भाग २ - भोपाळचा सापळा - 'या सम हा' ग्रंथातील समराचे प्रस्तूतीकरण
मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या लेखनातून निर्माण होणारे समर पॉवर पॉईटने आजच्या काळातील नकाशांच्या मदतीने साकारता येईल का? असेल तर कसे करता येईल? यावर आधारित आहे. लेखकाचे कथन काही ठिकाणी स्लाईड्सच्या आकाराला पुरक व्हावे इतपत संकलित सादर केले आहे. कोणतेही नवे संशोघन केल्याचा दावा खुद्द लेखक करत नाहीत. मस्तानी व अन्य कौटुंबिक व्यक्तींचा, घटनांचा समावेश ग्रंथात नाही. उपलब्ध माहितीच्या आधारे प्रत्येक लढाईचे लष्करी मोजमापातून विश्लेषण हा प्रमुख उद्देश आहे. हे प्रस्तूतीकरण याच मताने मी केले आहे. स्लाईड्स पाहताना पुन्हा पुन्हा दाबत राहून पुढील मजकुराकडे जाता यावे असा प्रयत्न केला आहे. तर पुर्ण पहायला डावी उजवीकडे करावे लागेल. नकाशा बनवताना हजारो सैन्याची, अवजड सामान, तोफांची हालचाल करताना एका स्थळाकडून दुसरीकडे जाण्याचा मार्ग शोधताना नद्यांची पात्रे, डोंगरांची चढउतर शक्यतो टाळून कसे जाता येईल या विचाराने बनवले आहेत. वाटेत विविध भागातील राजे, सरदारांनी आपापली दळे घेऊन निजामाच्या बरोबर सेनेत सामिल व्हावे असा बादशहाचा लेखी आदेश प्रत्यक्ष दाखवून कधी आपणहून तर कधी धाक दाखवून सामिल करून घेतले असावेत. चारापाणी, धान्य, भाजीपाला, याची बेजमी करता येणारे बाजार, वरिष्ठ सरदारांना आरामशीर राहायला किल्ले-महालाची सोय, करत करत पुढे जायला लागेल याची जाण ठेऊन मार्गांची निवड माझ्या मनाने करण्याचे स्वातंत्र्य मी घेतले आहे. उदा. बाजीराव ज्या मार्गाने सातपुड्याला पार करताना सांगवी नंतर खरगोनला जातात असे इतिहासात म्हटले आहे. खरगोन नावाची दोन गावे त्याच भागात सध्याही उपलब्ध आहेत पैकी छोटे खरगोन वाटेतच आहे. मोठे खरगोन वाटेपासून जरा दूर आहे. पण मुद्दाम वाट वाकडी करून विश्रांतीला, धान्य, चारा आदी मोठ्या बाजारात जाऊन मिळवायला, व्यवस्थेला सोय म्हणून मोठ्या खरगोनकडे जाणे शक्य आहे. काही त्रुटी लक्षात आणून दिल्यातर आभारी राहीन.
वाचने
4355
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम पण दुर्लक्शित
हेच म्हणतो. उत्तम धागा.
In reply to अप्रतिम पण दुर्लक्शित by दुर्गविहारी
सनावळ्यात गुरफटलेला इतिहास
भोपाळच्या सापळ्यातून सटकलेला निगरगट्ट निजाम...
प्रेझेंटेशन मोबाइलवर पाहिले...