Skip to main content

हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर

लेखक विनोदपुनेकर यांनी शुक्रवार, 06/12/2019 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे. त्यात आज पोलीस कोठडी संपत असताना सादर चारही आरोपी पहाटे तीन वाजता जिथे पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्या केली गेली त्या ठिकाणी आरोपीना घेऊन गेले असता त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला स्वाभाविक सर्वसामन्य जनतेने याचे स्वागत केले इतके कि सादर घटना स्थळी पोलिसावर फुलवर्षाव व फटके फोडून स्वागत केले गेले पण नेहमीप्रमाणी श्रीमती मनेका गांधी, अरविंद केजरीवाल आदिनीं सादर इनकॉउंटर विरोधात आवाज उठवत आरोप चालू केले आहेत माझे म्हणणे इतकेच आहे कि हे दुष्कर्म त्या चौघांनी केले असणारच इतकी खात्री आल्याशिवाय त्यांना यमसदनी पोलीस पाठवनार नाहीत खरे तर झाले तर खूप अभिनंदनीय आहे ...... हॅट्स ऑफ हेंद्राबाद पोलीस .

वाचने 67067
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

In reply to by मारवा

१ जर एनकाउन्टर फेक असेल.. म्हणजे काय मिडिया ट्रायल & एलिट क्लासनी निकाल दिलेला आहेच ़एन्काऊंटर फेकच आहे, आरोपीच्या जवळच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आणि चाळीस लाख रूपये दिले जावे, एखाद्याला निवडणूकीचं तिकीट द्यावे. २ अगोदरच ब्रुटल असलेली भारतीय पोलिस व्यवस्था... पोलीस भरती करताना टीवी अँकर, मानव अधिकार कार्यकर्ते, आर्मेचर अॅक्टिव्हीस्ट यांना प्राधान्य द्यावे. मारवाजी रस्त्यावर ट्रॅफिक नियम पाळणे कमीपणा समजणारे बहुसंख्य लोक असताना, अट्टल गुन्हेगाराला पकडताना हवालदार प्रेशरमधे असतो आजकाल गल्लीतला कुत्रा पण पोलीसावर हात टाकतो पण आरोपीला कोर्ट मध्ये नेण्याआधी मेडिकल करतात, जज आरोपीला आधी विचारतात तुम्हाला पोलिसांनी काही मारहाण केली का? मोठ्या तुरूंगात कैद्यांचे डबे चेक करणा-या पोलीसाला पण स्वतः च्या कुटुंबाची सुरक्षा आठवते. ३. राजकीय गुन्हेगारांवर आज काही कारवाई करावी तर उद्या त्यांना संरक्षण द्यावे लागते. आपल्याकडे एक थोर राजकीय व्यक्तिमत्व आहे ते वरीष्ठ पोलीस अधिका-यांना बोलताना कार्यकर्यांना सांगतात म्हणे अरे त्या कुत्र्याला बोलवा... क्रूपया विदा मागू नये ४. हायपोथेटीकल .. अहो बलात्कार करणा-यांना विरोध करू नका म्हणणारे विद्वान आपल्याकडे आहेत, उन्नावच्या आरोपींनी पिडीत व्यक्तिबरोबर काय केले समोर आहेच. जोपर्यंत पिडीत आपली कुणी नसते आपण मोकळे असतो काहीही विचार करायला. क्रूपया वैयक्तिक घेवू नये.

In reply to by यशोधरा

म्हणून तर म्हणालो होतो. ..ज्याचे जळते त्यालाच कळते... कालच, 3-4 गृपवर चर्चा झाली, ज्यांना ज्यांना मुली होत्या ते सगळेच मित्र आणि भाऊ, ह्या गोष्टी बाबत, खूष होते. कुणीही विरोधी मत प्रदर्शित केले नाही.

In reply to by जॉनविक्क

मला तुमच्या कडून ह्याच प्रश्नाची अपेक्षा होती. .. त्यांना आई, बहीण, बायको असल्याने, त्यांचे पण प्रतिसाद, Encounter केले ते योग्यच केले, अशीच होती. ..

In reply to by मुक्त विहारि

शब्द रचनाच तशी रचलेली आहे. आणि जो पर्यंत तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मी दिलेला नसेल तर आपण या धाग्यावर माझ्या प्रतिसादा ना उत्तर ही दिलेले दिसत नाही म्हणून तुम्हाला बोलते करायला तसे लिहावे लागले असो, मला इतकेच पुन्हा पुन्हा सांगायचे आहे जे स्पश्ट न बोलता ध्यानात येईल असे वाटत नाही म्हणून बोलतो. मला एकही स्त्री नातेवाईक नसती अथवा मी स्वतः स्त्री नसूनही मला सदरील चकमक घडून आल्याने आनंद वाटला मला बलात्काराचा धिक्कार करायला वजायनाच्या कुबड्या लागणे शरमेची बाब वाटते आणि चार लोकात त्याचा डंका पिटणे तर अजून लांच्छ नास्प द

वेळ आनंद साजरा करण्याची मुळीच नाही !!! रेपिस्ट लोकांचे असेच अनेक एन्काऊंटर झाले तरच मनाला समाधान वाटेल ! अनेक वर्षे केस चालुन जर आरोपींना शिक्षा द्यायला सरकारे काचकूच करत असतील तर अजून घटना घडतील आणि जसजसा वेळ जाईल लोकांना पीडितां बद्दल आत्मीयता राहणार नाही . ज्या प्रमाणे रोज अपघातात शेकडो लोक मरतात पण सार्वजनिक सुरक्षा कोणीही पाळत नाही त्याच प्रमाणे बलात्कार चे प्रमाण वाढून रोज मरे त्याला कोण रडे अशी वेळ पीडितावंर येईल . म्हणून मी म्हणतो किमान बलात्कार मध्ये तरी फेक एन्काऊंटर झालेच पाहिजे . अजून एक पर्याय , आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना ढिली सुरक्षा ठेवणे आणि सरळ जमावाच्या हवाली करणे . एक मात्र नक्की पोलीस आणि न्यायव्यवस्था यांचा म्हैस आणि धामिण सारखा वाद पुन्हा रंगणार !!!

तीन चार वर्षांच्या मुलींना सुद्धा हे रेपिस्ट उध्वस्त करतात तेंव्हा खरी चीड येते ! असल्या केसेस मध्ये सुद्धा ते आरोपी जेल मध्ये केस च्या सुनावणी ची वाट बघत आरामात जीवन जगत असतात . आजच ट्विटर वर केरळ मधील एक केस बघितली , लहान मुली चे आयुष्य उध्वस्त करणाऱ्याचे कोर्टात नेतानाचे चार वर्षापूर्वीचा आणि आता अलीकडेच्या फोटोची तुलना करून दाखवण्यात आली की जेल मध्ये त्या आरोपीने किती सुखात दिवस काढले आहेत . मग काय पेटवायचीय काय ती न्यायव्यवस्था ? निर्भया नंतर तर बलात्कार केसेस चा जणू महापूर आला आहे भारता सारख्या भोंगळ कारभार असणाऱ्या देशात बलात्कारपीडितांना आज पर्यंत न्यायासाठी तिष्ठत राहावे लागले आहे .

आरोपीनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे म्हणे.. हे खरे असेल तर ह्या पोलिसांना कोण न्याय देईल?

In reply to by यशोधरा

यमसदनी पाठवले की आरोपींना... त्यांनीच. क्लिनचीट ही मिळून जाईल एवढे जनमत सोबत असता, मग अजून काय हवय ? नाही मिळाली क्लीन चीट तरच प्रॉब्लेम होईल बघा...

In reply to by जॉनविक्क

तुम्हांला मला काय म्हणायचंय ते tangent गेलंय, तेंव्हा ते समजेपर्यंत गप्प बसलात तरी खूप झाले म्हणते मी.

In reply to by यशोधरा

तेंव्हा ते समजेपर्यंत गप्प न बसता अजून स्पष्ट करायचे शहाणपण प्रकट केले तरी समाधान पावलो म्हणतो मी.

In reply to by जॉनविक्क

जिथे तिथे तिरकस लिहायची घाई करण्यापेक्षा थोडा शांतपणे विचार केलात तर तुमचे तुम्हांलाच समजेल म्हणते मी.

भारतीय समाजाची एकुनच नीतीमत्ता सुधारणे हाच मुलभुत उपाय आहे असे वाटते. कसल्यातरी धाकाने,भीतीने गुन्हा करायचे सोडुन देत असे समजणे चुकीचे वाटते.

In reply to by गोंधळी

ही अशी मानसिकता सगळ्या जगांत कमी अधिक प्रमाणात आहेच. त्यामुळे, कठोर कायदे आणि त्वरित कारवाई, हा एक उत्तम मार्ग आहे. पाठीवर बडगा बसला की, मांजर पण सुधारते. नाहीतर मग आहेच, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय...

In reply to by मुक्त विहारि

त्यामुळे, कठोर कायदे आणि त्वरित कारवाई, हा एक उत्तम मार्ग आहे. भारतीय मानसिकता व सामाजिक परीस्थिति पाहता असे योग्य रीत्या होईल असे तुम्हाला खरच व प्रामाणिकपणे वाटते का ???

In reply to by मुक्त विहारि

मला अस म्हणायच आहे की- उदा . जर का माणसाचा एखादा अपघात झाला तर त्याला त्वरीत कारवाई म्हणजे उपाय योजना करण्याचि आवश्यकता असते पण जर का कर्करोग झाला असेल तर त्वरीत कारवाई करुन नाही चालत तर त्याच मुळ शोधुन त्या पेशींवर दीर्घ उपाय योजना करावी लागते. आता व्यापकपणे वरिल केस कधे पाहील तर हा अपघात आहे की त्याच स्वरुप कर्करोगा सारखे आहे हे ज्याने त्याने ठरवाव.

In reply to by अभिजित - १

अशी मानसिकता असेल तर प्रश्न सुट्णारतर नाहीच तर अजुन जटील होणार हे निश्चित आहे. आता यापुढे तुमच कुटुंब सुरक्षित झालेलच आहे. त्यामुळे ते रात्री अपरात्री कुठेही फिरु शकतात. तुम्हाला आता काळजीच कारणच नाही. आणि तरीही जर का तुम्हाला चिंता वाटत असेल तर तुम्ही तुम्हालाच मुर्ख बनवत आहात.

In reply to by गोंधळी

त्यामुळे, जमेल तसे आणि जमेल त्या मार्गाने, ह्या रोगाला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. कर्करोग झाला तर शस्त्रक्रिया पण आहे आणि केमोथेरपी पण आहेच. त्यामुळे , घरचे संस्कार ही केमोथेरपी.... आणि पालकांनी योग्य ते संस्कार करावेत म्हणून कठोर कायदे आणि त्वरित कारवाई. ..

फक्त कठोर कायदे गुन्हे रोखू शकत नाहीत उलट गुन्ह्याचे क्रौर्य वाढवतात. गुन्हे गारी रोखायची असेल तर मुळापासून प्रयत्न केले पाहिजेत. अगदी लहानपणा पासून उत्तम संस्कार,अतिशय संवेदनशील पोलिस आणि न्याय यंत्रणा,कमीत कमी वेळात योग्य न्याय ( न्याय चुकला तर सूडाची भावना निर्माण होते). अगदी मुळापासून प्रयत्न च गुन्हेगारी रोखू शकतात.

In reply to by Rajesh188

गुन्हे गारी रोखायची असेल तर मुळापासून प्रयत्न केले पाहिजेत. अगदी लहानपणा पासून उत्तम संस्कार, मुविजी लहानपणापासुन नेमके कोणते संस्कार केल्याने व कोणावर केल्याने गुन्हे घांबतील हे जरा विस्तार पुर्वक सांगितल तर सर्वांना उपयोग होइल. तुमच्या मनात नक्कीच काहीतरी आराखडा असेल संस्कारांचा कृपया शेअर करावा जाणुन घ्यायला आवडेल

In reply to by मारवा

एक बिनबुडाची थिओरी, लहापणापासूनच देवभोळे बनवलेले कितीतरी लोक नास्तिक झालेले सापडतील, संस्कार हा मुळात विषयच येत नाही गुन्ह्याच्या मानसिक ते मध्ये...

In reply to by शा वि कु

नेमकं काय शिक्षण व संस्कार आपणास अभिप्रेत आहेत ? लैंगिक शिक्षणाने बलात्कार थांबतील ? किंचित फरक नक्की पडेल. विशेतः लैंगिकतेबद्दलच्या निकोप मानसिकते मुळे. बलात्कारा विषयी संस्कार नेमके कितव्या वर्षी सुरू करणे अभिप्रेत आहे ? जिथे मोकळेपणी बोलायची बॉम्बाबोंब, जी स्त्री अथवा पुरुष असणे हा परिस्थितीनुसार कमालीचा advantage अथवा drawback असतो अशा परिस्थितीमध्ये संस्कार व शिक्षण फार कमी येईल असे वाटत नाही.

In reply to by शा वि कु

नेमकं काय शिक्षण व संस्कार आपणास अभिप्रेत आहेत ? लैंगिक शिक्षणाने बलात्कार थांबतील ? किंचित फरक नक्की पडेल. विशेतः लैंगिकतेबद्दलच्या निकोप मानसिकते मुळे. बलात्कारा विषयी संस्कार नेमके कितव्या वर्षी सुरू करणे अभिप्रेत आहे ? जिथे मोकळेपणी बोलायची बॉम्बाबोंब, स्त्री किंवा पुरुष असणे हा परिस्थितीनुसार कमालीचा advantage अथवा drawback असतो अशा परिस्थितीमध्ये संस्कार व शिक्षण फार कामी येईल असे वाटत नाही.

PUNE BPO Murder case - यातील बलात्कारी लोकांनी मानवी हक्काचा मुद्दा काढुन आपली फाशी मुंबई हाय कोर्ट रद्द करवून घेतली. सुप्रीम कोर्ट चा फाशीच निकाल धाब्या वर बसवला. हवं तर गुगल सर्च करा. https://timesofindia.indiatimes.com/city/pune/pune-bpo-employee-rape-an… 29 July , 2019 - HC sets aside death sentence over delay in executing them ३७१ भारतीय कैदी फाशीची शिक्षा होऊनही आज जिवंत आहेत . सरकार हातावर हात ठेवून गप्प आहे. अमित शाह काय करतोय ? मिशन लोटस ? कृपया विषय divert करू नका. भाजप सरकार फाशी द्यायला घाबरते का ? काँग्रेस घाबरत होती. भाजप पण डरपोक आहे ? आणि न्याय व्यवस्था आपले काम करतेय. हळू हळू का होईना. ३७१ लोकांना फाशी सुनावलीय. पण सरकार झोपले आहे. मग एन्काऊंटर झालं म्हणून कोणीही गळे काढू नयेत. https://www.business-standard.com/article/current-affairs/371-indians-a…

In reply to by अभिजित - १

सुरुवात स्वतः पासुन करावी कींवा तुमच्या घरातील मुला,मुलींना या कामाच महत्त्व सांगुन त्यांनाही तस करण्यास भाग पाडाव. तुमच्या घरातुन एकतरी एन्काऊंटर स्पेशालीस्ट व्हावा हीच प्रार्थना करतो.

In reply to by अभिजित - १

BPO, पुणे प्रकरणातील आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी म्हणे राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून झाल्यावर प्रशासनाने लवकर केली नाही. त्या बेसिसवर कोर्टाने त्यांची फाशी रद्द करून जन्मठेप सुनावली. हे प्रशासन कोण, त्यांना दिरंगाईमुळे जबाबदार धरून कारवाई का होत नाही? चीड येण्याजोगी गोष्ट आहे. ज्या आरोपींनी बलात्कार केल्यानन्तर ती मुलगी गयावया करत दयेची भीक मागत असताना निर्दयपणे तिच्या डोक्यात दगड घालून ठार मारले, ते केवळ सरकारी दिरंगाईमुळे वाचले. मग हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन होत असेल तर चुकीचे काय?

In reply to by अभिजित - १

आता पर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेल्या कितीतरी गुन्हेगारांना राष्टपतींनी जिवनदान दिलय. https://www.amarujala.com/india-news/first-mercy-petition-rejected-in-i…

मनमानी पद्धतीने आरोपी ठरवून एन्काऊंटर करण्याला कायदेशीर मान्यता मिळत नाही तोपर्यंत जास्त पुढचा विचार न करणाऱ्या अविवेकी लोकांना तो राक्षस देव आहे असा भास होत आहे. एकदा का असा अधिकार मिळाला की हा राक्षस आपले खरे रूप दाखवेल आणि सर्व नाश घडवेल भावना किती ही तीव्र असल्या तरी मत ही विवेकी च असावेत. सामान्य जनते विषयी बिलकुल ऑब्जेक्शन नाही कारण ती सामान्य लोक आहेत. पण राजकीय नेते,अधिकारी,विचारवंत,जबाबदार नागरिक ह्या लोकांनी संयमित च असावे . कारण त्याना हा देव रूपातील राक्षस भविष्यात काय विनाश घडवेल ह्याची पूर्ण जाणीव असते

लिहिणार नव्हतोच..पण सर्व वाचून राहवले नाही.. एनकाऊंटर ते चार जण पळून जात होते म्हणून केले हे मला तरी खरे वाटत नाही, त्यांना बेडया घालून घेऊन गेले असतीलच.. शिवाय असे चार जण कोणाच्या इतर बाह्य मदतीशिवाय पळून जात असतील असे मला वाटते नाही. असो मुद्द्यावर बोलतो.. मारले गेलेले सोडून आणखी कोणी आरोपी असतील तर आता ते कसे शोधले जाऊ शकतील, गुन्ह्यामागे आणखी काही घटना असतील का? येथे पोलिसांवर संशय घेत नाही, पण जर उद्या कोणी बलात्कार केला आणि पोलिसांना हाताला धरून दुसऱ्याला केस मध्ये अडकवले आणि काहीच न्याय प्रक्रिया न करता, पोलिसांकरवी त्या माणसाचा एनकौंटर केला तर? एनकाऊंटर करायचाच असेल तर आसाराम, रामरहीम, रामपाल, कुलदीप सेंगर . बलात्काराच्या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत या सर्वांचा एनकाऊंटर व्हावा का ? न्याय लवकर व्हावा, हे मान्य आणि यासाठीच आग्रह हवा. पण तसे न करता न्याय व्यवस्था च उधळवून लावणे किंवा त्याचे समर्थन आपण करतोय.. याचे परिणाम पुढे दिसतील.... असो..

In reply to by गणेशा

न्यायव्यवस्था उधळून लावा असे कुठे म्हटले गेल्याचे दिसत नाहीये, मिपावरच्या धाग्यातही नाही, वर्तमानवयात्रे, इतर ठिकाणी सोशल मीडियामध्येही नाही. हे म्हणजे जे नाही त्याची पुडी हळूच सोडण्यासारखे आहे. दुसरे म्हणजे पोलिसांची बाजू अगदीच विचारात घेतलेली नाहीये, म्हणजे ती खोटीच आहे, हे गृहीतक आहे. असेलही. समाजमनाचा पाठींबा ह्या एन्काऊंटरच्या कृत्याला का मिळाला असावा असे वाटते? बरोबर, चूक हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. अशा आणि कोणत्याही प्रकरणात मुळात न्यायालयीन प्रक्रिया वेळेवारी चालून आरोपीना विना विलंब जास्तीत जास्त शिक्षा होत असतील, तर समाजमन अशा एन्काऊंटर्सना पाठींबा देईल का? यथायोग्य आणि मुंगीच्या पावलांपेक्षा संथ गतीने होणाऱ्या न्यायाची वाट बघत अजून किती मुलींनी मरावे? त्या अन्यायाविषयी बोलावे वाटते का? ह्या मुलींच्या मानसिक, भावनिक खच्चीकरणाची, जीवांची किंमत काय? की नाहीच? कधीकाळी होईल किंवा नाही अशा तकलादू "न्यायाची" वाट बघत त्यांनी दुःखी, कष्टी होत, मानसिक शारीरिक क्लेश सहन करत का मरावे? जिथे मूळ पीडित व्यक्तीच्या असायची सुद्धा किंमत नाही - न्याय वगैरे लांबच्या गोष्टी - तो सूज्ञपणा काय चुलीत जाळायचा आहे? की त्या मुलींच्या मूलभूत हक्काच्या जाणिवेशी सूज्ञपणाला देणे घेणे नाही? मुळातच न्यायालयीन प्रक्रिया सुधारली तर कायदा हातात घ्यायची गरज कोणालाच भासू नये.

In reply to by यशोधरा

ताई, मी तुमच्या मताला एकदम चूकच असे म्हणत नाही. भावना प्रधान, समूहप्रिय, आणि लोकांना अपेक्षित अश्या भूमिकेपेक्षा वस्तुनिष्ठ मत मांडले मी.. कदाचित ते बऱ्याच जनांना पटणारे नसेल. पोलिसांची बाजू हि खोटीच गृहीत धरली आहे असे म्हणताना हि तुम्ही मी विचारलेल्या 2-3 प्रश्नांना उत्तर देऊ शकला नाही. त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न होता, या चार आरोपी सोडून अजून कोणी आरोपी असेल तर आता तो कसा शोधणार.?. . त्यामुळे घाई पेक्षा ठोस आणि पूर्ण कार्यवाही झाली असती तर ती न्यायव्यवस्थे शी प्रतारणा ठरली नसती. आणि न्याय व्यवस्था हि आरोपी चे कृत्य, त्याने ते करताना यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? असल्यास त्या व्यक्तीला पण आरोपी म्हणून समोर आणणे, पूर्ण पाळेमुळे शोधणे हे न्यायालयाचे काम होण्या आधीच आरोपींना मारणे हे मला योग्य वाटत नाही. भावनिक खच्चीकरण होणे, न्यायाची वाट पहात बसने क्लेश दायक आहेच हे मान्य, आणि त्या यातना कोणत्याही आई बहिणीवर येऊ नये हे मनापासून वाटते, पण म्हणून न्याय पूर्ण होई पर्यंत नं थांबणे पुढे धोकादायकच. समजा नंतर त्या फॅमिली ला कळले कि अजून एक मुख्य आरोपी त्या बलात्कारा मध्ये होता पण आधी तो समोर आलाच नाही, तर त्यावेळेस त्यांची अवस्था काय असेल? आणि ते न्याय कसे करू शकतील? पोलिसांच्या बाजूचा मुद्दा, न्याय प्रक्रिया पूर्ण न होता, आधी बलात्कार झाल्यावर पोलिसांना जे लोक शिव्यांची लाखोली वाहत होते ते आता त्यांचे अभिनंदन करत आहेत, हा पोलिसांचा विजय समजायचा की समाजाची हतबलता ? राहिला मुद्दा, न्यायालयीन प्रक्रिया सुधारणेचा आणि गतिमान करण्याचा .. जसे तुम्ही क्रियेवीण वाचाळता व्यर्थ असे बोलता तो येथे हि लागू होतो., आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधिंकडे आपण आणि सर्वांनीही या साठी कोणती मागणी केली आहे का? सर्वोच्च न्यायालयाला हि आपण विचारू शकतो, supremecourt@nic.in त्या ह्या मेल वर आपण कधी न्याय व्यवस्था फास्ट होण्यासाठी विचारना केली आहे का? केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाला ला आपण कधी अशी सूचना केली आहे का? किंवा जाब विचारला आहे का? असे काही हि न करता आपण मात्र भावना विवश होऊन हाना, मारा, तोडा असे म्हणत असू तर न्यायालयाचे अस्तित्व कश्यासाठी? असो.

In reply to by गणेशा

ह्या एका वाक्यात तुझ्या प्रश्नांची उत्तरे आहेत गणेशा. - मुळातच न्यायालयीन प्रक्रिया सुधारली तर कायदा हातात घ्यायची गरज कोणालाच भासू नये.

In reply to by यशोधरा

Ok, थांबतो. मी तुमच्या भावनेला समजत नाहीये असे नाहीये. हे सारे वाचणे हि क्लेश दायक आहे, तर प्रत्यक्ष ते भोगणे, पाहणे मरण यातना देत असतील यात दुमत नाही. त्यामुळे थांबतो.. आणि या धाग्यावर पुन्हा बोलत हि नाही. शेतकरी आत्महत्या, बलात्कार, कोवळ्या जीवांच्या हत्या, स्त्री बालकांचा मृत्यू यावर बोलणे खूपच यातना देतात. त्यामुळे यावर लिहिणे टाळतोच मी.

In reply to by गणेशा

तो तुझा निर्णय. माझ्यापुरते मी इतकेच म्हणेन की जोवर न्यायालयीन प्रक्रिया, पोलिसी तपास, चौकशा वगैरे सर्व "कायदेशीर" मार्ग पीडित स्त्रियांसाठी खरोखर वेगाने आणि पूर्ण शक्तीनिशी राबवले जात नाहीत, तोवर असा उद्रेक कधी होत असेल तर त्याला मी सरसकट चुकीचे मानू शकत नाही. मला कोणी कसलेही लेबल लावले तरी चालेल. :) असो.

In reply to by गणेशा

त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न होता, या चार आरोपी सोडून अजून कोणी आरोपी असेल तर आता तो कसा शोधणार.?. . मुळात जे पकडले गेले ते आरोपीच नव्हते असे तुम्हाला का वाटते? कोणत्याही महत्वाच्या वृत्तपत्रात असे धाडसी विधान केले गेलेले नाही. काल महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचलेली बातमी की एका आरोपीच्या वडीलांनी आरोपीने असे काही केले असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी असे मत व्यक्त केले(याचाच अर्थ तो असे काही करु शकतो याची त्यांना जाणीव असावी) गावातल्या लोकांचे म्हणणे होते की आरोपी मिळालेले पैसे ऐश करण्यात उडवायचे. यातील कोणतीही पार्श्वभूमी ते अगदी साधे सरळमार्गी होते व ते गुन्हा करणे शक्यच नव्हते याची पुष्टि करत नाही. तसेच अनेक बातम्यांमध्ये आरोपींना सीसीटीवी फुटेज वगैरे उपयोग करुन पकडल्याचे वाचनात आले। आरोपींना लगेच पकडल्यामुळे त्यांचे फोन डिटेल्स व वैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांजवळ असेलच आणि या चकमकी ची चौकशी होईल त्यावेळी हे पुरावे नक्कीच विचारात घेतले जातील. त्यामुळे खरे काय ते लवकरच कळेल. बाकी तुम्ही न्याय व्यवस्थेला सुधारण्यासाठी काय केले हे विचारत आहात तर त्याचे उत्तर असे आहे की कोणत्याही राज्याचा प्रमुख सार्वभौम न्याय व्यवस्थेला सुधारायला जात नाही कारण त्यांच्या हातात त्यांच्या अनेक नाड्या असतात. मुख्य न्यायमूर्तींसमोर बैठकीत हे लोक कसे बोलतात ते पाहायला हवे तुम्ही (मी पाहिले आहे) त्यामुळे कधी प्रत्यक्ष भेट झाली तर सांगेन. इथे सार्वजनिक संस्थळावर अशा संवेदनशील गोष्टी लिहणे योग्य होणार नाही. बाकी चालुद्या

अन्य था हे मि पा आहे की व्हॉटसअप ग्रुप अशी शंका येऊ लागली होती विशेषत: ज्यांना सुज्ञ समजावे अशी मानसिकता प्रदर्शित करणाऱ्या म्हाभागांच्या प्रतिक्रिया वाचून

अन्य था हे मि पा आहे की व्हॉटसअप ग्रुप अशी शंका येऊ लागली होती विशेषत: ज्यांना सुज्ञ समजावे अशी मानसिकता प्रदर्शित करणाऱ्या म्हाभागांच्या प्रतिक्रिया वाचून

गॉडफादर मध्ये मुलीचा बाप त्याच्याकडे न्यायाची याचिका करण्यासाठी येतो हा सीन आठवला . त्याचा स्ट्रीट जस्टीस नेहमीच आकर्षक वाटतो. मात्र त्याची किंमतही चुकवावी लागत असते. न्याययंत्रणा डावलुन त्यातील प्रक्रिया डावलुन न्याया ची अपेक्षा पोलिंसाकडुन केली जात असेल तर मग तुम्हाला पोलिसस्टेट ची ही तयारी बाळगावी लागेल. पोलिसांकडुन मग अन्याय्य झाला तर मग पुढचा पर्याय काय असेल ? हा प्रश्न नुसता वेगवान न्यायाचा नसुन मुलभुत समाज व्यवस्थेचा आहे. अशी व्यवस्था आपल्याला लोकशाहीला चालेल का ? मग उद्या खाप पंचायती ही फास्ट जस्टीस देतात म्हणुन त्यांचे ही समर्थन करता येइल काय ? इथे आपण प्रगल्भ लोकशाहीत न्याययंत्रणे ला केवळ अधिकारच दिलेला नाहीये तर एक मोठी जबाबदारी एक व्यवस्था ही दिलेली आहे ज्या अन्व्यये उचित न्याय साध्य होइल याची अनेक अंगांनी काळजी घेणे अपेक्षित असते. सध्याच्या न्यायसंस्थेंत प्रचंड त्रुटी कमतरता आहेतच आहेत हे मान्यच आहे. त्यात सुधार करण्याचे प्रयत्न करणे हे हे अत्यावश्यक आहे जुने कायदे रद्द करणे कालोचित बदल करणे इ. अनेक बाबी करणे सर्व मान्य आहे योग्य आहे. पण हे होत नाही म्हणुन ही पॉवर पोलिस वा त्याहुन झाले नाही तर इतर कोणा ला सोपवणे हा पर्याय भयावह आहे. याने जे अराजक माजेल ते भयंकर असेल. लोकशाही न्यायववस्था या दिर्घ काळाने उत्क्रांत होत आलेल्या बेस्ट पॉसिबल व्यवस्था आहेत त्यांना डावलुन तोडुन काहीही साध्य होणार नाही. जर त्याहुन प्रगल्भ पर्याय आला तरच ते योग्य होइल.

In reply to by मारवा

हेच लोकं विचारात घेत नाहीत, इथे न्याय झालाय की बदला हेच अजून स्पष्ट नाही आणि लोक सुरूही झाले न्याय झालाय म्हणायला. असो, घडले त्याचा मी विरोधक नाही एव्हढच सद्या पुरेसे आहे.

तुम्ही स्त्री असतात तर आणि तरच तुम्हाला बहीण आई मुलगी असती तर आणि तरच तुम्हाला यातील वेदना कळली असती वगैरे वगैरे पण यापैकी तुम्ही काहीही नसल्याने तुम्ही पात्र नाहीतच शिवाय आम्ही व आम्हाला हे सर्व आहेत म्हणुन ते अधोरेखीत करुन "दाखवुन " देणे हा सर्व प्रकार व हा पात्रता काढणारा प्रतिसाद नेहमीचाच यशस्वी असला तरी व एरवी अदखलपात्र असला तरी यावेळेस यावरचे जॉन विक्क यांनी त्यास उत्तम प्रत्युत्तर दिल्याने तो रडारवर आला.

इथे सर्व लोकांच्या आयुष्यात स्त्री कोणत्या ना कोणत्या रूपात आहे. त्या मुळे तुमची आई,बहीण,मुलगीअशी असती तर एन्काऊंटर योग्य ठरवलं असते असा प्रश्न काही व्यक्त करत आहेत. पिडीत कुटुंबाच्या भावनेशी पूर्ण सहमत आहोत. अशीच भावना सर्व लोकांची असेल. पण कायदेशीर मार्गाने शिक्षा होणे हे आरोपी ची फायद्याचे नसून समाजातील कमजोर लोकांच्या फायद्याचे आहे

मुंबई मध्ये gangwar मोडून काढण्यासाठी पोलिस नी चालवलेली एन्काऊंटर ची मोहीम गरजेची होती. कायदेशीर मार्गाने गॅंग वॉर संपवता आले नसते. माथेफिरू बिहारी तरुणाचे बस मधील एन्काऊंटर ही सुद्धा गरजच होती . तसेच सर्रास नाही पण बलात्कार सारख्या गुन्ह्यात एन्काऊंटर तात्पुरते कायदेशीर करावे आणि काही नियम आखून द्यावेत. एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींनी स्त्री वर बलात्कार करून तिची हत्या केली असेल किंवा गंभीर शारीरिक इजा केली असेल तर अश्या गुंडांचे एन्काऊंटर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकारात करण्यास मान्यता द्यावी. हा प्रयोग यशस्वी झाला तर कायमस्वरूपी तरतूद करावी. संगनमताने शारीरिक संबंध ठेवून नंतर बलात्कार ची ओरड करणारे,किरकोळ छेड छाड . काही विशिष्ट हेतूने प्रेरित होवून विनय भंगाचे आरोप ह्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यात कायदेशीर कोर्टाचा मार्ग अवलंबावा सर्व पुरावे तपासावे

समजा हरेन पांड्या, खुन प्रकरणातील मुख्य संशयीत, अमित शाह यांचा प्रदिर्घ न्यायालयीन प्रोसेस मधून सुटून बाहेर येण्या ऐवजी, कुणी इन्स्टंट जस्टीस म्हणून तेंव्हाच/लागलीच एन्काऊंटर केला असता. तर भारत त्यांच्या ऑपरेशन लोटस सारख्या बहाद्दरी पाहण्यावाचून वंचित झाला असता.

In reply to by ट्रम्प

चांगले झाले असते की, कारण त्या नंतर, "पप्पु" हा मुद्दा उपस्थित करून, सध्या फोफावलेले एक राजकीय बांडगुळ वाढले नसते.

भयानक आहे वर्तमान पत्रात वाचलं नेटवर बलात्काराचे व्हिडिओ सर्च करण्यात भारत तिसरा देश आहे. असं कसं असू शकतं प्रत्येक व्यक्ति एका स्रीच्यापोटी जन्म घेते तरीही बलात्काराची घ्रूणा वाटायचं दूर नेटवर सर्च??? हीपोक्रसी. मनानी एवढे बलात्कारी असल्यावर कुठली न्यायव्यवस्था, पोलीस,सायकीयाट्रीस काय करू शकतील

In reply to by झेन

भारतीय मीडिया chya दर्जा ची तुलना नुकतेच जन्म घेतलेल्या मुलाच्या बुध्दी शी केली जाते .. जागतिक सर्वात जास्त अपरिपक्व नादान मीडियानं तुम्ही स्वतः आजूबाजूला बघा आणि स्वतः स्वतःचे मत बनवा

मुलात बलात्कार गुन्ह्यातिल आरोपि ज्याला कोर्टाने फाशिचि शिक्शा सुनावलि आहे त्याला दयेच्या अर्जाचा अधिकार असावा का ? जर त्यचा गुन्हा सिध्द झाला असेल कोर्टात आनि फशिचि शिक्शा सुनावलि असेल तर त्यला राष्ट्र्पति कडे दयेचा अर्ज कर्न्याचा अधिकार नसावा असे वाटते