Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user निमिष सोनार
Submitted by निमिष सोनार on Sun, 12/08/2019 - 20:37
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना: मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ऐतिहासिक, पौराणिक, बायोपिक, फँटसी आणि सत्य घटनांवर आधारित, तसेच सत्य-असत्य मिश्रण (फॅक्ट-फिक्शन) असेलेले मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे चित्रपट/सिरीयल मी जरूर बघतो (असोका, 300, टायटॅनिक, सिरीयाना, पद्मावत्त, फर्जंद, फत्तेशिकस्त, बाजीराव मस्तानी, पोरस, बाहुबली, अलेक्झांडर, सूर्यपुत्र कर्ण वगैरे) आणि महत्वाचा मराठी इतिहास पडद्यावर मांडणारा हा चित्रपट असल्याने अर्थातच हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). तोपर्यंत बऱ्याच वाचकांनी मला विचारणा केली की माझ्याकडून परीक्षण कधी येईल, शेवटी लिहायला घेतले. आणि हो, अजून पर्यंत मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली नाही, पण वाचणार आहे! चित्रपट बघतांना पेशवे आणि त्यांच्या इतिहासाबद्दल थोडा तरी होमवर्क केलेला असला पाहिजे नाहीतर काही गोष्टी समजणार नाहीत! आधी पानिपत चित्रपटाभोवती असलेले काही वादग्रस्त मुद्दे बघूया: ट्रेलर रिलीज झाल्यापासून विविध विवादांत अडकलेला पानिपत चित्रपट अखेर 6 डिसेंबरला प्रदर्शित झाला. अर्जुन कपूरला सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचेवर टीका झाली, तसेच पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला, पानिपत नेमका कोणत्या ऐतिहासिक कालखंडावर आधारित आहे हे माहिती नसतांना काहींनी तो पद्मावत आणि बाजीराव मस्तानीचा मिक्स चित्रपट आहे अशा प्रकारच्या टीका केल्या. तसेच कुठेतरी मी बातमीत वाचले की अहमदशाह अब्दाली भारतात आला तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता आणि त्याच्या भूमिकेत संजय दत्त खूप थोराड वाटतो त्यामुळे या गोष्टीसाठी पात्रनिवड करणाऱ्यावर टीका झाली पण याबद्दलचे नेमके सत्य असत्य काय हे मला माहिती नाही. पानिपतबद्दल इतरांनी केलेल्या परीक्षणाबद्दल थोडेसे सांगून परीक्षणाला सुरुवात करतो: चित्रपट बघण्याआधी मी अनेक परीक्षण वाचले आणि युट्यूबवर बघितले. काही परीक्षण हे मुद्दाम आकस बुद्धीने विरोधासाठी विरोध म्हणून केलेले दिसले जसे की तीन तास खूप बोअर होतात, एकही लक्षात राहण्यासारखा डायलॉग नाही, गाणे आणि संगीत चांगले नाही असे बोलले जाऊ लागले पण मला चित्रपट पाहिल्यावर या तिन्ही गोष्टी खोट्या असल्याच्या आढळून आल्या. संगीत (गाणे आणि पार्श्वसंगीत) अतिशय छान आहे, चित्रपट मुळीच बोअर होत नाही (उलट मला वाटत होते की एवढ्यात चित्रपट कसा संपला?) आणि लक्षात राहण्यासारखे अनेक डायलॉग आहेत. चित्रपटगृहात हर हर महादेव, सदाशिवराव पेशवा की जय अशा घोषणा ऐकू येतात तसेच एकदा नव्हे तर अनेकदा प्रेक्षकांतून शिट्ट्या आणि टाळ्या येतात. एका गाण्यात सर्वजण शिवाजी महाराजांची आठवण तबकात त्यांची पगडी ठेऊन करतात तेव्हा चित्रपटगृह शिवाजी महाराज की ज्जय या घोषणांनी दुमदुमून जाते. काही डायलॉग सांगतो: गोपिकाबाई पार्वतीबाईला भर लग्नात टोमणा मारतात: "बिल्ली भी इतनी फुर्ती से सीढी नही चढती!" म्हणजे पार्वती ही एका सामान्य वैद्यांची मुलगी असून तिने सदाशिव सारख्या पेशव्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले अशा (गैर)समाजातून केलेली ही टीका असते. तसेच - "जिस दिल्ली ने छत्रपती शिवाजी महाराज का अपमान किया था, आखिर वह दिल्ली मराठो ने जीत ली!" दत्ताजी: "बचेंगे तो और भी लढेंगे!" दिल्ली जिंकल्यानंतर जेव्हा दिल्लीच्या गाडीवर बसण्यासाठी पार्वतीबाई सदाशिवराव यांना आग्रह करते तेव्हा ते म्हणतात: "मै राजनीती के लिये नही, युद्ध के लिये बना हूं!" आणि खालील काही डायलॉग: मल्हारराव होळकर: "यहां सब है, मराठा, पंजाबी, मुसलमान वगैरा है, लेकीन हिंदुस्तानी कोई नहीं है!" आणि सदाशिवराव: "अपनी संख्या बढा नही सकते पर दुश्मन की संख्या तो कम कर सकते है!" मराठ्यांचा जोश पाहून घाबरून अब्दाली सैन्य माघारी येते तेव्हा त्या सैन्याला स्वत: अब्दाली कापतो तेव्हा तो टिपिकल संजय दत्त टाईप डायलॉग मारतो: "अगर भाग कर वापस आओगे तो एक एक का पीछा करके मै सबको मार दूंगा, वापस जाओ और लढो!" आणखी एक: अर्जुन कपूर: "युद्ध से किसीका भला नही हुवा!" संजय दत्त: "सिर्फ ये बात समझने के लिये तुम पुणे से पानिपत तक आये!" कलाकार आणि अभिनय: अर्जुन कपूर अभिनयात बराच कमी पडत असला तरी एकूण चित्रपटात, त्यातील कलाकारात आणि कथेत तो सहज सामावून जातो. चित्रपटात ७० टक्के मराठी कलाकार आहेत. संजय दत्त ने भूमिका चांगली वठवली आहे. या चित्रपटात अभिनयाच्या बाबतील आश्चर्याचा सुखद धक्का जर कुणी दिला असेल तर तो म्हणजे कृती सेनॉन हिने! अपेक्षा नसतांना अभिनयाची तिने कमाल केली आहे. सहज सुंदर अभिनयाने तिने मने जिंकली आहेत. शेवटी सदाशिवराव युद्धात धारातीर्थी पडत असतात तेव्हा केवळ आणि केवळ तिच्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव आणि अश्रू हे बघून आपल्याला भावनिक वाटायला लागते. असाच दमदार अभिनय ठाकरे चित्रपटात जेव्हा तुरुंगातून बाळासाहेब ठाकरे मीनाताई (अमृता राव) यांना पत्र पाठवतात आणि ते पत्र वाचतांना अमृता राव ने चेहऱ्यावर बदलत जाणारे जे भाव दाखवलेत त्याची आठवण आल्यावाचून रहात नाही. मोहनीश बहल नानासाहेब पेशवे आणि अभिषेक निगम विश्वास राव यांच्या भूमिकेत अगदी शोभून दिसतात. रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी हे दोघेही (पिता पुत्र) यात आहेत. मिलिंद गुणाजी आहे पण खूप छोटी भूमिका आहे. झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका छान. मस्तानीचा मुलगा समशेर, तोफ प्रमुख गारदी आणि नजीब हे पण लक्षात राहतात. शुजा-उद-दौला पण त्याच्या घोगऱ्या आवाजामुळे लक्षात राहतो. कथेतील बेट्रायल किवा विश्वासघाताबाद्द्ल: चित्रपटाच्या शिर्षाकाबाबत सांगायचे झाले तर: पानिपतच्या पुढे एक लाईन आहे - "द ग्रेट बेट्रायल" म्हणजे "प्रचंड विश्वासघात" हे कथेत योग्य पद्धतीने मांडले आहे. मराठ्यांना पुण्याहून दिल्लीकडे अब्दालीच्या सेन्याशी लढायला जातांना रस्त्यात त्यांच्या मांडलिक राजांकडून सैन्य, आर्थिक आणि अन्नधान्य मदत मिळत जाते पण त्यापैकी तीन राजांकडून त्यांना धोका मिळतो. दोन वेळेस मराठा सैन्याला त्याचा सुगावा लागून जातो पण तिसऱ्यांदा ऐन युद्ध सुरु असतांना विश्वासघात होतो. तिन्ही विश्वासघातांची कारणे वेगवेगळी असतात. म्हणून प्रचंड मोठा विश्वासघात असेलेली कथा! तसेच या कथेत आणखी दिल्लीतील राजकारणाचा अंतर्गत विश्वासघात पण आहे आणि अब्दालीसोबत त्याच्यात देशात होत असलेला विश्वासघात पण दाखवलेला आहे. पानिपतची कथेची पार्श्वभूमी आणि घडामोडी खूप किचकट, गुंतागुंतीच्या असूनही कथा साधी सोपी आणि सरळ करून पडद्यावर आशुतोष गोवारीकर यांनी मांडली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन! एकूण या सिनेमात चार ते पाच वेळा आश्चर्याचे धक्के देणारे प्रसंग आहेत! कथेबद्दल अगदी थोडक्यात सांगतो: चित्रपटाच्या सुरुवातीला सदाशिवराव आणि राघोबादादा हे दक्षिणेतील उरल्यासुरल्या निजामशाहीचा पाडाव करून येतात. नंतर पेशव्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे सदाशिवराव यांची निवड सेनापती ऐवजी धन मंत्री म्हणून होते. दिल्लीतील नजीब जंगच्या सांगण्यावरून एक लाख सैन्यासह अफगाणीस्तानहून येणाऱ्या अब्दालीच्या आक्रमणाची चाहूल जेव्हा मराठ्यांना लागते तेव्हा पुण्याहून फक्त चाळीस हजाराचे सैन्य घेऊन राघोबादादा यांना नानासाहेब जायला सांगतात तेव्हा राघोबादादा नाही म्हणतात, पण सदाशिवराव एवढ्या कमी सैन्यासह तयार होतात कारण उत्तरेतील मांडलिक राजे सैन्य-मदत देतीलच हा त्यांना विश्वास असतो. सोबत विश्वास राव तसेच पार्वतीबाई आणि इतर बायकापण जातात. इतर अनेक कुटुंब पण सोबत जातात. प्रवासादरम्यान अनेक राजांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन घेऊन झाल्यावर मराठा सैन्याचा आमना सामना अब्दाली आणि शुजा यांच्या एकत्रित सैन्याशी अनपेक्षितरित्या रोहिला येथे होतो पण मध्ये असते खळाळती यमुना नदी! प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे सैन्यासह आणि लवाजम्यासह यमुना पार करणे अशक्य असल्याने त्यांच्या सैन्याला चकवून मराठा सैन्य नदीपात्राच्या कडेने दिल्लीकडे कूच करून एका घटनेमुळे अस्थिर झालेली दिल्ली जिंकतात आणि आणखी पुढे कुंजपुराकडे जाण्याआधीच अब्दाली सैन्य हत्तीवरून यमुना पार करून मागोमाग आलेलं असतं. तिथे पानिपतचं मैदान असतं आणि युद्ध सुरु होण्याआधी अब्दालीचा मुलगा तैमुर अफगाणीस्तानहून बातमी आणतो की तिथे अब्दालीच्या सिंहासन बळकावण्याच्या हालचाली सुरु आहेत म्हणून अब्दाली युद्ध न करता परत जायचे ठरवतो आणि सदाशिवराव यांचेशी तह करण्यासाठी काही अटी समोर ठेवतो. मग पुढे काय होते ते पडद्यावर बघा. शेवटच्या अर्ध्या तासाच्या पानिपत युद्धाबद्दल थोडे सांगतो: आशुतोषने स्पेशल इफेक्टचा भरपूर वापर करण्याचे टाळले आहे आणि त्यामुळे युद्ध प्रसंग अगदी जिवंत झालेत. स्लो मोशन प्रसंग खूप वेळ दाखवण्याचा मोह त्याने टाळला आहे, हे खूप चांगले झाले. 300 या हॉलिवूड युद्धपट मध्ये तसेच बाहुबली युद्धामध्ये खूप स्लो मोशन प्रसंग आहेत. युद्धातील अनेक बारकावे आशुतोषने दाखवलेत. युद्धनीती पण यात दाखवली गेली आहे. युद्ध प्रसंग खूप थरारक आहेत, अंगावर काटा येतो. युद्धात भाग न घेतलेली कुटुंबे आणि बायका पानिपतच्या किल्ल्यावर सुरक्षित असतात तेव्हा तिथे अब्दालीचे सैन्य हल्ला करते तेव्हा पार्वतीबाई सुद्धा लढते. एकूणच शेवटचा अर्धा तास थरारक आहे! माझे रेटिंग: चित्रपटाची लांबी जास्त आहे म्हणून कदाचित माझे परीक्षण पण लांबले असे वाटते. चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा! (लेखन दिनांक: 8 डिसेंबर 2019, रविवार) - निमिष सोनार, पुणे sonar.nimish@gmail.com
  • Log in or register to post comments
  • 32434 views

प्रतिक्रिया

Submitted by ट्रम्प on Sun, 12/08/2019 - 21:32

Permalink

धन्यवाद सोनार साहेब !!!

चित्रपट पाहण्याचे डोक्यात होतेच पण तुमच्या नेमक्या परीक्षणामूळे कधी पहायला जातोय असे झाले आहे . विशेष म्हणजे तुमचे परीक्षण आवडण्याचे कारण की पानिपत मध्ये तुमचा आवडता कलाकार चिन्मय मांडलेकर नाहीये : ) :) कृ ह घ्या .
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Sun, 12/08/2019 - 21:50

Permalink

चित्रपट पाहून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या

१) मराठे जुलमी बनले होते, जे मुघलांनी आपल्या मुलखात केले तेच मराठ्यांनी उत्तरेत केले (स्त्रियां वरील प्रत्यक्ष अत्याचार हा गुन्हा सोडून) २) खिशात अन्नाचा कण उरलेला नसताना नेतृत्वाने पुढे सरकायचा निर्णय घेतला ते सुध्दा दुप्पट सैन्य समोर ठाकले असताना. ३) अडचणींच्या काळात मदत करायला तयार असणाऱ्या उत्तरेतील राजांना त्यांचा मान नाकारण्यात आला म्हणून ते मागे हटले ४) शरद पवासाहेब त्यावेळी असते तर चित्र च वेगळे दिसले असते ५) आशुतोष गोवारीकर ९० च्या दशकातील नुक्कड टाईप सिरियलच बनवायच्या लायकीचा दिग्दर्शक आहे ६) गोवारीकर प्रदीर्घ व कंटाळवाणे चित्रपट बनवतो त्याच्याकडे आधुनिक व रोचक सादरीकरणाचा खडखडाट आहे, निवृत्ती घ्यावी अथवा सीरिअल्स मधे नशीब आजमावे कदाचित त्याची चलती होईलही ७) अर्जुन कपूर बंडल आहे ८) चित्रपटात हाणामारी ची दृश्ये इतकी बकवास चित्रित केली आहेत की तुलनेने लो बजेट फत्तेशिकस्त तांत्रिदृष्ट्या सरस ठरावा. ९) पानिपत स्त्री मुळे झाले नाही पण प्राभव त्यांच्यामुळेच १०) इतके दिवस पानिपतचा अभिमान वाटत होता चित्रपट बघून मत हलके झाले गोवारीकर बेटर यु रिअली शट अप!
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Sun, 12/08/2019 - 23:41

Permalink

गादीवर

'जेव्हा दिल्लीच्या गाडीवर बसण्यासाठी पार्वतीबाई सदाशिवराव यांना आग्रह करते' गाडीवर च्या ऐवजी गादीवर असे वाचावयास हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 12/09/2019 - 07:59

Permalink

चांगले लिहीलय परिक्षण. पिक्चर

चांगले लिहीलय परिक्षण. पिक्चर पहावा की कसे या विचारात होतो. परिक्षण वाचून "पहावा " हे मत बळावले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/31/2019 - 15:29

In reply to चांगले लिहीलय परिक्षण. पिक्चर by विजुभाऊ

Permalink

असंच म्हणतो.

चित्रपट परीक्षण उत्तम झालं आहे. चित्रपट पाहावा असे वाटत आहे. आभार. चित्रपट पाहिल्यावर सांगेन की चित्रपट कसा वाटला ते. आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 12/09/2019 - 10:11

Permalink

> प्रवासादरम्यान अनेक

> प्रवासादरम्यान अनेक राजांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन घेऊन झाल्यावर मराठा सैन्याचा आमना सामना अब्दाली आणि शुजा यांच्या एकत्रित सैन्याशी अनपेक्षितरित्या रोहिला येथे होतो पण मध्ये असते खळाळती यमुना नदी! हा यॉर्कर डोक्यावरून गेला. >"जिस दिल्ली ने छत्रपती शिवाजी महाराज का अपमान किया था, आखिर वह दिल्ली मराठो ने जीत ली!" छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आग्ऱ्यात झाला होता, दिल्लीत नव्हे, त्यामुळं असल्या डायलॉगमधील हवाच निघून जाते. ट्रेलरमध्ये ग्रीक सैन्याच्या धर्तीवर चिलखतवाले Phalanx मराठे पाहिल्यावर लढाई पाहण्याचा मूडच मेला. असले खडे घासा-घासाला लागले, तर तीन तास काढणे अशक्य आहे. त्यामुळं 'फारएंड' शैलीतील परीक्षण येईपर्यंत आपला पास.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Mon, 12/09/2019 - 14:22

In reply to > प्रवासादरम्यान अनेक by मनो

Permalink

चिलखतवाले मराठे

सहमत. विश्वास पाटलांच्या पानिपत मध्ये अब्दाली मराठ्यांना उघड्या पाठीचे म्हणतो. आंतरजालावर त्यावेळच्या एका मराठी सैनिकाचे चित्र आहे. हातात तलवार आणि कमरेला फक्त धोतर , वरती उघडाच. चिलखत वगैरे "लक्झरी" सामान्य सैनिकाला असेल की नाही शंकाच आहे :-) मी अजून पानीपत पाहिला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 12/21/2019 - 22:56

In reply to चिलखतवाले मराठे by बबन ताम्बे

Permalink

त्या चित्राची क्रुपया लिन्क

त्या चित्राची क्रुपया लिन्क द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Sat, 12/21/2019 - 23:21

In reply to त्या चित्राची क्रुपया लिन्क by खटपट्या

Permalink

ही लिंक बघा

https://www.newworldencyclopedia.org/entry/Maratha_Empire
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 12/23/2019 - 02:00

In reply to त्या चित्राची क्रुपया लिन्क by खटपट्या

Permalink

अजून एक

अजून एक Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by bhagwatblog on Mon, 12/09/2019 - 12:25

Permalink

तपशीलवार परीक्षण

अतिउत्तम आणि तपशीलवार परीक्षण!!! इतिहास म्हणाला की वाद, विसंवाद आलाच. अश्या वेळेस मी कथे कडे कमी आणि मांडणी, सादरीकरण, अभिनय, चित्रपटातील संदेश हेच बघतो. मांडणी, सादरीकरण, अभिनय, चित्रपटातील संदेश उत्तम असतील तर बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाभि.. on Tue, 12/10/2019 - 10:07

In reply to तपशीलवार परीक्षण by bhagwatblog

Permalink

इथेच चुकताय

ऐतिहासिक चित्रपट फक्त मांडणी, सादरीकरण पाहायला जायचे नसतात. खरा इतिहास काय आहे आणि त्यातून (इतिहासातून.. दिग्दर्शकाच्या डोक्यातील नव्हे) संदेश काय मिळतो हे पाहणे महत्त्वाचे. सादरीकरणासाठी बाहुबली सारखे काल्पनिक चित्रपट योग्य. वाद विवाद आहेत म्हणून इतिहासाकडे कानाडोळा करणे योग्य नाही. मुळात वाद होण्याइतपत इतिहासात मोडतोड का करतात हे लोक हेच समजत नाहीय.
  • Log in or register to post comments

Submitted by हस्तर on Mon, 12/09/2019 - 13:10

Permalink

शेवटी एक आराधक सिन्घ दाखव्लाय

शेवटी एक आराधक सिन्घ दाखव्लाय पण त्याचा आन्तर जालावर सन्दर्भ कुथेच साप्दत नाहिये
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 12/09/2019 - 19:15

In reply to शेवटी एक आराधक सिन्घ दाखव्लाय by हस्तर

Permalink

ठीक आहे.

मोबाईल ऑटो करेक्ट वाट लावते लिखाणाची, वेगळा कीबोर्ड का ट्राय मारत नाही ? तसेही मराठी voice typing उपलब्ध आहे च मोबल्या वर
  • Log in or register to post comments

Submitted by mrcoolguynice on Mon, 12/09/2019 - 21:24

In reply to ठीक आहे. by जॉनविक्क

Permalink

कदाचित त्यांनी मराठी voice

कदाचित त्यांनी मराठी voice typing चाच ट्राय मारला असेल, परंतु समजा एखाद्याच्या प्राशनात, स्ट्रॉंग द्रव पदार्थ आला, की जिभेला आलेला जडपणा, लवकर कमी होत नाही, तसं काही असावं की काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by हस्तर on Tue, 12/10/2019 - 12:05

In reply to कदाचित त्यांनी मराठी voice by mrcoolguynice

Permalink

आपलि पात्रता प्रशन्च्चे

आपलि पात्रता प्रशन्च्चे उत्तेर देणाय्त दख्वावि
  • Log in or register to post comments

Submitted by mrcoolguynice on Tue, 12/10/2019 - 14:24

In reply to आपलि पात्रता प्रशन्च्चे by हस्तर

Permalink

आपलया यवड्या पात्तरतेचा हा

आपलया यवड्या पात्तरतेचा हा स्तर अमाला कदिचे दख्वाविता एनर णाय्त.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाभि.. on Tue, 12/10/2019 - 09:58

Permalink

परीक्षण

परीक्षण चित्रपटासारखेच आहे. चांगले की वाईट हे ज्याचे त्याने समजून घ्यावे. मुळात मराठ्यांचा इतिहासच इतका रोमांचक आहे की त्याला नाटकी करण्याची गरज नसते. आहे तसा इतिहास दाखवला तरी पुरे! ऐतिहासिक चित्रपटात कल्पनिकाता घुसडताना बरीच काळजी घ्यावी लागते. एका एका प्रसंगाने, वाक्याने किंवा शब्दानेही इतिहासाला धक्का लागू शकतो. आशुतोष गोवारीकरला हे तितकसं जमत नाही. भन्साळी यापेक्षा कितीतरी तयारीचा आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Tue, 12/10/2019 - 22:24

Permalink

पानिपत इतिहास चटकन समजून देणारे वास्तववादी परीक्षण इथे आहे

http://www.kaustubhkasture.in/2019/12/blog-post_8.html?fbclid=IwAR1dDEowE5WgRmoE9afhB5s_wMdp5COsEaBrB2w8izCdaKj7PoKf_j7V6Dw&m=1 दिग्दर्शकाने किमान या बाबी ध्यानात घ्यायला हव्या होत्या. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by mrcoolguynice on Wed, 12/11/2019 - 10:09

In reply to पानिपत इतिहास चटकन समजून देणारे वास्तववादी परीक्षण इथे आहे by जॉनविक्क

Permalink

ह्याट... ह्याही पेक्षा

ह्याट... ह्याही पेक्षा तोलामोलाचा मनुष्य मिपावर वावरत असताना, कोण हा कौ ? त्यापेक्षा पानिपत चित्रपटाचे चे परीक्षण व कथा समजवुन सांगावी, अशी मी अ कुलकर्णी यांना विनंती करतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user निमिष सोनार

Submitted by निमिष सोनार on Wed, 12/11/2019 - 11:04

In reply to ह्याट... ह्याही पेक्षा by mrcoolguynice

Permalink

माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना मी दिली होती तरीही

वाचणार आणि मग नंतर नावे ठेवणार.... असो. सूचना अशी होती: मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by mrcoolguynice on Wed, 12/11/2019 - 12:44

In reply to माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना मी दिली होती तरीही by निमिष सोनार

Permalink

ओ निमिशजी तुमचा लेख छानच आहे.

ओ निमिशजी तुमचा लेख छानच आहे. कौस्तुभ म्हणून कुणाच्या तरी लिंक ऐवजी अकुजी चा लेख म्हणालो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Wed, 12/11/2019 - 13:06

In reply to ओ निमिशजी तुमचा लेख छानच आहे. by mrcoolguynice

Permalink

:)

  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on गुरुवार, 12/12/2019 - 17:19

Permalink

जाम बोअर झाले पानिपत बघताना !

जाम बोअर झाले पानिपत बघताना !!!! त्या पेक्षा बाजीराव मस्तानी आणि पदमावत लाख पटीने भारी . इथून पुढे गोवारिकर चे पिक्चर बंद .
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on गुरुवार, 12/12/2019 - 18:27

In reply to जाम बोअर झाले पानिपत बघताना ! by ट्रम्प

Permalink

अवघड आहे

पण पसन्द अपनी अपनी...
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 12/14/2019 - 09:28

In reply to अवघड आहे by अभिदेश

Permalink

पसंद वगैरे काही नाही हो !!!!!

मी मुलांना फक्त ऐतिहासिक सिनेमे दाखवण्याच्या अटीवर मॉल मध्ये नेत असतो , खान गॅंग साठी आज पर्यंत गेलो नाही . त्यातल्या त्यात अक्षय कुमार , रितीक रोशन चे आणि उरी वैगेरे ....... पण पानिपत मध्ये होत काय की पार्वती बाई ज्या एक सुराने फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पानिपत ची माहिती सांगत असते ते कंटाळवाणे होते . त्यात गोवारीकर चे सादरीकरण खूपच तकलादू , अर्जुन कपूर ने सुद्धा एकच सूर लावून संवाद म्हणून सदाशिवराव रावच्या भूमिकेचे कमी केलेले महत्व आशा अनेक गोष्टीमुळे पानिपत मनावर ठसा उमटवू शकला नाही . पानिपत मधील शोकांतिका आपल्याला पहावणार नाही म्हणून इतक्या दिवस टाळत होतो , पण मराठी दिग्दर्शक , मराठयांच्या पराक्रमाची गाथा म्हणून 2000 रु ची फोडणी देऊन आलो ............ शिवाय किमान 200 आसन क्षमता असलेल्या स्क्रीन हॉल मध्ये मोजून 50 / 60 प्रेक्षक ते सुद्धा संध्याकाळ च्या शो ला .......
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Wed, 12/18/2019 - 12:18

In reply to पसंद वगैरे काही नाही हो !!!!! by ट्रम्प

Permalink

तेच तर म्हणतोय...

जेव्हा तुम्ही पद्मावत आवडल्याचे म्हणता , तेव्हा मला हेच म्हणावेसे वाटते. प्रत्येक दिग्दर्शकाची एक शैली असते , जर तुम्ही आशुतोशच्या चित्रपटात रोहित शेट्टी श्टाईल फायटिन्गची अपेक्षा करत असाल तर ते नाही मिळ्णार. एक तर पानिपतचा विषय मोठ्या पडद्यावर आण्ण्याच धारिष्ट्य त्याने दाखवले हिच मोठी गोष्ट आहे. माझ्या मताप्रमाणे तो चुकला ते पात्र निवडित. जर त्याने मोठा सितारा (मझ्या मते रितिक) जर घेतला असता तर मोठा फरक पडला असता. पण मोहेन्जोदारो मुळे रितिक तयार नसेल झाला. आशुतोशच्या ह्याच शैलीचे स्वदेस , जोधा अकबर लोकानी डोक्यावर घेतले होतेच. ईथे फरक पडलाय तो मोठी स्टार कास्ट नसल्यामुळे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on गुरुवार, 12/19/2019 - 00:34

In reply to तेच तर म्हणतोय... by अभिदेश

Permalink

तुम्हाला हेच म्हणायचे आहे आशुतोष पकाऊच आहे

स्टारकास्ट मुळे तरून गेला अन यावेळी तरी त्याला ते कळले असेल की तो बंडल आहे ते
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on गुरुवार, 12/19/2019 - 17:41

In reply to तुम्हाला हेच म्हणायचे आहे आशुतोष पकाऊच आहे by जॉनविक्क

Permalink

तुमच्या मनाचे

शब्द दुसर्याच्या तोन्डी घालु नका. आधिच म्हट्ले आहे पसन्द अपनी अपनी. तसही बिन्डोक साजिद खानचे चित्रपट आवडणारे लोक आहेतच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on गुरुवार, 12/19/2019 - 17:44

In reply to तुमच्या मनाचे by अभिदेश

Permalink

माझे शब्द आणि तुमचे शब्द एका ओळीत लिहा पाहू

आणि मग माझी वाक्ये आणि तुमची वाक्ये लिहा, फरक स्पष्ट होईल आपोआप सगळ्यांनाच. साजिद खान फडतूस आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on गुरुवार, 12/19/2019 - 18:46

In reply to माझे शब्द आणि तुमचे शब्द एका ओळीत लिहा पाहू by जॉनविक्क

Permalink

फरक

सगळ्याना कळ्ला आहे , तुम्हाला कळला नसेल तर तेव्हड्या खालच्या लेवलवर मला नाही येता येणार...तुम्ही तुमची लेवल वाढवा .. :-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Fri, 12/20/2019 - 04:46

In reply to फरक by अभिदेश

Permalink

चला

हवा येउद्या!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Fri, 12/20/2019 - 11:58

In reply to चला by जॉनविक्क

Permalink

नको..

हवेत उडुन गेलात तर मिपावर जिथे तिथे प्रतिक्रिया कोण देणार... :-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Fri, 12/20/2019 - 12:07

In reply to नको.. by अभिदेश

Permalink

चला

हवा येऊ द्या
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Fri, 12/20/2019 - 12:21

In reply to चला by जॉनविक्क

Permalink

आशुतोष गोवारीकर ची लायकी

साजिद खानच्या चपला उचलायची पण नाही
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Fri, 12/20/2019 - 12:24

In reply to आशुतोष गोवारीकर ची लायकी by जॉनविक्क

Permalink

हो ना..

एवढ्या फाटक्या चपला कोण उचलणार... तुम्ही उचलता की काय ? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by हस्तर on Fri, 12/13/2019 - 13:50

Permalink

एवढ्या लोकांनी चित्रपट बघतील

एवढ्या लोकांनी चित्रपट बघतील ,मला कोणी सांगेल का शेवटी जो राजा होता आराधक सिंग त्याचा इतिहासात उल्लेख कुठे सापडेल
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Sat, 12/14/2019 - 08:05

In reply to एवढ्या लोकांनी चित्रपट बघतील by हस्तर

Permalink

तुम्ही इतकं शुद्ध लिहिण्याचे

तुम्ही इतकं शुद्ध लिहिण्याचे कष्ट घेतले म्हणून सांगतो. मी सिनेमा पाहिलेला नाही (कारण पहावला नाही). पानिपत या विषयाबद्दल गेली ७-८ वर्षे संशोधन करतो आहे, त्या माहितीतून उत्तर देतो. आला सिंग जाट असं ते नाव असावं, अराधक सिंग नव्हे. आला सिंग हा पतियाळा संस्थानचा पहिला राजा, तिथला स्थानिक जमीनदार म्हणा ना. भाऊ संकटात असताना त्याला उत्तरेकडून म्हणजे पंजाबातून रसद पुरवठा होत असे. त्यासाठी कर्नालच्याही उत्तरेस गरणाळ्यास २,००० स्वार पाठवले असा उल्लेख भाऊसाहेबांची कैफियत मध्ये आहे. तिथून हे स्वार धान्य, गवत म्हणजे कही अनंत असत, आणि अब्दाली त्यावर हल्ले करत असे. भाऊ त्याचा रोख आणि उत्तम मोबदला देत असे, म्हणून 'भाऊकी लूट' (अचानक मिळालेलं घबाड) असा वाक्प्रचार तिकडे प्रचलित होता. लढाईनंतर भाऊ जर वाचून उत्तरेकडे गेला असेल तर पंजाबात मराठ्यांना मदत करणारा आला सिंग त्यांना जरूर आश्रय देईल, असा भरवसा नानासाहेब पेशव्यांना वाटत होतं, म्हणून तिकडे शोध करण्यासाठी लिहिलेली पत्रे आज उपलग्ध आहेत. एक मराठा सरदार (नाव विसरलो) खरच काही स्वारांनीशी आला सिंग कडे सुखरूप राहून परत महाराष्ट्रात आला असे एक पत्र पेशवे दप्तरात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 12/13/2019 - 14:35

Permalink

परिक्षण आवडले....

छान लिहिलंय...
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Sat, 12/14/2019 - 05:59

Permalink

Laal Kaptaan : a hidden gem

आपल्याकडे अनेक फालतू चित्रपटाना पब्लिक डोक्यावर घेतं आणि त्यात हिरेमाणके बाजूलाच राहतात . माझ्या मते सैफ अली खान ची मुख्य भूमिका असलेल्या " नागा साधूचा सूड " अर्थात " लाल कप्तान " हा अगदी " लगान " च्या तोडीस तोड असलेला जबरदस्त मूव्ही आहे . अठराव्या शतकातील वातावरण आणि ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेली बंडाळी यांचे अभूतपूर्व असे चित्रण ह्या सिनेमात आहे . क्लायमॅक्स ला तर सिमेमॉटोग्राफीची कमाल आहे . यमुना तीरावरील किल्ला आणि नदीत होणारी लढाई अप्रतिम टिपली आहे . माझ्याकडून या सिनेमाला 4.5 * Available on Amazon Prime
  • Log in or register to post comments

Submitted by हस्तर on Tue, 12/17/2019 - 14:22

In reply to Laal Kaptaan : a hidden gem by मंदार कात्रे

Permalink

तो बोर आहे पण

तो बोर आहे पण
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 01/05/2020 - 09:46

In reply to Laal Kaptaan : a hidden gem by मंदार कात्रे

Permalink

मंदारजी ,

100 टक्के सहमत! दीपक डोबरियाल (डोब्राल) ने जी भुमिका वठवली आहे ती पाहण्यासाठी मी सिनेमा अजून दोन वेळा बघिन. खरोखर काही कलावंत प्रसिद्धिच्या झोतात का येत नाही हेच समझत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 12/18/2019 - 23:53

Permalink

पानीपत का रानीपत?

पानीपत या चित्रपटाचे नाव रानीपत शोभले असते एवढा बाईने नखरा दाखवलाय. चित्रपट आजिबातच बघायचा नव्हता पण नक्की कुठे कुठे माती खाल्लीये ते प्रत्यक्ष बघावं असं नंतर वाटलं म्हणून पाहिलाच. द ग्रेट मराठा या सीरीयलची कास्टींग सारखी डोळ्यासमोर येत होती. कहां राजा भोज कहां... असंच वाटतं राहिलं शेवटपर्यंत. क्लायमॅक्सला तर अब्दाली रडायचाच बाकी होता. मल्हारराव आजिबात शोभले नाहीत. दत्ताजींचे बचेंगे तो और लढेंगे हे इतिहासातील प्रसिद्ध वाक्य अतिशय सपक करून घाईघाईने उरकून घेतलं. शुजाउद्दौलाचा आवाज आणि स्वॅग इतका खतरा आहे की खरा व्हिलन हाच तर नव्हे असा संशय येतोच. मला फक्त नजीबखान आवडला! सं - दी - प
  • Log in or register to post comments

Submitted by हस्तर on Fri, 12/20/2019 - 12:17

In reply to पानीपत का रानीपत? by चांदणे संदीप

Permalink

मुद्दाम पार्वती बाई ला युद्ध

मुद्दाम पार्वती बाई ला युद्ध करताना दाखवले आणि ट्रेलर मध्ये पण ,त्यामुळे सो कॉल्ड woman empowerment वाले लोक चित्रपट बघायला गेले
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Fri, 12/20/2019 - 12:27

Permalink

@अभिदेश

आशुतोष गोवारीकर तुमच्या बागेत गवत उपटतो काय ? मग असल्या बंडल डायरेक्टरची तारीफ कशासाठी ?
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Fri, 12/20/2019 - 14:11

In reply to @अभिदेश by जॉनविक्क

Permalink

मिरची लगली...

साजिद खान काय करतो तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Fri, 12/20/2019 - 19:05

In reply to मिरची लगली... by अभिदेश

Permalink

झाडू मारतो

संडास साफ करायची जागा रिकामी आहे आशुतोष गोवरीकरला पाठवून द्या तुमचं इकडचे उपटून झाले की
  • Log in or register to post comments

Submitted by अभिदेश on Mon, 12/23/2019 - 12:32

In reply to झाडू मारतो by जॉनविक्क

Permalink

आधिच

म्हटल्यानुसार तुमच्या ईतक्या खालच्या लेवलला नाही येऊ शकत ... तेव्हा तुम्ही आणि तुमचे सन्डास तुम्हाला लखलाभ... रामराम.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 12/23/2019 - 12:59

In reply to आधिच by अभिदेश

Permalink

बाबड्या मिरची लागली का रे ?

  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 12/23/2019 - 13:04

In reply to बाबड्या मिरची लागली का रे ? by जॉनविक्क

Permalink

आशुतोष गोवारीकर ची लेव्हल वरची वाटते इथेच गँडलास रे

असं आहे बाबड्या तो आहे "शीट" डायरेक्टर, त्यामुळे संडास साफ चांगला करेल, तुझा काय प्रॉब्लेम आहे ? त्याने गवत उपटताना तुला फार त्रास झाला का ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com