चालू घडामोडी : डिसेंबर २०१९

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
1 Dec 2019 - 12:40 pm
गाभा: 

नमस्कार मिसळपावकर,
मागील महिन्यात चालू घडामोडी हा धागा काढला नाही.

राज्याच्या सत्ताकारणात इतक्या घडामोडी घडल्या आणी त्यावर मिसळपाव वरच इतके धागे निघाले की चालू घडामोडीमधे त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही.

सर्वप्रथम राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊया. सध्याच्या वातावरणात सरकार चालवण्यासाठी त्यांना शुभेच्छांची खुप गरज आहे असे वाटते. बर्‍याच लोकांना वाटते कि हे सरकार लवकर कोसळेल मात्र मला असे वाटते की हे सरकार कमीतकमी ४ आणि जास्तीत जास्त ५ वर्षे पुर्ण करु शकेल. शिवसेनेने मागील सत्तेत असताना ५ वर्ष भांडणे केली मात्र ते तरीही दुय्यम दर्जाच्या सत्तेला चिकटून राहिले. आता मागील कार्यकालापेक्षा जास्त प्रबळ सत्ता मिळाल्यामुळे ते ही सत्ता सोडतील असे वाटत नाही.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर लगेच त्यांनी आरे मधील कार डेपोच्या कामाला स्थगिती दिली. जरी त्यांनी निवडणूक जाहिरनाम्यात हे आश्वासन दिले आहे तरी हे काम थांबविणे हा शहाणपणाचा निर्णय नाही असे जाणवते. आतापर्यंत जवळपास ७०-८०% झाडे तोडली गेली आहेत आणि या घडीला हे काम थांबविणे म्हणजे मुंबईकरांचे अपरिमित नुकसान आहे.
दुसरा निर्णय शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा, तो देखील लवकरच घेतला जाईल असे वाटते. राज्याच्या तिजोरीवरील भाराची चिंता कोणत्याच सरकारने कधी केली आहे असे वाटत नाही त्यामुळे केवळ शिवसेनेलाच दोष देणे चुकीचे ठरेल.

आता (फुकटचा सल्ला) संजय राऊत आणि देवेंद्र फडणविसांसाठी.
राऊत साहेबांनो, तुमचा पक्ष आता सत्तेत आला आहे, आता तरी रोज रोजचा आरडा ओरडा थांबवा प्लीज. तुमची बाजू सत्याची आहे असे जरी मानले तरी आता तुमचे बोलणे ऐकायचा कंटाळा आला आहे. तुम्हाला जे करायचे ते करा, गोव्याचे सरकार पाडा, भले केंद्र सरकार पाडा पण कृपया ते शांतपणे करा.

देवेंद्र साहेब, तुम्ही आता पराभूत झाला आहात त्यामुळे तुम्हाला सगळेच सल्ले देणार आणि तुम्हाला ते ऐकल्यासारखे करणे भागच आहे. काल तुमच्या पक्षाने विधानसभेत जे मुद्दे मांडून गोंधळ घातला आणि सदनाबाहेर चालते झालात त्यामुळे तुमची प्रतिमा डावात हरल्यावर आरडाओरडा करणार्‍या लहान मुलासारखी होते आहे हे तुमच्या लक्षात येते आहे काय ? तुम्ही गरज असेल तिथे नक्की विरोध करा पण कालचा हंगामी अध्यक्ष निवडीचा मुद्दा केवळ तांत्रिक होता आणि त्यातून तुम्ही सरकार पाडू शकण्याची शक्यता केवळ शुन्य होती. प्रत्येक गोष्टीवरुन केवळ विरोध केल्यामुळे आपले हसे होते हे तुमच्या लक्षात कधी येणार ?

तुम्ही आरे च्या निर्णायाला केलेला विरोध, आणि आज हा लेख लिहिपर्यंत तुमच्या पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून घेतलेली माघार हे तुमच्यातील शहाणीव अजूनही जागृत असल्याचे लक्षण आहे मात्र त्यावर कृपया आततायीपणे वागून पडदा टाकू नका.

दुसरे असे की आपल्या पत्नी देखील राजकारणावर ट्वीटरद्वारे भाष्य करीत असतात. प्रत्येकाला आपली राजकीय मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे हे मान्य करुन देखील असे सांगावेसे वाटते की कृपया कोणतेही राजकीय भाष्य करण्यापासून स्वतःला आवरा. सत्ता आज आहे उद्या नाही. पतीला पत्नीची खंबीर साथ असावी पण तुम्ही राजकारणात सक्रीय नसाल तर जाहिर रित्या राजकीय भाष्य करु नयेत. त्यामुळे लोक तुमच्यावर वैयक्तीक टीका करतात. तुम्हाला भले त्याचे काही वाटत नसेल पण एक भारतीय पुरुष म्हणून आम्हाला आमच्या आईबहिणींवर विनाकारण टीका करणार्‍यांचा राग येतो. अर्थात तुम्ही स्वतःहूनच त्यांना फुलटॉस देत असाल तर त्यांना १००% टक्के दोष कसा देणार ?

आमच्या येथे मिसळपाव वर तुमच्याच पक्षाच्या एका आमदारांच्या पत्नी सक्रीय लेखन करतात मात्र त्यांनी आजपर्यंत राजकीय लिखाण, राजकीय कल दर्शविणारे लिखाण केलेले नाही हे मला फार कौतुकास्पद वाटते. आपल्याला त्यांच्यापासून, अमित शहा आणि नरेंद्र मोदींपासून बरेच शिकण्यासारखे आहे. सयंत बोलणारे भले जास्त चमकत नसतील पण दीर्घकालीन आदराचे पात्र ठरतात. सल्ला जास्त आगावूपणाचा वाटत असेल तर क्षमा असावी.

आता ह्या महिनाभराच्या घडामोडीतून आपण सामान्य मतदाराने शिकण्याचा धडा कोणता ?
आपण दरवेळी आपल्या आवडत्या पक्षाने काही चूक केली की नाराज होतो पण शेवटी मतदान त्यालाच करतो किंवा त्याचा राग म्हणून आपल्या नावडत्या पक्षाला मतदान करतो. मात्र आपली नाराजी केवळ मतपेटीतून व्यक्त करणे योग्य नाही. (जाड कातडीचे राजकारणी आपली चुक केवळ सत्ता गेल्यावरच सुधारतील बहुधा).
आपण जमेल तिथे आपली नाराजी सयंत भाषेत जाहीर केली पाहिजे, तुमच्या संपर्कात जे कोणी राजकीय नेते, कार्यकर्ते असतील त्यांना तोंडावर त्यांची चुक सांगण्याचे काम केले पाहिजे. मी अमूकतमूक पक्षाचा समर्थक असलो तरी तुम्ही ही चुक केली आहे त्यामुळे मी यंदा तुम्हाला मत देणार नाही हे ठणकावून सांगता आले पाहिजे. केवळ ५ वर्षातून एकदा मतपेटीतून व्यक्त होऊ नये.

कोणत्याही सदनाचा सभासद नसलेल्या व्यक्तीला राजकीय पद देऊन नंतर त्याला निवडणूक लढविण्याची संधी देणे हा शुद्ध "बॅक डोअर इन्ट्री" चा प्रकार आहे. तो थांबलाच पाहिजे.

-------------------
फास्टॅग ची अंमलबजावणी

१५ डिसेंबरपासून वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक केले आहे. फास्टॅग मुळे टोलनाक्यावरील वेळ वाचेल, इंधन बचत होईल असे अनेक दावे केले जात आहेत. वाहनाला फास्टॅग नसेल तर त्याला फास्टॅग लेन मधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागेल अशी धमकी देखील दिली आहे. फास्टॅग १ डिसेंबरपर्यंत मोफत मिळणार होता.मात्र आता त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील काय याची माहिती अजून माझ्या वाचनात आली नाही.
मात्र त्यात काही रक्कम अनामत आणि काही रक्कम टोल भरण्यासाठी अगोदरच जमा करावी लागेल. (अंदाजे ४०० ते ५०० रुपये)

आपण आपल्या वाहनांसाठी फास्टॅग खरेदी करून सरकारला, टोल कंपन्यांना इंधनबचत, वेळेची बचत याबाबतीत साहाय्य करावे. मात्र एकदा फास्टॅग घेतला की ती यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्याची काळजी जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी. एखाद्या टोलनाक्यावर ही यंत्रणा बंद असेल तर नियमाला जागून रोख रक्कम मुळीच देऊ नये. वेळप्रसंगी भांडणाची तयारी ठेवावी मात्र कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम देऊन सुटका करुन घेऊ नये असे आवाहन करीत आहे. आता सगळ्या टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही चे फलक झळकले आहेत त्याचे फोटो काढून घ्यावेत आणि त्याचा पुरावा म्हणून वापर करावा.

-------------------
हैदराबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी ह्या डॉक्टर महिलेवर अत्याचार करुन तिची जाळून हत्या केली गेली. आपण पुन्हा एकदा केवळ दु:खी होण्याव्यतीरिक्त काही करु शकलो नाही ! कोठून येतात ह्या प्रवृत्ती ? एक समाज म्हणून आपण काय केले पाहिजे जेणेकरुन हे प्रकार बंद होतील ? विचार करुन डोक्याचा भुगा झाला पण काही उत्तर मिळाले नाही ! पीडीतेला मुक श्रद्धांजली !!

-------------------
डिसेंबर महिना म्हणजे वर्षाचा शेवट. पुढील नव्या वर्षात मी यंव करीन, मी त्यंव करीन असे संकल्प करण्याचा आणि ते प्रत्यक्षात न आणण्याचा महिना. तेव्हा आताच संकल्प करायला घ्या आणि कुणीतरी त्यावर एखादा मजेदार धागा काढावा.
ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या मनापासून शुभेच्छा !
आणि केवळ नववर्ष साजरे करण्यापुरतेच ग्लोबल, लिबरल आणि सेक्युलर होणार्‍या (पेताडांनादेखील) देखील थर्टि फस्ट च्या शुभेच्छा :))

--------
वाचकांनी आपल्या अमुल्य प्रतिसादांची भर घालून धाग्याची लांबी, रुंदी, जाडी वाढवावी ही विनंती :)

प्रतिक्रिया

एका वाक्यात बोलायचे तर. ....

छत्रपती शिवाजी महाराज आज हवे होते.

जॉनविक्क's picture

1 Dec 2019 - 7:19 pm | जॉनविक्क

हैदराबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी ह्या डॉक्टर महिलेवर अत्याचार करुन तिची जाळून हत्या केली गेली.

सर्वप्रथम हे मिपावर उल्लेखल्याबद्दल आभारी आहे, बातमी कळल्या पासून काय घडले असेल या नुसत्या कल्पनेने डोळ्यात पाणी येणे कितीतरी वेळ थांबवू शकलो नाही. मिपावर काही महत्वाच्या घटना विनाउल्लेख राहतात ही पण त्यात सामील होईल की काय वाटले होते , असो.

एक समाज म्हणून आपण काय केले पाहिजे जेणेकरुन हे प्रकार बंद होतील ?

एक समाज म्हणून आपण सर्व इतका मोठा केऑस आहोत की नेमके काहीही केले तरी उपयोग 100% होईल याची खात्री कमीच आहे. पण एक व्यक्ती म्हणून काही बदल घडवायला सुरुवात केली तर कदाचित पुढील पिढी थोडी सुसंस्कारित असेलही, तूर्तास आपल्या सर्व आप्त स्वकीयांना स्त्री सुरक्षे संबंधीत app ताबडतोब इन्स्टॉल करायला लावा. हे अत्यावश्यक आहे.

धर्मराजमुटके's picture

1 Dec 2019 - 7:46 pm | धर्मराजमुटके

स्त्रियांना स्वतःची सुरक्षा करायला शिकले पाहिजे याबद्द्ल दुमत नाही पण दोघा चौघांसमोर एक व्यक्ती भले तो स्त्री असो किंवा पुरुष हतबल ठरु शकतात. गेल्याच आठवड्यात ओळखीतल्या एका स्त्रीने प्रवासासाठी ओला कॅब बुक केली होती मात्र काही कारणास्तव ड्रायव्हर ने गुगल मॅपवर दाखवितात त्यापेक्षा वेगळा मार्ग घेतल्यावर ती घाबरली. तीने मला फोन केला आणि संपर्कात आहोत असे ड्रायव्हरला भासवले. मी तुला माझे ट्रिप चे ट्रॅकींग पाठवते असे सांगीतले. कदाचित ड्रायव्हर ची काही टेक्नीकल अडचण देखील असू शकते मात्र ती सुखरुप घरी पोहोचली.

शहरात अशा तंत्रज्ञानाचा फायदा होतो पण आडबाजूच्या प्रवासात नेट नसणे, जीपीआरएस सिग्नल नसणे यामुळे तंत्रज्ञानाला मर्यादा येतात.
अशा घटनांमुळे स्त्रियांबरोबर चांगल्या पुरुषांचे देखील नुकसान होत आहे. कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो आहे.

मानसशास्त्र काय म्हणते ? अशा गुन्ह्यातल्या दोषींना शिक्षा होईल ती होईल पण संबंधीत यंत्रणा त्यांच्या मानसशास्त्रीय तपासण्या करतात काय ? अशा केसेसचे कदाचित काही रेकॉर्ड जमवले आणि अभ्यास केला तर काही मार्ग सापडू शकेल काय ?

तसेच शहरात ज्या उपाययोजना यशस्वी होती त्या हळू हळू कमी लोकसंखेच्या भागाकडेही संक्रमित करता येउ शकतील.

मानसशास्त्र काय म्हणते ? अशा गुन्ह्यातल्या दोषींना शिक्षा होईल ती होईल पण संबंधीत यंत्रणा त्यांच्या मानसशास्त्रीय तपासण्या करतात काय ?

कोणत्याही बाबतीत कमी अधिक तीव्रतेच्या बलाचा प्रयोग करून हेतू साध्य करणे हा एक अप्रत्यक्ष बलात्कारच असतो मग तो एखाद्या संस्थळावरील साहित्य संपादकांने एकतर्फी प्रतिसाद उडवणे असो की कंपूबाजी करून आपल्याला दाद न देणाऱ्या व्यक्तीला जेरीस आणणे असो, अथवा निव्वळ चर्चेत एखादयाने दुसऱ्याला गप्प बसवणे असो, की नोकरीमध्ये बॉसच्या तालावर उठसुठ नाचणे असो की तेल, देश अन धर्माच्या नावाखाली नरसंहार घडवणे असो, ही सर्व कमी जास्त तीव्रतेच्या बलात्कारचीच उदाहरणे आहेत. तेंव्हा जी कोणी व्यक्ती मी बलात्कार करू शकत नाही असे छातीठोकपणे सांगते तर ती नक्कीच भ्रमात आहे कारण लैगिकता हे फक्त प्रकटीकरण असते बीज न्हवे.

बीज हे प्रत्येकाच्या सरवायव्हल इन्स्टिकट् मधे असते, एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा फलाना फलाना बाबतीत सरस असणे मग ती योग्य की अयोग्य हा मुद्दाच नाही आपल्या मनात सूक्ष्म स्तरावर आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक म्हणून ठरवल्या जातात आणी त्यावर त्यावर डिफेन्स मेकानिजम म्हणून शरीराने व मेंदूने दिलेली तरल प्रतिक्रिया "काळजी घे रे बाबा" ही एक अतिशय सात्विक संवेदना असते कारण आपले अंतर्मन मन फक्त सात्विकतेला थारा देण्याची कुवत राखून आहे पण ही सात्विक जागृत मनात येता येता संवेदना राजसी प्रसंगी तामसी कशी बनते व प्रत्येक्ष कृती किती बिभीट्स होऊ शकते हा एका प्रतिसाद वा धाग्याचा विषय नाही यावर प्रत्यक्षच बोलणे घडू शकते

सारांश: बलात्काराची प्रवृत्ती नष्ट होईल यावर माझा विश्वास नाही, घटना मर्यादित करता येतील पण त्यासाठी बाहयपरिस्थिती व्यक्तीला स्वतःच्या आतमधे डोकावण्यास अनुकूल असणे आवश्यक आहे.

जॉनविक्क's picture

1 Dec 2019 - 9:43 pm | जॉनविक्क

HIV प्रमाणे precaution is better than cure हे न विसरुन आवश्यक त्या उपाययोजना अमलात आणणे जास्त योग्य.

मित्रहो's picture

2 Dec 2019 - 7:52 pm | मित्रहो

घृणास्पद घटना संपूर्ण हैद्राबाद शहर अजूनही शॉकमधेच आहे. नक्की काय चुकते हे सांगणे फार कठीण आहेत. समाजात अशा विकृत प्रकृती आहेत आणि कदाचित राहतील सुद्धा. काय उपाय आहे माहित नाही. दर पाच सात वर्षांनी असे काहीतरी घडत असते. आता रात्री साडेनऊची वेळ सुद्धा सुरक्षित राहिली नाही तर कोणती वेळ सुरक्षित आहे. डोकं बधीर झाले आहे.

जॉनविक्क's picture

3 Dec 2019 - 10:30 am | जॉनविक्क

दर पाच सात वर्षांनी असे काहीतरी घडत असते.

घडत तर नेहमीच असते पाच सात वर्षे त्याबाबत विशेष काही घडत नाही म्हणून नृशंसता कळस गाठते इतकंच :(

जॉनविक्क's picture

3 Dec 2019 - 10:47 pm | जॉनविक्क

आजच मटा मधे बातमी आली फक्त पिपरिचिंचवड भागात गेल्या वर्षभरात महिन्याला सरासरी 120+ बलात्कार होत आहेत

गणेशा's picture

3 Dec 2019 - 10:15 am | गणेशा

https://www.indiatimes.com/news/india/another-aarey-yogi-govt-to-cut-dow...

आधी ही news फेक वाटली होती, काल tv9 ला पण ही बातमी ओघवती दाखवली गेली.

खरे खोटे काही आता माहिती नाही.. सर्व वृत्तपत्र आणि इतर मीडिया पण यावर काही बोलताना दिसत नाहीये

गणेशा's picture

3 Dec 2019 - 10:17 am | गणेशा

https://www.newindianexpress.com/nation/2019/nov/29/yogi-govt-to-cut-dow...

बाकी ठिकाणी news नाहीये ही

मुक्त विहारि's picture

3 Dec 2019 - 11:05 am | मुक्त विहारि

ह्यांच्या वर फार विश्वास ठेवण्यात अर्थ नाही...

असे माझे मत आहे....

गणेशा's picture

3 Dec 2019 - 1:09 pm | गणेशा

https://www.news18.com/news/india/64000-trees-to-be-displaced-for-defenc...

News18 वरती पण वाचले आता.

विश्वास नाहीच जास्त, पण ही परिस्थिती खरी असेल तर आपण नक्की कुठे जातं आहोत...

सर टोबी's picture

3 Dec 2019 - 4:39 pm | सर टोबी

गणेशा,

आमची मातृभूमी आमच्यासाठी देवदेवतांइतकीच पुज्यनीय आहे. त्या मातृभूमीच्या रक्षणासाठीच सैन्य आहे आणि त्यांच्या क्षमतेचे प्रदर्शन होणे हे सैनिकांचा हुरूप वाढविणे, जनतेच्या मनात देशभक्ती उचंबळून येईल असे काही तरी करणे आणि पाकड्यांच्या उरात धडकी भरविणे यासाठी आवश्यक आहे. यावर शांतताप्रिय धर्माचे लोक, बेगडी निधर्मी, आणि अर्बन नक्षलवादी कोकलतील परंतु त्याकडे कोणीही लक्ष देण्याची गरज नाही. देशासाठी हजार एक झाडांची आहुती म्हणजे फार मोठी गोष्ट नाही.

जय हिंद!

आपला नम्र
सर टोबी

|| जय श्री बिनाबजेटबेटीबचाओबाबा प्रसन्न ||

जोपर्यंत पॅट्रिआर्किच्या वळचणीला आपापल्या मालकांच्या सुखरूप पंखाखाली बसलेल्या चिमण्या डेथ पेनल्टी पाहिजे असल्याचा चिल्लर चिवचिवाट करत होत्या तोवर लक्ष देण्याची गरज नव्हती. कठुआतल्या कृष्णकर्मीयांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या किंवा सेंगरभावोजींना पाठीशी घालणाऱ्या किंवा चिरकुट चिन्मयानंदचे चीप चाळे खपवून घेणाऱ्या पार्टीचे अनुयायी ज्यांचे मालक आहेत, त्या ह्या चिमण्या फीलगुडसाठी आर्मचेअर उबवत चिवचिवल्या, तर कोणाला त्रास असायचे कारण नाही.
परंतु, ज्यांनी राज्यसभेत कायदा निर्माण करायच्या जड जबाबदारीने जडावून जायला हवे त्या जडबुद्धी जयाबाई (बोल)बच्चन ह्यांनी डायरेक्ट कायद्याला काडीमोड देऊन लिंचिंग नामक परदेशस्थ कल्पनेचा पुरस्कार केला हे पाहून अगदी संत्ररसचावक वाॅलरसकाकांच्याही मिशा किंचित नापसंतीने थरथरल्या असाव्यात.
जयाबाई ज्या महान उद्योगातून राज्यसभेपर्यंत पोचल्या त्याच उद्योगातली काही उदाहरणे जयाबाईंच्या जुळ्या डोळ्यांच्या परिघात बसत नाहीत ह्याचे आश्चर्य नाही; पण विषाद अवश्य वाटू शकतो. म्हणजे बघा २०१७ मध्ये आपल्याच सहकारिणीचा लैंगिक छळ करणाऱ्या विकास बहल नामक नरपुंगवाला रिलायन्सच्या अत्यंत निष्पक्षपाती अशा अतर्गत तक्रार निवारण समितीने (हसू नका) त्यांच्या सुपर थर्टी पिक्चरच्या रिलीजपूर्वीच क्लीन चीट दिली, किंवा अन्नू मलिक ह्या एरवी महान प्रतिभाशाली असलेल्या पण केवळ कडक काॅपीराईट कायद्यामुळे धंदा बसलेल्या संगीतकाराविरुद्ध सात तक्रारी असूनही “इंडियन आयडाॅल (बाॅलीवुडी उच्चार: आयडल)” नामक कार्यक्रमात पुनरेकदा परीक्षक म्हणून सन्मानाने पाचारण केले गेले; तेव्हा जयाबाई (बोल)बच्चन यांचा घसा बहुतेक पनामा पेपर्स चावून गिळल्यामुळे सुकला असावा.
ह्या अशा महान एलीटांच्या सहवासासाठी लोटांगण घालणाऱ्या महान प्राण्यांच्या कळपात आपण राहतो हे आपले नशीब!
ह्या नशीबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी खालील मंत्राचे सहस्रावर्तन करावे असे शास्त्रात लिहीले आहे.
“बहुत हुआ नारी पे वार
अब की बार मोदी सरकार”
ॐ शांती ॐ

जॉनविक्क's picture

4 Dec 2019 - 12:26 am | जॉनविक्क

मुक्त विहारि's picture

4 Dec 2019 - 7:44 am | मुक्त विहारि

वाईट झाले....

आता मोबाईल Communication महाग होत जाणार...

जॉनविक्क's picture

5 Dec 2019 - 11:23 pm | जॉनविक्क

मोदी सरकार याच कारणाने लोकांच्या नजरेत भरत आहे. मोदी आपल्याला बाहेरील शत्रू बाबत अश्वस्त करत आहेत परंतू देशाच्या अंतर्गत व्यवस्थापनात गंभीर चुका करत आहेत असेच जनमत बनत आहे

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 8:12 am | मुक्त विहारि

सरकारी आस्थापनेवर अनावश्यक खर्च खूप होतो.

त्यामुळे अशा आस्थापना बंद करणेच उत्तम.

पण , त्यांच्या वर सरकारचे नियंत्रण हवे.

ट्रम्प's picture

4 Dec 2019 - 10:22 pm | ट्रम्प

पंकजा नंतर आता नाथा खडसे
फडणवीसाचें शुकलकाष्ठ लवकर संपणार नाही असे दिसत आहे .
https://www.bbc.com/marathi/international-50662141

जॉनविक्क's picture

6 Dec 2019 - 12:00 am | जॉनविक्क

हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या.
ही बातमी.

लोकभावनेला बळी पडून त्वरीत निकाल ??

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 8:47 am | मुक्त विहारि

कायदा राबवता आला तरच वचक राहतो.

वामन देशमुख's picture

6 Dec 2019 - 10:10 am | वामन देशमुख

जे झालं ते झालं; पुन्हा असं व्हायला नको.

यशोधरा's picture

6 Dec 2019 - 11:44 am | यशोधरा

ह्या प्रकरणात पोलिसांना संशयाचा फायदा द्यायला काहीच हरकत नाही माझी तरी. निर्भया, उनाव प्रकरणात कायदेशीर मार्गाने जाऊन त्या मुलींना काय न्याय मिळाला?

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 11:48 am | मुक्त विहारि

सोनीयासेनेचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी अजून इलेक्शन मोड मधून बाहेर आलेले दिसत नाहीत.
अमूक इतके आमदार बंड करणार , अमूक इतके नेते इकडे येणार अशा वदंत पसरवून स्वतःचे सामाधान करत आहेत.
वीट यायचेही बंद झालेय आता. राज्यकर्ते म्हणून सेना नेते आणि त्यांचे सर्वेसर्वा श्री श्री श्री संजय राऊत कधी गंभीर होणार आहेत कोण जाणे.
उद्धवचा देवेगौडा सारखा अ‍ॅक्सीडेंटल मुख्यमंत्री होण्याचा प्रवास चालू झाला आहे.
कोणतेच धोरण नाही, कोणत्याही योजना नाहीत . काल काय म्हणे तर मुंबई महापालीकेत जाऊन डिझास्टर रीकव्हरी यंत्रणेची पहाणी केली.
उद्धवला सांगली कोल्हापूर मिरज ही शहरे महारास्।ट्राबाहेर आहेत आनि तिथे जाण्यासाठी पासपोर्ट लागतो असे वाटत असावे किंवा त्यांच्या मते ही शहरे सिंदबादच्या सफरी या पुस्तकातली असावीत असे वाटत असावे.
सेना नेत्यांना महाराष्ट्रात दादर वांद्रे ठाणे या पलीकडे महाराष्ट्र आहे हे कधी समजणार.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 9:34 am | मुक्त विहारि

झुणका भाकर वाढली.

आणि नंतर काढून घेतली.

टीकोजीराव's picture

7 Dec 2019 - 10:26 pm | टीकोजीराव

झुणका भाकर काय घेऊन बसलात. आता तुम्हाला 10 रुपयात ताटभर जेवण मिळणार

मुक्त विहारि's picture

23 Dec 2019 - 4:13 pm | मुक्त विहारि

आता महागाई वाढली आहे आणि नविन पिढीच्या तोंडाला पण पाने पुसायची आहेत.

आमच्या वडीलांच्या काळात, हटाव लुंगी बजाव पुंगी, ही घोषणा करण्यात आली. लुंगी इथेच राहिली आणि मराठी माणूस पुंगी वाजवत बदलापुरात गेला.

आमच्या काळी, एक रूपयात झुणका भाकर, ही योजना दिली. पण त्या काळात गरिबी इतकी वाढली की खूपसे सेलिब्रिटी पण ह्या योजनेचा लाभ घेऊ लागले.

आता तर काय, पंगतच बसवली आहे. 10 रूपयात जेवण.

वामन देशमुख's picture

17 Dec 2019 - 10:33 pm | वामन देशमुख

"देवाला रिटायर करा" असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचे निधन.

https://www.newsnation.in/entertainment/bollywood/veteran-actor-shriram-...

प्रसाद_१९८२'s picture

23 Dec 2019 - 10:16 am | प्रसाद_१९८२

कल्लूमामा गॅंगचे,
झारखंड मधे देखील "पानिपत" होणार हे आता पक्के झाले.
--
बेरोजगारी, महागाई यासारखे सर्वसामन्य जनतेचे मुद्दे सोडून,
इतर रिकामटेकडे मुद्दे घेऊन निवडणुक लढल्यावर त्याचा काय परिणाम होतो, हे महाराष्ट्राने दाखवून दिले होते. तरिही तेच मुद्दे घेऊन झारखंड निवडणुकीत भाजपा उतरला व जनतेने ह्या खोटारड्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली.

मेक ईन ईंडिया, स्मार्ट सिटी या सारख्या फसव्या योजना.
बुलेट ट्रेन हा ही असाच माथी मारलेला निर्णय.
नोटबंदी व जी एस टी यामुळे झालेले अर्थ्व्यवस्थेचे नुकसान, कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी योग्यतो अभ्यास न करता घेणे,
आताही CAA & NRC ह्या सारखे निर्णय फक्त वातावरण बिघडवणे व हिंदु मताचे ध्रुवीकरण करणे हाच उद्देश आहे असे वाटते.
आर्थिक व बेरोजगारी ह्या मुद्द्यावर वस्तुस्थिती पाहीली तर हे सरकार अपयशी ठरलेले आहे.
हवाबाजी व भावनीक राजकारण करणे एवढेच हे सरकार करत आले आहे.

एकुनच भाजपाने नक्कीच देशाला निराश केले आहे.

मुक्त विहारि's picture

23 Dec 2019 - 9:49 pm | मुक्त विहारि

निराश फक्त पाकिस्तान आहे.

जॉनविक्क's picture

23 Dec 2019 - 11:51 pm | जॉनविक्क

फक्त शेजारी उपाशी आहे म्हणून मला एक वेळ तरी जेवायला मिळतंय यात मी निराश नाही म्हणणे योग्य नाही.

गोंधळी's picture

24 Dec 2019 - 10:13 am | गोंधळी

मु.वी. जी तुम्ही आपल्या देशाची तुलना पाकिस्तान बरोबर करता यातच तुम्ही किती निराश आहात हे दिसते.

मुक्त विहारि's picture

25 Dec 2019 - 11:35 am | मुक्त विहारि

भाजप सरकार शेजारच्या उपद्रवी राष्ट्रांना योग्य त्या प्रकारे उत्तर देत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

24 Dec 2019 - 1:04 pm | प्रसाद_१९८२

कॉंग्रेसमुक्त भारत ??
--
Photo