Skip to main content

प्रसन्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 27/12/2019 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
ते विस्मृत गाणे धूसर होऊन विरून जाते पण नेणीवेच्या अथांग डोही अवचित दिसते मग पुन्हा गीत ते शब्दांच्याही पल्याड नेते अन् नकळत अश्रु झरताना ओठांवर येते मग पुन्हा पुन्हा मी घाव सोसुनी लढत राहतो अन् कितीही हरलो तरी खळाळून प्रसन्न हसतो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1990
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान लिहिली आहे, आवडली पैजारबुवा,