मित्रांनो
डाएट या विषयावर सखोल चर्चा करण्याची इच्छा आहे. डाएट हा एक अत्यंत व्यापक विषय आहे वाढलेले वजन घटवण्यासाठी ची विशिष्ट आहारप्रणाली म्हणजे डाएट असा जो दृष्टीकोण आहे तो माझ्या मते फारच तोकडा असा आहे. सुदैवाने मला जरी वजन ही समस्या कधी आली नाही तरी अनेकांच्या आयुष्यात वाढलेले वजन हा मोठा गंभीर प्रश्न आहे याची जाणीव आहे. त्याचप्रमाणे वजन कमी करणे हा मुद्दा केंद्रात असल्यास ( व तो एक स्वतंत्र मुद्दाही अर्थातच फार महत्वाचाही असल्याने ) लोक डाएट साठी प्रेरीत होतात म्हणून आपणही तोच मुद्द्दा केंद्रीत ठेवुया मात्र त्या अनुषंगाने एकुण डाएट वर चर्चा होइल अशी अपेक्षा आहे. तर मला असे वाटते की एका एका भागात आपण एक पॉप्युलर डाएट घेऊन त्याची चिकित्सा केली तर नवे नवे पैलु समोर येतील. मी एक कच्चा खर्डा यासाठी Intermittent Fasting हा विषय घेऊन बनवला मात्र तो फारच विस्कळीत दिर्घ झाल्याने मलाच "पचला" नाही म्हणुन त्याएवजी मी विचार केला की फक्त विषय समोर ठेवतो व जसजसे प्रतिसाद येतील तशी एकेका मुद्द्यावर चर्चा करु या म्हणजे सर्वांनाच नवे पैलु उलगडतील व मजाही येइल.
तर बेसीक ओपनींग देण्याचा प्रयत्न करतो. सध्या Intermittent Fasting महाराष्ट्रात डॉ. दिक्षीत डाएट या नावाने लोकप्रिय आहे. Fasting चे मुळ तसे फार जुने वा प्राचीन असे आहे. डॉक्टर दिक्षीत यांच्या अगोदर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी महाराष्ट्रात सर्व प्रथम याची ओळख व प्रचार केलेला होता. त्यांच्या अकाली निधनाने मध्ये काही काळाची गॅप पडली नंतर डॉ, दिक्षीत यांनी त्यांचा विचार पुढे अधिक प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचवला. तर यामध्ये डॉ. दिक्षीत Intermittent Fasting च्या अनेक पॅटर्न पैकी केवळ एक ( याचे इतर व्हर्जन्स आपल्याकडे अजिबात चर्चेत नसतात असा अनुभव आहे किंबुहना हे एक व्हर्जन म्हणजेच सर्व काही असाही समज आहे ) १६/८ व्हर्जन वापरताअधिक यामध्येही डॉ. दिक्षीत १६/८ असा स्पेसीफिक आग्रह धरत नाहीत किंवा ही टाइम फ्रेम इनसीस्ट करत नाहीत. ते दोन जेवणाच्या सर्वसाधारण जेव्हा अधिक भुक लागते त्या ठरवुन घेण्यास सांगतात त्यामध्ये म्हणजे दिवसातुन दोन वेळेसच फक्त जेवण करावे त्यानंतर इतर वेळेत पुर्ण उपाशी रहावे असे सांगितले जाते. इतर मधल्या वेळात भुक लागल्यास डॉ. दिक्षीत काही ठराविक खाण्यासाठी परवानगी देतात. त्यात प्रामुख्याने साखरविरहीत ब्लॅक टी / ब्लॅक कॉफी , ताक , नारळपाणी एक टोमॅटो आणी अर्थातच पाणी दिवसभर. यामागचा तर्क असा आहे की या गोष्टींनी शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढत नाही म्हणुन या गोष्टी घेण्याची परवानगी आहे. संपुर्ण डाएट चा पाया शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रणात ठेवणे हा आहे. त्याचबरोबर ग्लुकॉगॉन या हार्मोन ला सक्रीय करण्यास वाव देऊन त्याद्वारे अनावश्यक मेदाचे फॅट चे ज्वलन करणे. व इतर बरेच असे आहे. शरीरात इन्सुलीन ची वाढलेली अनावश्यक पातळी व त्यामुळे निर्माण झालेला इन्सुलिन रेसीस्टन्स हा लट्ठपणासहीत अनेक रोगांचे मुळ आहे. यात एक निरिक्षण असे आहे की डॉ.दिक्षीत हे मुळ Intermittent Fasting चे " अतीसुलभीकरण" करतात त्यामानाने डॉ. श्रीकांत जिचकार हे अतीशय व्यवस्थित शास्त्रशुद्ध व्यापक मांडणी करत होते असे त्यांचे व डॉ. दिक्षीतांचे युट्युब वरील सर्व व्हिडीओ बघितल्यानंतरचे माझे मत आहे. जिचकारांचा प्लॅन व्यापक असा होता. दुसरी एक बाब डॉ. दिक्षीतांच्या अगोदरच सुलभ डाएट चे लोक त्याहुन अधिक सुलभीकरण करत त्यांच्या एकुण हेतुला व एकुण Intermittent Fasting च्या थेअरीची पार वाट लावुन काही भलतेच अंमलात आणतात. आश्चर्य म्हणजे कोणी Intermittent Fasting हा शब्च च वापरत नाहीत. स्वतः डॉ. दिक्षीत यांच्या तोंडुन हा शब्द ऐक्ल्याचे स्मरत नाही. म्हणजे जर डॉ. दिक्षीत यांची प्रणाली ( जी मुळात त्यांची नाही हे ते स्वतः ही मान्य करतात ) समजुन घ्यावयाची असेल तर मुळात हा विषय Intemittent Fasting या नावाने प्रचलित आहे हे समजुन घ्यायला हवे. बरेच मंडळींना माहीत असेलही पण इतर बरेच दिक्षीत डाएट म्हणून ओळखतात म्हणून हे सांगावेसे वाटते . म्हणजे या दिशेने जालावर शोधल्यास सखोल जाता येइल यासाठी हे म्हणतोय.
तर मित्रांनो तुमचे काय म्हणणे आहे तुमचा काय अनुभव आहे ?
वाचने
40785
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी १६/८ नियम गेले सहा महिने
व्यायाम न करता केवळ या
व्यायाम न करता केवळ या फास्टिंगने वजन कमी होण्याचा ( वजन होईलही कमी काही दिवस) आणि मुख्य म्हणजे ते मेंटेन्ड राहण्याचा रेट कंसिस्टन्ट असेल कि नाही माहित नाही. पण १६/८ सुरु केल्यापासून वजनाचे टेन्शन गेलंय हे नक्की( टच वूड)जगातल्या सर्व डाएट च्या
वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय काही ?
वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय काही ?
In reply to वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय काही ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह...!
In reply to वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय काही ? by तुषार काळभोर
माझे पण २ शब्द
माहितीपूर्ण.
In reply to माझे पण २ शब्द by डॉ श्रीहास
मोजक्या शब्दात
In reply to माझे पण २ शब्द by डॉ श्रीहास
डॉ. श्रीहासजी प्रतिसाद आवडला
In reply to माझे पण २ शब्द by डॉ श्रीहास
https://www.youtube.com/playlist?list=PLFbLg_bIQgxBG0hlJ7t2VjbtYC53tSRsoतसेच डॉ. जॅसन फंग चे ओबेसीटी कोड हे या विषयाशी संबंधित सर्वात जबरदस्त पुस्तक मला आजपर्यंत वाटले एकवार जरुर वाचुन पहा तुम्हाला आवडेल नक्की. https://www.amazon.com/Obesity-Code-Unlocking-Secrets-Weight/dp/B01MRKE…हे नक्की वाचा
In reply to डॉ. श्रीहासजी प्रतिसाद आवडला by मारवा
धन्यवाद श्रीहासजी
In reply to हे नक्की वाचा by डॉ श्रीहास
अजून काही मुद्दे
In reply to धन्यवाद श्रीहासजी by मारवा
१MAD करायची इच्छा आहे परंतु अजूनही धीर होत नाही
In reply to माझे पण २ शब्द by डॉ श्रीहास
एक अपडेट
In reply to माझे पण २ शब्द by डॉ श्रीहास
व्वा कौतुकास्पद आहे.
In reply to एक अपडेट by डॉ श्रीहास
धन्यवाद _/\_
In reply to व्वा कौतुकास्पद आहे. by चामुंडराय
रात्री झोप कशी आली ?.. किंवा
In reply to धन्यवाद _/\_ by डॉ श्रीहास
सवयीचा भाग आहे
In reply to रात्री झोप कशी आली ?.. किंवा by mrcoolguynice
@ डॉ श्रीहास
In reply to धन्यवाद _/\_ by डॉ श्रीहास
सोपं आहे....
In reply to @ डॉ श्रीहास by सुबोध खरे
ऑ
In reply to एक अपडेट by डॉ श्रीहास
वजन, ढेरी सोडा ....
In reply to ऑ by झेन
मी देखील सध्या जेवणाच्या प्रयोगावर आहे.
@डॉ श्रीहास
सुबोधजी ग्लायसेमिक इंडेक्स पेक्शा ग्लायसेमिक लोड
In reply to @डॉ श्रीहास by सुबोध खरे
बरोबर आहे
In reply to सुबोधजी ग्लायसेमिक इंडेक्स पेक्शा ग्लायसेमिक लोड by मारवा
कदाचित आश्चर्य वाटेल, पण
In reply to बरोबर आहे by सुबोध खरे
कदाचित आश्चर्य वाटेल, पण
In reply to कदाचित आश्चर्य वाटेल, पण by आनन्दा
१ ग्रॅम चरबी = ९ किलो कॅलरी तर १ ग्रॅम ग्लुकोज = ४ किलो कॅलरी
In reply to @डॉ श्रीहास by सुबोध खरे
बरोबर
In reply to १ ग्रॅम चरबी = ९ किलो कॅलरी तर १ ग्रॅम ग्लुकोज = ४ किलो कॅलरी by चामुंडराय
डॉक दोघांमध्ये काय फरक आहे ?
In reply to बरोबर by सुबोध खरे
१ किलो कॅलरी म्हणजे १००० कॅलरी
In reply to डॉक दोघांमध्ये काय फरक आहे ? by माझीही शॅम्पेन
लेकानो तूमचे वजन वाढतेच कसे.
प्रतिसाद लेखापेक्षा मोठा आहे पण अप्रोच युनिक आहे > एंजॉय
मस्त धागा
लोकवन गव्हाच्या चपातीवर तूप साखर टाकून म्हशीच्या दुधात बुचकळून .
तुम्ही नशिबवान आहात एवढंच
In reply to लोकवन गव्हाच्या चपातीवर तूप साखर टाकून म्हशीच्या दुधात बुचकळून . by विकास...
चांगली चर्चा
१.तुपाच्या फोडणीने चव तर
In reply to चांगली चर्चा by Prajakta२१
धन्यवाद
In reply to १.तुपाच्या फोडणीने चव तर by डॉ श्रीहास
या विषयाचा अभ्यास करताना झालेले ३ महत्वाचे साक्षात्कार!
अगदी बरोबर मांडलंत _/\_
In reply to या विषयाचा अभ्यास करताना झालेले ३ महत्वाचे साक्षात्कार! by तात्या९१
सहमत
वजन वाढवायचं कसं?
असे फास्टींग करुन वजन कमी
असं काही होत नाही .... नुसतं
In reply to असे फास्टींग करुन वजन कमी by जेडी
व्यायामात सर्व तर्हेचे
In reply to असं काही होत नाही .... नुसतं by डॉ श्रीहास
डॉ. जेसन फ़ंग चे व्हिडीओ बघा.
In reply to व्यायामात सर्व तर्हेचे by जेडी
हो ....
In reply to व्यायामात सर्व तर्हेचे by जेडी
उत्तम चर्चा
उद्या सकाळी
In reply to उत्तम चर्चा by अनरँडम
१२ तास एक चहा १०० पुश अप्स
In reply to उद्या सकाळी by अनरँडम
१०.३४ माइल्स, ९२ मिनिट
In reply to १२ तास एक चहा १०० पुश अप्स by अनरँडम
ऑन लायटर नोट...
ह्यासाठी ...