Skip to main content

[कविता' २०२०] - तू गेलीस तेंव्हा

Published on गुरुवार, 07/05/2020

तू गेलीस तेंव्हा




दिवेलागणीला , सांज घनव्याकुळ कंपित वितळला मेघ शापित, पापण्यांच्या डोहात || रंगगंध विस्कटले, आकाशी निजला सूर्य कापरे दिव्यात रात, चैत्रस्पर्श सुगंधीत || पेटले आकाश सारे, रक्तगंधाचे दिवे उजळल्या शब्दओळी, ओठांच्या तबकात || रात्र उभी पापण्यात, काजळ अंधार मनी उसवले श्वासधागे, काळजाच्या अंतरात || उडाले प्राणपक्षी, सजवाया नभकोंदण किती स्मरु चंद्रखुणा, स्वर्गज्योत उजळीत || मालवून स्वप्नदिप, रीती आसवांची झोळी क्षितिजावर विरल्या हाका, खिन्न गर्भरात ||


याद्या 10561
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

+१ क्या बात है..! अप्रतिम शब्दयोजना

अप्रतिम काव्यरचना!

सुंदर, ‘ग्रेस’फुल कविता..

"मेघ शापित" आय गॉट इट (डोळे मारणारी स्माईली) ;)

अदिम

कवितेला कोणताही आकृतीबंध नाही, यमक नाही; कल्पनेत सुस्पष्टता नाही. काही तरी भारी शब्द आधेमधे पेरुन शेवटी त येईल असं बघितलंय. पण जनरेट्यापुढे लोकशाहीचा इलाज नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

एक एक शब्द उत्तम. यावर्षी बाबा गेले त्यामुळे तू गेलास तेंव्हा अशीच वाचली आसवे थाबंत नाही|| सूर्य निजला म्हणजे आपला बाप जगात नाही || त्याचे सारे शब्द/प्रेम आता विस्कटले आहे हे सांगताना संध्याकाळचे वर्णन अतीव सुंदर|| आठवणींचा स्पर्श चैत्रस्पर्श ? तू सांगितल्या गोष्टी उजळून लख्ख दिसतात ते दाखवताना आकाश पेटले आणि चांदण्या म्हणजे रक्तगंध तूच आहे ग्रेस ची आठवण झाली|| रात्र आली || डोळ्यात सुंदर. तुझे प्राण गेलेत शोभा आकाशाची वाढली || नभ कोंदण || पण तूझे अस्तित्व, तुझ्या खुणा मी शोधते येथे आता रडून आसवे संपली || मी हाका मारतेय बाबा || पण तुझ्या आठवणी रात्री ने गर्भात घेतल्या? खिन्न वाटते आहे || माझा आवाज पोहचत नाही मी हताश.. किती हाका मारू? +1 ~~~ प्रिती.

+1 उंबऱ्यावर सांजसमयी मन माझे रडते आई... दारातली आर्त रांगोळी तुझेच गीत गाई.. - गणेशा

डोळ्यात अश्रू आले

निव्वळ शब्दांचा सोस मूळ आशयाला निष्प्रभ करून सोडतो तसे काहीसे झाले आहे. नाही आवडली. सं - दी - प

कविता आवडली. "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता" अन् ' तू गेल्यावर असे हरवले सूर ' यांची आठवण झाली.... उगाच! एक आईसाठी आहे, एक प्रेयसी साठी. (आठवण व्हायला निमित्त पुरते) कवितेला यमकाचे बंधन नाहीच. वृत्ताचे ही नाही. लयीचेही नाही. गेयतेचे ही नाही . त्यात फक्त भावना असावी, प्रवाही.

+1

सुंदर

व्याकुळ मनाची सैरभैर,संभ्रमावस्था कवितेच्या भावात,सोबतच कुठेकुठे आकृतीतही उतरती झाल्यासारखे वाटले!