शशक- माकडांपासून सुटका!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती.
एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली. बघते तो एक माकड पटकन पळून गेले. माझ्या मैत्रिणीही खूप घाबरल्या. एकीने सांगितले, अशीच एकदा माकडाने तिची वेणी ओढली होती. आम्ही वर्गात बसलो असताना व-हांड्यात माकडे दात विचकत सदैव फिरायची. शिक्षकही वैतागले. शेवटी घरच्यांनी तोडगा काढला!
एक दिवस गावाहून मामा, एक बर्यापैकी दिसणारे अन असणारे माकड घेऊन आला. घरच्यांनी त्याच्याबरोबर माझे लग्न लावून पाठवून दिले. आता दहा वर्षे झाली, आमच्या घराजवळ माकडे अजिबात फिरकत नाहीत !!
प्रतिक्रिया
कमाल आहे !
=))
तुमच्या घरच्यांनी तुमचं लग्न माकडा बरोबर कसे काय बरं लावून दिले
मस्त लिहिलयं
जबरदस्त!!
एक बर्यापैकी दिसणारे अन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liyeगोरिला!!! :=))
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे
माकड आणि माकडिणीच्या लग्नाची गोष्ट
काय आहे, जेव्हा मुलगी मोठी
गंभीर लेख
विनोदी कथा आहे. वाचकांनी
मग सगळेच माकड
घरचेही वैतागतात अन यावर सुटका
घरचेही वैतागतात अन यावर सुटका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmirछान
मस्त कथा
सर्व वाचकांचे पुन्हा आभार!
अभंगवाणी
कथा आवडली.
धन्यवाद चलत मुसाफिर,
नाईलाजको क्या इलाज ....
कथा म्हणून आवडली...
उत्तम कथा
ऑ