संदीप
In reply to गज़ल-शेर यातले फारसे काही कळत by मन्या ऽ
In reply to हम्म by चांदणे संदीप
In reply to हम्म by चांदणे संदीप
In reply to पाषाणभेद.. सर्वप्रथम जूने by गणेशा
दूर चालली चिमणी माझी..
काळजाच्या आरपार...
थेंब थेंब मोती ओला..
ओघळला गालावर..
रिते झाले गाव माझे..
रित्या झाल्या भावना
दूर वाजते सनई चौघडे..
त्याला आभाळ पुरेना..
क्या बात!! सही!!विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविलेहा शेर लिहीणार्याने आधी मी फूल ठेविले - पिस्तूल ठेविले असं यमक ध्यानी ठेवून लिहीला आहे की तो ओघात लिहीला गेला आहे हा प्रश्न मनात आलाच. पहील्या ओळीतून जाणवते की हा दोन जिवलगांमधील संवाद आहे. नातं कोणतं असेल इथपर्यंत जाण्याची गरज नाही. मात्र दुसरी ओळ पहील्या ओळीतील संवादाशी विसंगत आहे हे मात्र नक्कीच. कवितेची ताकद मला तेव्हा कळली होती जेव्हा मी शाळेत अभ्यासाला असलेली दया पवार यांची "कोंडवाडा" ही कविता वाचली होती. कशाला झाली पुस्तकांची ओळख बरा ओहळाचा गोटा गावची गुरं वळली असती असल्या इंगळ्या डसल्या नसत्या ओहळाचा गोटा आणि गुरं वळणं यांच्याशी असलेला संबंध तुटून आता वीस वर्ष झालीत. मात्र या ओळी शिलालेखाप्रमाणे मनावर कोरल्या गेल्या आहेत. ही आहे कवितेची ताकद.
मला वाटते, हिंदी/उर्दूतून गजल मराठीत आणताना कुणी काव्यपंडितांनी मराठी गजलेला चुकीच्या वाटेवर नेले आहे.हे हौशी नवशिक्या गझलकारांमुळे झाले असावे. नाही तर भाऊसाहेब पाटणकरांची गझल वाचून काय बिशाद होईल असं काही म्हणायची. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते आता हरदासाची कथा मूळ पदावर आणूया. कविता आणि गझल यात गझलेला झुकतं माप नको. :)
In reply to चर्चेची प्रेरणा काहीही असो, by सतिश गावडे
हे हौशी नवशिक्या गझलकारांमुळे झाले असावे.अगदी, अगदी! सं - दी - प
In reply to चर्चेची प्रेरणा काहीही असो, by सतिश गावडे
In reply to चर्चेची प्रेरणा काहीही असो, by सतिश गावडे
In reply to @ संदीप by पाषाणभेद
अशा स्पर्धांदरम्यान काव्यवाचनाचे सादरीकरणच महत्वाचे मानले जाते. आवाज, गजलकाराची देहबोली, त्याचे वय (तरूण, वयस्कर) दिसणे आदी मुद्दे महत्वाचे ठरतात - जे अनाठाई आहे. परिपुर्ण रसकोष, आषयाची घनता, गेयता, आकलन दृष्ट्या सोपेपणा, साधेपणा, सामान्य माणसाला समजेल असे रूपडे, शब्दसाधना आदी गुण मागे पडतात. नेहमीची अगदी चार ओळींची आशयसंपंन्न , मुक्तछंदीत कवीताही बाजी मारण्यालायक असतांना केवळ गायन, सादरीकरण, त्या गजलकाराचे मागचे वलय आदी मुद्यांमुळे गजल पुढे येते.इथे तुम्ही गजल बाजी का मारते हे थोडक्यात लिहून तिचे पितळ उघडे पाडले आहेच. मग तुम्हांलाही असे का वाटावे की गजल आणि कविता एका मंचावर नको? होऊद्या काय व्हायचे ते. नाहीतरी जनरेट्यापुढे कुणाचे चालते?
तर मुद्दा काय आहे की आहे गजल हा श्रेष्ठ काव्यप्रकार आहे.पण हे नक्की कशामुळे? काव्याच्या अंगभूत सौंदर्याची जाण जशी कविला असणे अतिआवश्यक आहे ती तशीच रसिक वाचकालाही असणे जरूरीचे आहे. अन्यथा सामान्य वाचकाला "माझ्या लाल गुलाबाचा कसा हरवला वास, शोधित फिरलो मी वणवण कोस कोस" यात गुलाबाचा वास कसा हरवू शकतो असे वाटणे स्वाभाविक आहे. तात्पर्य, अशा वेळी गजलेला दोन अंगुली श्रेष्ठत्व द्यावे त्यांनी ज्यांना या ओळीतले काव्य समजत नाही. त्यामुळेच काव्य न समजणार्याने निव्वळ उथळ शब्दांनी खोल अर्थ निर्माण केलेल्या रचनेला म्हणजेच गजलेला श्रेष्ठ म्हणणे असा प्रकार चालू आहे. गजल मराठीत येण्यापूर्वी कविता/अभंग्/विराण्या/भूपाळ्या/लावण्या कोणी लिहित नव्हते, वाचत नव्हते का? अचानक गजल श्रेष्ठ कशी झाली नक्की? हिंदीतही अनेक अफाट कविता आहेत. गजलाही आहेत. मी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, तमिळ, पंजाबी असे सगळे वाचतो. शोधून शोधून वाचतो. मला कुठेही कुठला अमुक एक काव्यप्रकार श्रेष्ठ वाटत नाही. गजला मी त्याच आवडीने वाचतो जेवढ्या आवडीने कविता वाचतो. नव्हे, तर मराठी हिंदी आणि उर्दूत गजला लिहितोही. म्हणजे, तसा प्रयत्न करतो. उत्तम काव्याला वृत्ताचे बंधन नाही. ती गजल'च' असावी असा काही सोसही नाही. सारखं आपलं गजल श्रेष्ठ गजल श्रेष्ठ करीत जगल करून वाचकवर्ग मिळवायचा हा व्यावसायिक हेतू वाटतो मला. व्यावसायिक म्हणजे केवळ 'अर्थ'कारणच नाही तर आपला वावर, आपले काव्यजगतातले स्थान इ. इ. गजल श्रेष्ठ असण्याबद्दलही माझे काहीही म्हणणे नाही. कवितेची जी याआडून मानहानी करवली जात आहे ती माझ्याच्याने नाही बघवत. सं - दी - प
In reply to ए खादा कवी समजा त्याच्या by बिपीन सुरेश सांगळे
In reply to संदीप, तुमच्या भावना पोचल्यात by राघव
In reply to गझल ही कवितेपेक्षा श्रेष्ठ by कानडाऊ योगेशु
दुसरा फरक म्हणजे कविता अक्षरशः सुचते पण गझलेच्या बाबतीत एखादा दुसराच स्ट्रायकिंग शेर सुचतो आणि बाकीच्या शेरांची मग जुळवाजुळ्व केली जाते.कविता सुचते, कधीकधी अक्षरशः फुटते.. कुठलीही घटना, संवेदना किती ठसठसती आहे, ह्यावरही कविता कि गझल (शेर) हे ठरतं. हे वरवर दिसत नाही, पण कविता स्त्रवत राहते, तर शेर एखाद्या बाणासारखा सन्नकन सुटतो. वर कुणीतरी हिंदी/उर्दू आणि मराठीत असलेल्या जझल आणि त्यांना मिळणारी दाद, ह्याबद्दल लिहीलंय. मला वाटत नाही, कि इथे भाषेचा प्रश्न असावा. कदाचित भाषासामर्थ्याचा असेल. असो. आताच सुचलेला शेर लिहीतो आणि प्रतिसाद संपवतो.. "ये माना कि मेरे गमों से सरोकार नहीं तुझे मगर मुझसे मेरे जीने की वजह तो ना छिन.."
In reply to एकूणात ... by चौकटराजा
In reply to नमस्कार , पाभे by खिलजि
In reply to नमस्कार , पाभे by खिलजि
In reply to कविता /गाणी /गझल /शब्द by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
+१
पर्फेक्ट !In reply to कविता की गझल? by एस
In reply to पा भे, गणेशा तुम्ही कविता by प्रमोद देर्देकर
In reply to जे खास कवितेचे रसिक आहेत by प्रमोद देर्देकर
In reply to कविताकोष आणि हिंदीसमय.कॉम by चांदणे संदीप
In reply to हिंदीसमय.कॉम खरंच अप्रतिम आहे by सतिश गावडे
"मला कवीता समजत नाही तरीपण वाचून मी प्रतिसाद दिलाहे माझ्या बाबतीत अगदी खरे आहे. मला कवीता समजत नाही पण अगदी साध्या सोप्या भाषेत (म्हणजे जो देखे रवी ,वो देखे कवि असल्या छापाच्या सोडून ) असल्या तर काहीतरी अर्थबोध होतो आणि अपवादाने प्रतिसाद दिला जातो बाकी गझल वगैरे वाचण्या पेक्षा ऐकायलच जास्ती आवडतात.
In reply to मला वाटतं असा भेद नसावा. by आगाऊ म्हादया......
In reply to अप्रतिम प्रतिसाद.. by गणेशा
In reply to फार खास माणूस आहे हो तो by आगाऊ म्हादया......
प्राजक्ताचा जन्म मिळावा, समोर यावे दार तुझे,
अगदी नकळत स्पर्श हजारो, व्हावे वारंवार तुझे,In reply to मी नाव कुठे तरी ऐकले आहे असेच by गणेशा
In reply to लिंक आहे का सर्व लिखाणाची? by गणेशा
In reply to मी नाव कुठे तरी ऐकले आहे असेच by गणेशा
In reply to लिंक कुठून आणू? by आगाऊ म्हादया......
In reply to मला वाटतं असा भेद नसावा. by आगाऊ म्हादया......
In reply to @आगाऊ म्हाद्या, प्रतिसाद आवडला! by मन्या ऽ
In reply to मला वाटतं असा भेद नसावा. by आगाऊ म्हादया......
In reply to तिला अशी दुय्यम by चौकस२१२
In reply to वृत्त बद्ध कविता by निनाद
In reply to छंद / वृत्त ठरवून कविता by राघव
In reply to वृत्त बद्ध कविता by निनाद
छंदबद्ध नसल्यास शब्दरचना ही कविता नाही
ह म्हणजे लग्न न झालेली माणसे, नपुसंक असतात असे म्हणण्यासारखे आहे..
गझल आवडते मला.. खुप आवडते..
पण वृत्त नसलेल्या कविता हि तितक्याच जवळच्या वाटतात.. भावनेच्या त्या जसेच्या तसे रूप वाटते..
पण वृत्तात लिहिले पाहिजे, वृत्त पाहिजेच हि अवाजवी मागणी करणारे.. शब्दा वर हि हक्क गाजवू लागतात तेंव्हा?
मग ती गझल असु वा निव्वळ कविता.. त्याचे काय..ज्यावर अहंकार चिकटतो.. तो संपतो असे आपले मत..
शब्द हे शब्द असतात...ते प्रेमिका च्या गळ्यात हि हार बनतात..
कोठ्यावर हि फुलेच बरसवतात.. घरात असता ते तिथे हि फुलांचा वर्षाव करतात..
पण म्हणून कोणी फुलांचा बाजार मांडून, तीच खरी फुले असे म्हणत असेल तर अवघड आहे...
In reply to वृत्त बद्ध कविता by निनाद
In reply to समर्पक चर्चा! by सत्यजित...
हम्म