भांडण

त्यानं तिच्या कडे पाहिलं, तिनं त्याच्याकडे पाहिलं..
पण बोलणं दोघांचं, मनातल्या मनात राहीलं..
उगाचच काढला विषय, तिचं मन तिला खात होतं..
उगाचच वाढवलं आपण, त्याचं मन त्याला समजावत होतं..
आज परत क्षुल्लक कारणांन, त्यांचं भांडण झालं होतं..
आणि भांडणाचं पर्यवसन अबोल्यात झालं होतं..
सकाळचा तापलेला सूर्य जसा मावळतीला आला..
तसा दोघांनाही आपल्या कर्तृत्वाचा पश्चाताप झाला..
मग तिनं त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला..
पण त्यात जास्त मिठाने थोडा घात केला..
तिच्या प्रेमळ वाढण्यात, त्याला खारटपणा जाणवलाच नाही..
त्यांच्या भांडणातला अबोला, टिकलाच नाही..
त्यानं तिच्या कडे पाहिलं, तिनं त्याच्याकडे पाहिलं..
आणि सकाळच्या भांडणाच उत्तर, अश्रूंत वाहत राहीलं..

वाचने
5298
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
तिच्या प्रेमळ वाढण्यात,
तिच्या प्रेमळ वाढण्यात, त्याला खारटपणा जाणवलाच नाही..ओह. आय सी!!नो यू डोन्ट सी..
In reply to तिच्या प्रेमळ वाढण्यात, by जव्हेरगंज
+१
अरे बापरे! मला वाटले की