Skip to main content

श श क : प्रतिसाद

लेखक Prajakta२१ यांनी बुधवार, 29/04/2020 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ते तिने पहिल्यांदा शतशब्दकथा स्पर्धेत भाग घेतला होता उत्साहाने २ कथा पाठवून रोज लहान मुलासारखे संकेतस्थळ उघडून प्रतिसादांची वाट बघायला लागली पण काहीच प्रतिसाद नसल्यमुळे खट्टू व्हायची अशातच स्पर्धेची मुदत संपली,विजेते पण घोषित झाले आपण नसणार हे माहिती होतेच 'जाऊदे पहिलाच प्रयत्न होता,स्वान्त सुखाय लिहिले होते असेच गम्मत म्हणून' हिरमुसलेल्या मनाची समजूत घालून ती विसरून गेली आणि रोजच्या रहाटगाडग्यात मग्न झाली पंधरवड्याने मेल बॉक्स बघताना उडालीच टुणकन खुर्चीतून ---------------- "आपली संकेतस्थळावर --------------- हि शतशब्दकथा वाचली कथेतली storyline आवडली असून त्यावर वेबसिरीज बनवायचा मानस आहे तरी आपण मला ह्या मेल वर संपर्क करा म्हणजे बोलता येईल " ---------------- आघाडीचा दिग्दर्शक प्रसिद्ध निर्मितीसंस्था
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2618
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

शशक वर वेबसिरीज.... &#129299

In reply to by जव्हेरगंज

हिंदी वाले ३६५ भागाची शीरेयल पण काढतील... ;-)

कल्पनाशक्तीचे चौखूर उधळलेले घोडे...… day dreaming दुसरे काय चित्रपट टाकणार होते पण अचानक वेबसिरीज च आले मनात spacing गंडल्यामुळे इफेक्ट कमी झालाय प्रकाशित करताना spacing एकदम कमी होऊन शेवटच्या ओळी एकदम वर आल्यात

मिपावर लेखन केलं की प्रतिसाद किती आले हे बघायचं नाही, त्रासाचं काम असतं ते. बाय द वे, कोणती कथा होती. लिंक द्या प्लस वन. करुन येतो. -दिलीप बिरुटे

धन्यवाद सर पण नियमांनुसार ओळख उघड करायची नाहीये क्षमस्व

'मिसळपाव' इति संस्थळस्य कृते श्री भगवान उवाच " लेखने एव अधिकारस्ते मा प्रतिसादेषु कदाचन...।"

मस्त आहे दिवास्वप्न!

आवडले विचार. माझे पण असेच होते..... माझे जे लेखन मला खूप आवडते व वाटते कीआपल्याला खूप प्रतिसाद येतील...तेंव्हा एकदम कोरडे प्रतिसाद मिळतात. उलट असेच टाईमपास म्हणून टाकलेल्या गोष्टींना भरभरून प्रतिसाद येतात. बरेच वेळा मला असा अनुभव आला आहे - काही ठिकाणाहून लेखन आवडले मित्र किंवा नातेवाईक जमणार आहेत...तुझा लेख वाचला तर चालेल का अशी विचारणा होते...पण वाचन झाल्यानंतर त्या लोकांच्या प्रतिक्रीया सुध्दा कळवत नाहीत...

https://misalpav.com/node/27397 काल असाच हा धागा बघत होते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ओबामा ८० ह्यांच्याशी लेखन विषय आणि प्रतिसाद संख्या ह्याबद्दल सहमत :-)