भारतीय सिनेमाची पायाभरणी झाली, तेव्हापासून आजतागायत गाणी हा प्रत्येक चित्रपटाचा अविभाज्य भाग होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटांची अख्खी बांधणी ही गाण्यांचे बिंदू पकडून अवतीभवती केली जाते. (इथे फक्त हिंदी सिनेमा नव्हे तर सर्वभाषिक भारतीय व्यावसायिक चित्रपट अभिप्रेत आहेत). हे भारतीय उपखंडाबाहेर कोणत्याच सिनेमा उद्योगात आढळत नाही. युरोपीय किंवा हॉलिवूड सिनेमात संगीताचा वापर केलेल्या चित्रपटाला 'म्युझिकल' असा वेगळा शब्द वापरतात. भारतीय सिनेमाला ही संकल्पना लागू होऊ शकत नाही.
असे का, हे कोडे मला अनेक वर्षांपासून छळत आलेले आहे. प्रत्येक सिनेमात गाणी असायलाच हवी या धारणेमागे काही मानसशास्त्रीय किंवा समाजशास्त्रीय कारण आहे असा माझा ठाम समज झालेला आहे. पण अजून ते कारण मला उमगलेले मात्र नाही.
जी कारणे सामान्यपणे पुढे केली जातात ती मला कधीच पूर्णपणे पटलेली नाहीत. पैकी काही अशी:
* मुंबईत जन्मलेल्या सिनेमाला मराठी, गुजराती व पारशी संगीत नाटकांशी स्पर्धा करण्यासाठी गाणी दाखवणे भाग होते. (ती स्पर्धा सिनेमाने केव्हाच नाटकाला धूळ चारून जिंकली. आता तर नाटकच आमूलाग्र बदलले.)
* प्रेक्षकांना लहानपणापासून अंगाई, भजने, ओव्या, कवाल्या, लोकगीते ऐकण्याची सवय होती (नामंजूर. ती सवय जगात सगळ्यांना तेवढीच असते. भारतीयही काही रोज नेमाने बागेत जाऊन गात नाहीत)
* गाण्यांमुळे दोन घटका करमणूक होते (चूक. लोक गाणी सुरू झाली की विड्या ओढायला बाहेर जातात)
* सिनेमाची प्रसिद्धी होते. (मग बाकीच्या देशांत फिल्मी गाणी का नाहीत?)
*****
सिनेमातील गाण्यांचे काही विशेष गुणधर्म आहेत (प्रत्येकी सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत).
* पंचाण्णव टक्के गाणी ही मोजक्या मूठभर प्रसंगांवर बेतलेली असतात. खोखोच्या भोज्याप्रमाणे प्रत्येक चित्रपटाला हे सर करत पुढे जायचे असते. त्यात नावीन्य कधीच नसते. उदा. आई बाजारात भाजी घेतानाचे गाणे, ड्रायव्हर आपली गाडी ओव्हरहॉल करतानाचे गाणे, पशुवैद्य म्हशीला तपासतानाचे गाणे किंवा पोलीस पंचनामा लिहितानाचे गाणे वगैरे कधीही चित्रपटात असू शकत नाहीत (ही पात्रे मात्र असू शकतात).
* कोणती पात्रे गाणी म्हणू शकतात आणि कोणती नाही हे ठरलेले असते आणि त्यात फार बदल होत नाही.
* गाण्यांच्या सुरावटी, संगीतरचना, वाद्यवृंद, आवाज यात प्रयोग होत असतात. पण शब्दरचनेत आणि कल्पनाशक्तीत फार फरक करता येत नाही.
* बहुतेक गाणी ही generic (मराठी प्रतिशब्द?) असतात आणि त्यांना चित्रपटापेक्षा स्वतंत्र असे आपले अस्तित्व असते. चित्रपटांतील पात्रे ती गाणी एकमेकांना उद्देशून म्हणत असली, तरी गाण्यांच्या ओळीत त्यांची नावे कधीच गुंफलेली नसतात.
* शेकडा नव्व्याण्णव गाणी ही प्रशिक्षित गायकांच्या आवाजात मुद्रित होतात.
* मुळात पात्रांनी गाणी म्हणणे हेच अवास्तव असल्यामुळे की काय, गीत चित्रीकरणात वास्तवाला पूर्णपणे तिलांजली देऊन नर्तकांचे समूह, भपकेदार नेपथ्य, सफाईदार पदन्यासावली, अशक्य कोटीतील कपडेलत्ते, चित्रणस्थळे इत्यादिचा सढळ हस्ते वापर केला जातो.
* गाणे संपताच चित्रपट मख्खपणे मूळपदावर येतो आणि पुढे चालू लागतो. म्हणजे काय की,
"ए, आपण ते मेक्सिकोच्या समुद्रावर नाचत होतो ना, तेव्हा मला एकदम गुहागरच्या आईआजी आठवल्या. भेटल्या नाहीत किती दिवसात",
किंवा
"अगं, परवा मला लोकलमध्ये तो नायर दिसला. अगं, तो तुझ्यामागे निळं बनियन घालून नाचत होता तोच"
असे प्रसंग कधीही चित्रपटात नसतात. (इथे विनोद अभिप्रेत नाही). मूळ चित्रपटापासून संपूर्ण फारकत घेतलेली असते.
****
या मुद्द्याचा कुणी विशेष अभ्यास केलेला आहे काय? यावरून भारतीय समाज, मानसिकता, जडणघडण यावर काही खास प्रकाश पडतो काय?
वर्गीकरण
वाचने
25760
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख पटला.
खिक्क!
In reply to लेख पटला. by यशोधरा
बाकी जग?
In reply to लेख पटला. by यशोधरा
असले प्रश्न विचारता म्हंजे
In reply to बाकी जग? by चलत मुसाफिर
:-)
In reply to असले प्रश्न विचारता म्हंजे by यशोधरा
मला खालील कारणं वाटतात -
विचारार्ह
In reply to मला खालील कारणं वाटतात - by बोका-ए-आझम
त्यांना त्यांच्या ''अभिनयावर'
In reply to विचारार्ह by चलत मुसाफिर
हाॅलिवूड
In reply to विचारार्ह by चलत मुसाफिर
अमान्य
In reply to हाॅलिवूड by बोका-ए-आझम
बोका भौ योग्य स्पष्टीकरण
In reply to मला खालील कारणं वाटतात - by बोका-ए-आझम
*हवे असतील
राहू द्या की ओ गाणी! आम्हांला
मान्यच की :-)
In reply to राहू द्या की ओ गाणी! आम्हांला by एस
आणि गीतविरहीत चित्रपटही बनलेले आहेत.
हो, पण
In reply to आणि गीतविरहीत चित्रपटही बनलेले आहेत. by बोका-ए-आझम
माझे मत
बरोबर , पण..
In reply to माझे मत by हुप्प्या
बरोबर , पण..
In reply to माझे मत by हुप्प्या
खरं आहे , काही काही चित्रपटात
माझ्या मते bellwether effect
बेलवेदर परिणाम
In reply to माझ्या मते bellwether effect by आदूबाळ
बेलवेदर परिणाम ...
In reply to बेलवेदर परिणाम by चलत मुसाफिर
मला वाटतं आपल्याकडे चांगली
आणखी थोडे
In reply to मला वाटतं आपल्याकडे चांगली by मराठी कथालेखक
तीव्र आक्षेप चलत मुसाफिर,
कळले नाही
In reply to तीव्र आक्षेप चलत मुसाफिर, by भंकस बाबा
स्पष्टीकरण पटत नाहीत.
In reply to कळले नाही by चलत मुसाफिर
मूळ मुद्दा लक्षात घ्या
In reply to स्पष्टीकरण पटत नाहीत. by भंकस बाबा
कारण ते सोनेरी पान आहे.
In reply to मूळ मुद्दा लक्षात घ्या by चलत मुसाफिर
हा...हा…हा
In reply to कारण ते सोनेरी पान आहे. by अभ्या..
क्या बात अभ्याराजे!
In reply to कारण ते सोनेरी पान आहे. by अभ्या..
एकद ट्रेंड सेट झाला की तोच
In reply to मूळ मुद्दा लक्षात घ्या by चलत मुसाफिर
ट्रेंड का सेट झाला?
In reply to मूळ मुद्दा लक्षात घ्या by चलत मुसाफिर
किशोरकुमार, रफ़ी, मुकेश
In reply to तीव्र आक्षेप चलत मुसाफिर, by भंकस बाबा
हे लांब जाईल बहुतेक!
In reply to किशोरकुमार, रफ़ी, मुकेश by मराठी_माणूस
अगदी अगदी!
In reply to हे लांब जाईल बहुतेक! by चांदणे संदीप
बोल्पट बोल्पट. नाहीतर लुमिए
In reply to अगदी अगदी! by बोका-ए-आझम
हे नट होते का?
In reply to किशोरकुमार, रफ़ी, मुकेश by मराठी_माणूस
किशोरकुमार, रफ़ी
In reply to तीव्र आक्षेप चलत मुसाफिर, by भंकस बाबा
चल-चित्र गाणे
गेले ते दिन गेले!
In reply to चल-चित्र गाणे by तिमा
असे का हे विचारायचे नसते.
In reply to गेले ते दिन गेले! by चलत मुसाफिर
मनोरंजन
अगदी हेच टंकायला आलो होतो.
In reply to मनोरंजन by मित्रहो
>>पण असे म्हणतात दोन रेल्वे
In reply to मनोरंजन by मित्रहो
हे पण कारण असावे,
एक राहिलेच
कृष्णधवल
किडे
नायक-नायिका स्वतः गात नाचत
भारतीय संगीतातील वैविध्य आणि
उलट आहे.
In reply to भारतीय संगीतातील वैविध्य आणि by सूक्ष्मजीव
.
बघून काटा आला अंगावर !
In reply to . by चांदणे संदीप
हे गाणं बघणं झेपलं नव्हतं.
In reply to . by चांदणे संदीप
माझाही एक अन्दाज
हे अपुरे स्पष्टीकरण आहे
In reply to माझाही एक अन्दाज by हुप्प्या
कदाचित अनुकरण
In reply to हे अपुरे स्पष्टीकरण आहे by चलत मुसाफिर
भारतीय चित्रपटाला संगीत
+१
In reply to भारतीय चित्रपटाला संगीत by कानडाऊ योगेशु
मुद्दा पटला नाही
In reply to भारतीय चित्रपटाला संगीत by कानडाऊ योगेशु
ह्याचे मूळ आपल्या
In reply to मुद्दा पटला नाही by चलत मुसाफिर
व्यावसायिक नाटक?
In reply to मुद्दा पटला नाही by चलत मुसाफिर