Skip to main content

[कविता' २०२०] - भांडण

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

भांडण




त्यानं तिच्या कडे पाहिलं, तिनं त्याच्याकडे पाहिलं.. पण बोलणं दोघांचं, मनातल्या मनात राहीलं.. उगाचच काढला विषय, तिचं मन तिला खात होतं.. उगाचच वाढवलं आपण, त्याचं मन त्याला समजावत होतं.. आज परत क्षुल्लक कारणांन, त्यांचं भांडण झालं होतं.. आणि भांडणाचं पर्यवसन अबोल्यात झालं होतं.. सकाळचा तापलेला सूर्य जसा मावळतीला आला.. तसा दोघांनाही आपल्या कर्तृत्वाचा पश्चाताप झाला.. मग तिनं त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला.. पण त्यात जास्त मिठाने थोडा घात केला.. तिच्या प्रेमळ वाढण्यात, त्याला खारटपणा जाणवलाच नाही.. त्यांच्या भांडणातला अबोला, टिकलाच नाही.. त्यानं तिच्या कडे पाहिलं, तिनं त्याच्याकडे पाहिलं.. आणि सकाळच्या भांडणाच उत्तर, अश्रूंत वाहत राहीलं..


वाचने 5298
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मस्त

हलकीफुलकी छान रचना. कवितेला + १ सं - दी - प