Skip to main content

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 10/04/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
डिअर ऑल, अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे. यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल. साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल. जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन : १) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक) २) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ? ३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ? ४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.

वाचने 55771
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर,
ज्याला हा क्षण कळला त्याला इतर काहीही जाणून घ्यायची गरज नाही. तो क्षणस्थ झाला. तो बुद्ध झाला. तिथे सगळे वाद संपले, सगळे प्रश्न संपले !
हे रोचक विधान आहे. यांतला क्षण हा शब्द काढून मन हा शब्द टाकला की अर्धवटरावांचा दृष्टीकोन उत्पन्न होईल. वानगीदाखल त्यंचा एक प्रतिसाद : http://www.misalpav.com/comment/930723#comment-930723 विस्तारभयास्तव इथे केवळ मासल्याचा उल्लेख केला आहे. खरंतर तुम्हां दोघांची पूर्ण चर्चा वाचली पाहिजे. धागाबाह्य संदर्भ दिल्याबद्दल क्षमस्व. चर्चा भरकटू नये अशी इच्छा व्यक्त करतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ती चर्चा `मना वेगळा कुणी नाही' यावर होती. त्याला यथार्थ उत्तर मनाच्या बाहेर !मधे दिलं आहे. इथे त्याचा संदर्भ नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

क्षणाबाहेर कुणी आहे का? असल्यास होण आहे? -गा.पै.

In reply to by संजय क्षीरसागर

तर मग क्षण आणि मन यांच्यात फरक तो काय उरला? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आपण मनाच्या परिघाबाहेर आहोत याचा, क्षण = मन याच्याशी काय संबंध ?

In reply to by संजय क्षीरसागर

क्षण = मन अशा अर्थी की तुम्ही ज्याला क्षण म्हणता आहात त्याला अर्धवटराव मन म्हणताहेत. फक्त मनाच्या बाहेर काही नाही इतकंच ते वेगळं बोलताहेत. बाकी तुमच्यासाठी क्षण हे सर्वस्व तर अर्धवटरावांसाठी मन हे सर्वस्व आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्यांच्या पोस्टवर (मनातल्या मनात) किंवा माझ्या पोस्टवर (मनाच्या बाहेर) क्षणावर चर्चा नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

त्या सर्व पोष्टींत मनाच्या जागी क्षण असंही टाकता येईल की. जरी मनावर चर्चा असली तरी ती क्षणालाही तितकीच लागू पडते (किंवा पडावी). हे नवल नव्हे काय! फक्त फरक इतकाच की तुम्ही 'आपण' बाहेर म्हणताय तर अर्धवटराव यांना 'आपण' नामे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्या सर्व पोष्टींत मनाच्या जागी क्षण असंही टाकता येईल की. जरी मनावर चर्चा असली तरी ती क्षणालाही तितकीच लागू पडते (किंवा पडावी). हे नवल नव्हे काय! नाही ! फक्त फरक इतकाच की तुम्ही 'आपण' बाहेर म्हणताय तर अर्धवटराव यांना 'आपण' नामे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. हाच सगळ्यात मोठा झोल आहे ! आपण किंवा स्व हा सार्वभौम आहे. तो मनाच्या पूर्वीपासून आणि मनानंतर (म्हणजे मन शांत झाल्यावर) सुद्धा आहे. अरांना त्याचा पत्ताच नाही ! या उप्पर अरा कडी करतात, ती अशी की `स्व' (किंवा `मी') ही मनाचीच निर्मिती आहे . मनोनिर्मित स्व हे व्यक्तिमत्त्व आहे आणि सार्वभौम स्व ही स्थिती आहे. थोडक्यात, अरांचा पुरता झोल झाला आहे आणि त्यांना वाटतंय की मला उत्तरं देऊन ते माझ्यासाठीच सत्कार्य करतायंत !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर,
हाच सगळ्यात मोठा झोल आहे !
असू द्या की झोल. काही फरक पडंत नाही. जरी मनाला सर्वस्व मानलं तरी आत्म्याचं काहीही बिघडत नाही. जोवर आपापलं मन कह्यात आहे तोवर कोणाचंही काहीही बिघडणार नाही. बरं ते जाउद्या. मन आणि क्षण वेगळे का नाहीत? क्षण पकडायला मन हवंच. नाहीतर सर्व क्षण सारखेच. तसंच मन पकडायला क्षण हवाच. अन्यथा मन माकडाप्रमाणे उड्या मारीत बसेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१) जरी मनाला सर्वस्व मानलं तरी आत्म्याचं काहीही बिघडत नाही. जोवर आपापलं मन कह्यात आहे तोवर कोणाचंही काहीही बिघडणार नाही. त्यांना मनावेगळं कुणी आहे हेच मंजूर नाही ना ! मग मन कुणाच्या काह्यात राहाणार ? २) मन आणि क्षण वेगळे का नाहीत? क्षण पकडायला मन हवंच. नाहीतर सर्व क्षण सारखेच. तसंच मन पकडायला क्षण हवाच. अन्यथा मन माकडाप्रमाणे उड्या मारीत बसेल. चला तुमचा हा पण डाऊट काढून टाकू ! हा क्षण म्हणजेच आपण, शुद्ध वर्तमान ! कृष्ण त्याला सनातन वर्तमान म्हणतो. हा क्षण कायम मनाच्या कक्षेबाहेर आहे. हे एकदा समजलं की मन कायम आपल्या काह्यात आहे. थोडक्यात, क्षण पकडायला मनाची गरज नाही. खरं तर अंदाधुंद मनामुळेच हा क्षण गवसत नाही. पण एकदा हा क्षण कळला की आपण स्वतःशी कनेक्ट होतो आणि मग मन बायोकंप्युटर होतं !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
त्यांना मनावेगळं कुणी आहे हेच मंजूर नाही ना ! मग मन कुणाच्या काह्यात राहाणार ?
हे बरोबर आहे. मात्र आत्म्यासंबंधीही हाच युक्तिवाद करता येतो. आत्मा दाखवता येत नाही. मग आपण आत्मा आहोत हे कशावरून? २.
हा क्षण म्हणजेच आपण, शुद्ध वर्तमान ! कृष्ण त्याला सनातन वर्तमान म्हणतो. हा क्षण कायम मनाच्या कक्षेबाहेर आहे. हे एकदा समजलं की मन कायम आपल्या काह्यात आहे.
एकाग्र मनाच्या सहाय्यानेच क्षण पकडता येतो. अन्यथा नाही. मनाची एकाग्रता ही नैसर्गिक स्थिती झाली पाहिजे. तर आणि तरंच क्षण पकडला असं म्हणता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१) मग आपण आत्मा आहोत हे कशावरून? मी अरांना दिला होता तोच चायलेंज तुम्हाला देतो ! तुम्ही `मी नाही' असं मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकणार नाही ! हा `मी' तुमचा, माझा, कृष्णाचा, कुत्र्याचा, दगडाचा (त्यांना म्हणता येत नसला तरी) एकच आहे. कारण मी ही व्यक्ती नसून कालातीत स्थिती आहे. आणि तीच आत्म्याची सिद्धता आहे ! २) एकाग्र मनाच्या सहाय्यानेच क्षण पकडता येतो. क्षण पकडण्याचा प्रश्नच नाही, तो उमजण्याचा प्रश्न आहे कारण हा क्षण म्हणजे खुद्द आपणच आहोत ! एकदा आपण स्वतःशी कनेक्ट झालो की काल अशी वस्तू या जगात नाही याची प्रचिती येते. एकदा आपण क्षणस्थ झालो की मग मन ही केवळ मेंदूत चाललेली अ‍ॅ क्टिविटी आहे हा पण प्रत्यय येतो. ज्या क्षणी तो प्रत्यय येतो त्या क्षणी मन काह्यात येतं. मन आपल्याला पकडू शकत नाही. आपण मन बायोकंप्युटर सारखं वापरायला लागतो.

In reply to by संजय क्षीरसागर

मी अरांना दिला होता तोच चायलेंज तुम्हाला देतो ! तुम्ही `मी नाही' असं मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकणार नाही !
वेड पांघरुन पेडगावच्या वार्‍या करण्यातच सुख मानताय का ? तुम्ही जो सतत "मी" चा घोषा लावलाय तो मनोद्भवा आहे हा सिंपल मुद्दा होता ना? "मी नाहि" म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे ?

In reply to by संजय क्षीरसागर

अरांचा काहिही झोल वगैरे झालेला नाहि. "मला" अमुक तमुक गोष्टीत रस होता, मग तो उरला नाहि, असं म्हणायचं, आणि वरतुन हा "मी" मनाबाहेरचा कोणितरी आहे असा दावा करायचा... ही मानसशास्त्राची आध्यात्माशी भेसळ आहे.
अरांचा पुरता झोल झाला आहे आणि त्यांना वाटतंय की मला उत्तरं देऊन ते माझ्यासाठीच सत्कार्य करतायंत !
आपली कॉण्ट्रॅडीक्शन कोणि दाखवुद दिली कि त्याला झोल वगैरे लेबलं चिटकवणे हा मनाचा कद्रुपणा आहे.

तुम्हाला वेबसाईट कशी तयार करावी याची माहिती पाहिजे होती ना! त्या माहितीवर लक्ष केंद्रित करा की! 'आपल्याच धाग्याचा खरडफळा करणे' याचं सोदाहरण प्रात्यक्षिक कशाला?

In reply to by पैसा

>>आवो सर तुम्हाला "आवो ठाकूर" म्हणायचं होतं का? ;) विनोद सोडून द्या, पण त्यांचे बरोबर आहे. ते त्यांच्या वेबसाईट चर्चिले जाणारे "सब्जेक्त म्याटर" डिस्कस करत आहेत.

In reply to by पैसा

Any publicity is good publicity ! (पक्षी : घटं भिंद्यात... ) ;)

संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
तुम्ही `मी नाही' असं मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकणार नाही ! हा `मी' तुमचा, माझा, कृष्णाचा, कुत्र्याचा, दगडाचा (त्यांना म्हणता येत नसला तरी) एकच आहे
. तुमचं विधान मला मान्य आहे. मात्र 'मी नाही' किंवा 'मी आहे' हे मनातच म्हणावं लागणार. मनाबाहेर कसं जायचं ते कोणी बघितलंय? स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसंत नाही. कशावरून तुम्ही (किंवा मी) स्वर्गात आहात? सांगायचा मुद्दा काये की आत्मा जरी मनावेगळा असला, तरी अचिंत्य असल्याने तसा पुरावा सादर करता येत नाही. त्याप्रमाणे काळ जरी अस्तित्वात असला तरी त्याचा थेट पुरावा देता येत नाही. मात्र देहाद्वारे काळाचा प्रत्यय येतो. संजय क्षीरसागर नामे कोणतरी व्यक्ती काळाचं अस्तित्व नाकारून सिद्धास्तित्व जगू शकते. फाईन इनफ, फेअर इनफ. पण तरीही ती काळाचे नियम पाळतच असते. त्याला ती सुज्ञ माणसाचं लक्षण वगैरे काहीतरी नाव ठेवते. मला तरी यांत काही विसंगती दिसंत नाही. २.
क्षण पकडण्याचा प्रश्नच नाही, तो उमजण्याचा प्रश्न आहे कारण हा क्षण म्हणजे खुद्द आपणच आहोत !
म्हणजेच क्षण ही आत्म्याची उपाधी आहे. अगदी तशीच कालांतर (म्हणजे दोन क्षणांमधील अवधी) ही देखील आत्म्याची उपाधी आहे. किंबहुना काळ दर्शवायची दोन मापं आहेत. पाहिलं काळ (= क्षण या अर्थी) आणि दुसरं वेळ (= क्षणांतर या अर्थी). आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१) आत्मा जरी मनावेगळा असला, तरी अचिंत्य असल्याने तसा पुरावा सादर करता येत नाही. आपण आहोत याला पुराव्याची गरज नाही. चिंतनाची तर त्याहून नाही कारण ती मानसिक प्रक्रिया आहे. २) संजय क्षीरसागर नामे कोणतरी व्यक्ती काळाचं अस्तित्व नाकारून सिद्धास्तित्व जगू शकते. फाईन इनफ, फेअर इनफ. पण तरीही ती काळाचे नियम पाळतच असते. एखादी कल्पना सर्वोपयोगी असू शकते. उदा. पैसा हा रंगीत कागदच आहे पण ती कल्पना व्यावाहारिक सुलभता आणते. तद्वत, वेळ अस्तित्त्वात नसली तरी कल्पना म्हणून उपयोगी आहे. सो, सर्वांच्या सोयीसाठी आपण वेळ पाळतो. थोडक्यात, कल्पना उपयोगी आहे पण वास्तविकात काल असं काहीही नाही. तो फक्त पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं होणारा भास आहे. ३) म्हणजेच क्षण ही आत्म्याची उपाधी आहे. अगदी तशीच कालांतर (म्हणजे दोन क्षणांमधील अवधी) ही देखील आत्म्याची उपाधी आहे. किंबहुना काळ दर्शवायची दोन मापं आहेत. पाहिलं काळ (= क्षण या अर्थी) आणि दुसरं वेळ (= क्षणांतर या अर्थी). हा क्षण एकच आहे आणि तोच कायम चालू आहे. हा क्षण ही स्थिती आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो आत्म्याकडे निर्देश करणारा शब्द (उपाधी) आहे किंवा तो आत्म्याचाच पर्यायवाची शब्द आहे. तो वेळ किंवा कालाचा भाग नाही. दोन क्षण असं अस्तित्त्वात काही नाही. मानव निर्मित कालाच्या सुरुवातीपासून, त्याच्या मध्यांतरात (ज्याला तुम्ही दोन क्षणातलं अंतर म्हणतायं) आणि त्याच्या अंतानंतरही, हा क्षण तसाच राहील कारण तो कालज्जयी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर,,
दोन क्षण असं अस्तित्त्वात काही नाही. मानव निर्मित कालाच्या सुरुवातीपासून, त्याच्या मध्यांतरात (ज्याला तुम्ही दोन क्षणातलं अंतर म्हणतायं) आणि त्याच्या अंतानंतरही, हा क्षण तसाच राहील कारण तो कालज्जयी आहे.
आमच्या लहानपणी शाळकरी वयात असतांना एक विनोद सांगितला जायचा. रेखा व बिंदू यांत फरक काय? विनोदी उत्तर असं की रेखा नायिका आहे तर बिंदू खलनायिका. या प्रश्नाचं बिनविनोदी उत्तर चक्रावून टाकणारं आहे. साधारणत: आपल्याला भूमितीत शिकवलं जातं की एकेक बिंदू जोडून रेखा तयार होते. या व्युत्पात्तीत अडचण अशी की बिंदूला लांबी, रुंदी, उंची काहीच नाही. मग असे एकसारखे असंख्य बिंदू जरी जोडले तरी तो एकंच बिंदू असेल. दोन बिंदू एकत्र येऊन रेखा कधीच उत्पन्न करू शकणार नाहीत. बिनविनोदी उत्तर म्हणूनंच बुचकळ्यात टाकणारं आहे. मात्र रेखा प्रमाण मानली तर दोन रेखा जिथे एकमेकींना छेदतात ते स्थळ म्हणजे एक बिंदू अशी व्याख्या करता येते. इथे बिंदू = क्षण आणि रेखा = काळ म्हणून टाकून पहा. क्षण सतत असतो म्हणजे बिंदू सर्वत्र आहे. मान्य. मात्र याच्या सर्वत्रपणामुळेच असंख्य्र रेखा उत्पन्न होताहेत. तुम्ही क्षणाला कालज्जयी म्हणता ते मान्य. मात्र हे करतांना क्षणाच्या सृजनशक्तीची उपेक्षा तर होत नाहीये ना? या सतत चालू असलेल्या क्षणामुळेच काळ उत्पन्न झालाय, नाहीका? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१) दोन बिंदू एकत्र येऊन रेखा कधीच उत्पन्न करू शकणार नाहीत. बिनविनोदी उत्तर म्हणूनंच बुचकळ्यात टाकणारं आहे. मात्र रेखा प्रमाण मानली तर दोन रेखा जिथे एकमेकींना छेदतात ते स्थळ म्हणजे एक बिंदू अशी व्याख्या करता येते. भौमितिक सिद्धांत हा फक्त दृष्टीचा खेळ आहे आणि लॉजिक म्हणून तो पटू शकतो. पण काल आहे किंवा नाही हे आकृत्या किंवा तर्क सिद्ध करु शकत नाहीत. २) क्षण सतत असतो म्हणजे बिंदू सर्वत्र आहे. मान्य. मात्र याच्या सर्वत्रपणामुळेच असंख्य्र रेखा उत्पन्न होताहेत. तुम्ही क्षणाला कालज्जयी म्हणता ते मान्य. मात्र हे करतांना क्षणाच्या सृजनशक्तीची उपेक्षा तर होत नाहीये ना? या सतत चालू असलेल्या क्षणामुळेच काळ उत्पन्न झालाय, नाहीका? क्षण सर्व-सर्जक आहे त्याला सृजनासाठी काल उत्पन्न करायची गरज काय ? तो डायरेक्ट प्रक्रियाच उत्पन्न करतो ! या क्षणात स्वर उमटू शकतो तो कितीही वर, खाली, सरळ, किंवा सर्वत्र एकसारखा पसरु शकतो. जर स्वराच्या सुरुवातीपासून ते लयाच्या `कालावधीच्या मापनाचा' आग्रह धरला तरच कालाची आवश्यकता आहे. अन्यथा स्वराचा `गोडवा' जगणं आनंदी करायला पुरेसा आहे.

संजय क्षीरसागर, १.
पण काल आहे किंवा नाही हे आकृत्या किंवा तर्क सिद्ध करु शकत नाहीत.
तुम्ही जसं क्षण म्हणजे आपण म्हणता त्याच धर्तीवर काळ म्हणजे आपण असंही म्हणता येतं. २.
क्षण सर्व-सर्जक आहे त्याला सृजनासाठी काल उत्पन्न करायची गरज काय ? तो डायरेक्ट प्रक्रियाच उत्पन्न करतो !
इथे तुम्ही प्रश्न आणि उत्तर एकत्रं दिलंय. क्षणाने सृजनार्थ काळ उत्पन्न केलाय. म्हणूनंच प्रक्रिया प्रत्ययास येते. अन्यथा सद्वस्तु एकंच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१) तुम्ही जसं क्षण म्हणजे आपण म्हणता त्याच धर्तीवर काळ म्हणजे आपण असंही म्हणता येतं. आपण कालातीत आहोत ! हाच तर अध्यात्माचा सिद्धांत आहे. २) क्षणाने सृजनार्थ काळ उत्पन्न केलाय. म्हणूनंच प्रक्रिया प्रत्ययास येते. अन्यथा सद्वस्तु एकंच आहे. प्रक्रियेचा प्रत्यय यायला जाणीव पुरेशी आहे. कालाची गरज नाही. सद्वस्तू एकच आहे पण काल भासमान आहे. बाय द वे, तुम्ही कितीही आणि कोणत्याही प्रकारे काल आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. पार शरीरशास्त्र, गणित, भूमिती, फिजिक्स, थिअरी ऑफ रिलेटिविटी, संगीत, नृत्य, चित्रकला, सायकॉलॉजी, खगोल, भूगोल, ..... काहीही. त्या शास्त्रांच्या दृष्टीकोनांचा ऑलरेडी आभ्यास झालायं आणि काल नाही हा माझा अनुभव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
प्रक्रियेचा प्रत्यय यायला जाणीव पुरेशी आहे. कालाची गरज नाही.
माझ्या मते प्रक्रिया घडायला काळ हवाच. अन्यथा प्रक्रिया घडतेय हे कळणार नाही. २.
बाय द वे, तुम्ही कितीही आणि कोणत्याही प्रकारे काल आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. पार शरीरशास्त्र, गणित, भूमिती, फिजिक्स, थिअरी ऑफ रिलेटिविटी, संगीत, नृत्य, चित्रकला, सायकॉलॉजी, खगोल, भूगोल, ..... काहीही. त्या शास्त्रांच्या दृष्टीकोनांचा ऑलरेडी आभ्यास झालायं आणि काल नाही हा माझा अनुभव आहे.
माझ्या मते शास्त्रांचा दृष्टीकोन असं काही नसतं. दृष्टीकोन असतो तो माणसाचा असतो. काळ नाही असा तुमचा अनुभव आहे तो मान्य. मात्र काळ अस्तित्वात असून त्याच्याशी सुसंगतपणे वागायचं असतं असा माझा अनुभव आहे. सांगायचा मुद्दा असा की, जे तुम्हाला गौण वाटतं (उदा. मन) नेमकं त्याच्या सहाय्याने इतर कोणी (उदा. अर्धवटराव) आत्म्यापर्यंत वाटचाल करू शकतात. बरं आता एक सांगा की स्मृती म्हणजे नक्की काय? मला वाटतं आपली यावर चर्चा झालेली आहे. पण या धाग्याच्या संदर्भात परत करायला आवडेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१) माझ्या मते प्रक्रिया घडायला काळ हवाच. अन्यथा प्रक्रिया घडतेय हे कळणार नाही. प्रक्रिया कळायला काळ लागतो म्हणणं म्हणजे भूक लागली हे समजायला घड्याळ वापरावं लागतं म्हणण्यासारखं आहे. २) माझ्या मते शास्त्रांचा दृष्टीकोन असं काही नसतं. दृष्टीकोन असतो तो माणसाचा असतो. `प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ? ३) काळ नाही असा तुमचा अनुभव आहे तो मान्य. मात्र काळ अस्तित्वात असून त्याच्याशी सुसंगतपणे वागायचं असतं असा माझा अनुभव आहे. काल ही उपयोगी कल्पना आहे. मी सुद्धा रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. ठराविक वेळी खेळायला जातो आणि सगळी कामं वेळेवर करतो पण ती सोय आहे, त्यानं कालाची वास्तविकता सिद्ध होत नाही. ३) सांगायचा मुद्दा असा की, जे तुम्हाला गौण वाटतं (उदा. मन) नेमकं त्याच्या सहाय्याने इतर कोणी (उदा. अर्धवटराव) आत्म्यापर्यंत वाटचाल करू शकतात. मेंदू ही मनाची एकूण मर्यादा आहे. आपण मनाबाहेर आहोत. अन्यथा देहांतानंतर, शरीराबरोबर मन आणि त्या बरोबर आपण असा सगळाच खेळ संपला ! कृष्ण व्यर्थ झाला, बुद्ध निरर्थक झाला आणि सांख्य निरुपयोगी झाला ! तस्मात, मनाच्या साह्यानं स्वतःप्रत पोहोचणं म्हणजे रोलर-कोस्टर राईडमधे बसून अचलतेच्या अनुभवाची अपेक्षा करणं आहे. ४) बरं आता एक सांगा की स्मृती म्हणजे नक्की काय? मन म्हणजे काय ते टफींच्या पोस्टवर ऑलरेडी सांगून झालंय. इथून पुढची त्या विषयावरची चर्चा तिथे किंवा माझ्या `मनाच्या बाहेर' या पोस्टवर होऊ शकेल. धन्यवाद !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
प्रक्रिया कळायला काळ लागतो म्हणणं म्हणजे भूक लागली हे समजायला घड्याळ वापरावं लागतं म्हणण्यासारखं आहे.
भुकेची जाणीव होते. पण प्रत्येक प्रक्रियेची जाणीव होईलंच याची खात्री काय? समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात. या प्रक्रियेत जाणीव कुठेच नाही. २.
`प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ?
कोणी असं विधान केलंय का? माझ्या मते अशी काहीही पूर्वअट नाही. मात्र याबाबत चूकभूल देणेघेणे. ३.
काल ही उपयोगी कल्पना आहे. मी सुद्धा रात्री झोपतो आणि सकाळी उठतो. ठराविक वेळी खेळायला जातो आणि सगळी कामं वेळेवर करतो पण ती सोय आहे, त्यानं कालाची वास्तविकता सिद्ध होत नाही.
स्मृती आणि स्वप्न यांतून काळाचं अस्तित्व सिद्ध होतं. भागवत पुराणात महर्षी व्यासांनी स्पष्टपणे लिहिलंय की भगवान कालरूपाने सर्व जिवांना व्यापून आहेत (संदर्भ : http://satsangdhara.net/bhp/bhp03-26.htm येथे 'कालरूपाने' शोधणे.). ४.
तस्मात, मनाच्या साह्यानं स्वतःप्रत पोहोचणं म्हणजे रोलर-कोस्टर राईडमधे बसून अचलतेच्या अनुभवाची अपेक्षा करणं आहे.
रोलरकोस्टरात बसलेल्याचं बूड खुर्चीला चिकटून स्थिरंच असतं. किंबहुना ते तसं स्थिर असल्यानेच आकाशात गटांगळ्या खाल्ल्याचा अनुभव घेऊनही जिवंत राहता येतं. असो. स्मृती म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं नाहीत. माझ्या मते स्मृती काळाशी निगडीत असतात. तुम्ही म्हणता तो काळ अस्तित्वात नसेल तर स्मृती कुठून उत्पन्न होतात? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. भुकेची जाणीव होते. पण प्रत्येक प्रक्रियेची जाणीव होईलंच याची खात्री काय? समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात. या प्रक्रियेत जाणीव कुठेच नाही. भूकेच्या जाणीवेला कालाची गरज नाही. पहिला पार्ट तुम्हाला मान्य आहे. समुद्राच्या पाण्याची वाफ होते ही प्रक्रिया जाणीवेच्या कक्षेत आली की झालं ! नाही तरी तो शोध ती प्रक्रिया कुणाच्या तरी जाणीवेत आली म्हणूनच लागला ना ? शिवाय जाणीव हा तुम्ही व्यक्तिगत फिनॉमिना समजतांय पण मूळात जाणीव ही शरीर बद्ध नाही. ती यत्र-तत्र-सर्वत्र असलेली निराकार स्थिती आहे. कधी तुम्ही चंद्रावर जरी गेलात तरी तिथे तुम्हाला चंद्रावर आलो ही जाणीव होईलच. २) `प्रक्रिया घडण्यासाठी कालाची आवश्यकता आहे' हा विज्ञानाचा फंडामेंटल दृष्टीकोन नाही काय ? कोणी असं विधान केलंय का? मग अरा काय म्हणतायंत असं तुम्हाला वाटतं ? घासकडवींनी इथे प्रदीर्घ वैज्ञानिक लेखमाला (इकडून तिकडून विदा गोळा करुन) पोस्टल्या आहेत. त्यांच्याशी याच तर फंडावर मी मतभेद व्यक्त केला होता आणि सर्वच्या सर्व लेखमालातून निव्वळ माहितीशिवाय काहीही हाती लागणार नाही, असं त्यांना पहिले छूटच सांगितलं होतं. ३) स्मृती आणि स्वप्न यांतून काळाचं अस्तित्व सिद्ध होतं. स्मृती किंवा स्वप्न ही या क्षणात झालेली जाणीव आहे. व्यासांनी काल हा देहातून वर्णन केलेला फिनॉमिना आहे. म्हणजे `काल देहासी आला खाऊ' टाईप. पण जाणीव सार्वभौम आहे, काल नाही. ४) रोलरकोस्टरात बसलेल्याचं बूड खुर्चीला चिकटून स्थिरंच असतं. किंबहुना ते तसं स्थिर असल्यानेच आकाशात गटांगळ्या खाल्ल्याचा अनुभव घेऊनही जिवंत राहता येतं. बूड स्थिर आहे ही जाणीव नव्हे काय ? ती मनाच्या बाहेर आहे तोपर्यंत स्थिरत्वाचा अनुभव येतो. ती एकदा मनाच्या गुंत्यात हरवली की चक्कर येते. ५) स्मृती म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं नाहीत. माझ्या मते स्मृती काळाशी निगडीत असतात. तुम्ही म्हणता तो काळ अस्तित्वात नसेल तर स्मृती कुठून उत्पन्न होतात? स्मृती हे मेंदूतलं रेकॉर्डींग आहे. वर्तमान क्षणात जाणीवेच्या कर्सरनं वेध घेतला की ती अ‍ॅक्टीवेट होते. तिचा कालाशी संबंध नाही. म्हणजे एखादी घडून गेलेली घटना आठवायला कालाची गरज नाही तर जाणीव जागृत हवी. ती घटना `घडली तेव्हा' ते कळलं जाणीवेमुळे आणि आता ती घटना`तेव्हा घडली होती' हे कळलं तेही जाणीवेमुळेच. कालाचा घटना घडण्याशी किंवा स्मृती अ‍ॅक्टीवेट होण्याशी काहीएक संबंध नाही.... कारण काल अशी काही वस्तूच या अस्तित्वात नाही !

ष्टेप बाय ष्टेप जलद अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग इथेही उपलब्ध आहेसा दिसतोयः कुणी जाऊन बघितले आहे का, हा काय प्रकार आहे तो ? . संक्षिसर, धाग्यात पुन्हा एक चित्र घालत असल्याबद्दल क्षमस्व. परंतु एका अर्थी हे धाग्याशी संबंधित आहे, म्हणून कुणाला याविषयी प्रत्यक्ष माहिती आहे का, हे जाणण्यासाठी घातले आहे.

संजय क्षीरसागर, तुमचा वरचा संदेश वाचला. १.
भूकेच्या जाणीवेला कालाची गरज नाही. पहिला पार्ट तुम्हाला मान्य आहे.
पहिला सोडा हो, सगळेच पार्ट्स मान्य आहेत. फक्त व्यवहारी जगात काळ का अस्तित्वात नाही हे शोधायचंय. २.
शिवाय जाणीव हा तुम्ही व्यक्तिगत फिनॉमिना समजतांय पण मूळात जाणीव ही शरीर बद्ध नाही. ती यत्र-तत्र-सर्वत्र असलेली निराकार स्थिती आहे.
मी जाणीवेस केवळ व्यक्तिगत अनुभव समजत नाही. केवळ हा शब्द महत्त्वाचा. जाणीव जेंव्हा देहाबाहेर विस्तारते तेंव्हा ती दैहिक काळाच्या पल्याड जाते. पण म्हणून दैहिक काळ अवैध (इन्व्हॅलिड) ठरंत नाही. अन्यथा झोपेतून परत जाग आलीच नसती. जाणीव जरी देहापल्याड विस्तारली तरी तिचा एक छोटासा अंश देहाशी तादात्म्य राखून असतोच. ३.
मग अरा काय म्हणतायंत असं तुम्हाला वाटतं ? घासकडवींनी इथे प्रदीर्घ वैज्ञानिक लेखमाला (इकडून तिकडून विदा गोळा करुन) पोस्टल्या आहेत. त्यांच्याशी याच तर फंडावर मी मतभेद व्यक्त केला होता आणि सर्वच्या सर्व लेखमालातून निव्वळ माहितीशिवाय काहीही हाती लागणार नाही, असं त्यांना पहिले छूटच सांगितलं होतं.
ही चर्चा मला माहित नाही. किंवा झाली असेल तर आठवंत नाही. यामुळे माझा टाटा. माझ्या मते पारंपरिक विज्ञानात (= न्यूटनीय विज्ञानात = स्थूल विज्ञानात ) काळाची उपस्थिती गृहीत धरतात. ती पूर्वावश्यकता नव्हे. मात्र पुंजीय विज्ञानात (= क्वांटम मेक्यानिक्स) परिस्थिती वेगळी असू शकते. ४.
व्यासांनी काल हा देहातून वर्णन केलेला फिनॉमिना आहे. म्हणजे `काल देहासी आला खाऊ' टाईप. पण जाणीव सार्वभौम आहे, काल नाही.
काळ देहाला कुरतडून खातोय म्हणून तर देह जिवंत आहे. देह अस्तित्वात असणे ही काळ अस्तित्वात असल्याची खूण आहे. मात्र असं असलं तरीही तुम्ही म्हणता तशी जाणीव सार्वभौम आहेच, काळ नाही. ५.
बूड स्थिर आहे ही जाणीव नव्हे काय ? ती मनाच्या बाहेर आहे तोपर्यंत स्थिरत्वाचा अनुभव येतो. ती एकदा मनाच्या गुंत्यात हरवली की चक्कर येते.
तुम्ही म्हणता तसा रोलरकोस्टरात बसून स्थैर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मनाच्या गुंत्यात हरवता कामा नये. यासाठी मन भ्रमणानुभव देणाऱ्या इंद्रियांशी (डोळा, जठार, इत्यादि) संयुक्त झालं असेल तर ते तिथून काढून आपल्या बुडापाशी स्थिर केलं पाहिजे. मगंच रोलरकोस्टरात बसून स्थैर्याचा अनुभव घेता येईल. याच धर्तीवर मनाच्या सहाय्याने मनाचं निरीक्षण करून आत्मतत्त्वापर्यंत पोहोचता येतं. 'मन करा रे प्रसन्न' हा तुकोबांचा अभंग याचीच साक्ष आहे. ६.
मन म्हणजे काय ते टफींच्या पोस्टवर ऑलरेडी सांगून झालंय. इथून पुढची त्या विषयावरची चर्चा तिथे किंवा माझ्या `मनाच्या बाहेर' या पोस्टवर होऊ शकेल.
प्रश्न स्मृती म्हणजे काय असा होता. जर स्मृती अस्तित्वात असेल तर काळ अस्तित्वात आहे असं म्हणता येतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

६) प्रश्न स्मृती म्हणजे काय असा होता. जर स्मृती अस्तित्वात असेल तर काळ अस्तित्वात आहे असं म्हणता येतं. हे ऑलरेडी वरच्या प्रतिसादात पॉईंट नंबर ५ मधे झालंय की ! बघा. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांना एकच फायनल उत्तर देऊन टाकतो ! १) पहिला सोडा हो, सगळेच पार्ट्स मान्य आहेत. फक्त व्यवहारी जगात काळ का अस्तित्वात नाही हे शोधायचंय. २) जाणीव जेंव्हा देहाबाहेर विस्तारते तेंव्हा ती दैहिक काळाच्या पल्याड जाते. पण म्हणून दैहिक काळ अवैध (इन्व्हॅलिड) ठरंत नाही. अन्यथा झोपेतून परत जाग आलीच नसती. जाणीव जरी देहापल्याड विस्तारली तरी तिचा एक छोटासा अंश देहाशी तादात्म्य राखून असतोच. ३) माझ्या मते पारंपरिक विज्ञानात (= न्यूटनीय विज्ञानात = स्थूल विज्ञानात ) काळाची उपस्थिती गृहीत धरतात. ती पूर्वावश्यकता नव्हे. मात्र पुंजीय विज्ञानात (= क्वांटम मेक्यानिक्स) परिस्थिती वेगळी असू शकते. ४) काळ देहाला कुरतडून खातोय म्हणून तर देह जिवंत आहे. देह अस्तित्वात असणे ही काळ अस्तित्वात असल्याची खूण आहे. मात्र असं असलं तरीही तुम्ही म्हणता तशी जाणीव सार्वभौम आहेच, काळ नाही. ५) याच धर्तीवर मनाच्या सहाय्याने मनाचं निरीक्षण करून आत्मतत्त्वापर्यंत पोहोचता येतं. 'मन करा रे प्रसन्न' हा तुकोबांचा अभंग याचीच साक्ष आहे. __________________________________________ हे मात्र ज्याम लक्षपूर्वक वाचा. यापलिकडे कोणत्याही प्रश्नाला काहीही उत्तर नाही. जाणीवेनंच सर्व अस्तित्व बनलंय. तो एकमेव घटक एकाच वेळी आकार असून सुद्धा निराकार आहे. त्या जाणीवेपरता अखिल विश्वात काहीही नाही. म्हणून सर्व ज्ञानी अस्तित्व एक आहे म्हणतात. `अहं ब्रह्मास्मी'चा अर्थ नंदन मंडळी `आय एम दि सुपर पॉवर' असा काढतात आणि तसं कुणी म्हटलं तर त्याच्याकडे नक्की `कोणत्या पॉवर्स आहेत' हे पाहातात. त्याला भींत चालवता येते का? त्याला पाण्यावर चालता येतं का? त्याला न्यायला एंडला आकाशातून विमान येणार का ? अँड सो ऑन.... बाकीची नंदन मंडळी `आयला ! ही काही तरी अचाट भानगड दिसते. आपलं चाललंय ते बरंय, नको तिकडे फिरकायला' असा विचार करतात. वास्तविकात इट इज अ सिंप ल स्टेटमंट ऑफ फॅक्ट. जर सगळं ब्रह्मच आहे तर मी त्या वेगळा कसा असू शकतो ? त्या मुळे मी सुद्धा ब्रह्मच आहे. इट इज जस्ट इंपॉसिबल टू बी अदरवाईज. या जाणीवेची हजोरो नांवं आहेत : बुद्ध तीला शून्य म्हणतो, तुकाराम आकाश (स्पेस) म्हणतात, ज्ञानी आत्मा म्हणतात, अध्यात्मात ब्रह्म म्हटलंय, कृष्ण तीला सनातन वर्तमान म्हणतो, ओशो तीला 'नाऊ अँड हिअर' म्हणतात, एकहार्ट `बिईंग' म्हणतो, निसर्गदत्त महाराज `सद्वस्तू' म्हणतात, मी `निराकार' म्हणतो, कुणी तीला सत्य म्हणतं तर कुणी तीला आदीम शांतता म्हणतात..... आणि इन द फायनल रन, आपण ती जाणीवच आहोत. कारण अखिल विश्वात त्यापरता व्यक्त किंवा अव्यक्त असं काहीही नाही. या जाणीवेची स्वतःत अब्जावधी प्रक्रिया निर्माण करण्याची क्षमता आहे. मग ती सूर्यमालीका असो, लक्षावधी आकाशगंगा असोत, समुद्र असो, वृक्षवल्लरी असो, की मुंगी असो की माती की सूक्ष्मातल्या सूक्ष्म विचाराचा ध्वनी... . प्रत्येक व्यक्त गोष्ट त्या अव्यक्तातूनच प्रकट होते आणि त्यातच विलीन होते कारण त्या वेगळं काहीही नाही. त्यामुळे जाणीव देहाच्या आत-बाहेर यत्र-तत्र सर्वत्र आहे. इन फॅक्ट देह सुद्धा जाणीवेच्याच एलीमेंटसचा बनला आहे. तस्मात, जाणीवेला स्वतःत काहीही निर्माण करायला कोणत्याही बाह्य वस्तूची (उदा. काल) गरज नाही कारण ती सर्वसंपन्न आहे. झोप झाली की जाग आपोआप येते, तिथे कालाची गरज नाही. फिजिक्स असो की क्वांटम मेकॅनिक्स, सगळ्या प्रक्रिया अंतीमतः जाणीवेच्याच अखत्यारित आहेत. त्या दृष्टीनं सर्व शोध हे फक्त उलगडा आहेत. तुम्ही जाणीवेच्या प्रक्रियेचे नियम दीर्घकालासाठी थोपवू शकत नाही कारण जाणीवेला काळाची फिकीरच नाही (ती फक्त माणसालाये). देहाच्या कोणत्याही प्रक्रियेसाठी कालाची गरज नाही. कालाची कल्पना बाद केली तरी जनन-मरण होईलच. मानच्या साह्यानं जाणीवेप्रत जाता येत नाही कारण एक विचार फक्त दुसरा विचार निर्माण करतो, तो जाणीव `निर्माण' करु शकत नाही. कारण जाणीव अनिर्मित आहे. तिच्याप्रत जायला कोणताही सेतूच नाही..... तो फक्त उलगडा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही जाणीवेच्या प्रक्रियेचे नियम दीर्घकालासाठी थोपवू शकत नाही कारण जाणीवेला काळाची फिकीरच नाही

In reply to by सचु कुळकर्णी

आपणच जाणिव आहोत, आपल्यातच प्रक्रिया होते, प्रक्रियेचे नियम देखील आपलेच आहेत तर ते नियम, दीर्घकाल काय किंवा अगदी क्षणभर काय, थोपवुन कसे धरता येतील ? याचा अर्थ नियम थोपवुन धरणारे 'तुम्ही' जाणिवेच्या बाहेरचे आहात ??

संजय क्षीरसागर, १.
तस्मात, जाणीवेला स्वतःत काहीही निर्माण करायला कोणत्याही बाह्य वस्तूची (उदा. काल) गरज नाही कारण ती सर्वसंपन्न आहे.
जाणीव सर्वसंपन्न आहे म्हणूनंच ती काळ उत्पन्न करू शकते, नाहीका? किंबहुना तिचं सर्वसंपन्नत्व कालातीत आहे. तुमच्या दृष्टीने काळ म्हणजे पृथ्वीचं परिवलन आहे. तर माझ्या दृष्टीने काळ त्या परिवलनास चालना देणारा आहे. २.
मानच्या साह्यानं जाणीवेप्रत जाता येत नाही कारण एक विचार फक्त दुसरा विचार निर्माण करतो, तो जाणीव `निर्माण' करु शकत नाही. कारण जाणीव अनिर्मित आहे. तिच्याप्रत जायला कोणताही सेतूच नाही..... तो फक्त उलगडा आहे.
मनाच्या सहाय्याने जाणीवेप्रत जाता येतं. तुकोबांचा 'मन करा रे प्रसन्न' हा अभंग हेच सांगतो. एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला तरी मन निर्विकार करता येतं. निर्विकार मन जाणीवेत लय पावतं. माऊलींनी ज्ञानेश्वरीत याचं बहारदार वर्णन केलं आहे (ऐकीव माहिती). आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विचार देखील जाणिवेचच अपत्य आहे. विचारांना जाणिवेच्या मार्गातली धोंड का समजल्या जातं ?

In reply to by गामा पैलवान

एक विचार जरी दुसरा विचार उत्पन्न करंत असला तरी मन निर्विकार करता येतं.
मन निर्वीकार व्हायला हि विचारांची वाहिनी अडथळा आणते असा काहिसा अर्थ वाटला मला. आणि मन, विचारांचं सौंदर्य मनातले विकार नाहिसे करायचा अप्रतीम मार्ग आहे हा स्वानुभव आहे. त्यामुळे प्रश्न केला. असो. अवांतरः ते नॉट इक्वल टु चिन्ह कसं टाईपायचं ??

In reply to by अर्धवटराव

अवांतर : गुग्गुळाचार्यांना "not equal sign" म्हणून विचारा. -गा.पै.

In reply to by कंजूस

तुम्ही माहिती देण्यात अजीबात कंजुसी केली नाहि :) धन्यवाद.

In reply to by अर्धवटराव

:)

आणि मी त्यावर लेखन करणार नाही. शेवटचा आणि अल्टीमेट प्रतिसाद वर दिला आहे. तो गोड मानून घ्यावा. तरीही मी काहीही हातचं राखलेलं नाही. याचा अर्थ तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत असा नाही. पण हा फोरम अध्यात्मिक लेखनासाठी नाही. मन, काल इथपर्यंत ठीके पण जाणीवेवर इथे चर्चा होऊ शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, चर्चेबद्दल धन्यवाद! मला झालेलं आकलन सांगून मीही आवरतं घेतो. तुम्ही म्हणता ती जाणीव सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान आहेच. यांत तिळमात्रही संशय नाही. मात्र मांडुक्योपनिषदात जाणीव त्रिभाजित होते असं म्हंटलंय. त्यामुळे तुमच्या या विधानाची मांडुक्योपनिषदाशी थेट संगती लागंत नाही. मांडुक्योपनिषदात जागृतावस्थेतल्या जाणीवेस वैश्वानर, स्वप्नावस्थेत तैजस आणि सुषुप्तीत प्राज्ञ अशा संज्ञा आहेत. तुम्ही वर्णिलेली सर्वव्यापी जाणीव प्राज्ञशी जुळणारी आहे. ही स्थिती सुषुप्तीत प्रत्ययास येते. स्वप्नावस्थेत व जागृतीत जाणीव बरीच मर्यादित असते. ही मर्यादा म्हणजे काळ, असं माझं आकलन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही इतकी सुयोग्य चर्चा केलीत म्हणून मी जाणीवेवर लिहीलं. अन्यथा माझ्या अध्यात्मिक पोस्टसवर पब्लिकनी इतका गोंधळ घातला होता की बोलायची सोय नाही. गाढवाचे फोटो काय, विडंबनं काय, ज्यांना अध्यात्मातलं घंटा काही कळत नाही त्यांच्या वाट्टेलत्या कमेंटस काय.... सो आय कॉल्ड इट अ डे ! एनी वे, इतक्या चांगल्या चर्चेनंतर तुमचा हा डाऊट पण क्लिअर करतो. जाणीवेचं त्रिभाजन हे वास्तविकात ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असं आहे. तुम्ही वर्णन केलेलं मांडुक्योपनिषदातलं त्रिभाजन : (जागृतावस्थेतल्या जाणीवेस वैश्वानर, स्वप्नावस्थेत तैजस आणि सुषुप्तीत प्राज्ञ अशा संज्ञा आहेत)..... सुद्धा निद्रा, स्वप्न, सुषुप्ती या अँगलनं योग्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या आणि देहातल्याच अवस्था आहेत. थोडक्यात, उपनिषदात जाणीवेचा वेध देहाच्याच लिमीटेड अँगलमधनं घेतला आहे. जाणीव ही देहबद्ध नाही. ती तशी असती तर अध्यात्माला अर्थच उरला नसता. देह संपला की जाणीव संपली, आपण संपलो, विषय संपला ! जाणीव ही फार थोर गोष्ट आहे तीचा कालाशी सुतराम संबंध नाही. म्हणून तर कृष्ण तीला `सनातन वर्तमान' म्हणतो ! आणि त्यामुळेच कृष्ण अजूनही हजर आहे, बुद्ध अजूनही उपस्थित आहे आणि ओशो देहांतानंतरही जसेच्या तसे आहेत. इन फॅक्ट ज्याला जाणीव कळली तो सुद्धा ती कायम स्थिती होतो. मग त्याच्यात आणि इतर सिद्धात काही फरक राहात नाही. कारण सर्व सिद्ध म्हणजे केवळ एकच `सर्वकाल उपस्थिती' आहे. तीचा कालाशी काहीही संबंध नाही... कारण काल अशी काही वस्तूच अस्तित्वात नाही. ती केवळ प्रक्रिया मापनासाठी केलेली मानवनिर्मित कल्पना आहे. आणि देहात आहोत तोपर्यंत (वास्तविकात नसली तरी) उपयोगाची नक्की आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

...सुद्धा जागृती, निद्रा, स्वप्न, सुषुप्ती या अँगलनं योग्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जागृती, निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या आणि देहातल्याच अवस्था आहेत.

याचाच अर्थ प्रत्येकाला आपलच सांगायच आहे. माझं कोणी ऐकुनच घेवु ईच्छित नाही. ठिकाय ठिकाय, मेरी वेळ आयेन्गी तब बघुन घेयेन्गे मय !!!!

In reply to by इरसाल

ओ इरसालसाहेब ! "ओशोंना जे समजाऊन द्यायला तासभर तरी लागत असे अशी गोष्ट तुम्हाला पाच मिनिटात समजाऊन सांगणे शक्य असेल आणि तरिही तुम्ही अनेक दिवसांमध्ये दिलेल्या असंख्य प्रवचनपर प्रतिसादांनंतरही तुमचे मत अनेक लोकांना पटत नसेल"; तरच तुम्हाला इथे मन, जाणीव, अध्यात्म, इत्यादी उच्च विषयांवर अधिकाराने लिहायला परमिशन आहे, बर्का ! :) =)) (हघ्या)

संजय क्षीरसागर,
पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा निद्रा, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या आणि देहातल्याच अवस्था आहेत.
माझ्या मते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जाणीवेच्या अवस्था आहेत. देहाच्या फक्त जिवंत आणि मृत या दोनच अवस्था आहेत. कितीही विचार केला तरी स्वप्न खरं की जागृतावस्था खरी हा निर्णय त्या त्या अवस्थेत असतांना घेता येत नाही. ही देहाची मर्यादा नसून जाणीवेवर पडलेला अज्ञानाचा पडदा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जाणीवेला अवस्था नाहीत ती एकसंध आणि अस्पर्शित आहे. शिवाय `अवस्था' होण्यासाठी ती प्रक्रिया नाही, अचल`स्थिती' आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर,
ती एकसंध आणि अस्पर्शित आहे.
माझी जाणीव (हे लिहितेवेळी) एकसंध आणि अस्पर्शित नाही. तिच्यावर अज्ञानाचा पडदा आहे. तो दूर कसा करू? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साधकाला बोध होणं किंवा न होणं हा त्याच्या व्यक्तिगत (चुकीच्या) धारणा, त्याच्या आयुष्यातले जाणीवेचं अवधान वेधून घेणारे प्रश्न आणि या दोहोंच्या निस्सरणानंतर, बोध होण्यासाठी त्यानं स्वतःच्या आयुष्यात निर्माण केलेली फुर्सत यावर अवलंबून आहे. तुम्ही जाणीवेच्या त्रिभाजनाचा प्रश्न निर्माण केला म्हणून प्रतिसाद दिला. पण वर म्हटल्याप्रमाणे अध्यात्मावर इथे लेखन नाही.

माझं दुसरं मत - एखादी जागा( कोकणातले घरसुद्धा) घेऊन तिथे चार/ सात दिवस राहण्याची व्यवस्था करा भाविकांची. त्यांनि काय ध्यानधारणा करायची ती तिथे करतील. शेवटी जागाच धंधा करते. इमेलमधून/ फोनने संपर्क करून बँक अकाउंटला पैसे घेता येतील NFTS ने. एक साधीशी ओपन वेबसाइट जनसामान्यांसाठी ठेवायची.

In reply to by कंजूस

माझ्या लेखी सत्य निर्वैयक्तिक आहे. त्यामुळे `काय सांगितलंय' ते `कोण सांगतोयं' यापेक्षा कायम महत्वाचंय. आणि ते सर्वांसाठी सारखंच आहे. ज्या पद्धतीनं इथे सर्वांसाठी`अनोळखी' हीच माझी ओळख आहे, तोच पॅटर्न संकेतस्थळावर राहील. आणि तो लेखनावर फोकस करायला बेस्टे. शिवाय बोललेले शब्द रेकॉर्ड केले नाहीत तर हवेत विरुन जातात. लेखनाचं तसं नाही. लेखन लोकांना फुर्सतीत, रेफरंससाठी पुढेमागे जात वाचता येतं....म्हणून वेब साईट !

In reply to by संजय क्षीरसागर

माझं जरा वेगळं मत आहे. पटतंय का बघा. सामान्य माणसाला आपल्या गुरूची 'ओळख' पाहिजे असते. त्याने कितीही मूर्खासारखे प्रश्न विचारले तरी गुरू त्याचे समाधान होईपर्यंत ज्ञानदान करत असतो. गुरू हा आपल्या आईसारखा मानायची आपली पद्धत आहे. त्यामुळे गुरूने शिष्याशी प्रेमाने, अनुकंपेने वागावे अशी त्यांची नेहमी अपेक्षा असते. त्यामुळे "साधक चिकटले" हे शब्द मला जरा पटले नाहीत. शेवट तुमची साईट, तुमचे शिष्य. तेव्हा त्यांच्याशी कसे वागावे हे तुम्हीच ठरवणार. मी आपले एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by पैसा

साधक पूर्णपणे गुरुला लटकतो आणि सो कॉल्ड गुरु पण त्याला दिलासा देत राहातो. वस्तुस्थिती अशीये की आपण ऑलरेडी सत्य आहोत. साधकाला दिलासा देण्यापेक्षा त्याच्या आकलनात नक्की कोणती गोष्ट आड येतेयं हे शोधणं महत्त्वाचं असतं. सब घोडे बारा टक्के छाप एका गुरुचे सर्व साधक गुरुंच्या गुरुंनी सांगितलेली साधना आयुष्यभर करतात. त्यानं ज्याम लाईट पडत नाही कारण साधकाचा नक्की प्रश्न काये त्याप्रमाणे त्याला साधना द्यावी लागते. गुरु आईसारखा वगैरे नसतो. तो मित्रासारखा असतो. तो पहले छूटच साधकाला सांगतो की प्रश्न साधनेचा नाही, तर आपण सत्य आहोत हे समजण्यात, त्या साधकाचा नक्की काय लोच्या आहे तो सोडवण्याचा आहे. कारण सत्य ही काही भविष्यात घडणारी घटना नाही. ती आता, या क्षणी असलेली वस्तुस्थिती आहे. तस्मात, साधकाला आपल्यावर अजिबात रेलू न देता, एखाद्या कुशल सर्जनप्रमाणे त्याला त्याचा प्रश्न दाखवून देणं आणि सुटकेचा मार्ग सांगणं, हे मला गुरुचं खरं काम वाटतं.

जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी । जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या । जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती । जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी । आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे । जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा । जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ समर्थ जिच्याबद्दल म्हणतात "जयेचा पार न कळे - ब्रह्मादिकांसी" ती जाणीव म्हणजे काय याबद्दल मिपावर शेवटी काय ठरले म्हणे ??

आपणांस नवीन कार्याच्या शुभेच्छा!! शुल्क आकारण्याबाबत काही सदस्यांनी तुम्हाला सांगितले आहेच,पण तुम्ही "लेट मी ट्राय" असे म्हणत आहात तर बघा ट्राय करून.आम्हास वाटलेच तर येवू आपल्या संस्थळावर.वरची चर्चा वाचून डोक्यात मुंग्या आल्यात,कदाचित कुंडली जागृत होत असावी.

In reply to by निष्पक्ष सदस्य

बिपी किंवा शुगर प्रॉब्लम दर्शवतं ! कुंडलीनी जागृत झाली नाही तरी चालेल, पण तब्येतीच्या दृष्टीनं ते पहिले चेक करावं.

In reply to by संजय क्षीरसागर

=)). संजयजी, कसयं... बघा पटतय का, मुद्दा क्रं एक-अध्यात्माचे शिखर गाठलेला माणुस कधीही हेवेदावे करत नसतो. उदा-मी ओशोंपेक्षा सोपं करून सांगतो वगैरे. मुद्दा क्रं दोन-सुरवातीला तुम्ही काही असंबंद्ध प्रतिसाद जे कि तुमच्याशी स्कोर सेटलिंग साठी येत होते ते तुम्ही इग्नोर केलेत तेव्हा छान वाटलं,पण नंतर तुम्ही परत त्यात अडकलात,याला मोहमाया म्हणतात,यासाठी कि तुम्ही हे चांगलेच जाणता कि तुमच्या विचारांशी काहीजण सदैव असहमत असतात तरीही तुम्ही प्रतिवाद करत बसता,हे कशाचे लक्षण आहे?मग तुमच्या अध्यात्मिक उन्नतीचा काय उपयोग? (कृपया यावर प्रतिवाद करू नका.)

In reply to by निष्पक्ष सदस्य

समजतंय का बघा : १) अध्यात्माचे शिखर गाठलेला माणुस कधीही हेवेदावे करत नसतो. उदा-मी ओशोंपेक्षा सोपं करून सांगतो वगैरे. एकेका श्लोकावर ओशो दीड तास प्रवचन द्यायचे. जमाना बदलला आहे. पब्लिकचा अटेंशन स्पॅन कमालीचा कमी झालायं. आज ओशोंच्या जुन्या प्रवचनांना काहीही मागणी नाही. ती फुकट डाऊनलोड करता येतात. अशा वेळी अत्यंत थोडक्यात आणि नेमकं सांगता येणं महत्त्वाचं झालंय. इतर सदस्य आणि मान्यवरांचं सोडा पण तुम्हाला मुद्दा कळायला अडचण नसावी. २) मुद्दा क्रं दोन-सुरवातीला तुम्ही काही असंबंद्ध प्रतिसाद जे कि तुमच्याशी स्कोर सेटलिंग साठी येत होते ते तुम्ही इग्नोर केलेत तेव्हा छान वाटलं,पण नंतर तुम्ही परत त्यात अडकलात,याला मोहमाया म्हणतात,यासाठी कि तुम्ही हे चांगलेच जाणता कि तुमच्या विचारांशी काहीजण सदैव असहमत असतात तरीही तुम्ही प्रतिवाद करत बसता,हे कशाचे लक्षण आहे?मग तुमच्या अध्यात्मिक उन्नतीचा काय उपयोग? उत्तम प्रतिवाद करता येणं हे सुद्धा अध्यात्मिक प्रगतीचंच लक्षण आहे कारण कोणताही आणि कसाही प्रश्न आला तरी नेमकं कळलेला (च) न गडबडता उत्तर देऊ शकतो. हे सुद्धा एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. ३ ) (कृपया यावर प्रतिवाद करू नका.) घाबरु नका. तुमची अध्यात्मिक उन्नतीची परिकल्पना दूर केली आहे.

In reply to by निष्पक्ष सदस्य

=)) कुंडली जागृत होणे हा काय प्रकार आहे?

In reply to by पैसा

कुंडलिनी असं म्हणायचं होतं मला.यामध्ये स्व गवसतो म्हणे!

संजय क्षीरसागर, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. त्यातला जाणीवेचा फंडा तुम्ही सांगितलाय तो मला पूर्वीपासूनंच मान्य आहे. १.
साधकाला बोध होणं किंवा न होणं हा त्याच्या व्यक्तिगत (चुकीच्या) धारणा, त्याच्या आयुष्यातले जाणीवेचं अवधान वेधून घेणारे प्रश्न आणि या दोहोंच्या निस्सरणानंतर, बोध होण्यासाठी त्यानं स्वतःच्या आयुष्यात निर्माण केलेली फुर्सत यावर अवलंबून आहे.
यांचसोबत साधकात बोध करून घ्यायची इच्छा प्रबळ हवी. २.
तुम्ही जाणीवेच्या त्रिभाजनाचा प्रश्न निर्माण केला म्हणून प्रतिसाद दिला.
खरंतर जाणीवेचं त्रिभाजन मांडुक्योपनिषदात सांगितलेलं आहे. माझं स्वतःचं काहीच नाही. ते वचन तुमच्या बोधकथनाशी जुळवायचं बघंत होतो. हा प्रयास माझा मलाच करावा लागणार आहे. तुमच्याशी चर्चा करून उत्तरं मिळाली नाहीत तरी प्रश्न सापडल्यासारखा वाटतो आहे. त्याबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये संजय क्षीरसागर in तंत्रजगत http://www.misalpav.com/node/39432 हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये संजय क्षीरसागर in तंत्रजगत http://www.misalpav.com/node/39444 हे दोन्ही धागे एकाच आहे ना ? फक्त लेखक वेगळा आहे..बरोबर ना ?