अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्यात,लॉबीच्या कोपर्यात, लिफ्ट मधे कोपर्यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्या लोकांचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. परदेशातून आलेल्या पाहुणे हे जेव्हा पहातात त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मागासलेला देश अशी होते. अतुल्य भारत च्या प्रबोधन जाहिरातींमधे ते दाखवून अशा थुंकीसम्राटांचे प्रबोधन करण्याचा क्षीण प्रयत्न सरकारी पातळीवर केलाही जातो.त्या जाहीराती अशा लोकांपर्यंत पोहोचतात किती व त्याचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. काही व्यापारी संकुलात जिन्याच्या कोपर्यात देवादिकांची चित्रे असलेल्या टाईल्स लावून या थुंकीवीरांवर नैतिक दबाव आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो.त्याचा काही अंशी परिणाम होतो देखील पण तो तेवढ्या पुरताच.थुंकीवीर आपले पिचकारीचे ठिकाण थोडे शिफ्ट करतात. एका टिकाणी मी पिचकारीचे शिंतोडे मारुतीच्या टाईल्सवर उडालेले पाहिले.कदाचित लक्षात आल्यावर थुंकणार्याने नंतर आपली जीभ चावली असेल. पुर्वी काही सरकारी कार्यालयाच्या आवारात विटकरी रंगाच्या भितींवर पांढर्या रंगाच्या पाटीवर लाल अक्षरात कार्यालयाच्या आवारात तंबाखू सिगारेट थुंकणे वगैरे गोष्टी भारतीय दंडविधान अमुक अमुक अन्वये गुन्हा आहे व तो अमुक शिक्षेस पात्र आहे अशा आशयाचे लिहिलेले दिसायचे.त्यानुसार कारवाई झाल्याचे पहाण्यात नाही.म्हणजे शिक्षेचे भय नाही व प्रबोधनाची तमा नाही. सुसंस्कृत व सुशिक्षित लोक हे सर्व असहाय्यपणे पहात असतात.
थुंकणार्याच्या मानसिकतेतुन पाहिले तर" आता मानुस हाये म्हन्ल्यावर थुकनारच ना! जनावर थुकत्यात का? हॅ हॅ! आमी कुट लोकांच्या अंगाव थुकतो. कोपरा पघुन थुकतो, आन द्यवाची तसबीर आसन तर थुकत बी नाई" असे विचार त्यांच्या मनात असतात. त्यांची भावनिक, बौद्धिक वाढ ज्या संस्कारात, ज्या वातावरणात झाली असते त्या दृष्टीने यात काही गैर नसते. जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, खाजवतो, ढेकर देतो, जांभई देतो तितकी ती निसर्गसुलभ व सहज प्रक्रिया आहे. पुलंच्या रावसाहेबांच्या फुल्या फुल्या जितक्या सहजसुलभ असतात तितक्या. ती एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया असते. जागॄत मेंदु त्याची दखलसुद्धा घेत नाही.
आमच्या जीवन शिक्षण मंदिरात पाचवी ते सातवी देव गुरुजी आम्हाला शिकवायचे. ते रोज पाच ओळी अक्षरसुधारणेसाठी शुद्धलेखन लिहून आणायला सांगायचे. टाक वापरणे आम्हाला सक्तीचे होते. चुकून जरी पेन नुसता दिसला तरी गुरुजी तरवारीच्या आवेशाने तो पेन दगडी भिंतीवर आपटून त्याचा विनाश करीत असत. खेड्यात लोक आपली पोर गुर्जींच्या पायावर घालायची. गुर्जींविषयी घरात तक्रार केली तर घरात डबल मार बसायचा पोरांना. गुर्जींची शिस्त कडक होती त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. गुर्जी अक्षरश: जीव ओतून शिकवायचे. सगळ्या विषयांना एकच गुरुजी असायचे. गावाचा गुर्जींवर पुर्ण विश्वास होता. आदरयुक्त दरारा असायचा गुर्जींचा. तर अशा या गुरुजींना तंबाखू खायच व्यसन होते. शेणाने सारवलेल्या वर्गात गुर्जींना फक्त खुर्ची टेबल असायचे. बाकी आम्ही खालीच बसत असू. आम्हीच सगळे मिळून वर्ग शेणाने सारवत असू. गुरुजी तंबाखू खात शिकवायचे व कधी कधी खिडकीतून बाहेर तर कधी खुर्चीच्या खालीच थुंकायचे. पण यामधे कुणालाच त्याकाळी गैर वाटत नसे. कारण या चित्राचा कॅनवास हा खेड्यातील समाजजीवन हा होता. ज्यामधे थुंकणे हा समाजजीवनाचा अपरिहार्य व अविभाज्य भाग होता. गुरुजींनी तंबाखू सोडण्याचे भरपूर प्रयत्न केले पण ते फसले. आता हे जर मी कॉन्वेंट स्कूल मधे शिकणार्या विद्यार्थी व पालकांना सांगितले तर शिक्षक वर्गात थुंकतात हे भयंकर अनाकलनीय वाटेल. एखाद्या चित्राचे आकलन हे ते चित्र कुठल्या कॅनवासवर प्रक्षेपित केले आहे त्यावर अवलंबून असते. चित्राचा कॅनवास बदलला कि आकलन ही बदलते. आपली समाज चित्रे ही अशीच असतात. माध्यम त्याचा वापर चतुराईने करुन घेतात. कधी त्याचा उपयोग समाज घडण्यासाठी होतो तर कधी बिघडण्यासाठी होतो. थुंकणार्या लोकांमधेही प्रबोधनामुळे काही बदल घडत असतात. भान सुटलेले कुठेही व कसेही थुंकणारे लोक आता आजुबाजूला कोणी नाही ना? असे पाहून रस्त्याच्या कडेला थुंकतात. स्वच्छ सुंदर चकचकीत अशा कार्यालयांमधे जर हे थुंकीवीर गेले तर त्या वातावरणाचा मनोवैज्ञानिक दबाव त्यांच्यावर पडतो व त्यांची थुंकीची उर्मी नाहीशी होते . पण जर एखाद्या ठिकाणी पिचकारीचे अवशेष दिसले की त्यांची उर्मी उफाळुन येते व प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तिथे अजून एक पिचकारी पडते. आपला देश एकाच वेळी किमान तीन शतकात तरी वावरतो. त्यामुळे देशातून या चित्राचे समूळ उच्चाटन शक्य होईल असे वाटत नाही पण किमान वेगाने घटले तरी दिलासा म्हणावा लागेल.
थुंक थुंकून कधी तू दमशील
थक थक रे थुंकीलाला
थक थक रे थुंकीलाला।
वाचने
14240
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
परेड सावधान.
सहमत
असतात काही सामाजिक सवयी
असेल ही लिहिलेला तुमच्या
In reply to असतात काही सामाजिक सवयी by ज्ञानोबाचे पैजार
:D
पका काकांशी सहमत
लिन्क द्या ना
In reply to पका काकांशी सहमत by शशिकांत ओक
जिव्हा शुद्धी अभियान
In reply to लिन्क द्या ना by प्रकाश घाटपांडे
जसे आपण श्वास घेतो, शिंकतो,
मी हे थुन्कणार्याच्या
In reply to जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, by सुबोध खरे
थुंकणे हि अत्यंत किळसवाणी
जसे आपण श्वास घेतो, शिंकतो,
आमच्या गुरुजींना मधे मधे
तंबाखू मधील निकोटीन हे
तंबाखू खायची नाही, बिडी
In reply to तंबाखू मधील निकोटीन हे by सुबोध खरे
त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
In reply to तंबाखू खायची नाही, बिडी by प्रकाश घाटपांडे
त्यावेळी मित्राच्या बेफीकीर
In reply to त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? by गवि
सहमत आहे.
In reply to त्यावेळी मित्राच्या बेफीकीर by प्रकाश घाटपांडे
त्यांना बहुतेक गाढव तंबाखू खाते असे वाटत असावे
In reply to सहमत आहे. by गवि
तंबाखू मधील निकोटीन हे
तंबाखू गिळू नये अन्यथा
कधी भेटताय डेमोच देतो
In reply to तंबाखू गिळू नये अन्यथा by सुबोध खरे
https://www.quora.com/Why
In reply to कधी भेटताय डेमोच देतो by जॉनविक्क
एक सिगारेट मध्ये असतो तेवढाच
:) :) :D
In reply to एक सिगारेट मध्ये असतो तेवढाच by सुबोध खरे
किमान एका सिगारेटमध्ये असतो तेव्हढा तंबाखूचला ही ओळ नव्याने ऍड करून विषय मर्यादित केलात ते बरे झाले. त्याचे असे आहे की प्रमाण हा शब्द ऍड झाला ना की विषही औषध म्हणून काम करते असो.ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये