✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"तो" आणि "ती"

अ
अभिनव प्रकाश जोशी यांनी
Wed, 12/11/2019 - 18:06  ·  लेख
लेख
ऑक्टोबर महिन्यातल्या कडक उन्हाचे दिवस होते. म्हाळ महिना चालू होता. परोब काकांकड़े आज म्हाळ करण्याचे ठरले होते. देवळातल्या साधले भटास लागणारे साहित्य आणि बाकी भट आणण्याची जबाबदारी दिली होती. घरात सगळीकडे लगबग सुरु होती. घराच्या उजव्या बाजूला, परसात ४ चुली तयार होत्या. कुमार मिलिंद त्यात जाळ करण्यासाठी घरातल्या शेगडीवरून पेटती कट्टी झेलवत झेलवत आणत असता त्यातील एका किटाळाणे साधले भटाने आणलेल्या एका भटाच्या धोतराला खिंडार पाडून खळबळ माजवली. धोतर पेटायच्याच मार्गावर होते ! भटाला त्या ठिणगीची ऊब लागताच त्याने पुढे मागे न बघता आचमनाला दाळून ठेवलेल्या तांब्यातील पाणी धोतरावर ओतून प्रसंग निभावून नेला ! पुऱ्या करण्याची तयारी करीत असलेल्या परोब काकूंनी सगळा प्रसंग बघून कुमार मिलिंदावर लाटणी भिरकावली, जी मिलिंदाने लीलया चुकवून आधीच धक्क्यात असलेल्या त्या भटाला चाटून जाईत भानावर आणून गेली ! मिलिंदाने तिथून लगेच पोबारा केला आणि चौकात बसून, काल आलेल्या पाहुण्यांच्या बशीत उरलेल्या शंकरपाळ्या खाणाऱ्या बाळाला जाळ करण्याचे काम सांगीत त्याचा हिरमोड केला व स्वतः बाहेर उडणारी भिरमुट पकडायच्या नादाला लागला. बाळ्याने उरलेल्या शंकरपाळ्या खिशात टाकून जाळ तयार केला.एव्हाना साधले भटाने परिस्तिथी नियंत्रणात आणली. "चला सगळ्यांनी हात पाय धुवून घ्या रे बसायच्या आधी- कारण काय आहे, शुद्ध-" - इति साधले भट "माझं झालं !"- भिजलेल्या धोतरातील तो भट ! त्या भटाने आपले सोवळे बदलून घेतले.स्वतःला सावरता सावरता त्याने बाजूला असलेल्या वर्तमानपत्रात छापलेल्या भविष्यावर एक तिरकी नजर टाकायचा एक असफल प्रयत्न केला व तोच तो झोपलाय असे समजून साधले भटानेv १-२ दा घंटा वाजवली ! त्या भटाने तो नाद सोडून लागलीच गंध झरवायला घेतले. हा झालेला सगळा वृत्तांत "तो", "वरून",नळ्यांतील भिंगातून बघत होता ! एव्हाना काकूंनी माळ्यावरून काढलेल्या परातीला पाणी लावले, व मैदा आणि गव्हाच्या पिठाचे भले मोठे डबे काढून परसात लावलेल्या चुलींकडे बस्थान मांडले. शेजारच्या १-२ बायकाही चुलीकडे हातभार लावायला आल्या होत्या. पुऱ्या, तांदुळाची खीर, चण्याची आमटी, भात, केळ्यांचे पंचामृत, काकडीची कोशिंबीर आणि तळण असा जुनाच बेत होता. एकाला सोडून सगळ्या भटांनी हात- पाय धुवून घेतले आणि न्याहारीची पंगत बसली. २ भटांनी सेकंड राउंडला जायचा विचार केला होता, पण साधले भटाने "आता खाणार आणि मग लवंडणार- त्यापेक्षा पुन्हा आणि नको"-असे म्हणून त्यांच्या विचाराला हरताळ फासला. आता न्याहारी होऊन केशवायनमः म्हणणार तेवढ्यात एका भटाने "लघुशंका निरसन केंद्रात जाण्यासाठी पाट सोडला ! त्याचे होताच इकडे विधी आणि तिकडे रांधप सुरु झाले. बायकांनी भाज्या निवडल्या. पाण्याचे तोप भरले आणि विळ्यांवर भाजी चिरायला बसल्या. परोब काकूंनीही चुलीवर पाणी उकळत ठेवले, आणि त्या बटाटे सोलायला बसल्या. "त्याला" ह्या सगळ्यांत काही रुची नव्हती. त्याच्या आणि बायकांमध्ये आता भिंग येत नव्हते ! तो वरून, जवळच खाली, परसात बसलेल्या बायका काय करतायत याकडे लक्ष ठेऊन होता. परोब काकूंनी बटाटे सोलून पुऱ्याना हात घातला तेव्हा तो बहुदा खुश झाला असावा. मगापासून "तो" तिथेच, "वर" बसून होता. कितिसाच वेळ गेला होता आणि परोब काकूंनी पुऱ्या तळायलाही घेतल्या होत्या. तिकडे म्हाळ संपत आला होता. नैवेद्याला पाने वाढली गेली. "त्याची" उत्कंठा शिगेला पोचली होती ! अन तेवढ्यात साधले भटाने अंगणात "वाडी" म्हणजेच कावळ्यासाठीचे पान आणून ठेवले आणि क्षणाचाही विलंब न करता परसातील तोरंगीच्या वरच्या फांदीवर बसलेल्या "त्या" कावळ्याने खाली येऊन त्या पानातली "ती" आवडती पुरी उचलली आणि साहजिकच खुशाल मनाने "तो" आपल्या वाटेने उडून गेला ! समाप्त
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
3692 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

म्हाल

विनोदपुनेकर
Wed, 12/11/2019 - 18:51 नवीन
म्हाल म्हन्जे काय ते समजले नाहि आनि शेवटि कावल्याने पुरि पळवली हा या लेखाचा विशय आहे हे समजले ... धन्यवाद
  • Log in or register to post comments

म्हाळ म्हणजे श्राद्ध

श्वेता२४
Wed, 12/11/2019 - 20:42 नवीन
पितृपक्ष, महालय असते त्याला म्हाळ म्हणतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोदपुनेकर

धन्यवाद माहिती बद्दल

विनोदपुनेकर
गुरुवार, 12/12/2019 - 09:25 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

कसल्याही साहित्यिक

जॉनविक्क
Wed, 12/11/2019 - 19:06 नवीन
कसल्याही साहित्यिक व्यभिचाराची जबरदस्ती नसणारे असे लेख व विविधरंगी लेखकच मिपाचे खरे वैभव आहे. मिपा कात टाकतेय, सुरेख. लिखाण आवडले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

अभिनव प्रकाश जोशी
Wed, 12/11/2019 - 21:17 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

मस्त काही नवे शब्द कळले .

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 12/12/2019 - 07:51 नवीन
मस्त काही नवे शब्द कळले .
  • Log in or register to post comments

देव देवळात नसतो तर तो

पाषाणभेद
गुरुवार, 12/12/2019 - 09:41 नवीन
देव देवळात नसतो तर तो भुकेलेल्यांत असतो.
  • Log in or register to post comments

खराय !

अभिनव प्रकाश जोशी
Fri, 12/13/2019 - 06:53 नवीन
खराय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

देवळांत देव असतो

गामा पैलवान
Fri, 12/13/2019 - 17:45 नवीन
पाभे, देवळांत देव असतो. फक्त तो वेगळी भूक भागवतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

+1

मुक्त विहारि
Fri, 12/13/2019 - 17:48 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा