केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत.
त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले.
मूळ गीत :
नाविका रे, वारा वाहे रे
डौलाने हाक जरा आज नाव रे
कवी : अशोकजी परांजपे
प्रकार : कोळीगीत
विडंबन :
नाभिका रे, केस वाढले रे
धैर्याने उघड जरा आज सलून रे
जटाधारी झालो आता, काप माझे केस रे
क्वारेंटीनचे दिस गेले, घरकैदेचा मास चाले, कोरोना आला
माझिया केसा गुंता होऊनि गेला,
धाव घेई तुजकडे माझे मन, नाही तुला ठाव रे
नाभिका रे, केस वाढले रे
धैर्याने उघड जरा आज सलून रे
पोनी स्टाईल ल्यायलो मी, झिपऱ्यावाणी सजलो मी, केसजाळी ल्यालो
माझे कुंतल डोक्यावरी फुलुनी आले,
नाचती रे बघ माझे केस, सांग तुझा भाव रे
नाभिका रे, केस वाढले रे
धैर्याने उघड जरा आज सलून रे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11255
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा, धम्माल विडंबन !
कविता चांगली, पण 'नाभिक' नव्हे, 'नापित'.
पूर्वी ध चा मा ऐकला होता...
In reply to कविता चांगली, पण 'नाभिक' नव्हे, 'नापित'. by चित्रगुप्त
न्हावी म्हणजे बहुतेकदा
In reply to कविता चांगली, पण 'नाभिक' नव्हे, 'नापित'. by चित्रगुप्त
वा वा खूपच माहीती समजली.
In reply to न्हावी म्हणजे बहुतेकदा by चौथा कोनाडा
लै भारी !
मलाही वाढलेल्या केसांचा लईच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liyeमी देखील दर एप्रील मध्ये
In reply to मलाही वाढलेल्या केसांचा लईच by मदनबाण
कविता जमली आहे.
नाभिक VS नापित
अगदी मनातलं दुःख व्यक्त केलत
अवघड झालंय.
वाढू द्या, लोंबू द्या, कापू
In reply to अवघड झालंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा
In reply to वाढू द्या, लोंबू द्या, कापू by चौथा कोनाडा
दिलीप बिरुटे साहेब _/\_
खूप भन्नाट जमलयं चामूंडराव, वाह वाह
आवडलं
तुम्ही केस कापून रस्त्यावर फिराल तर पन्नासजण विचारतील कोठे कापले