Skip to main content

वास्तव

लेखक Rohini Mansukh यांनी मंगळवार, 21/01/2020 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकरं प्रेयसींना शिळेने साद घालत आहेत पण गॅसवरील कुकरच्या शिट्ट्याच शेवटी खऱ्या आहेत ते म्हणतात हृदयरुपी हिरे अमूल्य आहेत पण बाजारात बटाटे ४० रुपये किलो आहेत त्यांच्या ओठांवर कविता अन् मनांत गाणी आहेत पण घराघरांतून महागाईची रडगाणी आहेत त्यांच्यासाठी ललनांचे चेहरे नभीचे चंद्र आहेत पण तव्यावरील भाकऱ्याच सर्वांची पोटं भरीत आहेत तिच्या तनाच्या अत्तराचे त्याच्या मनात सुवास आहेत पण उतू जाणाऱ्या दुधांचे वास हेच वास्तवात आहेत - सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2455
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मस्तच! सं - दी - प

जेव्हा कल्पनेतल्या मनोराज्यातुन धाडकन् वास्तव येऊन आदळले!