मास्तर तुम्ही महान आहात! तुमच्या या महान गुरूला, त्याच्या साहित्यिक प्रतिभेला माझा सलाम. या अशा थोर नरपुंगवाचे आपल्याला मार्गदर्शन लाभले म्हणूनच आपण एवढं उत्तम व्यक्तीचित्रं लिहू शकता. तुमच्या गुरूंना माझे लक्ष लक्ष सलाम!
=)) =)) =)) =))
नावातच सगळं काही आहे हो!
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
देवआजोबांनी एवढ्याश्या छोटुल्या छोटुल्या बाळांना सिद्धहस्त वगैरे म्हटल्यामुळे मास्तरांवर अन्याय झालेला आहे. असे मास्तरांसारखे लिहा, म्हणजे सिद्धहस्तचा सि कळेल.
-- मिसळभोक्ता
महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान महान
बिपिन कार्यकर्ते
मास्तर .. मास्तर ! कमाल केलीत तुम्ही !
यातल्या वाक्यावाक्याला, कल्पने कल्पनेला आणि शेवटच्या पिवळ्या फोटोला भरभरून दाद :)
शेवटच्या फोटोतल्या 'अवघड' स्थितीतून जालिंदर महोदय सुटले ही कमाल पाहता त्यांना एखादा पुरस्कार मिळालाच पाहिजे.
--(नोबेल पुरस्काराची हाव नसलेला) लिखाळ.
हा प्रकार तर आपल्या विचारशक्तीच्या बाहेरचा आहे बॉ..
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
काय ही ओळख! साठोत्तरी काळात नवकवितेला एक वेगळा आयाम देणार्या एका जालीम कवीची ओळख आज एक एप्रिलला होणे हाच माझा बहुमान आहे असे मी समजतो. त्रिखंडात (आफ्रिका, अशिया आणि अंटार्क्टिका) संचार असलेल्या ह्या महान हस्तीचा परिचय आपण आम्हा मिपाकरांना करुन दिलात त्याबद्दल आपले शतशः आभार. वाक्यावाक्याला, शब्दाशब्दाला मी अचंबित होत गेलो. पिवळा फोटो येईपर्यंत डोळे एवढे डबडबले की फोटोच पिवळा आहे की डोळे भरुन आल्याने असे दिसते आहे हे कळेना! आता आपल्याला पुढे वाचवणार नाही असे वाटत असतानाच ओळख संपली आणि चुटपुट लागून राहिली! आणखी एका बाबतीत आपले कौतुक वाटते. एवढे महान व्यक्तिमत्व प्रत्यक्ष गुरुस्थानी लाभूनही तुमच्या लिखाणात कुठेही आढ्यता नाही!
हे माझे गुरु, मी त्यांच्या शिष्य, ते तसे, मी असा; असे कुठेही नाही!! वा वा!! हाच शिष्य पुढे जाऊन आपला पराभव करणार ह्याची जलालाबादींना खात्रीच असणार ('शिष्यात इच्छेत पराजयम' की कायसे एक वचन आहे ना त्या आधारे लिहितोय. चूभूदेघे)!!!
तुमच्या लिखाणाच्या गंगेत आमचे घोडे असेच न्हाऊन निघो हीच जालिंदरचरणी प्रार्थना!!
(नतमस्तक)चतुरंग
सुंदर प्रतिसाद आणि गुणग्राहकतेबद्दल चतुरंग यांना वाकडा सलाम.
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
चतुरंगजी,
आपल्यासारख्या थोर समीक्षकाने आणि साक्षेपी लेखकाने या लेखावर आणि आमच्या गुरूंवरती इतकी स्तुतिसुमने उधळली, आम्ही भरून पावलो...
आपण तिकडे सातासमुद्रापलिकडे असल्याने आमच्या गुरूंची आपली नजिकच्या भविष्यकाळात भेट होणार नाही, परंतु आपल्या पुढल्या भारतभेटीत आम्ही आपली भेट जरूर घडवून आणू...( दुर्दैवाने काही अपरिहार्य कारणाने आमचे गुरू त्या तिकडल्या देशात जात नाहीत)...
बुरुंडी र्वांडा साहित्यसंस्कृती मंडळाच्या एकमेव उत्तेजनार्थ पारितोषिकाखेरीज कोणताही महत्त्वाचा पुरस्कार न मिळालेल्या या साहित्यिकाला जालावर भरभरून प्रतिसाद मिळेल याची खात्रीच होती...
रसिकाश्रय हाच खरा पुरस्कार , असं म्हणतात हे काही खोटं नाही...
सर्वांचे खूप आभार....
(आमच्या लिखाणकौशल्याचे सारे देणे आमच्या गुरूंचे असे आम्ही मानतो... त्यांच्याशी स्पर्धा मात्र आम्ही कधीच करू शकणार नाही असे नम्रपणे नमूद करतो)
आपला (नम्र)
भडकमकर मास्तर
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मास्तर!!!!!!!!!!!!!!
काय बोलू? माझा गळा भरून आला आहे. मी भावनातिरेकाने मूर्च्छित होईन की काय असे वाटत आहे. इतका महान लेख, त्यावरची अतिउच्च समीक्षा आणि तुमचे इतके नम्र उत्तर. नक्कीच तुम्ही पुरूष नाही.... महापुरूष आहात. श्यामच्या आईचा सल्ला तुम्ही अगदी खरा करून दाखवला. धन्य आहे तुमची. असे महान लोक अजून आपल्यात आहेत हे खरोखरच आमचे भाग्य आहे. मी आपल्या आणि रंगाबाबांच्या चरणाशी पूर्णपणे नत आहे.
बिपिन कार्यकर्ते
या थोर साहित्यिकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची ध्वनिफीत ऐकताना ठ्ठो-ठ्ठो-ठ्ठो- आवाजाचे रहस्य आता कळले. कित्येक वर्षे त्याचे मला कोडेच वाटत होते. कारण असे हास्याचे फवारे उडण्याइतके त्यांचे भाषण विनोदी नव्हते.
(आता ती ध्वनिफीत सापडत नाही. या महत्त्वाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाबद्दलची हयगय झालेली बघून मराठी साहित्याच्या धुरिणांबद्दल मनस्वी चीड नाही येणार तर काय येणार?)
त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची ध्वनिफीत ऐकताना ठ्ठो-ठ्ठो-ठ्ठो- आवाजाचे रहस्य आता कळले.
आपण ती ध्वनिफीत कुठे ऐकलीत ?
वेणुनाथ कुडचेडकर डब्बावाला या त्यांच्या शिष्योत्तमाकडे ती उपलब्ध होती असा आत्तापर्यंत गुरुजींचा समज होता...
पण वेणुनाथाकडे ही ध्वनिफीत नाहीए... ( आत्ताच फोनवर कन्फर्म केले)
आमच्या गुरुजींना ती ध्वनिफीत हवी आहे... कुठून उपलब्ध झाली तर जरूर कळवा...
...
राहता राहिले बुरुंडी र्वांडा साहित्य संस्कृती मंडळ... तिथे आपल्या कोणी ओळखीचे आहे का?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
वेणुनाथ कुडचेडकर डब्बावाला
कसलं नाव शोधून काढलं आहे!!! =)) =)) =)) =))
(खुद के साथ बातां : आज मास्तरांच्या ग्रे मॅटर मधे भलतीच उलथापालथ झालेली दिसते! ;) )
चतुरंग
एकंदर र्वांडा-बुरुंडी मराठी मंडळाची जी वाताहात झाली आहे, त्याला तेच जबाबदार आहेत. त्यांच्या चालकांपैकी कोणाची माझी पूर्वी ओळख असेल, तर ती मी कधीच विसरलो आहे. या टोपणनावाने तर मी त्यांना कधीच ओळखत नव्हतो.
संमेलनाच्या दिवशी र्वांडा-बुरुंडी मराठी मंडळाने आम्हाला आमच्या दुसर्या टोपणनावाने प्रवेश नकारला. त्यानंतर आम्ही बुरखे घालून प्रवेश करायचा प्रयत्न केला. पण स्वयंसेवकांनी आमच्या जोड्यांवरून आम्हाला ओळखून आम्हाला रोखले.
("आम्ही" म्हणजे बुरखेवाले तिघे जण होतो. बाकी दोघांना मी [बुरख्यामुळे] ओळखत नाही. पण स्वतःला "आम्ही" म्हणवण्यापर्यंत अजून माझी साहित्यिक पायरी नाही, हे दु:खदपणे नमूद करतो.)
संमेलनाच्या ठिकाणी मागच्या दारातून निसटताना शिष्यवर्य डब्बावालांनी आम्हाला "जय जालिंदरजी" घोष करताना पाहिले. त्या झिंगलेल्या अवस्थेतही त्यांनी आम्हाला कडाडून मिठी मारली, आणि घरी बोलावले, हा किती त्यांचा मोठेपणा. त्यांच्या घरी गेल्यावर सपाटून बर्फी खात-खात त्यांनी चोरून रेकॉर्ड केलेली ध्वनिफीत ऐकवली. ते चमत्कारिक जप करत आडवे झाले, तेव्हा गुरुवर्यांचे मानून त्यांचेच पाय धरून आम्ही बाहेर पडलो.
आता शिष्यवर्य डब्बावाल्यांकडेही ती फीत नाही, हे ऐकून संताप होतो आहे. माझ्याबरोबरच्या त्या दोन बुरखेवाल्यांची नियत खराब होती, अशी एक शंका वाटते आहे. पण डब्बावालांनी खुद्द ती गोड कॅसेट बर्फी समजून खाल्ली असेल, ही शक्यता देखील आहे.
पण स्वतःला "आम्ही" म्हणवण्यापर्यंत अजून माझी साहित्यिक पायरी नाही, हे दु:खदपणे नमूद करतो.
स्वतःबद्दल असे म्हणून धनंजय यांनी "सिद्धहस्त लेखक" म्हणून मिळालेल्या मानपत्राचा अपमान केला आहे ! निषेध ! ;-)
त्या झिंगलेल्या अवस्थेतही त्यांनी आम्हाला कडाडून मिठी मारली, आणि घरी बोलावले, हा किती त्यांचा मोठेपणा. त्यांच्या घरी गेल्यावर सपाटून बर्फी खात-खात त्यांनी चोरून रेकॉर्ड केलेली ध्वनिफीत ऐकवली.
बाकी त्या इतर दोन बुरखेवाल्यांमध्ये मीही होतो... मात्र आडोशाखालून मांडवात प्रवेश करताना आपली चुकामूक झाली असावी...
पण त्यामुळे आपल्याला वेणुनाथाच्या घरी जायला मिळाले..
डब्बावाला मोठा कलंदर माणूस... कधी ओळख दाखवेल कधी चोरासारखे बघेल...( म्हणजे तुम्ही चोर असल्यासारखे)... मला त्यांच्या घरी कधीच जायला मिळाले नाही...पण आपल्याला ही संधी मिळाली हे ऐकून खूप आनंद वाटला....
हल्ली वेणुनाथाला स्किझोफ्रेनिया झाला आहे असे ऐकले. त्यात ती ध्वनिफीत भडकमकरांनी हरवली असे सांगत तो फिरतो...
काही लोक आपल्याला कायम चोरच समजतात याचे मात्र वैषम्य वाटते.
असो...
डब्बावाल्यापासून जपून राहणे..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
बाकी त्या इतर दोन बुरखेवाल्यांमध्ये मीही होतो... मात्र आडोशाखालून मांडवात प्रवेश करताना आपली चुकामूक झाली असावी...
च्यायला...म्हणूनच मला मार पडला..
कारण तिसरा बुऱखेवाला मी होतो. भडकमकर मास्तर मध्येच आम्हाला चुकवून गेले आणि मी एका बुरखेवाल्या बाईचा हात धरून (त्यांना मास्तर समजून) धनंजय यांच्याबरोबर डब्बेवाल्यांकडे गेलो. (धनंजय यांना मी त्यांच्या जोड्यामुळे आधीच ओळखले होते.) नंतर ध्वनिफीत ऐकताना मास्तरांसारखे पट्टशिष्य असे पळायचा का प्रयत्न करत आहेत हे समजत नव्हते. गुरुंचा आवाज ऐकून मास्तरांना त्यांची तीव्र आठवण झाली असा आमचा समज झाला होता.
धनंजय यांच्याबरोबर आम्हीही गुरूवर्य(?) डब्बेवाल्यांचे पाय धरले आणि त्यावेळी हळूच ती ध्वनिफीत मारली. कारण आम्हाला डब्बेवाल्यांचा डाव माहित होता. एका अमेरिकन बाजारू साहित्यिकाला ती ध्वनिफीत विकायची होती. आमचा उद्देश ती ध्वनिफीत आपले सर्वांचे लाडके जालिंदरजीं यांच्या चरणी ठेवावी असा होता. नंतर बाहेर आल्यावर आम्ही ध्वनिफीत मिळाल्याच्या अति आनंदाने मास्तरांना कडकडून मिठी मारली आणि नंतर आम्हाला मार पडला. त्या बाईच्या नवरा जवळच आमचा शोध घेत होता. त्या मारहाणीत तो अमुल्य ठेवा (ध्वनिफीत ) नष्ट झाला आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा आमचा झालेला गैरसमज त्या बुरखेवालीला कळला तेव्हा तिलाही खुप वाईट वाटले.
अजूनही त्या ध्वनिफीतीचे तुकडे आम्ही आमच्या घरात पुजतो आहोत. ती बुरखेवाली सुद्धा आमच्याकडे ध्वनिफीतीचे दर्शन घ्यायला रात्री अपरात्री कधीकधी येते. तिच्या **** नवर्याला तिची ही भक्ती पसंत नाही त्यामुळे त्याच्या फिरतीवर जाण्याची तिला वाट पहावी लागते. लवकरच तिला घेऊन गुरूवर्य जालिंदर यांचे दर्शन घ्यावे म्हणतो.
त्यांना कव्हर फ़ायर देणारे त्यांचे अनुयायी आजही त्या प्रसंगाचे चित्तथरारक वर्णन करतात
तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण त्या कव्हर फ़ायर देणार्या अनुयायांपैकी आम्हीही एक होतो. पण कव्हरीग फ़ायर देण्याच्या भानगडीमुळे जालिंदरजींचे भाष्य पुर्ण ऐकता नव्हते आले. त्या वेळी त्यांचे पट्टशिष्य म्हणवणारे काही अनुयायी फोटो काढण्यात मग्न होते. डब्बेवाल्यांविषयी मनात कटूता जरी असली तरी त्यांच्यामुळे एकदा का होईना अध्यक्षीय भाषण ऐकायला मिळाले.
खादाडमाऊ
जलालाबादींसारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही. त्यांच्या कथा कादंबर्यांची एके काळी पारायणे केली होती. 'अंदमान ते सायबेरिया' या कादंबरीतलं पाचवं प्रकरण तर अतिशय थरारक आहे. (कुणाला कादंबरी हवी असल्यास व्यनी करावा). सध्या ते 'मी एक पेंग्वीन' नावाचं आत्मचरित्र लिहीत आहेत असं ऐकण्यात आलंय.
असे गुरु लाभले ही मास्तरांची पुर्वपुण्याईच म्हणावी लागेल.
अवांतरः पिवळ्या फोटोच्या शोधात गेले कित्येक दिवस होतो. तो इथे दिल्याबद्दल मास्तरांचे शतशः धन्यवाद!
पिवळ्या फोटोच्या शोधात गेले कित्येक दिवस होतो.
आपल्यालाही मल्लखांबाची आवड दिसते.
आमचे गुरू त्यांच्या शाळेकडून दिल्लीला मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवायला गेले होते त्यावेळचे हे छायाचित्र आहे. मागे लाल किल्ला असावा..
अजून एक माहिती...
जालिंदरजींचा इन ऍक्शन हा शेवटचा फोटो..कारण मी लेखात उल्लेख केलेला अपघात याच ठिकाणी झाला...आणि डॉक्टरांनी त्यांना मल्लखांब करायला मनाई केली...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
ह.ह.पु.वा.
=))
बापरे! काय भारी लिहिले आहे!!!
केरळी रांगोळी, बंगालात बंगला, हायकू कायकू आणि इतर हे तर लैच जोरात!
ह्या थोर साहोत्यिकाची ओळख करून दिल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद!!
--शाल्मली.
अरे देवा!!!
मी भयंकर म्हणजे भयंकर फसले.
लेखातली चित्रविचित्र नावे वाचून गोंधळून गेले.
आधी वाटले की आपले वाचन नाहीये फारसे म्हणून नसती ऐकली ही नावे...
शेवटी शेवटी तर हसू येत होते पण इतक्या महान व्यक्तीला कसं हसायचं म्हणून हसले नाही.
त्यावेळी प्रतिसाद दिला नाही.
आत्ता येउन बघते तर एकसे एक प्रतिसाद...=))
रेवती
इतक्या महान व्यक्तीला कसं हसायचं म्हणून हसले नाही.
=)) =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
=)) =))
अफलातून !!! या थोर साहीत्तीकाला भेटायला आवडलं असतं!! जाऊदे..
बायदवे, एकावेळी एकच भाकरी वगैरे बाण्या वरून बरंच काय काय ओळखीचे आठवलं! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
'जालिंदर जलालाबादी'या थोर साहित्यिकाची ओळख अगदी योग्य शब्दात करुन दिली. जालिंदर हे विशाल अंतःकरणाचे थोर कलावंत आहेत. मानवी मनात त्यांनी सद्बभावनेची ज्योत सतत पेटवत ठेवली . आपले समकालीन लेखक जे लिहितात त्यापेक्षा त्यांनी सतत वेगळे लेखन करण्याचा प्रयत्न केला , म्हणूनच प्रस्थापित साहित्यिकांना त्यांचे लेखन एक धक्का होता. बहूजन समाजात त्यांची लोकप्रिय होण्याची अनेक कारणे असली तरी लोकांना जे आवडते ते लिहून त्यातून समाजप्रबोधन करणे हे त्यांचे वैशिष्टे होते.
'बंगालात बंगला' लघूनिबंधातील एक सुंदर वाक्य आहे, ते म्हणतात '' अनुभवविश्व समृद्ध असल्याशिवाय लेखन समृद्ध होत नाही'' ( पाहा पृ.क्र. ४२० ) असो, अशा या थोर माणसाच्या सहवासात आपण राहिल्याने त्यांच्या लेखनाची छाप आपल्या लेखनावरही उमटली आहे, असे वाटते. 'क्षणभंगुर सिंगूर' या त्यांच्या काव्याला आमची प्रस्तावना आहे, हे सांगतांना खूप आनंद होत आहे.
वीस हजार फ़ुटांवरून हवाई छत्रीतून उडी घेऊन त्यांनी दक्षिण गंगोत्रीवर आगमन करणे अपेक्षित होते; त्यांनी तशी उडी घेतलीही परंतु हवाई उडीची सवय नसल्याने ते मूळ जागेहून ३० किलोमीटर दूर जाऊन पडले, तिथून १२ दिवस जीवघेण्या थंडीत पदभ्रमण करत असताना त्यांना वाचवले गेले. पण ते सापडले तेव्हा ते पेन्ग्वीनच्या एका जथ्याला आपली कविता वाचून दाखवताना आढळले.
डोळे भरले प्रसंग वाचतांना ! जालिंदरच्या समर्थकांचा फोटोही खूपच सुरेख आला आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
'क्षणभंगुर सिंगूर' या त्यांच्या काव्याला आमची प्रस्तावना आहे, हे सांगतांना खूप आनंद होत आहे.
आपले अभिनंदन...
हेच हेच ते सरप्राईज असावे....( जालिंदरजींनी खास जलालाबादची ब्रह्मगोळी (त्यांना उत्कृष्ट अफू खायला आवडते) खाताखाता मला एक हिंट दिली होती)
एका महान साहित्यिकाला दुसर्या महान कवीकडून साहित्यसुमनांजली अर्पण केली जाण्याचा अपूर्व योग येत आहे.
रसिक आपल्या प्रस्तावनेचीही वाट पाहत आहेत.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
'क्षणभंगुर सिंगूर' या त्यांच्या काव्याला आमची प्रस्तावना आहे, हे सांगतांना खूप आनंद होत आहे.
सिंगुरला क्षणभंगूर म्हटल्याने सिंगूरवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्याला साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष वगैरे व्हायचे असेल तर निवडणूकी आधीच ते प्रकरण निपटा बॉ :)
-- लिखाळ.
तात्या, मास्तरांपुढे नतमस्तकतर मी पण आहेच. पण मास्तरांच्या गुरूंचा अनुल्लेखाने अनादर करू नका! असा महान लेखक, क्रिडापटू, संगीतज्ञ इ. इ. पुढच्या पाच अब्ज वर्षांत होणे नाही.
वरचे सर्व प्रतिसादही भयंकर विनोदी आहेत, विशेषतः धनंजय, प्रा.डॉ., चतुरंग, टिऊ आणि मास्तरांचे!
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
मास्तर तुमच्या या महान गुरु चा शिश्य होउन ह्या उच्च गुरु शिश्य परम्परेत मला स्विकारा, म्हणजे मि पण मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा अन्तरजाला वर फ़डकावत राहिल व आपल्या साम्प्रदयाचे भविश्य उज्वल करिन.
मास्तरांचं पुन्हा एकदा अभिनंदन! च्यायला खूप दिवसांत एव्हढा हसलो नव्हतो.. हे असलं
लेखन आणि असले इरसाल प्रतिसाद फक्त मिसळ-पाववरच वाचायला मिळतात.. तरी अजून
विजूभाऊ, रामदास, पिडा आदींनी हे वाचलेलं दिसत नाही.. त्यांचीही वाट पाहात आहे
सुरवातीला वाचताना या महान लेखकाचे एक ही पुस्तक आपण कसे वाचले नाही अन नावही कसे काय ऐकले नाही या पेचात होते :?. त्यांचे नाव डायरीत निट लिहून ठेवले अन मगच लेख वाचायला घेतला "जियो जालिंदर जियो"... ऐवजी "पियो जालिंदर पियो" असे वाचले पण ऐवढ्या मोठ्या लेखकाचा आपण चुकून अपमान करत आहोत हे जाणवले . पण खालील वाक्ये वाचून हसणे अनावर झाले
वीस हजार फ़ुटांवरून हवाई छत्रीतून उडी घेऊन त्यांनी दक्षिण गंगोत्रीवर आगमन करणे अपेक्षित होते; त्यांनी तशी उडी घेतलीही परंतु हवाई उडीची सवय नसल्याने ते मूळ जागेहून ३० किलोमीटर दूर जाऊन पडले, तिथून १२ दिवस जीवघेण्या थंडीत पदभ्रमण करत असताना त्यांना वाचवले गेले. पण ते सापडले तेव्हा ते पेन्ग्वीनच्या एका जथ्याला आपली कविता वाचून दाखवताना आढळले.
प्रतीसाद वाचून हसता हसता पडेन असे वाट्ले
भडकमकर मास्तर तुम्ही अगदी थोर आहात तुमची थोरवी मिपाकर नेहमीच गाणार :-) मिपा मुळे तुमचे लेखन आम्हास लाभले म्हणून तात्यांचे ही आभार !
~ वाहीदा
फार अतिशयोक्त लिहिले आहे.
स्पश्ट बोल्ते..राग नसावा.
नाही आवड्ले.
...
विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा
>>विद्रोही चल्वलीचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा
लोकप्रिय साहित्यिकाचे असे विडंबन करु नये !
शरदिनी,तुम्ही प्रतिसाद सिरियसली लिहिला काय ? :?
प्रतिक्रिया
मास्तर
सिद्धहस्त
महान!!!!!!!!!
मास्तर ..
सलाम
हा
रोलरकोस्ट
मास्तुरे! मास्तुरे!!
भयंकर
चतुरंगजी,
मास्तर!!!!!!!!!!!!!!
थडाड्थम थम..
ठ्ठो!
ठ्ठो-ठ्ठो-ठ्ठो
अरे बापरे!!!
र्वांडा-बुरुंडी मंडळातील अंदाधुंद कारभार
निषेध !
डब्बावाला
तरीच..
हाहाहा
दंडवत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अती हुच्च
ङेच म्हणतो...
चला !एक एप्रिल साजरा झाला!
वा वा
पिवळा फोटो
१ नंबर
अरे
महान व्यक्ती
अफलातून !!!
धन्य आहात मास्तर !
प्रस्तावना
'क्षणभंगुर
लै भारी
मास्तरांप
तात्या,
गुरु-
खोखोखो
हुज लाइन इझ इट एनीवे !
धन्य..
आहा हा काय
मास्तर
थोरांची ओळख -जालिंदर ....
एक नंबर !
धन्य झालो...
मास्तर
मी ही खुप फसले !
फार
सहमत आहे !
+१