नमस्कार मिसळपावकर,
मागील महिन्यात चालू घडामोडी हा धागा काढला नाही.
राज्याच्या सत्ताकारणात इतक्या घडामोडी घडल्या आणी त्यावर मिसळपाव वरच इतके धागे निघाले की चालू घडामोडीमधे त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही.
सर्वप्रथम राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊया. सध्याच्या वातावरणात सरकार चालवण्यासाठी त्यांना शुभेच्छांची खुप गरज आहे असे वाटते. बर्याच लोकांना वाटते कि हे सरकार लवकर कोसळेल मात्र मला असे वाटते की हे सरकार कमीतकमी ४ आणि जास्तीत जास्त ५ वर्षे पुर्ण करु शकेल. शिवसेनेने मागील सत्तेत असताना ५ वर्ष भांडणे केली मात्र ते तरीही दुय्यम दर्जाच्या सत्तेला चिकटून राहिले. आता मागील कार्यकालापेक्षा जास्त प्रबळ सत्ता मिळाल्यामुळे ते ही सत्ता सोडतील असे वाटत नाही.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर लगेच त्यांनी आरे मधील कार डेपोच्या कामाला स्थगिती दिली. जरी त्यांनी निवडणूक जाहिरनाम्यात हे आश्वासन दिले आहे तरी हे काम थांबविणे हा शहाणपणाचा निर्णय नाही असे जाणवते. आतापर्यंत जवळपास ७०-८०% झाडे तोडली गेली आहेत आणि या घडीला हे काम थांबविणे म्हणजे मुंबईकरांचे अपरिमित नुकसान आहे.
दुसरा निर्णय शेतकर्यांच्या कर्जमाफीचा, तो देखील लवकरच घेतला जाईल असे वाटते. राज्याच्या तिजोरीवरील भाराची चिंता कोणत्याच सरकारने कधी केली आहे असे वाटत नाही त्यामुळे केवळ शिवसेनेलाच दोष देणे चुकीचे ठरेल.
आता (फुकटचा सल्ला) संजय राऊत आणि देवेंद्र फडणविसांसाठी.
राऊत साहेबांनो, तुमचा पक्ष आता सत्तेत आला आहे, आता तरी रोज रोजचा आरडा ओरडा थांबवा प्लीज. तुमची बाजू सत्याची आहे असे जरी मानले तरी आता तुमचे बोलणे ऐकायचा कंटाळा आला आहे. तुम्हाला जे करायचे ते करा, गोव्याचे सरकार पाडा, भले केंद्र सरकार पाडा पण कृपया ते शांतपणे करा.
देवेंद्र साहेब, तुम्ही आता पराभूत झाला आहात त्यामुळे तुम्हाला सगळेच सल्ले देणार आणि तुम्हाला ते ऐकल्यासारखे करणे भागच आहे. काल तुमच्या पक्षाने विधानसभेत जे मुद्दे मांडून गोंधळ घातला आणि सदनाबाहेर चालते झालात त्यामुळे तुमची प्रतिमा डावात हरल्यावर आरडाओरडा करणार्या लहान मुलासारखी होते आहे हे तुमच्या लक्षात येते आहे काय ? तुम्ही गरज असेल तिथे नक्की विरोध करा पण कालचा हंगामी अध्यक्ष निवडीचा मुद्दा केवळ तांत्रिक होता आणि त्यातून तुम्ही सरकार पाडू शकण्याची शक्यता केवळ शुन्य होती. प्रत्येक गोष्टीवरुन केवळ विरोध केल्यामुळे आपले हसे होते हे तुमच्या लक्षात कधी येणार ?
तुम्ही आरे च्या निर्णायाला केलेला विरोध, आणि आज हा लेख लिहिपर्यंत तुमच्या पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून घेतलेली माघार हे तुमच्यातील शहाणीव अजूनही जागृत असल्याचे लक्षण आहे मात्र त्यावर कृपया आततायीपणे वागून पडदा टाकू नका.
दुसरे असे की आपल्या पत्नी देखील राजकारणावर ट्वीटरद्वारे भाष्य करीत असतात. प्रत्येकाला आपली राजकीय मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे हे मान्य करुन देखील असे सांगावेसे वाटते की कृपया कोणतेही राजकीय भाष्य करण्यापासून स्वतःला आवरा. सत्ता आज आहे उद्या नाही. पतीला पत्नीची खंबीर साथ असावी पण तुम्ही राजकारणात सक्रीय नसाल तर जाहिर रित्या राजकीय भाष्य करु नयेत. त्यामुळे लोक तुमच्यावर वैयक्तीक टीका करतात. तुम्हाला भले त्याचे काही वाटत नसेल पण एक भारतीय पुरुष म्हणून आम्हाला आमच्या आईबहिणींवर विनाकारण टीका करणार्यांचा राग येतो. अर्थात तुम्ही स्वतःहूनच त्यांना फुलटॉस देत असाल तर त्यांना १००% टक्के दोष कसा देणार ?
आमच्या येथे मिसळपाव वर तुमच्याच पक्षाच्या एका आमदारांच्या पत्नी सक्रीय लेखन करतात मात्र त्यांनी आजपर्यंत राजकीय लिखाण, राजकीय कल दर्शविणारे लिखाण केलेले नाही हे मला फार कौतुकास्पद वाटते. आपल्याला त्यांच्यापासून, अमित शहा आणि नरेंद्र मोदींपासून बरेच शिकण्यासारखे आहे. सयंत बोलणारे भले जास्त चमकत नसतील पण दीर्घकालीन आदराचे पात्र ठरतात. सल्ला जास्त आगावूपणाचा वाटत असेल तर क्षमा असावी.
आता ह्या महिनाभराच्या घडामोडीतून आपण सामान्य मतदाराने शिकण्याचा धडा कोणता ?
आपण दरवेळी आपल्या आवडत्या पक्षाने काही चूक केली की नाराज होतो पण शेवटी मतदान त्यालाच करतो किंवा त्याचा राग म्हणून आपल्या नावडत्या पक्षाला मतदान करतो. मात्र आपली नाराजी केवळ मतपेटीतून व्यक्त करणे योग्य नाही. (जाड कातडीचे राजकारणी आपली चुक केवळ सत्ता गेल्यावरच सुधारतील बहुधा).
आपण जमेल तिथे आपली नाराजी सयंत भाषेत जाहीर केली पाहिजे, तुमच्या संपर्कात जे कोणी राजकीय नेते, कार्यकर्ते असतील त्यांना तोंडावर त्यांची चुक सांगण्याचे काम केले पाहिजे. मी अमूकतमूक पक्षाचा समर्थक असलो तरी तुम्ही ही चुक केली आहे त्यामुळे मी यंदा तुम्हाला मत देणार नाही हे ठणकावून सांगता आले पाहिजे. केवळ ५ वर्षातून एकदा मतपेटीतून व्यक्त होऊ नये.
कोणत्याही सदनाचा सभासद नसलेल्या व्यक्तीला राजकीय पद देऊन नंतर त्याला निवडणूक लढविण्याची संधी देणे हा शुद्ध "बॅक डोअर इन्ट्री" चा प्रकार आहे. तो थांबलाच पाहिजे.
-------------------
फास्टॅग ची अंमलबजावणी
१५ डिसेंबरपासून वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक केले आहे. फास्टॅग मुळे टोलनाक्यावरील वेळ वाचेल, इंधन बचत होईल असे अनेक दावे केले जात आहेत. वाहनाला फास्टॅग नसेल तर त्याला फास्टॅग लेन मधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागेल अशी धमकी देखील दिली आहे. फास्टॅग १ डिसेंबरपर्यंत मोफत मिळणार होता.मात्र आता त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील काय याची माहिती अजून माझ्या वाचनात आली नाही.
मात्र त्यात काही रक्कम अनामत आणि काही रक्कम टोल भरण्यासाठी अगोदरच जमा करावी लागेल. (अंदाजे ४०० ते ५०० रुपये)
आपण आपल्या वाहनांसाठी फास्टॅग खरेदी करून सरकारला, टोल कंपन्यांना इंधनबचत, वेळेची बचत याबाबतीत साहाय्य करावे. मात्र एकदा फास्टॅग घेतला की ती यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्याची काळजी जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी. एखाद्या टोलनाक्यावर ही यंत्रणा बंद असेल तर नियमाला जागून रोख रक्कम मुळीच देऊ नये. वेळप्रसंगी भांडणाची तयारी ठेवावी मात्र कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम देऊन सुटका करुन घेऊ नये असे आवाहन करीत आहे. आता सगळ्या टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही चे फलक झळकले आहेत त्याचे फोटो काढून घ्यावेत आणि त्याचा पुरावा म्हणून वापर करावा.
-------------------
हैदराबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी ह्या डॉक्टर महिलेवर अत्याचार करुन तिची जाळून हत्या केली गेली. आपण पुन्हा एकदा केवळ दु:खी होण्याव्यतीरिक्त काही करु शकलो नाही ! कोठून येतात ह्या प्रवृत्ती ? एक समाज म्हणून आपण काय केले पाहिजे जेणेकरुन हे प्रकार बंद होतील ? विचार करुन डोक्याचा भुगा झाला पण काही उत्तर मिळाले नाही ! पीडीतेला मुक श्रद्धांजली !!
-------------------
डिसेंबर महिना म्हणजे वर्षाचा शेवट. पुढील नव्या वर्षात मी यंव करीन, मी त्यंव करीन असे संकल्प करण्याचा आणि ते प्रत्यक्षात न आणण्याचा महिना. तेव्हा आताच संकल्प करायला घ्या आणि कुणीतरी त्यावर एखादा मजेदार धागा काढावा.
ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या मनापासून शुभेच्छा !
आणि केवळ नववर्ष साजरे करण्यापुरतेच ग्लोबल, लिबरल आणि सेक्युलर होणार्या (पेताडांनादेखील) देखील थर्टि फस्ट च्या शुभेच्छा :))
--------
वाचकांनी आपल्या अमुल्य प्रतिसादांची भर घालून धाग्याची लांबी, रुंदी, जाडी वाढवावी ही विनंती :)
वर्गीकरण
वाचने
21152
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हैदराबाद येथील गुन्ह्या बाबत काय बोलणार?
हैदराबाद येथे डॉ. प्रियांका
मानसशास्त्र काय म्हणते ?
In reply to हैदराबाद येथे डॉ. प्रियांका by जॉनविक्क
तज्ञांची मते जाणून घ्यायला आवडतील
In reply to मानसशास्त्र काय म्हणते ? by धर्मराजमुटके
तोपर्यंत
In reply to तज्ञांची मते जाणून घ्यायला आवडतील by जॉनविक्क
घृणास्पद घटना
दर पाच सात वर्षांनी असे
In reply to घृणास्पद घटना by मित्रहो
आजच मटा मधे बातमी आली फक्त
In reply to दर पाच सात वर्षांनी असे by जॉनविक्क
https://www.indiatimes.com
https://www.newindianexpress
In reply to https://www.indiatimes.com by गणेशा
वृत्तपत्रे आणि मिडिया. ..
In reply to https://www.indiatimes.com by गणेशा
https://www.news18.com/news
In reply to वृत्तपत्रे आणि मिडिया. .. by मुक्त विहारि
गणेशा
In reply to https://www.news18.com/news by गणेशा
|| जय श्री बिनाबजेटबेटीबचाओबाबा प्रसन्न ||
स्वकष्टाची किमया....
https://www.majhapaper.com/2019/12/03/repeated-presence-of-this-
BSNL चे 78,000 कर्मचारी घेणार VRS
मोठी उलथापालथ. ..
In reply to BSNL चे 78,000 कर्मचारी घेणार VRS by जॉनविक्क
बरोबर.
In reply to मोठी उलथापालथ. .. by मुक्त विहारि
आपण आपलेच खड्डे खणत आहोत. ..
In reply to बरोबर. by जॉनविक्क
पंकजा नंतर आता नाथा खडसे
(No subject)
हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
जे केले ते उत्तम केले. ...
In reply to हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार by धर्मराजमुटके
जे झालं ते झालं; पुन्हा असं
In reply to हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार by धर्मराजमुटके
ह्या प्रकरणात पोलिसांना
In reply to हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार by धर्मराजमुटके
+1
In reply to ह्या प्रकरणात पोलिसांना by यशोधरा
सोनीयासेनेचे मुख्यमंत्री आणि
माझ्या ताटात आधी एक रूपयात. ..
In reply to सोनीयासेनेचे मुख्यमंत्री आणि by विजुभाऊ
झुणका भाकर काय घेऊन बसलात.
हो ना. ..
In reply to झुणका भाकर काय घेऊन बसलात. by टीकोजीराव
"देवाला रिटायर करा" असे
कल्लूमामा गॅंगचे,
भाजपाने नक्कीच देशाला निराश केले आहे.
भाजपने मला तरी निराश केलेले नाही. ..
In reply to भाजपाने नक्कीच देशाला निराश केले आहे. by गोंधळी
पाकिस्तान बाबत सहमत.
In reply to भाजपने मला तरी निराश केलेले नाही. .. by मुक्त विहारि
निराश फक्त पाकिस्तान आहे.
In reply to भाजपने मला तरी निराश केलेले नाही. .. by मुक्त विहारि
मी अजिबात निराश नाही...
In reply to निराश फक्त पाकिस्तान आहे. by गोंधळी
निराशेची सीमा अशी झाली आहे की
In reply to भाजपाने नक्कीच देशाला निराश केले आहे. by गोंधळी
कॉंग्रेसमुक्त भारत ?? --