Skip to main content

मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती.

लेखक शितल यांनी शुक्रवार, 26/09/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स, बहुतेक लोकांच्या घरी दुरदर्शन संच सतत चालु असतोच, त्यामुळे सतत जाहिराती नक्कीच जाता येता कानावर , डोळ्यावर पडतात. त्याला वेळ काढुन बसावे लागत नाही. आणि एखादे गाणे जसे आपल्या तोंडात बसावे तशी एखाद्या जाहिरातीचे वाक्य आपल्या तोंडात बसते. तर मी आज अशाच कोणत्या जाहिराती मिपाकरांना आवडतात हे जाणुन घ्यायला आले आहे. मला मिन्टॉस - दिमाक की बत्ती जला दे ! अमुल - द टेस्ट ऑफ इंडिया तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते. ह्या जाहिराती मला आवडतात, आणि ती जाहिरात कानावर पडल्यावर पाऊले आपोआप दुरदर्शन संचाकडे वळतात. :) तुम्हाला कोणत्या जाहिरात आवडतात हे आम्हाला सांगा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 40426
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by देवदत्त

ही जाहिरात मलापण खूप आवडते.तो मुलगा जामच क्युट आहे. Johnson & Johnson च्या सगळ्या जाहिराती खूप छान असतात.छोटी-छोटी निरागस बाळं,त्यांचे भाव....अप्रतिम. 8> 8> 8>

In reply to by प्राची

>>>Johnson & Johnson च्या सगळ्या जाहिराती खूप छान असतात.छोटी-छोटी निरागस बाळं,त्यांचे भाव....अप्रतिम. १०१% सहमत. :)

आई आई गं..कंटाळ्ले मी या केसाला अगं प्रकाशचं माक्याचं तेल का वापरत नाहीस? त्यामुळं केस गळायचे तर थांबतातच पण डोकं शांत राहून झोपही छान लागते. २)वज्रदंती वज्रदंती वीको वज्रदंती.... (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

मी लहान होते तेव्हा प्रेस्ति़ज कुकर चि जाहिरात लागत असे. नविन लग्न झालेले जोद्पे दुकानात जाते, अनि बायको नवरयाला कुकर घ्यायला लाव्ते. मला तेवा असे वाते कि माझे लग्न कधि होतेय एक्दचे =)) चुचु

८०च्या मध्यातली 'आय लव यु रसना' ची जाहिरात मस्त असायची. त्या लहान मुलीच्या वाढदिवसाला बरिच मुले आलेली असतात्.आणि तिची आई सर्वाना रसना देते.