वाहत असेल झरा संथ
त्याच्या काठाशी बघ
पाण्यात पाय बुडवून
बसले असेन स्तब्ध
बहरली असेल बाग
एखाद्या झाडापाशी बघ
फुलांशी हितगूज करत
पाहत असेन पाखरे स्वच्छंद
हिरवाळलेला डोंगर
त्याच्या माथ्यावर बघ
घोंघावता वारा अंगावर घेत
असेन स्वतःच्याच विचारात गर्क
जर कुठेच नसेन मी
होत नसेल माझ्या
अस्तित्वाचा बोध
तू मला माझ्याच
कवितांमध्ये शोध
- सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2143
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनुवादित
धन्यवाद
In reply to अनुवादित by चांदणे संदीप