Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Rohini Mansukh on Wed, 01/08/2020 - 15:24
दात नाही यावे दिसून हसतो आम्ही हातचं राखून सर्वांपासून लपून छपून रडतो आम्ही हातचं राखून वजनावर डोळा ठेऊन जेवतो आम्ही हातचं राखून पहाटेचा गजर लावून झोपतो आम्ही हातचं राखून करत नाही मनापासून मदत करतो हातचं राखून मित्रांनाही तोलून मोलून मैत्री करतो हातचं राखून भावनांना आवर घालून जगतोच आम्ही हातचं राखून - सौ. रोहिणी विक्रम मनसुख

Submitted by मनिष on Mon, 01/13/2020 - 13:10

Permalink

भावनांना

भावनांना आवर घालून जगतोच आम्ही हातचं राखून
अगदी चपखल! अल्पाक्षरी, नेमकी आणि छान कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Mon, 01/13/2020 - 14:10

Permalink

==)) ==)) ==))

शोल्लीड है ,, इडंबन स्पेशल माल है .. पण आवरते घेतलंय .. न्हायतर खत्रूड आलेली बोटांवर .. खत्रूड म्हणजी येकदम खत्तरनाक
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 01/15/2020 - 16:44

In reply to ==)) ==)) ==)) by खिलजि

Permalink

इडंबन व्यनि करण्यात यावे अशी

इडंबन व्यनि करण्यात यावे अशी विनंती पुरुष सुलभ कुचंबणा म्हणतात ती हीच.... #कोनाडा झालाच पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Fri, 01/17/2020 - 13:22

Permalink

चांगली कल्पना आहे. पण ती

चांगली कल्पना आहे. पण ती अंगावर येत नाहीये.. तशी आली पाहिजे. या कल्पनेची ताकद तशी आहे. तिला कवितेत आणखी थोडे रंगवून लिहायला हवे. :-)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2876 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com